✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देव आणि धर्म, माझे मत

श
शरद यांनी
Tue, 06/19/2012 - 11:11  ·  लेख
लेख
देव आणि धर्म श्री. वालावलकर यांच्या पुस्तकासंबंधित प्रतिसादात बरेच जणांनी देव व धर्म यावर आपले विचार प्रगट केले आहेत. हिन्दू धर्म व देव याबाबत मी वाचलेल्या ग्रंथांवरून बनलेले माझे मत येथे देत आहे. हिन्दू हा शब्दच बाराव्या शतकात मुसलमान आक्रमकांनी सिन्धू नदीच्या काठी राहणारे, गुलाम या अर्थाने वापरला आहे. त्या आधी हिन्दू हा शब्दच नव्हता तर मग हिन्दू धर्म तरी कोठून असणार ? तर मग त्यापूर्वीच्या काळामध्ये धर्म नव्हताच काय ? या करिता प्रथम धर्म याची एक व्याख्या बनवू. लोकांचे आचार विचार, श्रद्धा,भावना , अभ्यास, परंपरा इ. यांच्या प्रभावाखाली जगण्याची जी शैली त्यांनी स्विकारली असेल ती त्यांचा धर्म म्हणावयाचे. उदा. बुद्धाचे व त्याच्या शिष्यांचे विचार ज्यांना पटतात व त्याप्रमाणे वागावयाचा जे प्रयत्न करतात, त्यांचा धर्म बौद्ध. लहानपणापासून घरातील व आजूबाजूच्या लोकांनी आई-वडीलांशी कसे वागवयाचे ह्याबद्दल जे काही सांगितले ते ऐकून-जाणून त्याप्रमाणे वागणे हा पुत्रधर्म. क्षात्रधर्म, समाजधर्म, राजधर्म वगैरे अनेक धर्म एकाच माणसाला एकाच वेळी पाळावे लागत असतात. ही व्याख्या परिपूर्ण नक्कीच नाही. पण वरील इ. त आणखी थोडी भर घालून तुम्ही या व्याख्येप्रमाणे धर्माला या लेखापुरते स्विकारा. राजाचा राजधर्म, सैनिकाचा क्षात्रधर्म , संसारी माणसाचा गृहस्थधर्म, वगैरे पार वैदिक काळापासून चालत आले आहेत व अजूनही पाळले जातात. आज आपण ज्या अर्थाने धर्म (हिन्दू, मुस्लीम, बौद्ध इ. ) हा शब्द वापरतो तोही यातील एक पोटविभाग. आता देव या बद्दलचे विचार सांगून परत धर्माकडे येऊ. आज सर्वस्वी विज्ञानावर अवलंबून रहावे लागत आहे. तरीही दाभोळकर-वालावालकर यांच्या कळपात चार माणसे आली तर दहा बाबा-बापू यांच्या आश्रमात, शिर्डी-तिरुपतीला पळत आहेत. असे का होते ? ही सर्व काही अडाणी नव्हेत. चांगले शिकलेले , धनाड्य, व्यवहारचतुर, राजकारणी , सर्व काही तिकडॅ पळतांना , अमाप संपत्ती दान करतांना दिसतात. याचे कारण असे की सर्वसामान्य माणूस दाभोळकरांपेक्षा फार फार निराळा आहे. तो केवळ विचार करून त्याप्रमाणे जगू शकत नाही. त्याला राग, लोभ, प्रेम, भीती अशा अनेक "भावना" आहेत. त्याचे जगणे या भावनांच्या सांगण्यावर अवलंबून असते. आणि ही त्याला माणुस निर्माण झाला तेव्हापासून मिळालेली देण आहे. अंधारात हिंस्त्र जनावरे हल्ला करत म्हणून आदीमानव अंधाराला घाबरत होता. आजही जन्मलेले प्रत्येक मुल अंधाराला घाबरतेच. मग भले ते अत्याधुनिक रुग्णालयात जन्मलेले असेना का. तुम्ही या भावना कमी /नाहिश्या करू शकाल पण मग मानव रोबो बनेल. ते बाजूला ठेऊ. या भावना अतिशय तरल व काबूत ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे जगतांना मानवाला "आधार " लागतो. लहानपणी तो आईचा आधार घेतो, शाळेत गेल्यावर शिक्षकाचा घेतो, समाजात वावरतांना नातेवाईक-मित्र यांचा घेतो. अगदी श्री. वालावलकरसुद्धा असा आधार घेतात. माझी खात्री आहे की त्यांनी प्रयोगशाळेत जाऊन प्राणवायू आहे याची खात्री करून घेतलेली नाही. पण त्यांचा विश्वास आहे की ते काही शिक्षण घेऊन, प्रयोग करून, प्राणवायू खराच आहे हे तपासू शकतील. हा विज्ञानावरचा विश्वास हा त्यांचा "आधार" आहे. कोणताही माणुस भावनिक, शारीरिक, बौद्धिक , इ. आधार घेतल्याशिवाय जगू शकत नाही. "देव" हा असाच एक आधार आहे. सगळ्यांना असा आधार लागेलच असे नाही. ज्याला लागत नाही तो माणुस देव न स्विकारता जगू शकेल. पण अशी माणसे विरळी. बाकिच्यांना देव ही एक गरज आहे. म्हणूनच माणुस श्रीमंत आहे, बुद्धीमान आहे, शूर आहे हे महत्वाचे नसते. तो भारतात आहे की अमेरिकेत हेही गौण असते. हा देव अनादी, अनंत आहे, त्याला चार हात आहेत की हत्तीचे तोंड याला काहीच महत्ब नाही. तुमची गरज भागवता येणे एवढे त्याला जमले पाहिजे . मग काय होते की प्रत्येकाची गरज निराळी असली की त्याचा देव निराळा होतो. जगातील गुंडांना तोंड देणे ही ज्याची प्राथमिक गरज त्याचा देव दैत्यसंहारक असतो. पावसाची गरज असलेल्या शेतकरी असा पाउस पाडणारा देवच मागणार. त्यामुळे एक तर देव अनेक असतात किंवा एकच देव सर्व काही देणारा असतो. काही जणांना वत्सल, प्रेमळ देवाची गरज असते तर काहींना त्यांच्या अलौकिक प्रश्नांची उत्तरे देंणारा. तर असा हा देव अनादी काळापासून, सर्वत्र होता, आहे व पुढेही असणारच. असा हा देव माणसाहून निराळा असणार हे उघडच आहे. पण माणुस आपले काही गुणधर्म त्याला चिकटवतोच. मग असा देव क्षीरसागरात नागावर झोपणार, स्वर्गात अमृत पिणार, लग्न करून मुले प्रसवणार. तो प्रेमळ असेल किंवा क्रुरही असेल. पृथ्वीवर नसूनही भक्तांच्या रक्षणाकरिता तो पृथ्वीवर अवतार घेणार. आपल्याला जसे कोणी आपल्याबद्दल चार चांगले शब्द काढले की बरे वाटते तसे तुम्ही त्याची प्रार्थना केलीत, स्तुती केलीत तर तोही प्रसन्न होणार. तुम्हाला आपले घर वरळी सीफेसला असलेले आवडेल तसे देवांपैकी कोणी काशी पसंत करतो तर कोणी तिरुपती. तिथे त्याला भेटावयास जाणेच इष्ट, होय की नाही ? तुमचे आर्टीओत काम असेल तर तुम्हाला मध्यस्थ लागतो. मग देवाकडून काम करवून घ्यावयाचे असेल तर बडवे, पांडे, बाबा, बुवा आलेच. परत नेहमीच्या व्यवहारकडे या. शेती करावयाची तर नांगरणी, पेरणी, वगैरे करणे, त्यांची पद्धत ठरवणे गरजेचे असते. तसेच या पुजारी लोकांनी केले. त्यांनी देवाची पुजा अर्चना करण्यचे नियम ठरवून दिले व या कर्मकांडालाच आपण धर्म, नेहमीच्या अर्थाचा धर्म, समजू लागलो. सामान्य माणुस मेंढरासारखा असतो. कुणाच्यातरी मागून जाणे त्याला सोपे वाटते.तसेच त्याला विहिरीतल्या बेडकांसारखा एक राजाही लागतो. बाबा-बापू ही बेरकी माणसे ते काम पार पाडावयास तयार असतातच.आणि जर या सगळ्याला शतकांची परंपरा मिळाली की झालेच, अगदी वज्रलेप. अन्निसचे कार्यकर्ते कितीही प्रयत्न करोत , त्यांना यश मिळणे दुरापास्तच. आता थोडा भारतातला इतिहास बघू. वैदिक काळात देव नव्हता. इन्द्र, वरुण, अग्नी सारख्या देवता होत्या. त्यांच्याकडे मागणेही साधे होते, देवताही साध्या होत्या. यज्ञ हा एकमेव कर्मकांडाचा मार्ग होता. उपनिषदकारांनी तर त्यांनाही जवळजवळ झिडकारले होते. सोळ्या प्रमुख दर्शनातील तिन-चार देवाला स्विकारतात. नंतर आले बुद्ध्-महावीर. त्यांना चांगले अनुयायी मिळाले, दोन धर्म भरभराटीस आले. काही शतके चलती होती. कर्मकांडांची सोय करण्यात आली होती.या सर्व काळात समाजाच्या खालच्या वर्गातील लोकांनी त्यांची प्राथमिक गरज सांभाळावयास त्यांचे देव जपले होतेच. बहुदा यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुराणीकांनी स्वप्नमयी दुनियेतील विष्णु-शंकर आदी देव निर्माण केले. यांचा जनसामान्यावर इतका पगडा बसला की दोन हजार वर्षे समाज या जोखडाला उराशी धरून बसला आहे. मुसलमानांसारखे कडवे आक्रमक त्याला खिंडार पाडू शकले नाहीत, अन्निस म्हणजे किस झाडकी पत्ती ! याला म्हाणावयाचे "हिन्दू धर्म ". तर असे आहे हे लफडे. तुमच्या मोलकरणीने कर्ज काढून सत्यनारायणाची पुजा केली किंवा देवीकरिता बोकड मारला तर ती तिची गरज आहे, भावनिक गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तिला अडाणी म्हणता येईल पण साईबाबाच्या मूर्तीवर दीड किलो सोन्याचा मुकुट चढवणाराही अडाणीच का ? मला तर हा सगळा प्रकार,अन्निसचे काम, दारूबंदीवर व्याख्यान देण्यासारखा वाटतो, न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो ! शरद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9566 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

केवढे हे शौर्य !!

यनावाला
Wed, 06/20/2012 - 14:20 नवीन
" मुसलमानांसारखे कडवे आक्रमक त्याला खिंडार पाडू शकले नाहीत, अन्निस म्हणजे किस झाडकी पत्ती ! याला म्हाणावयाचे "हिन्दू धर्म "......श्री.शरद यांच्या लेखातून.
"इस्लामी आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त केली. मूर्तीभंजन केले. तिथली संपत्ती लुटली.या खंडप्राय देशाला परकीयांनी अनेक शतके गुलामगिरीत ठेवले.आम्ही प्रतिकार असा केलाच नाही.दास्य स्वीकारले.पण आमच्या धर्मश्रद्धा,परंपरा,चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था नष्ट हो ऊ दिली नाही. कारण मानसिक गरजांसाठी श्रद्धा आवश्यक असतात.एवढ्या सशस्त्र आक्रमकांपासून आम्ही धर्मश्रद्धांचे,कर्मकांडांचे रक्षण केले. तिथे या अंनिसवाल्यांचा काय पाड? आम्ही श्रद्धा मुळीच सोडणार नाही.त्या टिकल्याच पाहिजेत. इथल्या घरा घरातील मोलकरणींच्या मानसिक गरजा भागल्याच पाहिजेत.मग त्या मोलकरणी दारिद्र्यात , अंधश्रद्धांच्या कर्दमात पिढ्यान्पिढ्या खितपत पडल्या तरी चालेल." . हिंदुधर्माभिमान्यांचे केवढे हे शौर्य ! !
  • Log in or register to post comments

>>>आम्ही प्रतिकार असा केलाच

नाना चेंगट
Wed, 06/20/2012 - 14:54 नवीन
>>>आम्ही प्रतिकार असा केलाच नाही. अगदी अगदी !! च्यायला इतिहासाची आयमाय कशी करायची हे शिका लेको अश्रद्धांकडून. >>> त्या मोलकरणी दारिद्र्यात , अंधश्रद्धांच्या कर्दमात पिढ्यान्पिढ्या खितपत पडल्या तरी चालेल च्यामारी अश्रद्ध झाले की दारिद्र्य जाते हे माहित नव्हते ब्वा ! कित्ती सोप्पा उपाय ! आम्ही यडझव्याप्रमाणे उद्योजकता हवी असे बोंबलू बोंबलू थकलो. बाकी केवळ हिंदूं, भारतीय, संस्कृती यावर गरळ काढण्यासाठी मिपावर येणार्‍या आयडींचा विजय असो. गरळ ओकून पळून जायचे... काय हे शौर्य !! वा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला

सहमत पूर्ण सहमत

रणजित चितळे
Wed, 06/20/2012 - 17:25 नवीन
आवडली प्रतिक्रीया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

ऐ शप्पथ!!

कवितानागेश
Wed, 06/20/2012 - 19:54 नवीन
ऐ शप्पथ!! :D :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला

बरोबर आहे !!!

अर्धवटराव
Wed, 06/20/2012 - 21:02 नवीन
सातवाहन, चाणक्य-चंद्रगुप्त, प्रताप, शिवाजी वगैरे मंडळी आयुष्यभर आक्रमकांच्या घोड्यांचा खरारा करत राहिले. आणि अनिंसनी ( खरं तर संपूर्ण अनिंस संथेने नाहि... त्यातल्या काहि अति उज्वल घटकांनी ) तर मोलकरीण-तत्सम समाज घटकांच्या उन्नतीकरता प्रचंड आर्थीक तरतुदी करुन ठेवल्यात... शिवाय या अश्या उत्तमोत्तम आर्थीक तरतुदींचा लाभ घ्यावा म्हणुन त्या समाजाची यथायोग्य वाढ देखील केली. या शौर्यापुढे धर्माभिमानीच काय, पण साक्षात नेपोलियन वगैरे मंडळी देखील पाणि भरतील. बाकी डॉक्टर लोकांना ट्रीटमेंट घ्यायला काहि खास वैद्यकीय व्यवस्था लागते कि आहे त्यात काम भागु शकतं अशी शंका यायला लागलीय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला

देव-धर्म

खुशि
Wed, 06/20/2012 - 15:27 नवीन
नमस्कार. चान्गला आहे लेख्,विचार करायला लावणारा.
  • Log in or register to post comments

गणितात x चे स्थान

रणजित चितळे
Wed, 06/20/2012 - 17:35 नवीन
गणित शिकताना माहित नसलेल्या किंवा काढायच्या गोष्टींना तात्पुरते x रुप दिल्याने प्रश्न सोडवायला सोपा जातो. आपल्या आयुष्यात सुद्धा अशा ब-याच अनु्त्तरीत प्रश्नांना आपण देव, नशिब, कर्मबंधन अशा उपाधी देतो. शुन्याला पण सगुण रुप देतोच की गणितात. परत धर्म हे समाज निट चालावा ह्या साठी समाजानीच घालून घेतेलेली काही बंधन आहेत. अनिस हा एक प्रकारचा धर्मच आहे. हिंदू धर्मात हे सगळे सामावलेले आहेत. आपण वेगळे आपण वेगळे म्हणवणारे बरीच लोकं हे विसरतात त्यांच्यावर हे वेगळे विचार आणण्यामध्ये सुद्धा कोठे तरी पुर्वजांचे संस्कार कारणीभूत असतात. हे संस्कार हिंदू धर्मातूनच आलेले आहेत. हिंदू नावाच्या जिवन शैलीला सरसकट उगाच नावे ठेवण्या पेक्षा, त्यात चांगले बदल घडवणे आपल्याच हातात आहे, त्या दृष्टीने अनिस वाले चांगलेच काम करत आहेत. हिंदू धर्माची काही जळमटे काढून.
  • Log in or register to post comments

असहमत

रमताराम
Wed, 06/20/2012 - 20:32 नवीन
शुन्याला पण सगुण रुप देतोच की गणितात. असहमत. हा तर्क मी बरेचदा ऐकतो. कसे त्याचा खुलासा वाचायला आवडेल मला . गणितात शून्य हे पूर्णपणे निर्गुण आहे, अभावनिदर्शक आहे असे आमचे मत. एखाद्या माहित नसलेल्या संख्येला x रूप देणे आणि शून्याचे गृहितक या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. दोघेही Place holder म्हणून काम करीत असले तरी x हा संख्यादर्शक आहे (ज्याला मूल्य आहे फक्त ते ठाऊक नाही इतकेच) तर शून्य हा अभावदर्शक (त्याला कोणतेही मूल्य नाही.) शून्याला स्वतंत्रपणेच काय पण स्थानसंदर्भातही (w.r.t the power of 10 in decimal system) मूल्य नाही. (गणिती) रमताराम. हिंदू नावाच्या जिवन शैलीला सरसकट उगाच नावे ठेवण्या पेक्षा, त्यात चांगले बदल घडवणे आपल्याच हातात आहे, त्या दृष्टीने अनिस वाले चांगलेच काम करत आहेत. त्याचं काय आहे चितळेसाहेब. 'सरसकट' हे विशेषण वापरले ना की अवघड प्रश्नांची उत्तरे देणे टाळता येते. कोणताही प्रश्न आला की 'तुम्ही सरसकट नावे ठेवता' म्हटले की प्रश्न मिटला. आमचे मत आहे असे स्वीकारा नाहीतर तुम्ही 'सरसकट नावे ठेवता' हा 'सरसकट' आरोप मान्य करा. आमच्यासारख्या Nothing is sacred समजणार्‍यांना तिसरा पर्याय शिल्लकच ठेवत नाहीत परंपराप्रेमी. मग आम्ही त्यापेक्षा चर्चा न करणं पसंत करतो. त्यामुळे धर्म वगैरे बाबतच्या दळणावर आपली अळि मिळी गुप चिळी. पीठ किती ते पाहून भरायला गोणी घेऊन येईन नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

............

ईन्टरफेल
Wed, 06/20/2012 - 21:03 नवीन
जाम विट आलाय ह्या लोकांचा ! एकच ठरवाना राव तुम्हि लोक ? काय म्हनायच ! देव हाय का? नाय ? आस वाटत ? परत याव कि न याव मि.पा. वर आमच्या सारख्या न शिकलेल्या लोकांनि ! काय कराव कळना राव !
  • Log in or register to post comments

तुम्ही मिपावर का येता ?

अर्धवटराव
Wed, 06/20/2012 - 21:13 नवीन
मिसळ खायलाच ना? मग मिसळेचा मजा घ्या कि. इथे मिसळेच्या अनेक व्हेरायटी आहेत... तुमच्या तब्बेतीला जमेल तसं आंबट-तिखट सँपल उचला.. आणि ताव मारा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईन्टरफेल

कुच्चर मटकीचे काय करायचे हो

कवितानागेश
Fri, 06/22/2012 - 11:58 नवीन
कुच्चर मटकीचे काय करायचे हो भौ? खाउ का गिळू? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

थुंकून टाका !!

नाना चेंगट
Fri, 06/22/2012 - 11:59 नवीन
थुंकून टाका !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आणखी एक ऑप्शन आहे...

अर्धवटराव
Fri, 06/22/2012 - 21:15 नवीन
>>खाउ का गिळू? -- चघळा वा रवंध करा (मी कधि कधि तेच करतो :) ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

फिर वोही 'दिल' लाया

प्यारे१
Fri, 06/22/2012 - 10:17 नवीन
फिर वोही 'दिल' लाया हू...! साधारण कधीपर्यंत चालेल 'रिपीट टेलिकास्ट' ??? बाकी, नानाला एक लार्ज सॉरी 'वैदिक लार्ज' माझ्याकडून. :)
  • Log in or register to post comments

दि होल थिंग इज दॅट के भैय्या...

विकास
Fri, 06/22/2012 - 22:36 नवीन
जगात खालील एका संदर्भात मात्र, तमाम आस्तिक-नास्तिक पब्लीक, देव आहे का नाही हा वाद न घालता, गुमान मान्य करतात ;) Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा