देव आणि धर्म, माझे मत
देव आणि धर्म
श्री. वालावलकर यांच्या पुस्तकासंबंधित प्रतिसादात बरेच जणांनी देव व धर्म यावर आपले विचार प्रगट केले आहेत. हिन्दू धर्म व देव याबाबत मी वाचलेल्या ग्रंथांवरून बनलेले माझे मत येथे देत आहे.
हिन्दू हा शब्दच बाराव्या शतकात मुसलमान आक्रमकांनी सिन्धू नदीच्या काठी राहणारे, गुलाम या अर्थाने वापरला आहे. त्या आधी हिन्दू हा शब्दच नव्हता तर मग हिन्दू धर्म तरी कोठून असणार ? तर मग त्यापूर्वीच्या काळामध्ये धर्म नव्हताच काय ? या करिता प्रथम धर्म याची एक व्याख्या बनवू. लोकांचे आचार विचार, श्रद्धा,भावना , अभ्यास, परंपरा इ. यांच्या प्रभावाखाली जगण्याची जी शैली त्यांनी स्विकारली असेल ती त्यांचा धर्म म्हणावयाचे. उदा. बुद्धाचे व त्याच्या शिष्यांचे विचार ज्यांना पटतात व त्याप्रमाणे वागावयाचा जे प्रयत्न करतात, त्यांचा धर्म बौद्ध. लहानपणापासून घरातील व आजूबाजूच्या लोकांनी आई-वडीलांशी कसे वागवयाचे ह्याबद्दल जे काही सांगितले ते ऐकून-जाणून त्याप्रमाणे वागणे हा पुत्रधर्म. क्षात्रधर्म, समाजधर्म, राजधर्म वगैरे अनेक धर्म एकाच माणसाला एकाच वेळी पाळावे लागत असतात. ही व्याख्या परिपूर्ण नक्कीच नाही. पण वरील इ. त आणखी थोडी भर घालून तुम्ही या व्याख्येप्रमाणे धर्माला या लेखापुरते स्विकारा. राजाचा राजधर्म, सैनिकाचा क्षात्रधर्म , संसारी माणसाचा गृहस्थधर्म, वगैरे पार वैदिक काळापासून चालत आले आहेत व अजूनही पाळले जातात. आज आपण ज्या अर्थाने धर्म (हिन्दू, मुस्लीम, बौद्ध इ. ) हा शब्द वापरतो तोही यातील एक पोटविभाग. आता देव या बद्दलचे विचार सांगून परत धर्माकडे येऊ.
आज सर्वस्वी विज्ञानावर अवलंबून रहावे लागत आहे. तरीही दाभोळकर-वालावालकर यांच्या कळपात चार माणसे आली तर दहा बाबा-बापू यांच्या आश्रमात, शिर्डी-तिरुपतीला पळत आहेत. असे का होते ? ही सर्व काही अडाणी नव्हेत. चांगले शिकलेले , धनाड्य, व्यवहारचतुर, राजकारणी , सर्व काही तिकडॅ पळतांना , अमाप संपत्ती दान करतांना दिसतात. याचे कारण असे की सर्वसामान्य माणूस दाभोळकरांपेक्षा फार फार निराळा आहे. तो केवळ विचार करून त्याप्रमाणे जगू शकत नाही. त्याला राग, लोभ, प्रेम, भीती अशा अनेक "भावना" आहेत. त्याचे जगणे या भावनांच्या सांगण्यावर अवलंबून असते. आणि ही त्याला माणुस निर्माण झाला तेव्हापासून मिळालेली देण आहे. अंधारात हिंस्त्र जनावरे हल्ला करत म्हणून आदीमानव अंधाराला घाबरत होता. आजही जन्मलेले प्रत्येक मुल अंधाराला घाबरतेच. मग भले ते अत्याधुनिक रुग्णालयात जन्मलेले असेना का. तुम्ही या भावना कमी /नाहिश्या करू शकाल पण मग मानव रोबो बनेल. ते बाजूला ठेऊ. या भावना अतिशय तरल व काबूत ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे जगतांना मानवाला "आधार " लागतो. लहानपणी तो आईचा आधार घेतो, शाळेत गेल्यावर शिक्षकाचा घेतो, समाजात वावरतांना नातेवाईक-मित्र यांचा घेतो. अगदी श्री. वालावलकरसुद्धा असा आधार घेतात. माझी खात्री आहे की त्यांनी प्रयोगशाळेत जाऊन प्राणवायू आहे याची खात्री करून घेतलेली नाही. पण त्यांचा विश्वास आहे की ते काही शिक्षण घेऊन, प्रयोग करून, प्राणवायू खराच आहे हे तपासू शकतील. हा विज्ञानावरचा विश्वास हा त्यांचा "आधार" आहे. कोणताही माणुस भावनिक, शारीरिक, बौद्धिक , इ. आधार घेतल्याशिवाय जगू शकत नाही. "देव" हा असाच एक आधार आहे. सगळ्यांना असा आधार लागेलच असे नाही. ज्याला लागत नाही तो माणुस देव न स्विकारता जगू शकेल. पण अशी माणसे विरळी. बाकिच्यांना देव ही एक गरज आहे. म्हणूनच माणुस श्रीमंत आहे, बुद्धीमान आहे, शूर आहे हे महत्वाचे नसते. तो भारतात आहे की अमेरिकेत हेही गौण असते. हा देव अनादी, अनंत आहे, त्याला चार हात आहेत की हत्तीचे तोंड याला काहीच महत्ब नाही. तुमची गरज भागवता येणे एवढे त्याला जमले पाहिजे . मग काय होते की प्रत्येकाची गरज निराळी असली की त्याचा देव निराळा होतो. जगातील गुंडांना तोंड देणे ही ज्याची प्राथमिक गरज त्याचा देव दैत्यसंहारक असतो. पावसाची गरज असलेल्या शेतकरी असा पाउस पाडणारा देवच मागणार. त्यामुळे एक तर देव अनेक असतात किंवा एकच देव सर्व काही देणारा असतो. काही जणांना वत्सल, प्रेमळ देवाची गरज असते तर काहींना त्यांच्या अलौकिक प्रश्नांची उत्तरे देंणारा. तर असा हा देव अनादी काळापासून, सर्वत्र होता, आहे व पुढेही असणारच.
असा हा देव माणसाहून निराळा असणार हे उघडच आहे. पण माणुस आपले काही गुणधर्म त्याला चिकटवतोच. मग असा देव क्षीरसागरात नागावर झोपणार, स्वर्गात अमृत पिणार, लग्न करून मुले प्रसवणार. तो प्रेमळ असेल किंवा क्रुरही असेल. पृथ्वीवर नसूनही भक्तांच्या रक्षणाकरिता तो पृथ्वीवर अवतार घेणार. आपल्याला जसे कोणी आपल्याबद्दल चार चांगले शब्द काढले की बरे वाटते तसे तुम्ही त्याची प्रार्थना केलीत, स्तुती केलीत तर तोही प्रसन्न होणार. तुम्हाला आपले घर वरळी सीफेसला असलेले आवडेल तसे देवांपैकी कोणी काशी पसंत करतो तर कोणी तिरुपती. तिथे त्याला भेटावयास जाणेच इष्ट, होय की नाही ? तुमचे आर्टीओत काम असेल तर तुम्हाला मध्यस्थ लागतो. मग देवाकडून काम करवून घ्यावयाचे असेल तर बडवे, पांडे, बाबा, बुवा आलेच. परत नेहमीच्या व्यवहारकडे या. शेती करावयाची तर नांगरणी, पेरणी, वगैरे करणे, त्यांची पद्धत ठरवणे गरजेचे असते. तसेच या पुजारी लोकांनी केले. त्यांनी देवाची पुजा अर्चना करण्यचे नियम ठरवून दिले व या कर्मकांडालाच आपण धर्म, नेहमीच्या अर्थाचा धर्म, समजू लागलो. सामान्य माणुस मेंढरासारखा असतो. कुणाच्यातरी मागून जाणे त्याला सोपे वाटते.तसेच त्याला विहिरीतल्या बेडकांसारखा एक राजाही लागतो. बाबा-बापू ही बेरकी माणसे ते काम पार पाडावयास तयार असतातच.आणि जर या सगळ्याला शतकांची परंपरा मिळाली की झालेच, अगदी वज्रलेप. अन्निसचे कार्यकर्ते कितीही प्रयत्न करोत , त्यांना यश मिळणे दुरापास्तच.
आता थोडा भारतातला इतिहास बघू. वैदिक काळात देव नव्हता. इन्द्र, वरुण, अग्नी सारख्या देवता होत्या. त्यांच्याकडे मागणेही साधे होते, देवताही साध्या होत्या. यज्ञ हा एकमेव कर्मकांडाचा मार्ग होता. उपनिषदकारांनी तर त्यांनाही जवळजवळ झिडकारले होते. सोळ्या प्रमुख दर्शनातील तिन-चार देवाला स्विकारतात. नंतर आले बुद्ध्-महावीर. त्यांना चांगले अनुयायी मिळाले, दोन धर्म भरभराटीस आले. काही शतके चलती होती. कर्मकांडांची सोय करण्यात आली होती.या सर्व काळात समाजाच्या खालच्या वर्गातील लोकांनी त्यांची प्राथमिक गरज सांभाळावयास त्यांचे देव जपले होतेच. बहुदा यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुराणीकांनी स्वप्नमयी दुनियेतील विष्णु-शंकर आदी देव निर्माण केले. यांचा जनसामान्यावर इतका पगडा बसला की दोन हजार वर्षे समाज या जोखडाला उराशी धरून बसला आहे. मुसलमानांसारखे कडवे आक्रमक त्याला खिंडार पाडू शकले नाहीत, अन्निस म्हणजे किस झाडकी पत्ती ! याला म्हाणावयाचे "हिन्दू धर्म ".
तर असे आहे हे लफडे. तुमच्या मोलकरणीने कर्ज काढून सत्यनारायणाची पुजा केली किंवा देवीकरिता बोकड मारला तर ती तिची गरज आहे, भावनिक गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तिला अडाणी म्हणता येईल पण साईबाबाच्या मूर्तीवर दीड किलो सोन्याचा मुकुट चढवणाराही अडाणीच का ? मला तर हा सगळा प्रकार,अन्निसचे काम, दारूबंदीवर व्याख्यान देण्यासारखा वाटतो, न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो !
शरद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
केवढे हे शौर्य !!
>>>आम्ही प्रतिकार असा केलाच
सहमत पूर्ण सहमत
ऐ शप्पथ!!
बरोबर आहे !!!
देव-धर्म
गणितात x चे स्थान
असहमत
............
तुम्ही मिपावर का येता ?
कुच्चर मटकीचे काय करायचे हो
थुंकून टाका !!
आणखी एक ऑप्शन आहे...
फिर वोही 'दिल' लाया
दि होल थिंग इज दॅट के भैय्या...