अंगाई मज गाती
इथे ओळखीचेही पक्षी, अनोळखी का होती
रंगभूमीची गाणी कसली, रंग असेतो गाती
भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे
नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती
कुशल हातांचा स्पर्श लाभता, विराणशा माळाला
फुललेल्या बागेतुन होते, भ्रमरांची या दाटी
गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी
कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती
हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी
निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती
- संध्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1450
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
संध्या .. ह्यावेळी काहि तरी
हे मस्त ...
विषय चांगलाच निवडला-गेलेला
रचना(नेहमी सारखी) सहजगम्य होत
भिरभिरणा-या आभाळाचे,
In reply to रचना(नेहमी सारखी) सहजगम्य होत by सांजसंध्या
सुरेख !
सर्वांचे आभार. हा मा़झ्यासाठी