Skip to main content

काय केले असते तुम्ही....?

लेखक चिम् चिम् मामा यांनी शनिवार, 07/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे... तुम्हालापण हा अनुभव आला असेल. माझ्या समोर ओरडा-ओरडी करण्या पलीकडे काहीच पर्याय नव्हता...तुम्ही काय केले असते. पावसात भिजल्या नंतर...चहाच्या तपरी वरचा चहा... प्लास्टिकच्या अतिशय पातळ अश्या कपात... टपरी समोर नक्किच पाणी तुंबलेले... मझ्या दोन्ही हातात चहाचे (प्लास्टिकचे) छोटे-छोटे कप (चहाने गच्च भरलेले)... पाण्यातुन चालताना चहा माझ्या बोटावर चटके देत होता.... आणि तेवढ्यात गुन-गुन करत डोळ्यावर...नाकात... जाउन मला प्रचड त्रास... दोन्ही हातात...चहाचे कप आणि नाका-समोर माशी.... चहा खाली ठेवायला जागा नाही... माशी झटकायला हात रिकामा नाही... काय केले असते तुम्ही....?

वाचने 6550
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

ऐला ह्याचा विचार कधी केलाच नव्हता.....धाग्यावरील चर्चा आणि अनुभवी मिपाकारांचे अनुभव जाणून घेण्यासाठी जागा अडवून ठेवत आहे. लगे रहो :) ;)

पाण्यातुन चालताना चहा माझ्या बोटावर चटके देत होता त्याच चहाने त्या माशीला चटका द्याचा ना. जन्माची अद्दल घडली असती लेकीला.

हा माझा स्वतःचा अनुभव आहे... तुम्हालापण हा अनुभव आला असेल. माझ्या समोर ओरडा-ओरडी करण्या पलीकडे काहीच पर्याय नव्हता...तुम्ही काय केले असते. हापिसातल्या प्रचंड कामानंतर ... कधीतरी मिळालेला मिपा चा Access ... प्रचंड काय काय मिसलेले लेख, भटकंतीचे लेख .... काथ्याकूटात नक्कीच तुंबलेल्या चर्चा बॉस ची नजर चुकवून विंडो छोटीशी करून कडेने वाचताना डोळ्यांना त्रास होत होता .. तेवढ्यात मागून बॉस तणतणत येत , फालतू सुनव्तोय.. मला प्रचंड त्रास .. मी विंडो कशीबशी बाजूला घेऊन बघतोय .. आणि त्यात हा भिकार लेख .. बॉस मागे असल्याने विंडो त्याच्या समोर बंद करायला वेळ नाही .. आणि मी संपादक नसल्याने हा "टाकाऊ" लेख (?) उडवायचे अधिकार नाहीत काय केले असते तुम्ही....?

In reply to by स्पा

शब्दजुलाब झालेल्या लोकांना प्रेम दे. त्यांचा तिरस्कार करु नकोस. ॐ शांति | हळुचलतीकडे हाणारे परामहाराज पुणेकर

In reply to by परिकथेतील राजकुमार

मराठमोळ्या मिपाकरांवर शब्द जुलाबी सडे मराठी पाऊल हे लडबडे|

In reply to by स्पा

हा लेख तुझ्या बॉसला वाचायला दे. तसेच मिपाचा सभासद करवुन या धाग्यावर प्रतिसाद द्यायला लाव. प्रमोशन नक्की. ( आणि आम्हाला प्यार्टी पण नक्की)

In reply to by स्पा

तरिही तुम्ही माझ्या लेखनाला प्रतिक्रिया दिलित... या बद्दल धन्यवाद आणि हो... लेख तुम्हाला आवडेल म्हणुन लिहिलाच नव्हता...!

अरेरे, तुम्हाला आठवत नाही, तुमच्या पुढेच होतो मी, तुमची ही दारुण अवस्था पाहुन मी तुमच्या नाकावर एक गुद्दा मारला ती माशि उडवायला, आणि तुम्ही पडलात खाली, पण त्यामुळं एवढा परिणाम होईल माहित नव्हतं, असो.... चांदीच्या पेल्यातुन कांद्याचा रस घेत जा, परत येईल रॅम.

असल्या भिकार ठिकाणी आम्ही चहा पित नसल्या मुळे असला काही अनुभव आम्हाला आला नाही. त्या मुळे त्यावर आम्ही काही सल्ला देउ शकत नाही. चहावाल्या पोर्‍याला विचारुन सांगतो, तो कदाचीत सांगू शकेल. पण आमच्या ऑफीस मधे चहा पोचवायला येणारा मुलगा किटलीतनच चहा आणतो आणि रिकामा कप टेबलवर ठेउन त्यात चहा ओततो. तुम्हीपण किटलीची मागणी करा. किंवा नोकरी बदला. दुसरी गोष्ट आमचा चहा वाला पोर्‍या बहुतेक रोजच्या रोज अंघोळ पण करतो. नाकही स्वच्छ ठेवतो. त्या मुळे त्याच्या अंगावर / नाकावर माशा बसत नाहीत. ( एक निरीक्षण :- आजकाल कोणीही काहिही सल्ले मागते. ) (कोणी काय करावे हे काही मी सांगुशकत नाही . मी केवळ एक निरीक्षण नोंदवले इतकेच )

In reply to by पक पक पक

माफ करा पकोबा - प्रतिसादाच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्हाऐवजी चुकून प्रश्नार्थक चिन्ह टंकल्या गेले.

पोरींना चहा पाजायला किमान हाटेलात तरी घेऊन जायचं, टपरीवर काय!

वरील शिर्षकावरचे वेगवेगळे विषय तरळुन गेले आणि त्या बद्दल लिहीता येत नाही ह्याचे वैषम्य वाटले.. हा प्रतिसाद नाना, आणि परा ला सादर अर्पण.

इतक्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. अखिल मानवजातीला हा प्रश्न पडला होता. पण त्याची ऊकल करायचे कोणीही मनावर घेतले नव्हते. मला तर तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची तुलना, न्युटनला सफरचंद झाडावरून पडताना बघून पडलेल्या प्रश्नाशीच कराविशी वाटतेय. इथे टिका करणार्‍यांकडे अजिबात लक्ष न देता (फाट्यावर मारा सर्वांना, 'भिऊ नको मी आहे पाठीशी' असे कुणीसे म्हणून ठेवलेय) नेटाने किल्ला लढवून ह्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढा! मानवजातीवर थोर उपकार करणार्‍या सर्व थोरामोठ्यांना सुरुवातीला असेच टिकेला सामोरे जावे लागले होते पण नंतर त्याच टिकाकारांनी त्यांचा उदो-उदो केला होता हे विसरू नका! आपले आभार कसे मानावे हेच कळत नाहीयेय! - ( आज दिवसभर माश्या मारलेला ) सोकाजी

एक जिलबी ओठांमध्ये अलगद धरुन ठेवली असती तर माशी त्या जिलबी बसली असती, अन नाकात नसती गेली.

In reply to by कुंदन

इ ससुरी जलेबी देवी भी पटाखा है, कंबख्त उसे पास रखेगा तो मार मार के तुम्बा नही बना देगी.... ;) ही अशी जलेबी ओठात धरण्यापरिस नाकात माशीच परवडली.

In reply to by कुंदन

एक जिलबी ओठांमध्ये अलगद धरुन ठेवली असती तर माशी त्या जिलबी बसली असती, अन नाकात नसती गेली.
ओ कुंदन शेठ काय पण काय सांगता राव! ती तोंडातली जिलबी पाहून एखादं गाढव आलं तर मग काय करणार(असा धागा येणार नाही का)?

च्यायला !! कस काय ? अन काय काय ? सुचत हो तुम्हाला..? :tongue: खरच कमाल आहे या प्रतिभेची.. :) त्या वेळेस तुम्हाला सर्दी सुद्धा झाली होती काय हो....? :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

एकाच वेळी चहाचे २ कप हातात कश्याकरता? स्वतः चहा पिताना सोबतच्या/चीलाही पाजता की एक घोट उजव्या हातातल्या कपातून आणि एक घोट डाव्या हातातल्या कपातून असं पिता? फुकटचा सल्ला: दोन कप चहा लागत असल्यास एकानंतर एक (कप) घ्यावा.

In reply to by स्मिता.

२ कप चहा कशा करता? तर एक घोट एका कपाने आणि दुसरा घोट दुसरा हाताने.... कोण पित का हो असे चहा? पण फार छान कल्पना आहे हो....!

In reply to by चिम् चिम् मामा

वर त्या म्हणत आहेत.. एक घोट उजव्या हातातल्या कपातून आणि एक घोट डाव्या हातातल्या कपातून असं पिता? आणि तुम्ही म्हणता आहात, तर एक घोट एका कपाने आणि दुसरा घोट दुसरा हाताने. आईस्क्रीम वगैरे असते तर ठीक होते. पण चहा??? :-D

चहा पिणार्‍या, वाट चुकलेल्या कोकरा... तुला कॉफीप्रेमाचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे, कारण कुणीसे म्हटलेच आहे, की खूप काही होऊ शकते, डोंबलावर एक कप कॉफीच्या.... शाकाहार बरवा की मासाहार, यासारखा हा विषयही अमर होवो... :)

बाकी तुम्ही धारण केलेले नामाभिमान फार आवडले. पुढल्या वेळी माझे बाल्यावस्थेत असलेले भाचे भेटतील तेव्हा त्यांना परदेस मधील ये दुनिया एक दुल्हन गाण्याच्या चालीवर चिम चिम मामा मामा चिम चिम मामा ऐकवून दाखवीन...

एक मामा मि.पा.ला कामाला लावतो.