हा माझा स्वतःचा अनुभव आहे... तुम्हालापण हा अनुभव आला असेल.
माझ्या समोर ओरडा-ओरडी करण्या पलीकडे काहीच पर्याय नव्हता...तुम्ही काय केले असते.
पावसात भिजल्या नंतर...चहाच्या तपरी वरचा चहा... प्लास्टिकच्या अतिशय पातळ अश्या कपात... टपरी समोर नक्किच पाणी तुंबलेले... मझ्या दोन्ही हातात चहाचे (प्लास्टिकचे) छोटे-छोटे कप (चहाने गच्च भरलेले)... पाण्यातुन चालताना चहा माझ्या बोटावर चटके देत होता.... आणि तेवढ्यात गुन-गुन करत डोळ्यावर...नाकात... जाउन मला प्रचड त्रास... दोन्ही हातात...चहाचे कप आणि नाका-समोर माशी.... चहा खाली ठेवायला जागा नाही... माशी झटकायला हात रिकामा नाही...
काय केले असते तुम्ही....?
वाचने
6639
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऐला ह्याचा विचार कधी केलाच
ऐला ह्याचा विचार कधी केलाच नव्हता.....धाग्यावरील चर्चा आणि अनुभवी मिपाकारांचे अनुभव जाणून घेण्यासाठी जागा अडवून ठेवत आहे. लगे रहो :) ;)
पाण्यातुन चालताना चहा माझ्या
पाण्यातुन चालताना चहा माझ्या बोटावर चटके देत होता
त्याच चहाने त्या माशीला चटका द्याचा ना. जन्माची अद्दल घडली असती लेकीला.
काय केले असते तुम्ही....?
हा माझा स्वतःचा अनुभव आहे... तुम्हालापण हा अनुभव आला असेल.
माझ्या समोर ओरडा-ओरडी करण्या पलीकडे काहीच पर्याय नव्हता...तुम्ही काय केले असते.
हापिसातल्या प्रचंड कामानंतर ... कधीतरी मिळालेला मिपा चा Access ...
प्रचंड काय काय मिसलेले लेख, भटकंतीचे लेख .... काथ्याकूटात नक्कीच तुंबलेल्या चर्चा
बॉस ची नजर चुकवून विंडो छोटीशी करून कडेने वाचताना डोळ्यांना त्रास होत होता ..
तेवढ्यात मागून बॉस तणतणत येत , फालतू सुनव्तोय.. मला प्रचंड त्रास .. मी विंडो कशीबशी बाजूला घेऊन बघतोय .. आणि त्यात हा भिकार लेख .. बॉस मागे असल्याने विंडो त्याच्या समोर बंद करायला वेळ नाही .. आणि मी संपादक नसल्याने हा "टाकाऊ" लेख (?) उडवायचे अधिकार नाहीत
काय केले असते तुम्ही....?
प्रिय स्पा,
In reply to काय केले असते तुम्ही....? by स्पा
शब्दजुलाब झालेल्या लोकांना प्रेम दे. त्यांचा तिरस्कार करु नकोस.
ॐ शांति |
हळुच भलतीकडे पहाणारे परामहाराज पुणेकर
सडे
In reply to प्रिय स्पा, by परिकथेतील राजकुमार
मराठमोळ्या मिपाकरांवर
शब्द जुलाबी सडे
मराठी पाऊल हे लडबडे|
स्पा
In reply to काय केले असते तुम्ही....? by स्पा
हा लेख तुझ्या बॉसला वाचायला दे. तसेच मिपाचा सभासद करवुन या धाग्यावर प्रतिसाद द्यायला लाव. प्रमोशन नक्की. ( आणि आम्हाला प्यार्टी पण नक्की)
तरिही तुम्ही माझ्या लेखनाला प्रतिक्रिया दिलित
In reply to काय केले असते तुम्ही....? by स्पा
तरिही तुम्ही माझ्या लेखनाला प्रतिक्रिया दिलित... या बद्दल धन्यवाद
आणि हो... लेख तुम्हाला आवडेल म्हणुन लिहिलाच नव्हता...!
अरेरे, तुम्हाला आठवत नाही,
अरेरे, तुम्हाला आठवत नाही, तुमच्या पुढेच होतो मी, तुमची ही दारुण अवस्था पाहुन मी तुमच्या नाकावर एक गुद्दा मारला ती माशि उडवायला, आणि तुम्ही पडलात खाली, पण त्यामुळं एवढा परिणाम होईल माहित नव्हतं,
असो.... चांदीच्या पेल्यातुन कांद्याचा रस घेत जा, परत येईल रॅम.
तुम्हचे़ कौ़तुक
In reply to अरेरे, तुम्हाला आठवत नाही, by ५० फक्त
कथेला वेगळे वळण दिल्या-बद्दल तुम्हचे़ कौ़तुक
किटली मिळण्या साठी आंदोलन करा
असल्या भिकार ठिकाणी आम्ही चहा पित नसल्या मुळे असला काही अनुभव आम्हाला आला नाही. त्या मुळे त्यावर आम्ही काही सल्ला देउ शकत नाही. चहावाल्या पोर्याला विचारुन सांगतो, तो कदाचीत सांगू शकेल.
पण आमच्या ऑफीस मधे चहा पोचवायला येणारा मुलगा किटलीतनच चहा आणतो आणि रिकामा कप टेबलवर ठेउन त्यात चहा ओततो. तुम्हीपण किटलीची मागणी करा. किंवा नोकरी बदला.
दुसरी गोष्ट आमचा चहा वाला पोर्या बहुतेक रोजच्या रोज अंघोळ पण करतो. नाकही स्वच्छ ठेवतो. त्या मुळे त्याच्या अंगावर / नाकावर माशा बसत नाहीत.
( एक निरीक्षण :- आजकाल कोणीही काहिही सल्ले मागते. )
(कोणी काय करावे हे काही मी सांगुशकत नाही . मी केवळ एक निरीक्षण नोंदवले इतकेच )
हा तर नव - हुच्चभ्रू पणा
In reply to किटली मिळण्या साठी आंदोलन करा by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा - अहो हा तर नव - हुच्चभ्रू पणा. तुम्ही केला नाही कधीच?
रंगोबा त्यांचा प्रतिसाद
In reply to हा तर नव - हुच्चभ्रू पणा by श्रीरंग_जोशी
रंगोबा त्यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा... :crazy: :crazy: :crazy:
लोकांना प्रश्नच फार पड्तात. :crazy:
जरा घोळ झाला....
In reply to रंगोबा त्यांचा प्रतिसाद by पक पक पक
माफ करा पकोबा - प्रतिसादाच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्हाऐवजी चुकून प्रश्नार्थक चिन्ह टंकल्या गेले.
एकच कप घेउन जायचे ना, दुसरा
एकच कप घेउन जायचे ना, दुसरा कुणासाठी????
एकच कप घेउन जायचे ना, सल्ला
In reply to एकच कप घेउन जायचे ना, दुसरा by निवेदिता-ताई
एकच कप घेउन जायचे ना,
सल्ला छान आहे.. ;)
दुसरा कुणासाठी????
अवघड प्रश्न कशासाठी...? ;)
अरे रे.
पोरींना चहा पाजायला किमान हाटेलात तरी घेऊन जायचं, टपरीवर काय!
A lot can happen over tea too
A lot can happen over tea too :-p
हा हा अगदी!!!
In reply to A lot can happen over tea too by अन्या दातार
हा हा अगदी!!!
(काय केले...........)
वरील शिर्षकावरचे वेगवेगळे विषय तरळुन गेले आणि त्या बद्दल लिहीता येत नाही ह्याचे वैषम्य वाटले..
हा प्रतिसाद नाना, आणि परा ला सादर अर्पण.
चहाच्या पेल्यातील वादळ?
विचारप्रवर्तक धागा ;)
जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!
क्लास!
इतक्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन.
अखिल मानवजातीला हा प्रश्न पडला होता. पण त्याची ऊकल करायचे कोणीही मनावर घेतले नव्हते. मला तर तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची तुलना, न्युटनला सफरचंद झाडावरून पडताना बघून पडलेल्या प्रश्नाशीच कराविशी वाटतेय.
इथे टिका करणार्यांकडे अजिबात लक्ष न देता (फाट्यावर मारा सर्वांना, 'भिऊ नको मी आहे पाठीशी' असे कुणीसे म्हणून ठेवलेय) नेटाने किल्ला लढवून ह्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढा!
मानवजातीवर थोर उपकार करणार्या सर्व थोरामोठ्यांना सुरुवातीला असेच टिकेला सामोरे जावे लागले होते पण नंतर त्याच टिकाकारांनी त्यांचा उदो-उदो केला होता हे विसरू नका!
आपले आभार कसे मानावे हेच कळत नाहीयेय!
- ( आज दिवसभर माश्या मारलेला ) सोकाजी
जिलबी
एक जिलबी ओठांमध्ये अलगद धरुन ठेवली असती तर माशी त्या जिलबी बसली असती, अन नाकात नसती गेली.
जिलबी....
In reply to जिलबी by कुंदन
इ ससुरी जलेबी देवी भी पटाखा है, कंबख्त उसे पास रखेगा तो मार मार के तुम्बा नही बना देगी.... ;)
ही अशी जलेबी ओठात धरण्यापरिस नाकात माशीच परवडली.
काय पण!
In reply to जिलबी by कुंदन
ओ कुंदन शेठ काय पण काय सांगता राव! ती तोंडातली जिलबी पाहून एखादं गाढव आलं तर मग काय करणार(असा धागा येणार नाही का)?
अण्भव...अण्भव म्हनतात तो हाच
In reply to जिलबी by कुंदन
अण्भव...अण्भव म्हनतात तो हाच ;)
च्यायला !! कस काय ? अन काय
च्यायला !! कस काय ? अन काय काय ? सुचत हो तुम्हाला..? :tongue: खरच कमाल आहे या प्रतिभेची.. :)
त्या वेळेस तुम्हाला सर्दी सुद्धा झाली होती काय हो....? :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
दोन कप??
एकाच वेळी चहाचे २ कप हातात कश्याकरता? स्वतः चहा पिताना सोबतच्या/चीलाही पाजता की एक घोट उजव्या हातातल्या कपातून आणि एक घोट डाव्या हातातल्या कपातून असं पिता?
फुकटचा सल्ला: दोन कप चहा लागत असल्यास एकानंतर एक (कप) घ्यावा.
फार छान कल्पना आहे हो....!
In reply to दोन कप?? by स्मिता.
२ कप चहा कशा करता? तर एक घोट एका कपाने आणि दुसरा घोट दुसरा हाताने....
कोण पित का हो असे चहा?
पण फार छान कल्पना आहे हो....!
सहमत.. लैच रोमँटीक कल्पना..
In reply to फार छान कल्पना आहे हो....! by चिम् चिम् मामा
वर त्या म्हणत आहेत.. एक घोट उजव्या हातातल्या कपातून आणि एक घोट डाव्या हातातल्या कपातून असं पिता?
आणि तुम्ही म्हणता आहात, तर एक घोट एका कपाने आणि दुसरा घोट दुसरा हाताने.
आईस्क्रीम वगैरे असते तर ठीक होते. पण चहा??? :-D
चहा पिणार्या, वाट चुकलेल्या कोकरा...
चहा पिणार्या, वाट चुकलेल्या कोकरा... तुला कॉफीप्रेमाचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे, कारण कुणीसे म्हटलेच आहे, की खूप काही होऊ शकते, डोंबलावर एक कप कॉफीच्या....
शाकाहार बरवा की मासाहार, यासारखा हा विषयही अमर होवो...
:)
चुकून 'आपल्या कपाळात ओढण्याचा
In reply to चहा पिणार्या, वाट चुकलेल्या कोकरा... by चित्रगुप्त
चुकून 'आपल्या कपाळात ओढण्याचा प्रयत्न' असं वाचलं.
चिम चिम मामा
बाकी तुम्ही धारण केलेले नामाभिमान फार आवडले.
पुढल्या वेळी माझे बाल्यावस्थेत असलेले भाचे भेटतील तेव्हा त्यांना परदेस मधील ये दुनिया एक दुल्हन गाण्याच्या चालीवर चिम चिम मामा मामा चिम चिम मामा ऐकवून दाखवीन...
आणि .....
एक मामा मि.पा.ला कामाला लावतो.
हाहाहा आजकाल वाचनमात्र
In reply to आणि ..... by नाखु
हाहाहा आजकाल वाचनमात्र खुळखुळेही लिहायला लागलेत :D :D :P
मामा, तुमचं 'झालं' की
मामा,
तुमचं 'झालं' की सांगा... !
यातल्या २ छत्र्या नेल्या
यातल्या २ छत्र्या नेल्या असत्या. ;)
पावसात भिजलो नसतो
In reply to यातल्या २ छत्र्या नेल्या by गणपा
तुम्ही सुचविलेल्या छ्त्री ने... मी पावसात नक्किच भिजलो नसतो
पावसात भिजलो नसतो
In reply to यातल्या २ छत्र्या नेल्या by गणपा
तुम्ही सुचविलेल्या छ्त्री ने... मी पावसात नक्किच भिजलो नसतो