Skip to main content

ईशकण(?) सापडला!

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 04/07/2012 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
आताच पाहिलेल्या वेबकास्टनुसार 'सर्न' मधील एलेचसी (लार्ज हेड्रॉन कोलायडर) उपकरणाच्या आधारे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर जगातील भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुमानित मूळकण (प्रायमरी पार्टीकल) सापडला असावा असा कयास व्यक्त केला गेलेला आहे. तो हिग्ज बोसॉनच असावा याबाबत ऍटलस आणि सीएमएस नामक दोन वेगवेगळ्या संशोधनकर्त्या टीम्सचे एकमत झालेले आहे. पण हा नक्की कोणता हिग्ज बोसॉन आहे? हिग्ज बोसॉन्स ही एक कणमालिका आहे तरी कशी? या प्रश्नांवर संशोधन करण्याचा मानस या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. विश्वाबद्दल मानवाला असलेल्या माहितीत आणखी थोडी भर घातल्याबद्दल शास्त्रज्ञांचे आभार. या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल सर्नशी संबंधित असलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. 'ईशकण' (गॉड पार्टिकल) हे नाव प्रसिद्धी माध्यमांनी बहाल केल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या कणाविषयी उत्सुकता निर्माण झाली असली तरी त्याचा ईश्वराशी कोणताही संबंध नाही. हे नाव केवळ त्याच्या 'हितंच हाय पर दिसत नाय' या (ईश्वरसदृश) गुणधर्मामुळे मिळाले आहे. कदाचित त्याला 'गॉड्डॅम' पार्टिकल ('इश्श्यकण' ? ) असेही नाव चालले असते असे विकीतली माहिती सांगते. इथे असलेले तज्ञ या कणाबद्दल आणखी माहिती सांगतीलच. पण तोवर सर्वसामान्यांना समजेल अशी ही माहिती - ही संशोधक परिषद सर्न यथे सुरू असता दिसलेले काही क्षण-
सीएमएस आणि ऍटलास टीमच्या निरीक्षणाचे एकत्रीकरण
घोषणा
एक्सपेरीमेंटल फिजिसिस्टचे (प्रयोगकर्त्या भौतिक शास्त्रज्ञांचे) अभिनंदन करताना स्वतः पीटर हिग्ज
आपल्या जीवनकालातच अनुमानित बोसॉन सापडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पीटर हिग्ज
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9806
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

सर्न च्या बुलेटीन मधला ले

१९६९ च्या एका रात्री दोन वाजता जागा होतो. मानवाने आपले ऐतिहासिक पाउल चन्द्रावर ठेवले.तो क्षण अजूनही आठवतो.नील आर्मस्ट्राँग यानी आणलेले चांद्र अश्म अगदी तीन फुटावरून पहाण्याचे भाग्य ही त्यानंतर मला पुणे येथे इस्स्टीटुट ऑफ इंजेनियर्स च्या जागेत मिळाले. ही " इशकणां" ची बातमी आज दुपारी पाहिली. हे भाग्य त्याच मालिकेतील समजू काय ?

धन्यवाद! अदितीसारखे तज्ञ यात माहितीपूर्ण भर घालतील या अपेक्षेने या धाग्याकडे लक्ष ठेवणार आहे. फक्त या कणाला बोसॉन का म्हणतात याचा विकिपेडियावरील हिग्ज-बोसॉन पार्टिकल विषयीच्या माहितीत सरळ स्पष्ट उल्लेख नाही हे खटकलं, पण विकीवरच इतरत्र असलेल्या बोसॉनच्या माहितीत हा उल्लेख आहे. [बर्‍याच ठिकाणी हे नाव Higgs-boson असं लिहिलं जातं, b captalize न करता...... हिग्ज म्हणजे पीटर हिग्ज हा शास्त्रज्ञ, जो हयात असून या शोधसभेत उपस्थित होता; पण ...] आपणा भारतीयांना अभिमानाची गोष्ट आहे की त्या Boson च्या मागे आहे ती Bose-Einstein Condensate ची थिअरी, आणि बोस म्हणजे प्रा. सत्येन्द्रनाथ बोस.

गॉड्स पार्टिकल या न्यायाने ईशकण हे ठीक. पण ब्रह्मकण हा शब्द अधिक उचित ठरावा. भाषातज्ज्ञ अधिक सांगतीलच. :-)

In reply to by श्रावण मोडक

ह.घ्या. (असे वेगळे लिहावे लागते हे दुर्दैव आहे.) मोडकांनी भाषातज्ञांवर जबाबदारी ढकलू नये ही आग्रहाची विनंती. भाषातज्ञ ती घेणार नाहीत. :) कारण- ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण (किंवा ब्राह्मण ब्रह्म जाणतो) अशा न्यायाने - या ईशकणाला जर ब्रह्मकण म्हटले तर या हिग्ज बोसॉनला जाणणारे सर्व शास्त्रज्ञ ब्राह्मण आहेत असे श्री. मोडक महाशयांना सुचवायचे आहे अशी खात्री पटली. ;)

In reply to by विसुनाना

अगदी अगदी! शेवटी ते ही ब्राह्मणच! ;)

माहिती छान. पण अजून माहिती कोणी देऊ शकले तर उत्तम. विशेषतः याला क्रांतिकारी शोध का म्हणतात? अशी कोणती क्रांती आमच्या-तुमच्या आयुष्यात या शोधाने होणार आहे ते कळले तर तयार राहायला बरं पडेल.

In reply to by नगरीनिरंजन

जर युद्धखोर राष्ट्रे तलवारी म्यान करुन २५ वर्षे शांत बसले तर या शोधीत कणांच्या आधारे आपण मानवनिर्मीत भौतीकी नियम वापरुन कस्टमाइझ्ड विश्व बनवु शकु. ( आणि मग नो मोअर सास बहु सिरियल किंवा बार्बी डॉल अ‍ॅण्ड क्रिकेट :) आपण निर्माण केलेल्या विश्वाशी खेळा आणि मनोरंजन करा ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

म्हणजे जसं नदीतून वाळू उपसून घरं बांधतो आपण तसं का?
आपण निर्माण केलेल्या विश्वाशी खेळा आणि मनोरंजन करा
आँ? मनोरंजनासाठी चाललंय का हे सगळं?

In reply to by नगरीनिरंजन

अगदी नदीतुन वाळु उपसुन घर बांधावं तसं. आणि किती प्रकारची घरं असावी... याला लिमीट नाहि. काहि ठिकाणी चुंबकीय क्षेत्रात वीजवाहक धारु फिरवला तर वीज निर्माण व्हायच्या ऐवजी उष्णता निर्माण होईल... कुठे भारवाही कणांपासुन अणु बनवण्यापेक्षा ध्वनी लहरेंतुन ते बनतील. तिथे सूर्याच्या किरणांनी तहान भागेल आणि वाळुची शेती करावी लागेल :) >>आँ? मनोरंजनासाठी चाललंय का हे सगळं? -- हे सगळं म्हणजे काय.. अहो सर्वकाहि मनोरंजनासाठीच चाललय. मग हे तरी त्यातुन कसं सुटेल ? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आँ? मनोरंजनासाठी चाललंय का हे सगळं?
सगळे काही मनोरंजनासाठीच चालेले खेळ आहेत हो.. "लीला" परमेश्वरही लीलाच करतो आहे ना? म्हणजे काय? खेळ. तो खेळतो. आपल्याला बनवतो. आपण नवा खेळ मांडायच्या स्टेजपर्यंत उत्क्रांत होऊ शकतो ना?

In reply to by अर्धवटराव

>>>जर युद्धखोर राष्ट्रे तलवारी म्यान करुन २५ वर्षे शांत बसले तर या शोधीत कणांच्या आधारे आपण मानवनिर्मीत भौतीकी नियम वापरुन कस्टमाइझ्ड विश्व बनवु शकु. अधोरेखित शब्द मजेशीर :) >>>>( आणि मग नो मोअर सास बहु सिरियल किंवा बार्बी डॉल अ‍ॅण्ड क्रिकेट आपण निर्माण केलेल्या विश्वाशी खेळा आणि मनोरंजन करा ) विनायकप्रभुमोड>पँट्च्या खिशात हात घालून निवांत उभे राहिले तरी बरेच मनोरंजन होते / विनायकप्रभुमोड>

In reply to by अर्धवटराव

आपण निर्माण केलेल्या विश्वाशी खेळा आणि मनोरंजन करा > म्हंजे फार्मव्हिले का? :P

In reply to by कवितानागेश

ते म्हणजे पौराणिक विमाने आणि वैज्ञनीक पतंग बनवा आणि कलादालन/पाककृती सदरात काथ्याकुट करा :P अवांतरः >> आजचा सुविचारः अंडे खा, सेक्सी व्हा! -- फुटलो (अंड्यासारखा नाहि बरं) अर्धवटराव

शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन. नेमकं काय शोधलंय अन त्याने काय होणार हे अज्जिबात समजलं नाही पण जगाचं भलं होणार असेल तर चांगलंच आहे.

विश्वनिर्मितीचे कोडे यातून उकलण्यास मदत करणारा हा कण एका प्रकारे - निदान जड विश्वातून - देव या 'संकल्पने'ला तिलांजली देण्याच्या दिशेने नेणारा आहे म्हणजे याला 'सैतान' कण म्हणायला हवे, देवकण कुठला हा.

In reply to by रमताराम

विश्वनिर्मितीचे कोडे यातून उकलण्यास मदत करणारा हा कण एका प्रकारे - निदान जड विश्वातून - देव या 'संकल्पने'ला तिलांजली देण्याच्या दिशेने नेणारा आहे म्हणजे याला 'सैतान' कण म्हणायला हवे, देवकण कुठला हा. वा फारच छान भाबडा आशावाद आहे हा. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आशावाद हा नेहमी भाबडाच असतो, असे आमचे आंजावरचे विचारवंत मित्र म्हणतात.

In reply to by रमताराम

एरवी देव नाही असं कोणी ठामपणे म्हटलं असतं? (चला धाग्याला आता जम्मू सुद्धा सामील झाले)

In reply to by रमताराम

मला वाटायचं की सैतान हीही भ्रामक कल्पना आहे. ;-)

In reply to by श्रावण मोडक

तुम्हाला नि पुप्याला भेटण्यापूर्वी माझाही असाच गैरसमज होता...... दूर झाला.

In reply to by रमताराम

म्हणूनच मी तरी तुला देव मानतो बॉ... ;-)

In reply to by श्रावण मोडक

म्हणजे तुम्हीही आता माझं देऊळ बांधून आपलं हार-फुलांचं नि अध्यात्माचं - या देवाचा सोल एजंट म्हणून - दुकान चालवणार तर. पहिल्यापासून हुशार होऽ.

In reply to by रमताराम

चला आता देव नाही असे सांगत फिरता येईल. (असाच प्रतिसाद कोठे तरी दिला आहे. परत देतो आहे कारण विषय तोच आहे)

विशेष कौतुक वाटले नाही. मिपावरच्या काही लेखकूंना हा शोध 'शब्दकणां'च्या रुपाने आधीच लागलेला आहे. हे शब्दकण दर दिवशी स्वतःपासून अनेक शब्दांकणांची निर्मीती करतात आणि ते मिपाकरांच्या डोक्यावरती आदळतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

एल एच सी (लार्ज हॅड्रॉन कोलायडर) प्रमाणे मिपादेखील *एल जी सी आहे असेच ना? *= लार्ज जिलेबी सेंटर.

विज्ञानाचा साह्याने सृष्टीची उकल होण्याच्या दृष्टीने शोधलेला कण आणि अशा कणांच्या बाबतीत मूलभूत संशोधन करणार्‍या विविध शास्त्रज्ञांबरोबर सत्येंद्रनाथ बोस यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहेच. बाकी, कोणत्या कणापासून विश्वाची निर्मिती झाली. आणि कोणते अणू चे विघटन होते, होत नाही. कोणत्या अणूंचा स्फोट केल्यावर कशाची निर्मिती होते वगैरे काही कळत नाही. विश्वनिर्मितीचा शोध विज्ञानाने लावावा नाही तर ईश्वरवाद्यांनी, पण कोणीतरी या निर्मितीमागच्या शक्तीची भेट घडवून आणावी, इतकीच आपली इच्छा आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण कोणीतरी या निर्मितीमागच्या शक्तीची भेट घडवून आणावी, इतकीच आपली इच्छा आहे.
नानबा, अरे आपली ती डबल बॅरल आण रे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

साल्या परा मला विसरलास का? लक्षात ठेवीन.

In reply to by विनायक प्रभू

साल्या परा मला विसरलास का? लक्षात ठेवीन.
आता ह्या गादीवरच्या कुस्तीच्या वयात, तुम्हाला कुठे कुस्ती खेळायला न्यायचे लाल मातीत ? म्हणून हाक नाही मारली प्रभुदेवा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, वयाबाबतीत बोलायचे काम नाही हां. विइश्ठ कणाबाबतीत आपली पि.य्च.डी. आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जाऊ दे रे ! आपला माणूस आहे... सांजच्याला आणु त्याला भेटवून धर्मक्षेत्रे कावेरीक्षेत्रे मधे ;)

युरेका युरेका युरेका युरेका युरेका hey GOD pls help these people to discover the truth of world. --------------------------------- GOD भक्त.

In reply to by गोंधळी

>>>युरेका युरेका युरेका युरेका युरेका हो हो हो ह्हो...हो! ओ गोंधळी, कापडं घाला आदी... :P 'तसंच' पळू नगा. कायदं बदलल्यात आता! ;)

In reply to by प्यारे१

=)). आता देवाच्या व्रताच्या नावावर चालतं म्हणा कपड्याविना प्रदक्षिणा वैग्रे घालणं. एरवी पाप वा अश्लील असलेले कृत्य देवाच्या नावावर पावन होऊन जाते. परिसस्पर्श म्हणतात तो हाच हो.

In reply to by प्यारे१

प्यरे१ जी भावना को समझो म्हण्जे कपड्यांचा प्रोब्लेम येणार नाही. (आता ही भावना कोण असे विचरु नका)

In reply to by Nile

I almost learned to pretend that I have a Boson Candy ;) अर्धवटराव


“Physicists do not need mysticism and mystics do not need physics, but humanity needs both." - Dr. Capra