शाळेतील संम्मेलन..
मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060)
वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते.
मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच. पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर आमचे मार्कांचे गूण घसरले पण अंगचे गूण उधळायला सुरुवात झाली ) मी सर्व गूण संपन्न आहे असा शिक्षकांचा समज झाला.
४थीत असतांना, बाईंनी स्नेह संम्मेलनात आम्हा मुलांचे नाटक बसवायचे ठरवले.माझे पाठांतर पक्के असल्याने मला नाटकात घेतले.सुदैवाने माझे अख्खे नाटक ३/४ दिवसांतच पाठ झाले.नाटकाची थोडक्यात कथा सांगतो.
एक राजपूत्र असतो.त्याला भाज्या आणि फळे आवडत नसतात्.राजा-आणि राणी त्याला खूप समजवतात , पण तो काही ऐकतच नसतो. प्रधान (म्हणजे, मी केलेला रोल) राजपूत्राला फूस लावत असतो.शेवटी एकदा दरबारात परी येते आणि प्रत्येक भाजीला आणि फळांना बोलावते.ते प्रत्येक जण आपले आपले गूणधर्म सांगतात.शेवटी राजपूत्र भाज्या आणि फळे खायला लागतो.
ह्यात मला आणि परीला संवाद भरपूर होते.मी प्रत्येकाचे दोष दाखवणार, तर परी गूण्.माझा थोडा रोल झाला आणि मग परीचा रोल चालू झाला.समोर गर्दी बघून आमची "वर्गभगिनी" घाबरली.तिचे , मी आहे परी , मी आहे परी , काही संपेना. ती पुढे न बोलल्यामूळे मला पण संवाद बोलता येईना.मग मीच चालू केले.
प्रधान :तुम्हाला काही सांगायचे आहे का?
परी : हो
प्रधानः राजपूत्राने फळे खावीत, भाज्या खाव्यात असे तुम्हाला वाटते का?
परी : हो
प्रधान : मग आपण कोबी पासून सुरुवात करू या का?
परी : हो
प्रधान : मग बोलाव कोबीला..का मी बोलावू...
परी: हो...
मग ती कोबी आली, तिने गाणे वगैरे गात आपले गूण-वर्णन केले.ते चालू असतांना मी हळूच त्या परीला म्हणालो... लोकांकडे न बघता, राणी-कडे बघून संवाद म्हण....मग काय त्या परीने नंतर सगळे संवाद राणीकडे बघूनच म्हटले....पुढे मोठ्या शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांत भाग घेतला... पण लक्षात मात्र हाच एक प्रसंग राहिला...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्टेज म्हंटलं की मग लहान काय
खरी गोष्ट आहे...
वा वा...
आईला अफाट हसते आहे. -
>>आईला अफाट हसते आहे. -
हो तोच तो शब्द
अंह मुवि?? बरेच हुषार होता
हुषार वगैरे काही न्हवतो...
मुव्या छान प्रसंगावधान रे!
असे ही असेल...
मस्त अनुभव. कॉलेजातले काही
अहो, मग लिहा की...
मुविजी,
:) मस्त!!
मिपा चाळता चाळता हे लिखाण वाचले
छाsssन! -(नाटकी) सोकाजी