✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साबू-हॉलीवूड गाजवणारा भारतीय अभिनेता

प
प्राध्यापक यांनी
Sun, 06/24/2012 - 20:59  ·  लेख
लेख
आज भारतीयांनी चित्रपट क्षेत्रात जबरदस्त अशी प्रगती केलेली आहे,तरीही भारतीय अभिनेत्यांना हॉलीवूड चे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे,अनेक जण हॉलीवूडमधे काम मिळवताना धडपडताना दिसतात,या पार्श्वभुमी वर काळाच्या ओघात मागे पडलेल्या पण हॉलीवूड गाजवलेल्या एका भारतीय अभिनेत्या बद्दल वाचण्यात आले ती माहीती मिपा करांसमोर मांडण्या चा हा छोटासा प्रयत्न. २७ जानेवारी १९२४ ला मैसूर ला साबू चा जन्म झाला. मुळ नाव शेलर शेख साबू. जन्म गाव कारापुर सभोवताली प्रसिध्द अस मैसूरच जंगल पसरलेलं(होय विरप्पन फेम जंगल).त्यामुळे बालपण जंगली श्वापदा मधे गेलेलं,त्याचे वडील मैसूरच्या महाराजांच्या पदरी माहुत होते,साहजीकच साबू ही हत्तींच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठा झालेला.वयाच्या दहाव्या वर्षी वडीलांच्या हाताखाली काम करायला तोही मैसूरला गेला त्याबदल्यात त्याला मिळणार होतं दोन वेळच जेवण,वर्षाला दोने कपड्यांचे जोड आणी रोज एक रुपया पगार.घरच दारीद्र्य पाहता दररोज पोटभर जेवण हे पण मोठ आमिष होतं .हे पाहता हा मुलगा भविष्यात परदेशात जाउन किर्ती मिळवेल, महालात राहील असा विचार ही कुणी केला नसेल. साबूला पहिल्यापासुनच हत्तींच जबरदस्त आकर्षण होत वयाच्या १० व्या ११ व्या वर्षीच हत्ती नियंत्रण करण्याच त्याच कसब अफलातुन होतं,हत्तींशी खेळण,त्यांच्या वर माया करण हे जणु त्याच्यात जन्मजातच होत. १९३७ ला हत्तींच्या जिवनावर माहीतीपट काढणारी एक ब्रिटीश फिल्म कंपनी मैसूरला आलेली होती त्याचा प्रमुख होता रॉबर्ट फ्लो हार्टी. रॉबर्ट साबूच हत्ती हाताळण्याच कसब थक्कच झाला एकतर ब्रिटीशांना भितीदायी आकर्षण आणी त्यात हा एवढासा पोरगा मोठमोठ्या हत्तींशी एवढ सहज खेळताना पाहून त्यान साबूला अमेरिकेला नेण्याची इच्छा दाखवली,मोठ्या कष्टानं त्याच्या वडीलांच मन वळवुन रॉबर्ट साबूला आपल्या बरोबर नेण्यात यशस्वी झाला. इथुन सुरु झाला साबूचा झगमगता काळ १९३७ ला १३ व्या वर्षी साबू रुपयार्ड किपलिंग च्या कथे वर आधारीत "एलेफंट बॉय" या चित्रपटात झळकला,हा चित्रपट चांगलाच गाजला,पुढे १९३८ ला त्याचा "दि ड्र्म " हा चित्रपट तर १९४० ला "थिफ ऑफ बगदाद" झळकला. १९४२ ला झोल्टन कोर्डा या दिग्दर्शकाने "जंगलबुक" हा चित्रपट बनवला यामधे "मोगली"नावाच्या मुलाची प्रमुख भुमिका केली,या चित्रपटानं बॉक्स ऑफीस वर प्रचंड यश मिळवल . १९४४ ला साबूला अमेरिकन नागरीकत्व बहाल करण्यात आल्,या नंतर साबू अमेरीकन वायुसेनेते भर्ती झाला व दुसर्‍या महायुध्दात अनेक चकमकीत त्यान मोलाची कमगीरी बजावली. त्याच्या या धाडसाबद्दल सरकारने त्याला "डिस्टिंगविश्ड फ्लांइग क्रॉस या पदकान सन्मानीत केल. साबून तब्बल २० चित्रपटात काम केलं. २ डिसेंबर १९६८ ला त्याचं निधन झालं. वरील लेखा चा संदर्भ हा मधुबाला या अप्रतीम पुस्तकातील आहे त्याचे लेखक डॉ.श्रीकांत मुंदरगी हे आहेत्,अजुन पुस्तक वाचतोय पण जेव्हढ वाचलय त्यावरुन सांगतो मधुबाला या अभिनेत्रीबद्दल अतिशय सुंदर माहीती यामधे आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
धोरण
मांडणी
संस्कृती
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
शुभेच्छा
प्रतिसाद
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
3668 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

अरे वा! फारच रोचक आणि नवीन माहिती, धन्यवाद!

बहुगुणी
Sun, 06/24/2012 - 21:31 नवीन
तुम्ही सांगताहात ते सर्व चित्रपट माहिती होते, पण त्यामागचा हा भारतीय कलाकार माहीत नव्हता. नवीन माहितीबद्दल धन्यवाद! वयाबाबतीतील माहितीवरून हा अभिनेता ३४व्या वर्षी म्हणजे फार तरूणपणी गेला :-(, पण ७-८ वर्षांत २० चित्रपट म्हणजे किरकोळ कामगिरी नव्हे! कौतुकास्पदच! आणखी शोधून वाचलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

खुप छान माहिती दिलित,त्याचा

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/24/2012 - 22:41 नवीन
खुप छान माहिती दिलित,त्याचा एखादा फोटो टाकायला हवा होतात.
  • Log in or register to post comments

या नावाचा अभिनेता आहे हे

शिल्पा ब
Sun, 06/24/2012 - 23:01 नवीन
या नावाचा अभिनेता आहे हे माहीती नव्हतं..त्याचा पिच्चर कुठे मिळाला तर बघेन. http://www.youtube.com/watch?v=CqehjbJiON4 मिळाला लगेच. :)
  • Log in or register to post comments

वा! लगेच दुवा दिल्याबद्दल दुवा!

बहुगुणी
Sun, 06/24/2012 - 23:40 नवीन
पूर्ण चित्रपटच आहे! पहातो आहे, साबूचं इंग्लिश बोलणं आत्मविश्वासपूर्ण आहे. त्याच्याविषयी आणखी माहिती इथे आणि इथे आहे. ड्रम या चित्रपटातील त्याची माहिती इथे मिळाली. हा चित्रपट इथे पहायला मिळेल (बहुधा पूर्ण लांबीचा असावा). सेलार साबूचे जालावर काही फोटो आहेत, त्यांपैकी एकः Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

'जंगलबुक' मधे

चित्रगुप्त
Sun, 06/24/2012 - 23:42 नवीन
'जंगलबुक' मधे साबू: Image removed. (Patricia O'Rourke & Sabu in Jungle Book ) थीफ ऑफ बगदादः Image removed. Image removed. एलिफंट बॉयः Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

व्वा! मारी नाव वाचतो आम्ही या

स्पंदना
Mon, 06/25/2012 - 08:24 नवीन
व्वा! मारी नाव वाचतो आम्ही या अ‍ॅक्टरच पण इतिहास नव्हता माहित . माझ्याकडे आहेत या सि डी ज. खरच नशिब नावाच काहीतरी आहे याचा पडताळा येतो.
  • Log in or register to post comments

डॉक्युमेंट्री

चावटमेला
Mon, 06/25/2012 - 14:50 नवीन
काही वर्षामागे, हिस्ट्री चॅनेल वर साबू वरील डॉक्युमेंट्री पाहिल्याचे आठवते. बहुधा त्याने एका अमेरिकन मुलीशी लग्न केले होते आणि चित्रपट निर्मितीचाही प्रयत्न केला होता.
  • Log in or register to post comments

१९४८ ला त्याने मार्लिन कूपर

प्राध्यापक
Mon, 06/25/2012 - 15:57 नवीन
१९४८ ला त्याने मार्लिन कूपर या गौरवर्णीय अभिनेत्रीबरोबर प्रेम विवाह केला. त्यांना दोन मुल झाली,त्याच्या पॉल साबू नावाच्या मुलानं "रॉक बँड साबू" नावाचा वाद्यव्रुंद १९८० साली काढला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा