Skip to main content

फॉरेस्ट गंप अन इतर

लेखक शिल्पा ब
शुक्रवार, 06/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बरंच वैचारीक वादळ घोंघावलं होतं...त्यामुळे हे जरा लाईट कैतरी म्हणुन. आताच नवर्‍याने फॉरेस्ट गंप लावला होता. कितीही वेळा पाहीला तरी नविन काहीतरी आवडत जातं. अगदी निरागस अशा फॉरेस्टच्या आयुष्यात बरंच काय काय होतं...तो त्याला कसा सामोरा जातो. अगदी वेगळा विषय, वेगळी मांडणी अन मुख्य म्हणजे टॉम हॅन्क्सचा अभिनय. तसंच कास्ट अवे सुद्धा. अजुन असे कोणते चित्रपट आहेत जे कितीही वेळा पाहीले तरी आवडतात?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9790
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

खोसला का घोंसला

लॉर्ड ऑफ द रिंग्ज ट्रिलॉजी कित्येक वेळा पाहिलाय तरी पुन्हा पुन्हा पाहावासा वाटावा असाच.

In reply to by प्रचेतस

तो पाहून सारखं मनात येतं, च्यायला महाभारतावर असलाच एखादा भन्नाट पिक्चर आला तर काय मजा येईल!!! कल्पनेनेच हर्षवायू होतो :)

माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक. पटकथा, संवाद, चित्रिकरण, फार मोठ्या नाही पण ४ दशकाच्या काळाचा पडदा, त्यात घडून गेलेल्या खर्‍याखुर्‍या राजकीय आणि सामाजिक बदलाच्या चित्रिकरणाचं गुंफण, जीवन जगण्याचं तत्वज्ञान आणि अशा बर्‍याच बाबतीत हा चित्रपट उजवा वाटतो. बघायला गेलं तर चित्रपटाच्या पटकथेची तुलना देवदास बरोबर करावीशी वाटते. दुर्दैवाने देवदास आत्मकेंद्री होऊन स्वत:च्या आयुष्याचं नुकसान करून घेतो, तर फॉरेस्ट "जस्ट लाईक दॅट" म्हणत आयुष्यात बर्‍याच उलाढाली करतो, त्यामुळे त्याच्या आजुबाजूला असलेल्या लोकांच्या आयुष्यातही काहीतरी चांगलं घडवून आणतो. खूप वेळा पाहिला चित्रपट, खूप आवडला. मिपावरल्या समिक्षकांकडून समिक्षा आली तर आवडेल वाचायला. ह्या चित्रपटातली पियानो वरची अ‍ॅलन सिल्वेस्टरची धून पण मला खूप आवडते. माझा मॉर्निंग अलार्म आहे तो :)

जब वी मेट गोलमाल ( जुना ) दे धक्का जो जिता वही सिकंदर कयामत से कयामत तक मासुम (जुना) मैने प्यार किया होम अलोन टायट्यानिक द ममी बेबीज डे आउट बरिच मोठी लिस्ट आहे यार ......... ;)

टर्मिनल, अंदाज अपना अपना, इल्युजनिस्ट, पिंक पँथर, मेगामाईंड ई. टॉम हँक्स चे बरेचसे चित्रपट मस्तच असतात

"फॉरेस्ट गंप" तर आवडतोच पण त्याच वर्षी प्रदर्शित झालेला "शॉशॅन्क रिडम्प्शन" सुद्धा अत्यंत आवडीचा. पण माझे काही आवडीचे हॉलीवूड चित्रपट जे मी नेहेमी बघतो... अ‍ॅज गुड अ‍ॅज इट गेट्स - हेलन हंट आणि जॅक निकोलसन्च्या अभियनाने नटलेला अत्यंत सुंदर मानवी स्वभाववैशिष्ट्यांची कहाणी सांगणारा. इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईण्ड - प्रेमाचा रिव्हर्स गियर. इन्सेप्शन - स्वप्नांचा वापर करून शत्रूला नामोहरम करण्याचा एक डाव. टर्मिनेटर - २- यंत्रांचं अधिराज्य मोडायला ठेपलेल्या मनुष्य जातीने भूतकाळात लढलेली लढाई. एलियन- अंतराळातला थरकाप! कास्ट अवे- निर्जन बेटावर एकट्याने जगण्याची आणि संवादांची धडपड. रोजमेरीज बेबी - न जन्मलेल्या अमानवी सैतानी बाळाविषयी असलेलं आईचं दोलायमान भावनिक नातं. अ टेल ऑफ टू सिस्टर्स- अमानसिक घटनांचं बहुरेषीय चित्रकथन. अ ब्युटीफूल माईण्ड- जेव्हा स्किजोफ्रेनिया नोबेल जिंकते. प्रिटी वूमन- सार्‍या हॉलिवूडची ज्युलिया रॉबर्ट्स का चहिती आहे ह्याचं मूळ कारण. ह्याच्या व्यतिरीक्त ख्रिस्तोफर नोलानचे "प्रेस्टीज", "बॅटमॅन सिरीज", "मेमेन्टो". जेम्स कॅनरॉनचा "अवतार", "ट्रु लाईज" जिम कॅरीचे "मास्क", "एस वेन्चुरा" आणि "फन विथ डीक अ‍ॅण्ड जेन" ब्रुस विलीसचे "सिक्स्थ सेन्स", "डाय हार्ड १ ते ५". "पिच ब्लॅक", "ग्रज", "ट्रॉय", "३००", "साईडवेज", "हॅरी पॉटर - प्रिझनर ऑफ आझ्काबान", "लॉर्ड ऑफ द रीन्ग्ज ट्रायोलॉजी", "मॅट्रीक्स ट्रायोलॉजी", "शिंडलर्स लिस्ट", "फाईट क्लब", "पॅन्स लॅबिरिन्थ", "काईट रनर" आणि अनेक!

बरेच आहेत पण टंकाळ्यामुळे फक्त टॉप ३ देतो हिंदी: चलती का नाम गाडी अंगूर गोलमाल (व हृषीदांचे बरेचसे) इंग्रजी: प्राईड अ‍ॅन्ड प्रेज्युडीस (बीबीसीचा ५ तासांचा, इतक्यावेळा पाहिला आहे की मुळ सीडी खराब झाली, रीराईट केलेली त्याच मार्गावर आहे म्हणून अजून एक नवी मागवलीये :) ) साऊंड ऑफ म्युझिक ब्लड डायमंड (नुकताच किंग्ज स्पीच पाहिला, प्रचंड आवडला. काही दिवसांतच या यादीत तो यील असे वाटते) इतर: त्सोत्सी (साऊथ आफ्रीका) चिल्ड्रेन ऑफ हेवन (इराण) हरिशचंद्राची फॅक्टरी(मराठी)

मला हृषिकेश मुखर्जींचे कुठलेही चित्रपट कधीहि कुठेहि आणि कितीहि वेळेस पहायला अवडतात :) १.खुबसुरत (जुना) २. बावर्चि ३. आनंद ४. मिली ५. अभिमान ६. चुपके चुपके ७. गोलमाल (जुना) वरचा प्रत्येक चित्रपट म्हणजे नुसती करमणुकच नाहि तर "आर्ट ऑफ लिव्हींग" चे धडेच आहेत :) त्याच बरोबर असेच काहि अजुन हलके फुलके चित्रपट अवडतात : १. बांतो बांतो में २. छोटी सी बांत ३. किसीसे ना केहना ४. जाने भी दो यारो बाकि इराणी(नी?) चित्रपटही खुप खुप आवडत आणि कितीहि वेळेस पाहिले तरी अगदि नविन वाटतात, विशेषतः 'माजिद माजिदी' चे : १. चिल्ड्रन ऑफ हेवन २. कलर ऑफ पॅराडाईस ३. बरान ४. द व्हाईट बलून (दिग्दर्शक : जाफर पनाहि )

ब्लड डायमंड मम्मी चे सर्व भाग जेम्स बॉड पट त्यातील जास्त भावले पीअर्स ब्रॉन्सन चे बाँड पट अग बाई अरेच्चा

जाने भी दो यारो शोले अंदाज अपना अपना हेराफेरी My Best Friends wedding Speed रफू चक्कर बिवी ओ बिवी (संजीव कपूर, रणधीर कपूर, पूनम धिल्लन) Its a Mad Mad Mad Mad world अशी ही बनवाबनवी सामना सिंहासन वजीर कभी हा कभी ना सरफरोश ३ ईडियट्स तारे जमीन पर दिल चाहता है जिंदगी ना मिलेगी दोबारा जो जीता वोही सिकंदर Paths of Glory Black Hawk Down The Pursuit of Happiness Behind Enemy Lines आणि अजुन बरेच

फॉरेस्ट गंप थेटरात पाहिला होता. आता परत हिंदी डबींग असलेली सी.डी पाहीली, बरेच न कळलेले पंचेस कळ्ले. इतका परिणाम झाला होता कि बरेच दिवस फॉरेस्ट गंप असल्या सारखा वागत होतो.

माझ्याच प्रोफाइअलचं पान जशाला तसं देतोयः- (फक्त सर्वात फेवरिट पिक्चरचं त्यात नाव नाही :- बेबीज् डे आउट) दूरचित्रवाणी:- मालगुडी डेज्, मिट्टी के रंग,तहकिकात, व्योमकेश बक्षी,गंगाधर टिपरे, स्मॉल वंडर,डेनिस द मेनिस्,द थ्री स्टूजेस हिंदि चित्रपटः- आहिस्ता आहिस्ता, मनोरमा सिक्स फीट अंडर, सोचा न था, आमिर, १९७१(मनोज वाज्पेयी मुख्य भूमिकेत The Great Escape चा रीमेक ) राजेश खन्नाचा "इत्तेफाक" , अंग्रेज, भेजा फ्राय मेरा पहला पहला प्यार (teenage lovestory) जॉनी गद्दार खोसला का घोसला सत्या टॅक्सि नंबर नौ दो ग्यारह अ वेन्सडे मराठी चित्रपटः- पिंजरा, चौकट राजा, सामना, सिंहासन तू तिथं मी नाटकः- माकडाच्या हाती शँपेन तुझे आहे तुजपाशी अजूनही खूप काही, पण फुर्सतीत लिहीन.

In reply to by मन१

माकडाच्या हाती शँपेन बघायचं राहून गेलं होतं. ह्याची सी.डी. आली आहे का बाजारात? अलिकडच्या मराठी नाटकांमध्ये यू-टर्न, काटकोन त्रिकोण आणि सुखांशी भांडतो आम्ही ही खूप आवडली.

In reply to by माझीही शॅम्पेन

पूर्णतः सहमत. याच नाटकावर आधारित "बदाम राणी - गुलाम चोर" येऊ घातलाय. आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, अशा नामवंत मंडळींना घेऊन बनवलेला चित्रपट चांगला असावा असं ट्रेलरवरून तरी वाटतंय.

प्यासी पडोसन कुंवारी दुल्हन साली आधी घरवाली तन बदन ये प्यास नही बुझती कच्ची कली सोलवा साल जंगल मे मंगल माहेरची साडी थांब लक्ष्मी कुंकू लावते ताईच्या बांगड्या हळद रूसली कुंकू हसलं बायको हरवली स्टँडवर इ.इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मालक, नुसती लिस्ट नाय चालणार.... प्रत्तेकाचे परिक्षण लिहावे लागेल....

In reply to by परिकथेतील राजकुमार

माहेरची साडी मधले "तु कसला बाप.. तू तर साप!" "आई??तू आहेस कसाई!" असली अफलातून यमकं असलेले संवाद म्हणजे कहरच.

In reply to by गोंधळी

Nicolas Cageचे लै मोट्टे फ्यान वाट्टं !! मस्तच... त्याचा एकही फालतु चित्रपट पाहिल्याचं आठवत नाही. त्यानंतर Robert Downey, Jr.चे चित्रपट सुद्धा. विशेषतः शेरलॉक होमस. Hugh Jackman, Leonardo DiCaprio पण भारी...

मराठी चित्रपटः- देउळ सामना सत तुकाराम (जुना) साधी माणसे बाल शिवाजी पिंजरा वळु एक डाव भुताचा शामची आइ आम्हि जातो आमच्या गावा मुम्बैचा जावइ निवडुग जैत रे जैत रगल्या रात्री अशा पाडु ह् वालदार एक गाव बारा भानगडी सागते ऐका English Movies :- Gladiator Duma Saving Private Ryan We were soldiers Bruce Almighty Indiana Jones Home alone 3 Police Academy 3 Operation condor Born free Men of Honor Two Brothers Executive Decision The Animal My Super Ex Girlfriend अजुन बरेच ........

In reply to by स्वराजित

पण स्वराजित म्हणजे शांताराम बापूंचा पुनर्जन्म तर नव्हे ? कारण पिंजरा आणि संध्याचे ७२० कोनातून मान वेळावणे आवडणारे (आणि ते देखील पुन्हा पुन्हा) ते एकटेच. बाकी .n किंवा shift + m दाबून अनुस्वार देता येईल. s.nta tukaaraam (junaa) संत तुकाराम shaamachee aaI(shift + i) शामची आई मराठीत लिहिण्यासाठी अधिक मदत येथे आहे. http://www.misalpav.com/node/1312

In reply to by परिकथेतील राजकुमार

पिंजरा आवडलेले आणि अनेकदा पाहिलेले चिक्कार लोक आहेत. मलापण पिंजरा आवडला होता. संध्या ऐवजी जरा बरी नटी असती तर एकदम भारी झाला असता).

शोSSSSले (अर्थातच जुना, रामुवाला नाही, आणि रामगढवाला तर नैच नै) आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा.

ग्रेगरी पेक - गन्स ऑफ नॅवरोन हॅरिसन फोर्ड- ऐअर फोर्स वन नासीरूदीन शहा- वेडनेस डे राजेश खन्ना - इत्त फाक सुनील दत - वक्त शमीकपूर- कश्मीरकी कली राजकपूर - संगम देव आनंद - जॉनी मेरा नाम धमेंद्र् - चुपके चुपके उमार शेरीफ -मॅकेनाज गोल्ड राजा परांजपे- जगाच्या पाठीवर भरत जाधव- शिक्षणाच्या आईचा घो सचिन- अशी ही बनवाबनवी रमेश देव- अपराध अरूण सरनाईक - सिंहासन श्रीराम लागू - सामना निळू फुले -शापित चार्ली चाप्लीन - मॉडर्न टाईम्स स्तीव्हन सीगल - अंडरसीज

हा ही मला अधुन/मधुन पहायला अवडतो...

पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटणारे चित्रपट हा तर फारच आवडीचा विषय. हा विषय उपस्थित केल्याबद्दल धागाकर्तीचे मनापासून आभार. मला आवडलेले अन पुन्हा पाहिले की नवे काही तरी भावणारे काही चित्रपट - वोह सात दिन - नायक म्हणून अनिल कपूरचा पहिला चित्रपट. गरिबीचे चित्रण कुठलाही भडकपणा न वापरता कसे करावे याचे चांगले उदाहरण म्हणता येईल असा एक चित्रपट. यातील एका प्रसंगात अनिल कपूर नदीच्या पाण्यात कापड भिजवून पोटाभोवती बांधत असतो. यावर त्याचा चेला नायिकेला (पद्मिनी कोल्हपुरे) स्पष्टीकरण देतो की, ओले कापड करकचून पोटाला बांधले की भूक लागत नाही. अपना गुरू दिन मे तीन बार ऐसेही खाना खाता है. या प्रसंगात पडद्यावरील तिघांचाही अभिनय मनाला चटका लावून जाणारा. निळू फुलेंचाही अभिनयानेही या चित्रपटाची शोभा वाढवली आहे. जो जिता वोही सिकंदर - एकाच वेळी आपल्याच मस्तीत जगणारी, कुठल्याही शिस्तीचा व अभ्यासाचा तिटकारा असणारी तरुणाई व आपल्या जबाबदारीचे भान असणारी व ध्येयाने प्रेरीत असलेली तरुणाई यांचे भावस्पर्शी चित्रण. नवतरूणांच्या प्रेमभावनांचे (त्यातही तरूण मुलग्यांचे सगळे लक्ष केवळ आकर्षक दिसणाऱ्या तरूणींकडेच) परिणामकारक चित्रण. मध्यांतरानंतर संजयलाल चा जिंकण्याच्या इर्ष्येने ध्येयाकडे होणारा प्रवास प्रवास आमिर खान ने ज्या प्रकारे रंगवला त्यातून त्याने आपल्या अभिनयक्षमतेची दखल चित्रपटरसिकांना घ्यायला भाग पाडले. पहेला नशा या गाण्याचे मंद गतीने केलेले चित्रीकरण व अखेरीस सायकलींच्या शर्यतीचे थरारक चित्रीकरण त्याकाळच्या चित्रपटांपेक्षा बरेच पुढचे होते. हा चित्रपट मी बराच नंतर पाहिला. आमच्या महाविद्यालयीन काळात आम्ही पैजामाछाप म्हणूनच ओळखले जात होतो. क्रिकेट चा सामना असला की 'हारी बाजी को जितना हमे आता है' हे गाणे पाहून जायचो :-). अन सबसे पिछे लडके कौन? ही आमची स्वतःबद्दलची आवडती घोषणा होती त्यामुळे या चित्रपटाला अंतःकरणात कायमचे स्थान लाभले आहे. द पेट्रियट - युद्ध व सत्ताधाऱ्यांबरोबरचा संघर्ष यातील फोलपणा कळून चुकलेला एक थोर सेनानि (बेंजामीन फ्रँकलिन) मेल गिब्सन ने या चित्रपटात जोरदार रंगवला होता. या चित्रपटात मला सर्वाधिक भावलेला एक प्रसंग. बेंजामीन च्या ७ अपत्यांपैकी सर्वात धाकटी मुलगी जी जन्मापासून कधीच बोललेली नसते, नंतर बोलणे सुरू झाल्यानंतरही पित्याबरोबर कधीच बोलत नसते. एका प्रसंगात बेंजामीन लढाईवर निघताना सर्व कुटूंबियांचा निरोप घेत असतो. तिलाही बोलते करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्नांना यश येत नाहीये हे पाहून खिन्न मनाने निघालेला असताना ती आयुष्यात प्रथमच त्याला बाबा म्हणून हाक मारते. हा फारच हृद्य प्रसंग आहे. आताही इथे टंकताना डोळ्याच्या कडा ओलसर झाल्या आहेत. असे इतरही अनेक चित्रपट आहेत पण तुर्तास इथेच विश्राम!!

व्हय, जशे टॉम हँक्सचे चांगले आस्तात तशेच त्या रॉबिन विल्यम्चेबी एकेक चांगले आस्तात. अशात पाह्यलेला 'गुड विल हंटींग' . आजुक गंज हायेत, उजुक टाक्तो. http://www.imdb.com/title/tt0119217/

अशीही बनवा बनवी निशाणी डावा अंगठा पक पक पकाक जानें भी दो यारों अंदाज अपना अपना घोसला का खोसला व्हॉट वुमेन वॉन्ट इन परस्युट ऑफ हॅप्पीनेस मॅट्रीक्स कास्ट अवे - ( 'लाईट कैतरी' आवडणारा ) सोकाजी

अर्थातच फॉरेस्ट गॅंप रॉकस्टार रंग दे बसंती सगळे स्पायडरमॅन सगळे बॅटमॅन तुम बीन प्यार का पंचनामा जिंदगी ना मिलेगी दोबारा दिल चाहता है धुम धडका आणि सगळ्यात आवडती सीरियल कॉमेडी एक्सप्रेस आणि एक जबरदस्त नाटक !!! माकडाच्या हाती शँपेन

watch morgan freeman as well like amistad, along came a spider, lean on me*** (my favourite),the contract,edison force..invictus(must must),the bucket list,thick as thieves... tomm hanks green mile,money pit(comedy),road to pardition(clssical),terminal(cute movie), the last king of scotalnd(uganda coup),the great debator,the village,raid on entebbe(must watch),the genral's daughter,ratatuille (animation bt really cute),too big to fail 2008 financial crisis(documentry),papillon,glory,formosa betrayal,...many more gud movies already discussed on this portal itself...

एकच नाव दादा कोंडके कोणताही चित्रपट पुन्हा पुन्हा बघा :) अनं कंटाळ आलाच तर मग मोमेंटो बघा प्रत्येक प्रसंग आकलन व्हायलाच पुन्हा-पुन्हा बघावा लागतो अन इतक्यावेळा पाहीला गेल्याने चित्रपट आवडुनही जातो