Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Wed, 07/04/2012 - 17:20
लेखनविषय (Tags)
भाषा
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
आस्वाद
मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि नशापाणी न करता कुत्री आणि मांजरं पाळत आलो आहे. मांजरांची पिल्लं बिल्ल्यांसारखी शर्टावर लटकावून मी लहानपणी हिंडायचो. ती नखांनी शर्टला घट्ट पकडून असायची.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. लटकता लटकता ती पिल्लं हळूहळू वर चढत जायची..मग खांद्यावर चढून कानाशी कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले की मी परत त्यांना पकडून शर्टाला अडकवायचो. मांजरांना मी सुकी कोळंबी आणून घालायचो. कोळंबीचा पुडा घेऊन घरात शिरलं की जिथ्थे कुठे मांजरं बसली असतील ती हर्षवायूने ओरडत पायात यायची. एखादं मांजर गरीब स्वभावाचं निघायचं, बाकी सर्व एकजात स्वार्थी आणि वखवख करणारी.. शिवाय काम झालं की झंडा ऊंचा करुन चालते होणारी..इन जनरल मांजर जात नालायक.. त्यांच्याविषयी याहून जास्त लिहायची त्यांची लायकी नाही. म्हणून मग कुत्री.. पण कुत्र्यांमधेही भरपूर दुर्गुण असतात.. कदाचित मांजरापेक्षा जास्त.. कितीही कुलवान कुत्रं असलं तरी ते रस्त्यावर फिरायला नेल्यावर शी किंवा तत्सम गलिच्छ पदार्थात तोंड घालतंच. त्यासाठी त्याला मारहाण केली तर ते निरागस चेहरा करुन आपल्याकडे पाहात राहतं. आंघोळ घालण्यासाठी कुत्र्यांना नेताना त्यांना वधस्तंभाकडे नेत असल्यासारखी त्यांची धडपड असते. गळ्याला फास लागेपर्यंत उलटे खेचत राहतात. त्यांना जवळजवळ फरपटतच नळस्तंभाकडे न्यावं लागतं. आंघोळ झाली रे झाली की तत्क्षणी ते नाकाच्या शेंड्यापासून शेपटाच्या टोकापर्यंत एका लयीत थुर्रर्रर्रर्रर्र करुन आपल्या बेसावध अंगावर सुडाचे शिंतोडे उडवतात. त्यानंतर मात्र ते अंगात वारं शिरल्यासारखे इकडून तिकडे पळत सुटतात. आंघोळीनंतर इतका आनंद होत असताना ती करण्यापूर्वी इतका दंगा करण्याचं कारण तेच जाणोत. संधिवात, वार्धक्य, स्लिपडिस्क,फुटका गुडघा,कपाळमोक्ष इत्यादिंच्या कचाट्यात न सापडलेल्या लोकांनी डॉबरमन, ग्रेट डेन असे वासराएवढे कुत्रे पाळले तर एखाददोन वर्षांत ते वरीलपैकी एका पीडेने बाधित झालेच पाहिजेत. मालक इमानदारीत फिरायला नेत असतानाही तेवढ्यात जीव खाऊन पुढे खेच घेण्याचं कारण समजण्यासाठी कुत्र्याचा जन्मच घ्यावा लागेल.. ही जीवघेणी खेच कमी पडली तर आपल्या या श्वानविशेषाला आसपास कुठेतरी एखादं मांजर, डुक्कर दिसावं..बस्स..मग मनगट तुटो वा साखळी तुटो.. शिवाय श्वानवाहकाच्या मणक्यात गॅप पडलीच पाहिजे.. शिवाय ही वासरुछाप कुत्री दणादणा खातात. दिवसाकाठी पाचसहा अंडी, अर्धा किलो मटण साताठ भाकर्‍या असं भदाडभर खाद्य पैदा करुन त्यांना घालावं लागतं. इतर कोणाच्या जिवावर सोडून जाता येत नाही. त्याचा बकासुरी आहार पाहून दोन दिवसात तुम्हाला घरी परत बोलावण्यात येतं. शिवाय या राक्षसी कुत्र्यांना खाण्याची जराही नजाकत नसते. थाळीला पोचे येईपर्यंत त्यावर तुटून पडतात. भसाभसा खाताना हे जितकं सांडतात त्यावर एका छोट्या केसाळ कुत्र्याचं जेवण निघेल. नंतर यांच्या नाकाभोवती अन्नाचा गोळा चिकटलेला असतो आणि त्यांना त्याचं भान नसतं.. काही मोठ्या आकारातल्या जातींचे कुत्रे एकाच मालकाच्या सोबत राहतात आणि त्याने खायला दिल्याशिवाय खात नाहीत. त्यामुळे त्याच्या लाडक्या मालकाच्या गैरहजेरीत हे त्याची आठवण काढून सुरात रडतात. उपाशी राहतात. अन्न सोडून खंगायला लागतात. की मग मालकाला झक मारत कामधाम सोडून घरी यावं लागतं. मालक थोड्या दिवसांच्या गॅपने घरी आलेला दिसला तर दरवाजातच या कुत्र्यांना प्रेमाचं महाप्रचंड भरतं येऊन ते गुर्ब गुछ असे आवाज काढत मालकाच्या पोटाखांद्यावर पुढचे दोन पंजे ठेवतात. मालक किरकोळ असला तर कुत्र्याच्या तीसचाळीस किलोच्या प्रेमाने तो खाली कोसळतो, पण कुत्र्याचा मात्र मालकाला पाडण्याचा उद्देश नसतो. या धोबीपछाड अवस्थेत मालकावर कुत्री आपली जीभ वापरु इच्छितात. जितकं कुत्रं मोठ्ठाड तितकी त्याची जीभ लांब अन लपलपीत. मोठ्या कुत्र्याची जीभ "लप्प" अशा एका फटकार्‍यात मालकाचा संपूर्ण चेहरा भिजवू शकते आणि अशावेळी एकाच फटक्यात हे होत असल्याने बचावाची संधी मिळत नाही. कुत्री अत्यंत म्हणजे अत्यंत लोचट असतात. यासाठी एक साधा प्रयोग करुन खात्री करता येईल. स्वत:च्या पाळीव कुत्र्याला चुक चुक करून बोलवा. तो नक्कीच तातडीने तुमच्या अंगाशी येऊन चिकटेल. मग त्याला जोर लावून दूर ढकला. तुम्ही जितक्या जोरात दूर ढकललात तितक्याच जोरात स्प्रिंग अ‍ॅक्शनसारखा तो तुम्हाला परत येऊन झळंबेल. असं कितीदाही ढकलून पहा. तुम्ही थकाल पण कुत्रा लोचटपणात हार जाणार नाही. इमानदारी हा शब्द कुत्र्यांच्या बाबतीत तितकासा बरोबर नाही. इमानदारी या शब्दात चाकरीचा भास होतो. अन्नाच्या बदल्यात आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहणं असा काहीसा गुण.. पण कुत्री तर आपल्या मालकावर साली अगदी अन्नाशिवायही अतोनात प्रेम करतात.. एकदम निरपेक्ष.. फार त्रास होतो..सवय नसते आपल्याला आणि मग आणखीच त्रास. हे सर्व सहन करता येईलही.. पण कुत्र्यांचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे ती मरतात. तेच्यायला माणूस जाण्याहून वाईट प्रकार... मुळात फार जास्त प्रेम लावायचं असेल तर मग नंतर मरण्याला काय अर्थ आहे? आणि मरायचंच तर का लावतात माया? बेअक्कल प्राणी.. ..तेव्हा अजून कुत्र्याच्या मोहात पडला नसाल तर आता यापुढे कुत्री आणून पाळू नका इतकंच..
  • Log in or register to post comments
  • 47489 views

प्रतिक्रिया

Submitted by जाई. on Wed, 07/04/2012 - 17:38

Permalink

हम्म सुरुवातीला वाटल कि गविनी

हम्म सुरुवातीला वाटल कि गविनी मांजर कुत्रांची तुलना लिहीलीय पण शेवटच्या दोन परिच्छेदात गवि टच जाणवला त्या दोन परिच्छेदांचा अनुभव स्वत घेतलाय
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/04/2012 - 17:39

Permalink

नेहमी प्रमाणे गवी स्टाइल...

नेहमी प्रमाणे गवी स्टाइल... एक नंबर ... झक्कास...! Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 07/05/2012 - 23:23

In reply to नेहमी प्रमाणे गवी स्टाइल... by अत्रुप्त आत्मा

Permalink

+१

अगदी अगदी.... गवि रॉक्स :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 07/04/2012 - 17:41

Permalink

शेवटच्या दोन परिच्छेदात

शेवटच्या दोन परिच्छेदात लेखाचा सूरच पालटला की. खासच,
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 07/04/2012 - 17:43

Permalink

मस्त लेख...

सूंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Wed, 07/04/2012 - 17:49

Permalink

वा वा वा....

मस्तच. वरती जाईनं म्हटल्याप्रमाणं शेवटचे दोन परिच्छेद खास गविशैलीचे. मस्तच. पुलंचं "पाळिव प्राणी आणि पक्षी" ऐकल्यावर काहीही नाविन्य न घेता हे त्याच लाइनवर जातय की काय असं वाटलं, पण सुदैवानं तसं झालं नाही. कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले शब्दश: चित्र समोर उभे करणारे शब्द, वाक्य.:- त्यांना जवळजवळ फरपटतच नळस्तंभाकडे न्यावं लागतं. नळस्तंभ ह्या शब्दाला सलाम! गुर्ब गुछ रुक्ष व्याकरणात अर्थवाही क्रियाविषेषणे असं काहिसं शिकलो होतो. त्याचं जिवंत प्रात्यक्षिक म्हणजे हा शब्द. थेट "झपूर्झा" च्या तोडिचा. जितकं कुत्रं मोठ्ठाड तितकी त्याची जीभ लांब अन लपलपीत. मोठ्या कुत्र्याची जीभ "लप्प" अशा एका फटकार्‍यात मालकाचा संपूर्ण चेहरा भिजवू शकते आणि अशावेळी एकाच फटक्यात हे होत असल्याने बचावाची संधी मिळत नाही. हे म्हणजे पुन्हा एकदा शब्दश: चित्र समोर उभे करणारे शब्द, वाक्य. खूपच आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 07/04/2012 - 17:52

Permalink

अचूक निरीक्षणातून उतरलेला

अचूक निरीक्षणातून उतरलेला जबरा लेख शेवटी अंमळ हळवा करून गेला. बाकी मांजरं पण लोचटपणात कुत्र्यांहून बिलकुल कमी नाहीत. लाडीगोडीने अगदी पाठ खाजवत हैराण करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Wed, 07/04/2012 - 17:57

In reply to अचूक निरीक्षणातून उतरलेला by प्रचेतस

Permalink

नाही....

त्यांचा लोचटपना नि मैत्री पोटभरेपर्यंतच. नंतर त्यांना माणसाशी दोस्ती करण्यात काही इंटरेस नसतो. कुत्री पोट भरले तरी, भुकेले असले तरी माणसाशी खेळायला, दंगा करायला तयार असतात. तसाच काहिसा प्रकार घोड्यांचा. ते नंतर कधीतरी. आमच्या ब्राउनीचं सगळ्यात गमतीशीर काही वाटत असेल तर ते म्हणजे पठ्ठ्या त्याच्याकडं लक्ष दिलं नाही की स्वतः ची शेपूट पकडायला जाउन एकटाच गरागरा फिरत बसायचा. खेळायला लागलो त्याच्याशी की पुन्हा शांत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Wed, 07/04/2012 - 18:02

Permalink

अनुभव अनुभव म्हणतात तो हाच.

अनुभव अनुभव म्हणतात तो हाच. शब्दा-शब्दात अनुभव ओघळतोय. एकदम गवि-स्टाईल! स्साला, आताशा कुत्री पाळायलाच नकोशी वाटतात ती केवळ आणि केवळ गविंनी दिलेल्या कारणापोटीच..... (एकेकाळी ३-४ कुत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवून खांदा दिलेला) प्रास
  • Log in or register to post comments

Submitted by आगाऊ कार्टा on Wed, 07/04/2012 - 18:03

Permalink

इन जनरल मांजर जात नालायक..

लेख सुंदरच आहे पण "इन जनरल मांजर जात नालायक.." हे पटले नाही. कारण... १) मुळात मांजर हा अतिशय स्वच्छ राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला आंघोळ वगैरे घालायची भानगड नाही. २) मांजराला फिरायला घेऊन जावे लागत नाही. ३) मांजर सहसा चावत नाही. चावले तरी जखम होईल इतकी ताकद नसते. समजा झालीच जखम तरी इंजेक्शन घ्यावे लागत नाही. अर्थात हे मी गावठी मांजरांबद्दल बोलतोय. पर्शियन कॅट वगैरेंबद्दल आपल्याला काही महिती नाही. आमच्या कोकणातल्या आजोबांच्या घरी कायम ४-५ मांजरे असतात (सध्या ८ आहेत). त्यामुळे घर कौलारू असून सुद्धा ऊंदीर औषधाला सुद्धा मिळत नाही. त्यचबरोबर फुरसे, मण्यार, घणस यांसारख्या सरपटणार्‍या विषारी जनावरांची देखील भिती नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 07/04/2012 - 18:28

In reply to इन जनरल मांजर जात नालायक.. by आगाऊ कार्टा

Permalink

मान्य..

तुम्ही मांजर कसं पाळण्यास सुलभ, उपयोगी, सेफ आणि स्वच्छ आहे हे सांगितलंत. नालायकपणाचा यातल्या कशाशी काही संबंध नाही.. तो वेगळाच गुण.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 07/05/2012 - 21:26

In reply to इन जनरल मांजर जात नालायक.. by आगाऊ कार्टा

Permalink

चुकीचा गैरसमज.

अज्ञानात सुख असते म्हणे. हे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/Cat_scratch_disease अतीशय स्वच्छ मांजरीची 'शी' काढण्याचा प्रसंग कधी आला आहे का तुमच्यावर?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 07/04/2012 - 18:05

Permalink

छान.

एकुन एक अनुभव घेतले आहेत. आणि लिहिलंही एकदम मनातलं. कुत्री पाळण्याचा नाद असल्यामुळे लेख आवडला. सध्या जर्मन शेफर्ड आहे. लंबर एकची कामचुकार आहे. कोणी आल्यागेल्यावर भूंकत नाही. फार क्वचित तिला जवाबदारीची आठवण येते. पण, आता जीव लावला आहे, सोडता येत नाही सोडणार नाही. पामेलियन, डॉबरमन, आणि आता जर्मनशेफर्ड,आता ग्रेट डॉन किंवा वासरुसारखं मोठं हवंय. कोणाकडे हाय का ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Wed, 07/04/2012 - 18:11

In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरुटेसर, पाठदुखी लावून

बिरुटेसर, पाठदुखी लावून घ्यायचा विचार दिसतोय का?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 07/04/2012 - 18:24

In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

कोणी आल्यागेल्यावर भूंकत

कोणी आल्यागेल्यावर भूंकत नाही.
कुत्र्याचं भुंकण्याचं प्रमाण त्याच्या शरीराच्या आकाराच्या व्यस्तप्रमाणात असल्याचं निरीक्षण आहे. माझं डॉबरमन कुत्रं शांत असायचं. फार झालं तर एकदाच भफ्फ करायचं घशातल्या घशात. तेवढ्यानेही समोरच्याचं पाणी व्हायचं. जवळच्या घरात ग्रेट डेन होता तो तर भुंकायचा नाही की पळायचा नाही. नुसता गेटची पूर्ण लांबी अडवून शांत आडवा झोपायचा.. बस्स. तेवढ्याने गेटबाहेरचाही ट्रॅफिक थांबायचा.. उलट पोमेरियन पहा.. उगाच ब्यॅक ब्यॅक ब्यॅक ब्यॅक कंटिन्युअस....आणि आलेला मनुष्यही घाबरण्यापेक्षा वैतागतो जास्त अशा किटकिटीने..
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Wed, 07/04/2012 - 21:33

In reply to कोणी आल्यागेल्यावर भूंकत by गवि

Permalink

+१

तसच ते वोडाफोनच्या जाहिरातीतले कुत्रेही भुंकायला लागले की लैच डोकं उठवतात. भुंकताना आवेश तर इतका की बैलाच्याही अंगावर धाऊन जातील आणि बैलानं नुसती मुंडी हलवली तरी धूम पळत माघारीही फिरतील! आमचा ब्राउनी हा पामेरियन. एकदा घरात नियमित घुसणार्‍या मांजराच्या मागे लागला. मांजर धुम्म पळत सुटले. मांजर पुढे हे आणि हे बुद्धु मागे. आख्ख्या घरात हैदोस सुरु. कपाटाच्या मागची फट्,बाथरूम शेजारचा पॅसेज्,,पलंगाखालची रिकामी जागा अशा सर्व जागीए घुसून ह्यांचा लपंडाव सुरु झाला. शेवटी अंगणात एका भिंतीच्या कोनाड्यापर्यंत मांजर पळत गेले आणि आमचे साहेब मागे मागे वॅक वॅक करत आवेशात त्याच्या मागं. मांजराला पळायला जागाच उरली नाही. ब्राउनी अगदि फूटभर अंतरावर उभा आणि...... ... आणि एकदम मांजरानं नखं काढली.फिस्सकन ते वसकले. शेपूट ताठ झाली. त्याचे शरीर कडक झाले. त्याच्या निस्त्या "म्याsssव" ला सुद्धा विलक्षण धार आली. तो अवतार एवढा जबरदस्त होता की ब्राउनीची बोबडी वळली आणि तोच उलट्या पावली धूम पळत सुटला. काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे आणि मांजर त्याच्या पाठलागावर असा अद्भुत सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पहायला मिळाला!!
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Wed, 07/04/2012 - 21:37

In reply to +१ by मन१

Permalink

=)) =)) किस्सा आवडला मनोबा

=)) =)) किस्सा आवडला मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/04/2012 - 21:46

In reply to +१ by मन१

Permalink

सेम असाच किस्सा मीपण घडताना

सेम असाच किस्सा मीपण घडताना पाहिला होता :) लै खत्रा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 07/04/2012 - 22:08

In reply to +१ by मन१

Permalink

हाहाहा लै भारी.

पामेरियन लै शेपूट घालू कुत्रं आहे. पण, याचा आव असा की याच्या समोर कोणी आलं तर फाडून खाईल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 07/05/2012 - 10:52

In reply to +१ by मन१

Permalink

काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे

काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे आणि मांजर त्याच्या पाठलागावर असा अद्भुत सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पहायला मिळाला!! तुमच्या घराच्या जागी शनिवारवाडा बांधायला घ्या मग आता ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 07/05/2012 - 10:52

In reply to +१ by मन१

Permalink

काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे

काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे आणि मांजर त्याच्या पाठलागावर असा अद्भुत सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पहायला मिळाला!! तुमच्या घराच्या जागी शनिवारवाडा बांधायला घ्या मग आता ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/05/2012 - 11:06

In reply to काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे by मृत्युन्जय

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे तो

माझ्या माहितीप्रमाणे तो किस्सा ससा आणि कुत्रे असा होता. चूभूदेघे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 07/05/2012 - 12:32

In reply to माझ्या माहितीप्रमाणे तो by बॅटमॅन

Permalink

हो. तसाच आहे. पण हा

हो. तसाच आहे. पण हा बाजीरावाचा शनिवार वाडा थोडेच आहे. हा मनरावांचा शनिवारवाडा आहे ना. इथे कुत्रा मांजर असु शकते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 07/05/2012 - 12:33

In reply to हो. तसाच आहे. पण हा by मृत्युन्जय

Permalink

सहमत आहे... 'मना'च्या खेळात

सहमत आहे... 'मना'च्या खेळात काहीही घडू शकतं की! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/05/2012 - 12:59

In reply to हो. तसाच आहे. पण हा by मृत्युन्जय

Permalink

रैट्ट यू आर स्सार

रैट्ट यू आर स्सार :)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 07/05/2012 - 15:58

In reply to काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे by मृत्युन्जय

Permalink

शनिवार ऐवजी

शनिवार ऐवजी "मनीमार वाडा " (म्हंजे जिथं मांजरीनं (कुत्र्याला) मार दिला ती जागा) बांधायला घ्यावा म्हणतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/05/2012 - 16:58

In reply to शनिवार ऐवजी by मन१

Permalink

चला यमकहरामी कुठचे

चला यमकहरामी कुठचे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 07/05/2012 - 11:06

In reply to +१ by मन१

Permalink

वाघ

वाघ मागं मी पुढं, वाघ मागं मी पुढं, वाघ मागं मी पुढं, :D :D :D :D :D
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 07/05/2012 - 23:35

In reply to +१ by मन१

Permalink

=)) =)) =))

असा प्रसंग जर व्हॉडाफोन कुत्र्याच्या नशिबी आला तर त्यांना डिस्ल्केमर टाकावं लागेल... नेटवर्क फॉलोव्स एव्हेरीव्हेअर, एक्सेप्ट रागावलेल्या मांजरी :D अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Wed, 07/04/2012 - 18:14

Permalink

म्हणून मी कुत्री आणि मांजर

म्हणून मी कुत्री आणि मांजर पाळण्याच्या भानगडीत पडत नाही. एकदा ससे पाळले होते. नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलो असताना कुत्र्यांनी माझ्या लाडक्या सश्यांचा फडशा पाडला होता. म्हणून आता कुठलाही पाळीव प्राणी घरात पाळण्याची इच्छा होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 07/04/2012 - 18:24

Permalink

मस्त लेख गवि. आवडला.

मस्त लेख गवि. आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 07/04/2012 - 18:29

Permalink

वा..

लेख छानच, खूप आवडला.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by उदय के'सागर on Wed, 07/04/2012 - 18:30

Permalink

मस्तं लेख बाकि >>.तेव्हा

मस्तं लेख :) बाकि >>.तेव्हा अजून कुत्र्याच्या मोहात पडला नसाल तर आता यापुढे कुत्री आणून पाळू नका इतकंच..>>> कुत्र्याच्या मोहात तर मी लहानपणीपासुनच आहे, पण आई-बाबांनी कधी परवानगीच दिली नाहि... अता तर पक्कं वाटतय की पाळावचं एखादं क्युटसं, छोटुसं कुत्रं :) ... ते कुत्र्याचे छोटे छोटे पिल्लं किती 'गोग्गोड' असतात नै :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Wed, 07/04/2012 - 18:30

Permalink

छान लेख

गमतीजमतीत सुरुवात होवून लेख संपतांना हळवे करून गेला. लेखात लिहिलेल्या तमाम कारणांमुळे कोणताच प्राणी पाळावासा वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/04/2012 - 18:35

Permalink

मस्त लेख...वल्लीने

मस्त लेख...वल्लीने म्हटल्याप्रमाणे शब्दाशब्दातून अनुभव ओघळतोय. कुत्र्यांपेक्षा मांजरं देखणी पण तितकीच नालायक (स्वार्थी, माणसासारखी ;)). कुत्र्यांसारखे निरपेक्ष प्रेम कोणी करू शकत असेल असे नाही वाटत. आमच्या शेजार्‍यांचे कुत्रे त्याला रात्री मोकळे सोडले की कायम आमच्याच अंगणात ठाण मांडायचे. त्याला त्याच्या घरात फार प्रेम मिळत नसावे, ते कायम आमच्याचकडे. इतके असले तरी अलीकडे कुत्र्यांची फारच भीती वाटते- तेदेखील एकदाही कुत्रे चावले नसताना. कशी घालवावी कळत नाही. काही अंशी यशस्वी झालोय, पण नाही गेली अजून.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 07/04/2012 - 18:46

In reply to मस्त लेख...वल्लीने by बॅटमॅन

Permalink

काय घाबरता राव..

ह्या क्लिप्स बघा.. http://www.youtube.com/watch?v=ZgPZLU7q_A4&feature=related http://www.youtube.com/watch?v=G1TI-60lsY8&feature=related http://www.youtube.com/watch?v=d69Wj4VdP-o&feature=related http://www.youtube.com/watch?v=5pioav9kX0Q&feature=related
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Wed, 07/04/2012 - 20:33

In reply to काय घाबरता राव.. by मुक्त विहारि

Permalink

वा... मु.वि.

तुम्च्या दुव्यांनी मजा आणली. मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/04/2012 - 20:37

In reply to काय घाबरता राव.. by मुक्त विहारि

Permalink

पाहिले, मस्त आहेत सर्व.

पाहिले, मस्त आहेत सर्व. डॉबरमॅनची जीभ ओढणारी झाशीची राणी तर खत्राच आहे :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 07/05/2012 - 23:34

In reply to पाहिले, मस्त आहेत सर्व. by बॅटमॅन

Permalink

हो नं राव... कसली गोड पोरगी

हो नं राव... कसली गोड पोरगी आहे आणि तो डॉबरमॅन एकदम रावडी :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Wed, 07/04/2012 - 19:32

Permalink

कुत्रा, मांजर तरी परवडले...

नालायकपणाचे म्हणाल तर कुत्रा/मांजर परवडले, पण माणसाइतकी नालायक आणि हरामखोर जात दुसरी आढळणार नाही. मला एक नीतिकथा आठवते. मुनी शिष्यांना सांगत होते, ' कुत्रा बाह्यात्कारी घाणेरडा असतो. धुळीत लोळतो, नको तिथे तोंड घालतो, केसात पिसवा असतात, अंघोळीचा कंटाळा. पण मनाने एकदम चांगला. निष्ठावान, आज्ञापालक आणि मायाळू. तेच मांजराचे बघा. अत्यंत मुलायम त्वचा. दिवसातून सत्रावेळा चाटूनपुसून अंग साफ करणार. अंगावर एक किडा राहू देणार नाहीत. लाळ गाळणार नाहीत, पण मनाने लबाड. सांगितलेले ऐकणार नाही, मालकाच्या घरचे चोरुन खायला काही वाटणार नाही. अगदी विरुद्ध स्वभाव.' 'गुरुदेव! माणसाचे काय?' एका शिष्याने विचारले. त्यावर गुरुंनी मौन धारण केले. (अवांतर - मांजर आज्ञा पाळत नाही आणि त्यामुळे त्याला शिकवणे कठीण. याच कारणाने चित्रपटांत एकवेळ कुत्रा, माकड, हत्ती यांच्याकडून काम करुन घेणे सोपे, पण मांजर सहसा आढळत नाही. मात्र मागे 'कॅट फ्रॉम आउटर स्पेस' नावाचा जुना इंग्रजी चित्रपट पाहिला होता. त्यात मांजराने इतके सुरेख काम केले आहे.) रच्याकने - लेख छान लिहिलाय गवि.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 07/05/2012 - 04:36

In reply to कुत्रा, मांजर तरी परवडले... by योगप्रभू

Permalink

मांजर आज्ञा पाळत नाही आणि त्यामुळे त्याला शिकवणे कठीण..

>>>मांजर आज्ञा पाळत नाही आणि त्यामुळे त्याला शिकवणे कठीण सर्कशीतही याच कारणामुळे मांजरे नसतात. >>दिवसातून सत्रावेळा चाटूनपुसून अंग साफ करणार. लहानपणी माझ्याकडे मांजरे यायची मारामार, चुकूनही आले की शेपटी ओढून घेणे, कान मागे घडी करून घेणे, जीभेचा खरखरीत पणा तपासून घेणे अशी शिक्षा मिळत असल्याने ते सहसा दूरच पळायचे. एकदा मी अभ्यास करताना शेजारी येवून बसले व स्वत:चे हातपाय चाटून स्वच्छ करणे सुरू झाले. मी आगाऊपणा करत स्वच्छ झालेल्या पायावर बोट फिरवले, मांजराची शिस्त बिघडली! पुन्हा तो पाय चाटून काढला. मग पुन्हा मी बोट फिरवले, मग पुन्हा स्वच्छता.. असे ३ / ४ दा झाल्यावर ते वैतागून निघून गेले. :-D
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 07/05/2012 - 23:39

In reply to मांजर आज्ञा पाळत नाही आणि त्यामुळे त्याला शिकवणे कठीण.. by मोदक

Permalink

=)) =))

>> .. असे ३ / ४ दा झाल्यावर ते वैतागून निघून गेले -- असेच एखादे मांजर मिपावर येऊन गेले असावे काय? अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 07/04/2012 - 20:01

Permalink

कंपनी शोधतो आहे.

मस्तं लेख. कुत्रा पाळण्याची तीव्र इच्छा आहे. पण आता निवृत्ती नंतरच. संध्याकाळी दोन पेग घेणारा डॉबरमन शोधतो आहे. स्साला, संध्याकाळला कंपनी हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Wed, 07/04/2012 - 21:34

In reply to कंपनी शोधतो आहे. by प्रभाकर पेठकर

Permalink

फुकट

फुकटात पाजणार असाल तर पिणार्‍यांची कमी नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Wed, 07/04/2012 - 22:04

In reply to कंपनी शोधतो आहे. by प्रभाकर पेठकर

Permalink

संध्याकाळला कंपनी हवी. हे हे

संध्याकाळला कंपनी हवी. हे हे हे म्हणजे निवॄत्तीनंतरही कंपनीत जाणार
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 07/04/2012 - 20:01

Permalink

हम्म्म!

लेख आवडलाच पण माझ्या बोरिसच्या आठवणीने आतल्याआत रडायला झालं! ते दु:ख फार वाईट. तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार! :( (बोरिसच्या आठवणीने व्याकूळ)रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Wed, 07/04/2012 - 21:01

Permalink

लेख आवडला

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Wed, 07/04/2012 - 21:00

Permalink

लेख आवडला

;-)
  • Log in or register to post comments

Submitted by कौशी on Wed, 07/04/2012 - 21:50

Permalink

सुंदर लेख..

शेवट मन हळ्वे करून गेला...आवड्ला.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/04/2012 - 21:57

Permalink

लेख आवडला. आमच्याकडच्या

लेख आवडला. आमच्याकडच्या पॉमरेनियनला चॉकोलेट फार आवडायचे. तो गेल्यावर घरचे माणूस जावे तसे सगळेजण रडले होते. २५ जुलैला वाढदिवस आहे. आपण त्याला पाळले आहे की त्याने सगळ्या मेंब्रांना दावणीला बांधले आहे ते कळत नाही. ;) मुलगा म्हणतोय आणखी एक आणू. म्हणजे पुन्हा दहा बारा वर्षांनी एक म्हातारपण बघणे आले. नकोच ते!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com