आनंदराव माहीती गमतीशीर आहे. वाचताना मजाही आली.
तरी देखिल हा प्रश्न उरतोच की खरंच त्याचं काय महत्व आहे बुवा?
अर्थात बर्याच गोष्टी मानण्यावर असतात... असे म्हणतात. त्याप्रमाणे मानणार्यांसाठी ही पर्वणी होती आणि नाही त्यांच्यासाठी इतर कोणत्याही क्षणांसारखाच तो एक क्षण होता. बस्स जास्त काही नाही.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मी सुद्धा अनुभवला हा क्षण !!!
मुळात चायनीज प्रमाण वेळेनुसर रात्री ८ वाजुन ०८ मिनीटीनी आणी ०८ सेकन्ड झाले असता ,
ऑलिम्पिक ची सुरुवात झाली ..
स्थानीक वेळेनुसार रात्री १२.२५ पर्यन्त उद्घाटन सोहळा चालू होता..
आणी सी सी टी व्ही वर आम्ही हा सोहळा पाहात होतो...
आगाउ माहिती: माझ्या ओळखीचे एक ग्रहस्थ मला आधीच म्हनाले होते की ,
०८ हा अन्क पाच वेळा येत असलेला हा क्षण अशुभ आहे ,
काही ना काही विचित्र ,वाईट वगैरे घडेन !!!
पण तस काहीही घडल नाही....
असो !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
बीजिंग ऑलिंपिक रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सुरू झाले ती वेळ ०८: ०८:२००८:२०:०८ अशी होती. ज्या लोकांचा ८ ऑगस्टचा मुहूर्त चुकला असेल त्यांना २० ऑगस्ट रात्री ८ वाजून ८ मिनिटे आणि ८ किंवा २० सेकंदाचे मुहूर्त साधता येतील. त्या क्षणांच्या वेळा २०:०८:२००८: २०:०८:०८ आणि २०:०८:२००८: २०:०८:२० अशा राहतील.
अर्थातच हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. निसर्गाला त्याचे कांही सोयरसुतक नसते हे मी माझ्या लेखात स्पष्ट केले आहे. मी स्वत: मुहूर्त ही संकल्पना मानत नाही. माझ्या मते कोणतीही वेळ शुभ किंवा अशुभ तर नसतेच. अमावास्येच्या मध्यरात्री किती तरी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत.
तारिख ८/८/८ ,सकाळी ८ वा ८ मि. ,वजन ८ पौंड ८ औंस
म्हणजे एकुण ७ वेळा ८.
आता पोरीचे नाव "अष्टमी" ठेवायला पाहिजे म्हणजे राहिलेल्या आठाची भर पुर्ण करता येइल. :)
(ह.घ्या.)
अभिज्ञ.
प्रतिक्रिया
गमतीशीर माहीती!
काय हो..............
मी सुद्धा
आणखी एक गंमत
अमावास्ये
आणि १९४७
बधाई हो बधाई!
८