Skip to main content

कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/07/2012 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली, फार पुर्वी दारासिंहानी आम्हाला आनंद दिला त्यांच्या फ्लाईंग किक्स व फ्री स्टाईल डावपेचांमुळे. आम्ही फिदा होतो 'लुटेरा' (१९६५) पाहून. त्यात लप्याचे संगीत, सिनेमा फार लक्षात राहिला. त्यातील गाण्यामुळे.... १ पतली कमर नाजुक उमर....... स्त्री वेषातील दारासिंहची नृत्यकला ! २.ऩींद निगाहों की खो जाती है, क्योंकि जवानी में हो जाती है मुहब्बत,,, ८ या गाण्यात म्हणे मुहब्बत शब्द ४९ वेळा आला आहे! ३.सनम राह भूले यहां आते आते.....। ४. ओ दिल वालो, साज दिल पे जरा झूम लो। ५. किसी को पता ना चले बात का ...। ६. मुझे देखिए मैं कोई दासतां हूं।रात से कहो रुके ज़रा...... काय चित्रगुप्त... पद्मा टॉकीज, सांगली? ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4975
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

तरी म्हणलं दारासिंग जाऊन इतका वेळ झाला तरी अजून सुतकी धागा कसा नाही आला.... पण विंगकमांडर तुम्हाला सलाम! उगाच फेफरातली बातमी इकडे छापून उगाच स्वतः ची धागा संख्या वाढवण्यापेक्षा तुम्ही अनोखी श्रद्धांजली अर्पण केलीत.

In reply to by आंबोळी

>>>> तरी म्हणलं दारासिंग जाऊन इतका वेळ झाला तरी अजून सुतकी धागा कसा नाही आला... चालायचंच.....तसंही कोणाचंही मरण आता तितकसं संवेदनशील राहीलेलं नाही, रोजच लोक अनेकानेक कारणानं मरताहेत. वार्धक्याचंही मरण तसंच. आपण अमरत्वाचं वरदानं घेऊन आलेल्यांनी कोणाकोणाच्या कलेवर अश्रू ढाळायचेत, नाही का...? >>>>फेफरातली बातमी इकडे छापून उगाच स्वतः ची धागा संख्या वाढवण्यापेक्षा तुम्ही अनोखी श्रद्धांजली अर्पण केलीत श्रद्धांजलीबरोबर काही अधिकची माहिती असलीच पाहिजे, विंग कमांडर यांनी चांगले दुवे डकवलेत. धन्स. -दिलीप बिरुटे

त्या वयात बघितलेले दारासिंग चे सिनेमे म्हणजे मर्मबंधातली ठेव. अर्थात त्यातील फक्त मारामारीच बघायची असे. नायिकेच्या मागे बागेत वगैरे गाणे म्हणताना बघून हसू यायचे: http://www.youtube.com/watch?v=EEQBZmcUdm8&feature=results_video&playne… (सिनेमा: 'नसीहत' संगीत: ओपी नय्यर) त्याकाळी दारासिंग आणि ओपी नैय्यर ही आमची दैवते. दारासिंग यांनी 'नसीहत' हा सिनेमा केला, तेंव्हा "हम कुश्तीके बादशाह है, आप संगीतके बादशाह हो" असे म्हणून ओपींना संगीतासाठी पाचारण केले. 'नसीहत' मधील आणखी एक गाणे: http://www.youtube.com/watch?v=dC6s1NJJZO0 दारासिंग 'फिल्मोग्राफी: http://cineplot.com/dara-singh-filmography/

In reply to by चित्रगुप्त

काही देमार चित्रपटाना ओपीनी संगीत दिले. त्यावेळी ए ग्रेड सिनेमासाठी मिळणारे पैसे त्यानी वसूल केले. या चित्रपटांत नायकापेक्षा ओपी ची कमाई अधिक झाली म्हणे ! दारा साहेबांचे कौतुक यासाठी, आदर यासाठी की १९५२पासून ते २००५ पर्यंत ते कोपर्‍यात कधी जाऊन बसले नाहीत. झोतात राहिले.

आजच्या पिढीला शर्ट काढणारा सलमान फारच आवडतो. पण सलमान बिलमान जन्मलेसुद्धा नव्हते तेंव्हा हा "ही मॅन" त्या काळात हे करीत होता. विश्वास बसणार नाही ना. हे बघा.

आपण दिलेलेल दुवे खासच. (शेवटचा दुवा गडबडला आहे) दारासिंगची खास ओळख रामानंद सागर यांच्या रामायणातल्या मारुती पासून झाली. फिल्म इंड्रष्ट्रीतला सर्वात शक्तीमान माणूस दारासिंग असे एक चित्र मनात असलेले अनेक असतील. तगडा माणूस दिसला की 'दारासिंग' दिसतोय, असे म्हटल्या जायचे. असो. दीर्घकाळ स्मरणात राहणारा हरहुन्नरी कलाकार. माझीही भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दारासिंगची खास ओळख रामानंद सागर यांच्या रामायणातल्या मारुती पासून झाली. असहमत. असे म्हणणे म्हणजे दारासिंग ह्यांच्यातील पहिलवानाचा आणि कलाकाराचाही अपमान आहे असे वाटते. दारासिंग 'रुस्तम-ए-हिन्द' पासून प्रकाशझोतात आले. पहिलवान म्हणूनही त्यांची कारकिर्द जगभरात नावाजलेली आहे. ह्या जोडणीवर बर्‍यापैकी माहिती आहे. रामायणाच्या कितीतरी आधी चित्रपट क्षेत्रात मुमताज बरोबर मुख्य भूमिकेत त्यांनी १७ चित्रपट केले आहेत. चित्रपट सृष्टीच्या कृष्ण-धवल कालखंडापासून दारासिंग यशाच्या शिखरावर होते. चित्रपटसृष्टीचा रंगीत जमाना सुरु झाला आणि ते मागे पडले. तरीही दुय्यम भूमिकांमधून त्यांनी लक्षात राहण्याजोग्या भूमिका केल्या. 'आनंद', 'चमेली की शादी' वगैरे काही नांवांवर दारासिंग ह्यांनीही मोहोर उमटवली आहे. हल्ली-हल्लीचा 'जब वी मेट', मला वाटते, त्यांचा शेवटचा चित्रपट असावा. रामायण मालिकेत आजवर लोकांच्या मनांत असलेल्या हनुमानाच्या प्रतिमेशी दारासिंग ह्यांची शरीरयष्टी, भव्यकपाळ, बोलकेडोळे आणि चेहर्‍यावरचा राकट, तरीही, सेवाभावी भाव इतका तंतोतंत जुळला की त्यांची ती भूमिका लोकांनी डोक्यावरच घेतली. दुरदर्शन मालीकेने 'त्या' मारूतीला घरोघर पोहोचविले. आधीपासूनच मोठ्यांचा, शरीर सौष्ठवाचा, आदर्श असलेल्या दारासिंगाला लहानग्यांच्या विश्वातही भयंकर प्रसिद्धी मिळाली. ह्याचे श्रेय रामायण मालिकेला नक्कीच आहे. पण इथे त्यांची 'खास' ओळख सर्वांना झाली ह्या मताशी मी सहमत नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>>> असहमत. असे म्हणणे म्हणजे दारासिंग ह्यांच्यातील पहिलवानाचा आणि कलाकाराचाही अपमान आहे असे वाटते. दारासिंग रंधवा यांचा अपमान करायचा आहे, म्हणुन मी तसं लिहिलं असेल असं आपल्याला आणि वाचकांना वाटत असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. दारासिंग रंधवा यांचा जन्म ते काल पर्यंतच्या प्रवासापर्यंतचा टप्पा मोठा आहे. मला व्यक्तिश: दारासिंग रंधवा कलाकार म्हणुन घराघरात केव्हा गेलेत, असं वाटलं म्हणुन मी तसं लिहिलं. सिंगापुर, इंडोनेशिया, श्रीलंका, इथे जाऊन तेथील पहिलवानांना हरवले तेव्हाचे दारासिंग कोणाला खास वाटले असतील. कुस्त्यांपेक्षा चित्रपटातला प्रवेश कोणाला खास वाटेल, हे खास वाटणं प्रत्येकाच्या आवडी-निवडीवर अवलंबुन आहे, असे वाटले. कृष्ण-धवल कालखंडाची आम्हाला काय ओळख. आपण जाणकारांनीच अशा वेळी माहितीत भर घालायची असते. बाकी, दारासिंग रंधावा यांचा कमिपणा दाखविण्यासाठी तसं लिहिलं नाही, हे पुन्हा एकदा लिहितो. बाकी, आपल्या मताचा आदर आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, 'दारासिंग रंधवा यांचा अपमान करायचा आहे, म्हणुन मी तसं लिहिलं असेल असं आपल्याला.....' 'म्हणून' आपण असं लिहीलत असं मी कुठेही म्हंटलेले नाही. तसा अर्थही ध्वनीत होत नाही. उलट, माझं म्हणणं असं आहे की, 'अनवधानानेही दारासिंग ह्यांच्यातील पहिलवानाला/कलाकाराला आपण (त्यात मीही आलोच) कमी लेखता कामा नये.' अहो, तुम्ही कसली दिलगीरी व्यक्त करता? दिलगीरी व्यक्त करण्यासारखे काही घडलेलेच नाही. हे खास वाटणं प्रत्येकाच्या आवडी-निवडीवर अवलंबुन आहे, असे वाटले. प्रश्नच मिटला. 'कृष्ण-धवल कालखंडाची आम्हाला काय ओळख. आपण जाणकारांनीच अशा वेळी माहितीत भर घालायची असते.' आमच्या वयाच्या मोठेपणापेक्षा आपल्या ज्ञानाच्या मोठेपणाला आम्ही फार मानतो. तरीपण, आपण मोठेपणा दिलाच आहे तर त्या मोठेपणाला जागायचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न करू असे म्हणतो. (फार मोठी जबाबदारी टाकलीत आमच्या इवल्याश्या खांद्यांवर).

In reply to by प्रभाकर पेठकर

जे साठीला आले आहेत त्याना दारासिंग यांची पैलवान व सिनेमातील हिरो म्हणून ही ओळख आहे . मध्यम वय असलेल्यांसाठी ते हुनमान आहेत. व अगदी तरूण असलेल्यांसाठी ते मालिकांमधील व जब वी मेट मधील " दादा " जी आहेत.

आम्ही त्याना थेट रामायणातच पाहिलं.. चे पु वर अशी श्रद्धांजली वाहिली जातेय..

आठ दहा वर्षांचा असताना अहमदनगरला दुकानांच्या फळ्यांवर, भिंतीवर चिकटवलेली 'दारासिंग - रंधावा यांची जंगी कुस्ती अमुक अमुक ठिकाणी अमुक तारखेला" अशी पत्रके वाचलेली आठवतात. त्यावेळी कधी ते बघायला गेलो नाही. पुढे काही सिनेमातून दारासिंग दिसले. परंतु ते कृष्णधवल सिनेमे सध्याच्या तरुणाईने बघितलेले असण्याची शक्यता नाही. त्यानंतर त्यांची मोठी ओळख पुन्हा रामायण मालिकेतला हनुमान अशीच झाली. त्या भूमिकेत ते अगदी चपखल वाटले होते आणि त्यांनी कामही मनापासून केले होते. जब वी मेट सारखा एखादा सिनेमा, कधी दूरदर्शनच्या जाहिराती असे अधूनमधून कुठे ना कुठे ते दिसत रहात. एक प्रामाणिक आणि सच्चा कलाकार गेला. (व्यायामप्रेमी)रंगासिंग

In reply to by चतुरंग

'दारासिंग - रंधावा यांची जंगी कुस्ती अमुक अमुक ठिकाणी अमुक तारखेला" अशी पत्रके वाचलेली आठवतात. मराठी, हिंदी विकीपिडिया वर उचकापाचक करतांना मला एक पोष्टर आवडलं. Dara_Singh [चित्र सौजन्य] -दिलीप बिरुटे

त्याकाळी खूप प्रचंड बॅनर लागायचे, ज्यात अमूक कोणी 'नकाबपोश' परदेशी पहिलवान आला असून त्याने दारासिंगला आव्हान दिलेले आहे.... असे असायचे, मग पेपरातून बातम्या, की दारासिंगने सांगितले, की आधी रंधवाशी (दारासिंग चा लहान भाऊ) लढ, त्याला हरवलेस, तर मी लढेन..वगैरे.त्या 'नकाब पोश' चा बुरखा कुस्तीत फाडल्यावरच कळायचे (म्हणे) की तो कोण आहे.... आम्हाला हे सर्व बघण्याची भयंकर उत्सुकता असायचे, पण लहान असल्याने जाता येत नसे. त्या काळीसुद्धा जाहिरातबाजी कशी चालायची, हे आता कळते, तेंव्हा सर्व खरे वाटायचे. थोडे अवांतरः तेंव्हा गावोगावच्या बँडवाल्यांना शंकर जयकिशन इ. कडून पैसे मिळायचे म्हणे, फक्त त्यांचीच गाणी वाजवावीत म्हणून.... याबद्दल कुणाला माहिती आहे का?

दारासिंग आणि रंधावा ह्या बंधूद्वयामुळे फ्रिस्टाईल कुस्तीतला 'ड्रॉप किक' हा प्रकार कळला. तसेच कुस्तीला हिन्दीत 'दंगल' म्हणायचे त्याचीही गंमत वाटायची. त्याकाळी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर कुस्त्या व्हायच्या. त्याची भित्तीपत्रके मुंबईभर लागायची. 'नकाबपोश' आणि 'नकाबपोशका नकाब उतारुंगा|' असली आव्हानं वाचून बाहू फुरफुरायचे (पण तेवढ्यापुरतेच). स्टेडियमवर जाऊन कुस्त्या पाहण्याची चैन परवडण्यासारखी नसायचीच. तेंव्हा सौदागर नांवाचे एक पंच होते. दोन्ही मल्ल भिडले आणि कांही चुक झाल्यावर शिट्टी वाजवून त्यांना दूर करायचे आणि पुन्हा नवी फेरी सुरु व्हायची. ह्या प्रकारात जर मल्लांनी पंचांचे ऐकले नाही, एकमेकांना सोडले नाही तर सौदागर स्वतः 'ड्रॉप किक' मारून त्यांना सोडवायचे असे ऐकले होते. दारासिंगची 'ड्रॉप किक' आणि 'डेथ लॉक' ही दोन जबरदस्त अस्त्र होती. चित्रपटसृष्टीत कृष्ण-धवल कालखंडात विविध अभिनेत्र्यांबरोबर दारासिंग ह्यांनी झाडांभोवती पकडापकडी खेळत गाणी म्हणताना चांगला अभिनयही केला आहे. उतारवयात अभिनय करताना त्यांना गुडघ्यांच्या त्रासाने ग्रासले होते. त्यामुळे त्यांच्यावर कॅमेरा असताना ते एकाच जागी उभे राहून संवाद म्हणीत. सोफ्यावर बसणे, उठणे, चालणे अशी दृश्ये नसत. त्यांना डोकेदुखीचाही त्रास होता त्यावर त्यांची 'मॅग्नेट थेरपी' चालू होती. असो. लहानपणापासूनचा आवडता मल्ल आणि तरूणपणी कौतुक करावेसे वाटायचे असा नट हरपला.

In reply to by प्रभाकर पेठकर

दारासिंगांचे चित्रपट कितीही पैसा मिळवून देत असले तरी त्यांच्याबरोबर काम करायला त्याकाळच्या साधना-वैजयंतीमाला यांसारख्या प्रथितयश अभिनेत्री तयार होत नसत. काही झाले तरी दारासिंग काम करीत असलेले हे दे-मार चित्रपट ब-दर्जाचे समजले जात. पुढे सॅमसनच्या शूटिंगदरम्यान निर्मात्याने चित्रीकरण पहात असलेल्या मुमताझ आणि तिच्या १४ वर्षाच्ह्या बहिणीकडे बोट दाखवून त्यांतली एक नायिका म्हणून पसंत करायचा आग्रह केला. "मी ब्रह्मचारी, मला त्यांतले काही समजत नाही, आपण सांगाल तिच्याबरोबर काम करीन"...दारासिंगांचे उत्तर. आणि मुमताझ दारासिंगांची नायिका झाली, आणि त्यापुढील काळात मुमताझची मरगळलेली चित्रपट कारकिर्द झळाळून निघाली. मुमताझच्या बहिणीने पुढे दारासिंगांच्या धाकट्या भावाशी लग्न केले.
[साभार :मराठी विकिपीडिया ] प्रा.डॉ.दिलीप बिरुटे [मराठी विकिपीडिया सदस्य]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी दारासिंग शेजारी नायिका बसली आहे (बहुतेक मुमताजच असावी) आणि दारासिंग तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला प्रेमाने जवळ ओढतो असे चित्रिकरण होते. दारासिंग पडला पहिलवान माणूस आणि नायिका एकदम नाजूक-साजूक. पुढील संभाव्य धोका ओळखून दिग्दर्शकाने हळूच दारासिंगला सांगितले, 'दाराजी, लडकी जरा नाजूक मिजाज है| हाथका पुरा भार मत डालीए. थोडा संभलके|' दारासिंगनेही मान हलवून काळजीपूर्वक वागायची शाश्वती दिली. कॅमेरा सुरु झाला....... अ‍ॅक्शन म्हंटल्यावर..... दारासिंग ह्यांनी अगदी प्रेमाने, अलगद त्या नायिकेच्या खांद्यावर हात ठेवून तिला अगदी नजाकतीने जवळ ओढले............... नायिकेची मान मुरगळली. चित्रिकरण रद्द झाले. हा किस्सा दारासिंग ह्यांनीच, दूरदर्शनच्या एका मुलाखतीत, निरागसपणे खळखळून हसत, सांगितला आहे.

अलीकडील मुलाखतीत दारासिंग यानीच सांगितलेले दोन किस्से म्हातारपणी मल्लांची फार वाईट अवस्था होत असे म्हणून मी फिल्मची ऑफर स्वीकारली .निर्मात्याला मी विचारले मी अ‍ॅक्शन करतो पण अ‍ॅक्टींग? कोण करणार ? पहिल्या पाच चित्रपटात मला दुसर्‍याचा आवाज घ्यावा लागला , कारण मला उर्दू अजिबात येत नव्हते व त्यावेळी उर्दू मिश्रित हिंदीच चालत असे. एकदा मी एका मारामारीत मधे पडलो तर त्यातील एकाने विचारले " तू स्वता: ला काय दारासिंग समजतोस काय ?"

In reply to by चौकटराजा

एकदा मी एका मारामारीत मधे पडलो तर त्यातील एकाने विचारले " तू स्वता: ला काय दारासिंग समजतोस काय ?" मस्त......:)