✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उत्तर सांगा...

य
योगप्रभू यांनी
Fri, 07/13/2012 - 13:32  ·  लेख
लेख
माझे नाव स्थिरबुद्धी. मी जंबूकाचार्यांचा शिष्य. अनाथ सापडलेल्या माझे संगोपन व शिक्षण जंबूकाचार्यांनी केले. अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा देताना आचार्य मला म्हणाले, 'स्थिरबुद्धी. तुला स्वतःचे कुणी नाही. मलाही मेधा या एकुलत्या एक मुलीखेरीज कुणी नाही. तू मेधाशी परिणय करुन हे गुरुकुल चालवावेस असे मला वाटते.' त्यावर मी म्हणालो, 'गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्‍या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो. त्यामुळे भगिनीसम मेधाशी विवाह अनुचित नाही का ठरणार?' आचार्यांनी मेधाला बोलवून विचारले. मेधा ही अत्यंत बुद्धिमान, पण खोडकर होती. ती म्हणाली, ' मी आजवर स्थिरबुद्धीकडे बंधू या नात्याने कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे मला तो पती म्हणून चालेल. पण 'कन्या हे परधन' असे आपली नीती सांगते. स्थिरबुद्धी इथेच राहिला तर माझी सासरी पाठवणी होणार नाही आणि परधन स्वतःकडे ठेऊन घेतल्याचा दोष तुम्हाला लागेल. अर्थात स्थिरबुद्धीने अन्यत्र गुरुकुल चालवले तर मी त्याची सहचरी बनायला तयार आहे. मात्र त्याने येथे गुरुकुल चालवण्यात मला अडचण वाटते.' आम्ही उपस्थित केलेल्या या पेचावर आचार्यांनी काय केले असावे? या कहाणीचा शेवट काय झाला असावा, असे तुम्हाला वाटते?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7958 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

स्थिरबुद्धी ला गुरुकुल ही

गणेशा
Fri, 07/13/2012 - 13:50 नवीन
स्थिरबुद्धी ला गुरुकुल ही चालवायला द्यायचे आणि मेधाशी परिणय ही करुन आणयचा असे दोन्ही ही साध्य करायचेच आहे असे गृहीत धरुन उत्तर देतो ( नाहीतर बरेच पर्याय तयार होतील) प्रथमता जंबुकाचार्य सर्व गुरुकुल आपल्या शिष्याकडे सोपवुन (विकुन्/हस्तांतरीत करुन/ नावे देवून) मेधा बरोबर इतर कोठे तरी रहायला निघुन जातील. नंतर ते मेधाचा विवाह स्थिरबुद्दीशी करतील.
  • Log in or register to post comments

-१

गवि
Fri, 07/13/2012 - 13:56 नवीन
या मार्गाने 'मुलगी हे परधन" हा प्रश्न सुटला तरी भगिनीसमान मेधाशी विवाह करण्याची इच्छा नसणे हे यात सुटलेलं नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/13/2012 - 14:05 नवीन
अहो मेधालाच गुरुकुल चालवायला दिले की सगळे प्रश्नच सुटले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आता असं पहा . .

गवि
Fri, 07/13/2012 - 14:37 नवीन
पराषेट पराषेट, अहो मेधा गुरुकन्येची थेट प्रोप्रायटर झाली तरी स्थिबुबाबतचं तिचं भगिनीपद आपोआप गळून पडणार आहे थोडंच.. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छे !

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/13/2012 - 16:15 नवीन
काय हे गवि ? अडकलात 'योग'मायेत ? जंबूकाचार्यांच्या जागी 'शरदाचार्य' घ्या आणि लग्नाच्या जागी 'मुख्यमंत्रीपद' घ्या. आता सोडवा बरे कोडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वरचा 'सा'!!

श्रीरंग
Mon, 07/16/2012 - 10:15 नवीन
वरचा 'सा'!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आपले बरोबर आहे. पण गुरुदेव!

गणेशा
Fri, 07/13/2012 - 14:07 नवीन
आपले बरोबर आहे. पण
गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात
या एका वाक्यावर आणि मेधाने त्याला बंधुसम न मानल्याने , या प्रश्नाला मी एका फटक्यात विसरलोच की. जर बघिनीसम मेधाशी त्याला लग्न करण्याची इच्छा नसेल तर उत्तर वेगळे होयील वाटते. --- बाकी आणखिन आलेले रिप्लाय वाचुन मज्जा येते आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कॉलेजात असताना मानलेला भाउ अन

पक पक पक
Fri, 07/13/2012 - 21:47 नवीन
कॉलेजात असताना मानलेला भाउ अन मानलेली बहिण नावाचा प्रकार फार वेळा पहाण्यात आला होता.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

दादाभाई नवरोजी !

नाना चेंगट
Sat, 07/14/2012 - 13:22 नवीन
दादाभाई नवरोजी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

गुरुकुलाच्या शेजारी दुसरे

JAGOMOHANPYARE
Fri, 07/13/2012 - 13:53 नवीन
गुरुकुलाच्या शेजारी दुसरे न्यू गुरुकुल काढावे.
  • Log in or register to post comments

हेच म्हणणार होतो.

बॅटमॅन
Fri, 07/13/2012 - 13:55 नवीन
हेच म्हणणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

अरे रे !

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/13/2012 - 13:56 नवीन
विशिष्ठ जातीने विशिष्ठ जातीसाठी काढलेला धागा.
  • Log in or register to post comments

कैच्याकै...उगाचच

टवाळ कार्टा
Fri, 07/13/2012 - 21:44 नवीन
कैच्याकै...उगाचच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

१)जंबूकाचार्यांनी ते गुरूकुल

कवटी
Fri, 07/13/2012 - 13:57 नवीन
१)जंबूकाचार्यांनी ते गुरूकुल स्थिरबुद्धीच्या हवाली करून तेथून स्वतः चालते झाले... २)स्थिबुने गुरूकुला समोरच न्यु (हा एकदम छोट्या टाईपात) गुरूकुल चालू करून आचार्यांचा धंदा बसवला... ३) स्थिबुने बाजूच्याच गावात संसार थाटून गुरूकुलासाठी अप्-डाऊन सुरू केले... अजून सुचतील तसे देतोच... सध्या पोच समजावी.... खरे उत्तर ऐकायची लै उत्सुकत आहे.
  • Log in or register to post comments

गुरुकुल आचार्यानीच चालवलं, अन

५० फक्त
Fri, 07/13/2012 - 14:04 नवीन
गुरुकुल आचार्यानीच चालवलं, अन स्थिबु आणि मेघाला, ते दोघं लक्ष्मी विष्णुचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला तर सगळे प्रश्न मिटतील, मग पुढं मागं गुरुकुल चाललं नाही तरी चालेल, कसे ?
  • Log in or register to post comments

लिव्ह इन रीलेशन मधे

कपिलमुनी
Fri, 07/13/2012 - 14:10 नवीन
लिव्ह इन रीलेशन मधे रहातील .. ;) कशाला पाहिजे लग्नाचं झंझट !!!
  • Log in or register to post comments

बास बास बास!!

इनिगोय
Fri, 07/13/2012 - 15:05 नवीन
येSSSकदम बेश्ट. पाहिजेच कशाला लग्नाची झंझट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

त्यापेक्षा ते TomKat सारखं ३

एमी
Sat, 07/14/2012 - 15:56 नवीन
त्यापेक्षा ते TomKat सारखं ३ वर्षाँचं कॉँट्रेक्ट चांगलं... पूर्वी 7 year itch असायचं आता 3 year म्हणजे लय झालं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

१.आधी मेधेला कोणा चौथ्या

sagarpdy
Fri, 07/13/2012 - 14:11 नवीन
१.आधी मेधेला कोणा चौथ्या माणसास दत्तक द्यावे. आता मेधा कायदेशीररीत्या आचार्यांची कन्या नाही. आणि गुरुकुल हे तिचे माहेर हि नाही. २. गुरुकुल स्थिरबुद्धीच्या नवे करून हिमालयात जावे (उगाच कशाला ढवळाढवळ रिटायर झाल्यावर!?)
  • Log in or register to post comments

पण जो पर्यंत सांगोपण केले

गणेशा
Fri, 07/13/2012 - 14:20 नवीन
पण जो पर्यंत सांगोपण केले तोपर्यंत मेधा ही त्यांची मुलगीच होती, त्यामुळे एकदा बहिनीसम माणलेल्या व्यक्तीस असे दूसर्याला दत्तक दिले की सर्व आधीचे नाते नष्ट कसे होयील. असे असेन तर, ज्या दिवशी गुरु ने शिकवणे बंद केले त्या दिवशी ते स्थिरबुद्दीचे गुरु राहिले नाही.. म्हणजे पिताच राहिले नाहित.. असा युक्तिवाद पण उभा राहु शकतोच की.. पण हे योग्य वाटत नाहि बॉ.. बाकी काय चालु आहे साहेब ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

कोड्यासाठी जुळवाजुळव! बाकी

sagarpdy
Fri, 07/13/2012 - 14:44 नवीन
कोड्यासाठी जुळवाजुळव! बाकी चर्चा ख.व. मध्ये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

स्थिरबुद्धी आणी मंदबुद्धी

मराठमोळा
Fri, 07/13/2012 - 14:13 नवीन
स्थिरबुद्धी आणी मंदबुद्धी (पक्षी :मेधा) यांना एकमेकाशी लग्न करण्याची ईच्छा आहे आणि जंबुकाचार्य यांचा याला विरोध नसेल तर नीती वगैरे ला फाट्यावर मारावे. आणि त्या मेधाला अति शहाणपणा करु नये असा सल्ला द्यावा.. (स्वगतः स्त्री ही पित्याची देखील शत्रू असते की काय? पळा...) ;)
  • Log in or register to post comments

पळा...) पळा का हो.. तुमचे

गणेशा
Fri, 07/13/2012 - 14:17 नवीन
पळा...)
पळा का हो.. तुमचे कोणॅए शत्रु आहेत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

"आपण मेधाचाही विचार घ्यावात.

कवटी
Fri, 07/13/2012 - 14:30 नवीन
"आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्‍या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो. त्यामुळे भगिनीसम मेधाशी विवाह अनुचित नाही का ठरणार?' अरे चोरा!!!! येवढ सगळ अनुचित वाटतय तर पुन्हा आणि मेधाचा विचार कशाला घ्यायला सांगतोय्स? सरळ सांगना ती मला बहिणी सारखी आहे अतएव लग्नाचे जमणार नाही, गुरूकुल देत असलात तर बोला! पण नाही. याला दोन्ही हवय... एक तर लहानपणापासून त्या मेधावर लाईन मारली. नंतर तिला नादी लावलं आणि अता तिचा बापच लग्न करून द्यायला लागल्यावर याला जबाब्दारी नको. प्रभुगुर्जी , सोडू नका त्याला... चंगला कानाला धरून लग्नाला उभा करा.
  • Log in or register to post comments

आयला लाईन मारायची मेघा

५० फक्त
Fri, 07/13/2012 - 15:34 नवीन
आयला लाईन मारायची मेघा (संदर्भ - मी याला भावासारखं पाहिलं नाही वगैरे वगैरे ), आणि आळ बिचा-या शिष्यावर, पुरुषजातीवर हा अन्याव फार प्राचीन आहे, असं आमचं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

पुरुषजातीवर हा अन्याव फार

कवटी
Fri, 07/13/2012 - 15:49 नवीन
पुरुषजातीवर हा अन्याव फार प्राचीन आहे, असं आमचं मत आहे. आज मला तुमच्यात युयुत्सु दिसले!!! कवटीत्सु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पुरुषजातीवर हा अन्याव फार

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/13/2012 - 15:57 नवीन
पुरुषजातीवर हा अन्याव फार प्राचीन आहे, असं आमचं मत आहे. जोरदार अणुमोदण ;-) ह्या इरुद्ध आवाज उठवायला हवा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

जोर्दार अणु(की

बॅटमॅन
Fri, 07/13/2012 - 16:35 नवीन
जोर्दार अणु(की हिग्स्?)मोदण!!!!!!!! या अन्यायाचे परिमार्जन तर दूरच, याला साधी वाचादेखील कोणी फोडत नाही, साली बहुत नाइन्साफी है रे ठाकुर!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

गुरुआज्ञा बलियसि

निश
Fri, 07/13/2012 - 15:11 नवीन
गुरुआज्ञा बलियसि / गुरुईच्छा बलियसि.
  • Log in or register to post comments

त्याचं काय आहे

चैतन्य दीक्षित
Fri, 07/13/2012 - 16:23 नवीन
त्याचं काय आहे, त्या स्थिबुचा मेन प्रॉब्लेम (म्हणजे मुख्य प्रॉब्लेम, नाय तर 'मेन' या शब्दावर कुणी तरी श्लेष करायचं ;)) असा आहे की मेधा 'भगिनीसम' आहे म्हणजे जिला 'सम' बहिणी आहेत अशी आहे. त्या मेधाला २ किंवा २ च्या पटीत बहिणी असाव्यात. मेधाला विषम बहिणी असतील तर स्थिबुला प्राब्लेम नाय. त्यामुळे प्राब्लेम सोडवायचा असला तर जंबुकाचार्यांना पुढच्या पाळण्याचं मनावर घेतलं पायजेल :)
  • Log in or register to post comments

आणि पुढल्या पाळण्यात पोरगीच

प्रीत-मोहर
Fri, 07/13/2012 - 16:28 नवीन
आणि पुढल्या पाळण्यात पोरगीच झाली पायजेल. म्हंजे थिबु स्त्रीयांचे जास्तीत जास्त जन्म व्हावेत ह्या मताचा होतर थोडक्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

असे केले तर...

चिखलू
Sat, 07/14/2012 - 12:46 नवीन
आचार्य मेधाला घेउन दुसरीकडे जातात. आता आश्रमाचा गुरू स्थिरबुद्धि. नंतर मेधा स्थिरबुद्धिची शिष्या होते, ती शिष्या झाल्यानंतर स्थिरबुद्धिचे आणि तिचे आधीचे नाते अस्तित्वात राहत नाही. म्हणजे गुरूभगिनी ऐवजी शिष्येशी लग्न...... येतायना मग लग्नाला..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

ब्रूट्स ( हाच ना ! ) यु टू

सुहास..
Fri, 07/13/2012 - 16:26 नवीन
ब्रूट्स ( हाच ना ! ) यु टू ;)
  • Log in or register to post comments

जंबुकाचार्यांनी स्थिरबुध्दीला

प्राध्यापक
Fri, 07/13/2012 - 17:00 नवीन
जंबुकाचार्यांनी स्थिरबुध्दीला गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा दिली व त्यानंतर आपल्या मुली चे लग्न त्याच्याशी लावुन दिले जंबुकाचार्यांचे गुरुकुल स्थिरबुध्दीने चालवण्याचा प्रश्नच येत नाही कारण स्थिरबुध्दी जिथे राहील तिथे त्याचे गुरुकुल आपोआपच चालु होइल .
  • Log in or register to post comments

दुपारीच

श्रावण मोडक
Fri, 07/13/2012 - 17:00 नवीन
आज काय दुपारीच का? असो. ;-)
  • Log in or register to post comments

(No subject)

sagarpdy
Fri, 07/13/2012 - 18:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

स्थिरबुद्धी - मेधा

श्रावण मोडक
Fri, 07/13/2012 - 23:32 नवीन
इतकंच माहिती आहे की, मेधा ही स्थिरबुद्धीची पत्नी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मग ही फसवणूक म्हणावी लागेल.

रेवती
Sat, 07/14/2012 - 02:33 नवीन
मग ही फसवणूक म्हणावी लागेल. ;) आम्ही कोडे शिरेसली घेतले. तुम्ही म्हणता तश्या अर्थाने (तो आधी माहीत होता पण त्या अर्थी घेतले नाही) हे लग्न होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

(No subject)

जेनी...
Sun, 07/15/2012 - 09:52 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

दोनच गोष्टी विवाहात अडसर ठरत

रेवती
Fri, 07/13/2012 - 20:19 नवीन
दोनच गोष्टी विवाहात अडसर ठरत आहेत. १. मेधा ही टेक्निकली भगिनीसमान वाटणे. २. त्याच गावात गुरुकुल चालवणे. उपाय. १. मेधास दत्तक देणे. २. दुसर्‍या गावी गुरुकुल चालू करणे. या दोन्ही गोष्टी सहज शक्य आहेत. जे स्थिरबुद्धीला वाटते आहे ते मेधास वाटत नाही व जे मेधास मान्य आहे ते स्थिरबुद्धीस पटत नाही. अगदी योग्य जोडी आहे. संसार सुखाचा करतील. ;)
  • Log in or register to post comments

जे स्थिरबुद्धीला वाटते आहे ते

पक पक पक
Fri, 07/13/2012 - 22:56 नवीन
जे स्थिरबुद्धीला वाटते आहे ते मेधास वाटत नाही व जे मेधास मान्य आहे ते स्थिरबुद्धीस पटत नाही. अगदी योग्य जोडी आहे. संसार सुखाचा करतील. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कथा कोणत्या काळातली आहे?

ऋषिकेश
Fri, 07/13/2012 - 22:21 नवीन
कथा कोणत्या काळातली आहे?
  • Log in or register to post comments

कथा कोणत्या काळातली आहे? काय

पक पक पक
Fri, 07/13/2012 - 23:02 नवीन
कथा कोणत्या काळातली आहे? काय फरक पड्तोय , लग्न निर्विघ्न पार पडावे एवढेच म्हणणे आहे.म्हण्जे कथेचा शेवट छान होईल.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

छान होइल नाही छान झाला आहे.

अभ्या..
Sat, 07/14/2012 - 00:15 नवीन
तो असा... तिघेही आप्ल्या ईच्छा अपुर्या ठेउन मरतात. आणि मोह्बतेन नावाच्या चित्रपटात येतात. गुरुकुल ट्रान्स्फर होते. प्रेम चालू राहते. नवीन पिढीला पण सन्देश मिळतो.
  • Log in or register to post comments

.

आत्मशून्य
Sat, 07/14/2012 - 00:16 नवीन
मी आजवर स्थिरबुद्धीकडे बंधू या नात्याने कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे मला तो पती म्हणून चालेल.
हॅहॅहॅ. असो, ये शादी नही हो सकती.
  • Log in or register to post comments

जंबुकाचार्यांनी ते स्थिबुचे

सूड
Sat, 07/14/2012 - 09:17 नवीन
जंबुकाचार्यांनी ते स्थिबुचे मामा असल्याचं सांगावं (थोडक्यात, थाप मारावी).
  • Log in or register to post comments

प्रतिसाद, मध्येच आला, पुन्हा देतो...

चिखलू
Sat, 07/14/2012 - 12:50 नवीन
आचार्य मेधाला घेउन दुसरीकडे जातात. आता आश्रमाचा गुरू स्थिरबुद्धि. नंतर मेधा स्थिरबुद्धिची शिष्या होते, ती शिष्या झाल्यानंतर स्थिरबुद्धिचे आणि तिचे आधीचे नाते अस्तित्वात राहत नाही. म्हणजे गुरूभगिनी ऐवजी शिष्येशी लग्न...... येतायना मग लग्नाला..........
  • Log in or register to post comments

मेधा स्थिरबुद्धिची शिष्या

मन१
Sat, 07/14/2012 - 13:46 नवीन
मेधा स्थिरबुद्धिची शिष्या ओ भाउराव, शिष्या ही पुत्रीसमान असते असे आपल्या हिमालयासम उत्तुंग संस्कृतीने म्हटले तर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिखलू

ते जाऊ द्या ! लग्न झाले तर

नाना चेंगट
Sat, 07/14/2012 - 13:25 नवीन
ते जाऊ द्या ! लग्न झाले तर जेवणाचा मेन्यु काय आहे? त्यानुसार पाकिट बनवायला !
  • Log in or register to post comments

त्यानुसार पाकिट बनवायला

पक पक पक
Sat, 07/14/2012 - 16:04 नवीन
त्यानुसार पाकिट बनवायला ! जेवण करुन मगच पाकिट भरायला घ्या... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा