या आगीमदी काय दडलय काय....

Primary tabs

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
21 Jun 2012 - 10:30 pm
गाभा: 

आज म्हणे मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली.
दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते संध्याकाळी बंद केले गेले - आग विझविणार्‍या यंत्रणेला मार्ग मिळावा म्हणुन.
आग कशी लागली. कुठुन लागली वगैरे चर्चांचे गुर्‍हाळ अनेक वाहिन्यांवर धडाक्यात सुरू आहे.

आगीत नक्की काय काय जळलय?
- अर्थातच फायली!

चला मंडळी पाहुया आता कुणा कुणाचं नशिब उघडतय ते. शहर रचना विभागातले नकाशे आणि फायली गेल्या तर मज्जाच मज्जा! बनवा हवे ते नकाशे आणि पाडा नवे भूखंड. उगाच कुणावर नोंदी फिरवल्याचे आरोप नकोत. झालं गेलं आगीला मिळाल.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

21 Jun 2012 - 10:44 pm | चिरोटा

मंत्रीगण/सरकारी बाबू सुखरूप आहेत ना? सी.बी.आय. चौकशी मात्र झालीच पाहिजे. नायतर मजा नाय येत.

विकास's picture

21 Jun 2012 - 11:07 pm | विकास

असा संशय कसा घेता? हे आपल्या आदर्शात बसत नाही. म्हणून म्हणतो, दुर्घटनाग्रस्त मंत्री-सचीव-संत्री (जे कोणी असतील त्यांना) मदत करण्यासाठी काही मदतनिधी तयार करता येईल का यावर चर्चा करूयात ;)

असो. आमच्याकडून....

विनोद म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी जो डिझास्टर मॅनेजमेन्ट सेल स्थापला होता तो ही या आगीत स्वाहा झाला.
कसलं डोंबलाचं डिझास्टर मॅनेजमेन्ट?

चिरोटा's picture

22 Jun 2012 - 11:03 am | चिरोटा

अनेक खोल्यांमध्ये जुने फर्निचर्,असंख्य कागद दुथडी भरून वाहत असतात असे कळले.

प्रदीप's picture

22 Jun 2012 - 3:25 pm | प्रदीप

डी. आरची टेक्निक्स शिकण्याच्या निमीत्ताने ह्यापुढे अनेक बाबू, व मंत्री परदेशी दौरे काढण्यास मोकळे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Jun 2012 - 2:38 am | निनाद मुक्काम प...

गणपा भाऊ आपण सर्व अनिवासी
तेव्हा अश्या घटनावर विनोद झाला असे दर्शविण्याचा आपल्याला अधिकार नाही.
मिपा वरील स्वयंघोषित तुमच्यावर अजून तुटून कसे बर पडले नाही.
मी अजूनही ह्या धाग्यावर आगी संबंधी दिली आहे का प्रतिकिया ?
तो आपला हक्कच नाही.
मिपावरील सर्व अनिवासी लोकांनी नवीन फतवा ध्यानात ठेवावा
अशी विनंती करतो आणि उगाच राजकारणी लोकांवर टीका करू नका असा सल्ला सुद्धा देतो. कारण मला तसा मिळाला आहे.

शिल्पा ब's picture

24 Jun 2012 - 2:45 am | शिल्पा ब

झाली का रडारड सुरु इथे पण!!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2012 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि's picture

21 Jun 2012 - 11:35 pm | मुक्त विहारि

सगला ते आगीतच गेला....

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 12:34 am | अर्धवटराव

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार अग्नीशामक दलांना गर्दी, अव्यवस्थीत पार्क केलेल्या गाड्या, अपुरे टँकर्स, लांब शिड्या इ. सर्वच आपत्तींना तोंड द्यावे लागले. अग्निशमन यंत्रणा वापरायचे ज्ञान मंत्रालयातील कर्मचार्‍यांना नव्हते. या यंत्रणेचे वेळोवेळी ऑडीट झाले नव्हते. अलार्म सिस्ट्म काम करत नव्हती. लोकांना बाहेर पडायला एकच मार्ग उपलब्ध होता... वगैरे वगैरे...

राज्याच्या सर्वात संवेदनशील इमारतीची आपत्तींना तोंड देण्याची ही अशी तयारी... मग उर्वरीत राज्यात जे हाल आहेत ते ऑब्व्हिअस म्हणायचे.

इथेही वृत्तवाहिन्या बाईट्स मिळवायला टपकल्या... बेजबाबदारीची हद्द झाली.

अर्धवटराव

विकास's picture

22 Jun 2012 - 6:12 am | विकास

फारच गंभीर घटना आहे.

त्याव्यतिरीक्त नेहरूंचा अस्थिकलश (खरा, प्रतिकृती नाही) आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची प्रतिकृती या दोन्ही ऐतिहासीक वस्तू आगीत जळून खाक झाल्या. ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

खालचा फोटो पाहून धक्का बसला. पोलीस आणि काही कर्मचारी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज वाचवताना दिसताहेत आणि त्याबद्दल मनःपूर्वक सलाम! पण काहीच पर्सनल प्रोटेक्षन कसे नाही? काही ट्रेनिंग नाही का? शिस्त नाही का? आपत्कालात संवाद (emergency communication) कसे करावे याची काहीच माहिती नाही का?
Ì

कशाला कसाब हवाय? पाकीस्तान आयएसआयने तातडीची अंतर्ग्त बैठक घेऊन अतिरेक्यांना पाठवणे थांबवण्यास हरकत नाही...

प्रदीप's picture

22 Jun 2012 - 3:29 pm | प्रदीप

पण काहीच पर्सनल प्रोटेक्षन कसे नाही? काही ट्रेनिंग नाही का? शिस्त नाही का? आपत्कालात संवाद (emergency communication) कसे करावे याची काहीच माहिती नाही का?

असे, उत्तरे माहित असलेले प्रश्न विचारण्याबद्दल तुमचा निषेध नोंदवतो.

आता माझ्यासमवेत तीनदा म्हणा:

'मेरा भारत महान है| वो 'ब्रिक' का एक सामायिक हिस्सा है| अर्थात वो एक 'सुप्पर पॉवर' है | '

विकास's picture

22 Jun 2012 - 5:15 pm | विकास

अर्थात वो एक 'सुप्पर पॉवर' है | '

सगळ्या सिस्टीमची त्या सुप्पर पॉवर रीन का सर्फ डिटर्जंटनी धुलाई केली पाहीजे!

दादा कोंडके's picture

24 Jun 2012 - 12:34 am | दादा कोंडके

त्याव्यतिरीक्त नेहरूंचा अस्थिकलश (खरा, प्रतिकृती नाही) आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची प्रतिकृती या दोन्ही ऐतिहासीक वस्तू आगीत जळून खाक झाल्या. ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
पोलीस आणि काही कर्मचारी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज वाचवताना दिसताहेत आणि त्याबद्दल मनःपूर्वक सलाम!

कुठल्यातरी मनोजकुमारच्या देशभक्तीपर चित्रपटातला प्रसंगबघून गहिवरून येण्यासारखं वाटलं. तिरंगा वगैरे फक्त एक प्रतिक आहे. तिरंग्याला वाचवण्यापेक्षा काही फायली वाचवल्या असत्या तर चांगलं झालं असतं.

बाकी अविश्वासामुळे सरकारवर जी टिका होतेय त्यासाठी केवळ सरकारच जबाबदार आहे. बाकीच्या लोकांचं सोडा, विरोधीपक्षनेताच चौकशी करा म्हणतोय म्हणजे प्रश्नच मिटला. आणि आगीचं म्हणाल तर अगदी छोट्या छोट्या कंपन्यातही , "बीसीपी","डिझास्टर मॅनेजमेंट" वगैरे असतं, कार्यालयात स्मोक डिटेक्टर्स आणि स्प्रिंकलर्स असतात. मंत्रालयात हे नसेल याच्यावर विश्वास बसत नाही.

jaydip.kulkarni's picture

22 Jun 2012 - 4:29 am | jaydip.kulkarni

कोणी जाळली रावणाची लंका .......... स्वतः रावणानेच ...... ? का आणखी कोणी .........

मृगनयनी's picture

22 Jun 2012 - 11:57 am | मृगनयनी

कोणी जाळली रावणाची लंका .......... स्वतः रावणानेच ...... ? का आणखी कोणी .........

रावणाची ओरिजिनल लन्का महारुद्र- हनुमानाने जाळली होती....
ही इथल्या महाराश्ट्रातल्या रावणांची लन्का बहुधा दहा तोन्डांनी एकत्र येऊन जाळल्यासारखे वाटते...
बारामतीचे एक माजी बॅन्क सन्चालक, एक गूळ-व्यापारी आणि अजून कुणीतरी असे तिघे जण या आगीत मृत्यू पावले.... पैकी बॅन्क सन्चालक आनि गूळ्व्यापारी हे अजित पवारांचे जवळचे मित्र होते.... :|

असो!.. महाराश्ट्रातल्या ढिसाळ कारभाराची पुन्हा एकदा साक्ष पटली.... जस्ट शेमफुल...... :|

नितिन थत्ते's picture

22 Jun 2012 - 10:42 am | नितिन थत्ते

काथ्याकूट आणि प्रतिक्रिया वाचून ३१ ऑक्टोबर १९८४ ची आठवण झाली. २८ वर्षांपूर्वीही हीच परिस्थिती होती.

विकास's picture

22 Jun 2012 - 4:42 pm | विकास

काथ्याकूट आणि प्रतिक्रिया वाचून ३१ ऑक्टोबर १९८४ ची आठवण झाली. २८ वर्षांपूर्वीही हीच परिस्थिती होती.

म्हणजे? ३१ ऑक्टोबरल १९८४ ला मिपा होते आणि येथे (गृहीत धरतो, इंदीराजींच्या हत्येसंदर्भात) काथ्याकूट-प्रतिक्रीया आल्या होत्या? ;)

बाकी, आपल्याला या आगीसंदर्भात बाकी काय वाटले?

नितिन थत्ते's picture

22 Jun 2012 - 5:25 pm | नितिन थत्ते

>>म्हणजे? ३१ ऑक्टोबरल १९८४ ला मिपा होते आणि येथे (गृहीत धरतो, इंदीराजींच्या हत्येसंदर्भात) काथ्याकूट-प्रतिक्रीया आल्या होत्या? Wink

नाही. आम्ही ऑफीसमध्ये होतो. आणि सुमारे १२ वाजता इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्याची बातमी कळली. (तेव्हा सबसे तेज चॅनेल नव्हते आणि टीव्ही फक्त संध्याकाळी चार तास असे). बातमी ऐकून ऑफिसातल्या अनेकांनी "हा इंदिरेचा काहीतरी स्टंट असणार" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. म्हणजे २८ वर्षापूर्वीसुद्धा प्रत्येक गोष्टीत कॉन्स्पिरसी शोधणारे (शंका घेणारे) लोक होते. म्हणून हीच परिस्थिती होती असं म्हटलं. :)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

गेली २८ हून जास्ती वर्षे अशा नतद्रष्ट लोकांच्यात वावरून देखील आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवून असणार्‍या थत्ते चाचांना मानाचा मुजरा. ;)

विकास's picture

22 Jun 2012 - 7:30 pm | विकास

अहो कॉन्स्पिरसी थिअरी महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर पण निघाली होती, ती सिद्ध देखील झाली नाही आणि तरी देखील आजपर्यंत उगाळली जात आहे. त्यात नवीन ते काय?

मराठे's picture

22 Jun 2012 - 10:50 pm | मराठे

पण आगीशिवाय का धूर येतो? ;)

तिमा's picture

22 Jun 2012 - 11:36 am | तिमा

नुकसान फक्त करदात्याचे झाले आहे. मंत्र्यांना त्याच्याच पैशातून आणखी दिमाखदार लाक्षागृहे करुन मिळतील.

मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली............

पण सगळे मंत्री संत्री सहीसलामत ! आणि तीन सामन्य व्यक्ती मात्र नेहमीप्रमाणे होरपळुन, गुदमरुन जीवास मुकल्या. काही जखमी झाल्या.............. :sad:

अमोल केळकर's picture

22 Jun 2012 - 12:08 pm | अमोल केळकर

दोन दिवसांनी पान मसाल्यांवर बंदीचा निर्णय घेण्यात येणार होता
यामागे ही टोळधाड ही असू शकेल
जाऊदे
झालं गेलं आगीला मिळाल - -हेच खरं

अमोल

चिरोटा's picture

22 Jun 2012 - 12:20 pm | चिरोटा

निर्णय न घेण्यासाठी,लांबणीवर टाकण्यासाठी फायली किंवा कचेर्‍या जाळायची गरज पुढार्‍यांना,नोकरशहांना लागत नाही.फायली दाबून ठेवण्यात आपले लोक उस्ताद आहेत.

कलंत्री's picture

22 Jun 2012 - 2:30 pm | कलंत्री

आगीचे कारणे काहीही असोत त्यात काही व्यक्तिंनी जीव गमावला आहे हे मात्र वाईटच झाले. सध्या एकंदरीतच वातावरण इतके दुषित झाले आहे की कोणी काहीही तर्क काढु शकतो आणि लोकांचा त्यावर इतरांचा विश्वासही बसु शकतो.

मृतात्म्यांना श्रद्धाजंली आणि त्यांच्या आप्तस्वकियांच्या दुखात मी सहभागी आहे.

न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषी लोकांवर कारवाईही व्हावी.

गोंधळी's picture

22 Jun 2012 - 2:39 pm | गोंधळी

पुढील षडयंत्रासाठी शुभेच्छा.
From,
मुर्ख्,अडाणी,झोपलेली,हतबल,निराश,अभागी -भारतीय जनता.

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 2:59 pm | नाना चेंगट

मंत्रालयाचा चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्ण जळलाय . .. माझं संपूर्ण दालन, मंत्रिमंडळ बैठकीचा हॉल, कॉन्फरन्स हॉल, व्हिजिटर्ससाठी असलेला कक्षही खाक झालाय... मग सीएमसाहेबांचं चेंबर कसं सुरक्षित राहिलं ? , याचं मला आश्चर्यच वाटतं ... तिथे एवढं काहीच झालेलं नाही... ' हे उद्गार आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे. आता, यातून त्यांना नक्की काय सूचित करायचंय, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14335584.cms

म.टा.मधील बातमीनुसारः

' आदर्श ' घोटाळ्यासंबंधीच्या महत्त्वाच्या फाईल्स सीबीआयकडे आहेत, काही फाईल्स चौकशी आयोगाला दिल्यात आणि त्यापैकी ब-याच फायलींच्या फोटोकॉपी आमच्याकडे आहेत. त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशीवर, मंत्रालयातील अग्निकल्लोळाचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.

नितिन थत्ते's picture

22 Jun 2012 - 5:59 pm | नितिन थत्ते

म्हणजे एक कॉन्स्पिरसी थिअरी निकालात निघाली. आता नेहरूंचा अस्थिकलश जळला याची कॉन्स्पिरसी थिअरी उरली. ;)

विकास's picture

22 Jun 2012 - 7:28 pm | विकास

म्हणजे एक कॉन्स्पिरसी थिअरी निकालात निघाली. आता नेहरूंचा अस्थिकलश जळला याची कॉन्स्पिरसी थिअरी उरली.

फारच छान. मी विचार करतोय की त्याजागी जर मनोहर जोशी अथवा गोपिनाथ मुंडे असते आणि असेच म्हणाले असते तर आपण तसे गृहीत धरले असते का? त्या बाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री मोदींनी स्वतःबद्दल असेच सर्टीफिकेट दिले, चौकशी अहवालात अजून काही निष्पन्न झाले नाही.त्यांचे म्हणणे देखील तुम्ही असेच मान्य करता का हो?

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 10:47 pm | अर्धवटराव

नव्हे.. निकालात काढली म्हणा. बाबा-दादांचा "हात" धरतय कुणी या बाबतीत? तसही "आदर्श" प्रकरणातील फायली कुठल्याही थेअरीविना अच्यानक गायब होतात... मग काहि पाने गमवुन पुन्ह अवतीर्ण होतात. कुठलाही धर्मांध साधु दाखवु शकणार नाहि अश्या या प्रचंड चमत्कारापुढे हि बापुडी आग आणि तिची कॉन्स्पिरसी थेअरी काय चीज.

अर्धवटराव

कापूसकोन्ड्या's picture

22 Jun 2012 - 5:33 pm | कापूसकोन्ड्या

१) सदर चौकशी कुणी करावी? सिबिआय की,न्यायाधिश, यावर चर्चा करूया
२) मृतांच्या नातेवाइकांना रोख रक्कम द्या. खुप आणिबाणि ची परिस्थिती असल्यामुळे नेहमी ची पध्दत बाजूला सारा.
३) विरोधक संकटाचा सामना न करता सरकारला कोंडीत पकडतात म्हणून त्यांचा निषेध करू या
४) नेहरूंचा अस्थी कलश गेला त्याचे काहीच नाही पण काही माणसे मेली त्यांच्या बद्दल मात्र विरोधकाना पुळका. विरोधा मृतांच्या टाळूवरील लोणी खात आहेत. त्यांना निवडून देउ नका.
५) नवीन इमारत बांधा, जुनी इमारत पाडून तिथे बहुमजली नविन इमारत बांधा. तिथे गरजूना घरे द्या (गरजू कोण ते आम्ही ठरवू.त्यात राजकारण नको.)
६) जुनी इमारत पाडणे, नविन बांधणे याचे कॉन्ट्रॅक्ट --- यानाच द्या. टेंडर काढायची जरूरी नाही.मी आहे ना?
--- चालू दे.

jaypal's picture

22 Jun 2012 - 8:21 pm | jaypal


ज्यांनी आपले प्राण संकटात टाकुन आग आटोक्यात आणली त्या "अग्निशमन" कर्मचा-यांना आपण सर्वच जण विसरलो आहोत.
त्यांना माझा दंडवत /मानाचा मुजरा

"अग्निशमन" कर्मचा-यांना आपण सर्वच जण विसरलो आहोत.
त्यांना माझा दंडवत /मानाचा मुजरा

काल विविध वाहिन्यांवरुन अगदी सुरुवातीपासून म्हणजे दुपारी सव्वातीनपासून मी अगदी अग्निशमन कर्मचार्‍यांची कामाची कार्यवाही पाहीली. मला तर तर या अग्निशमन कर्मचार्‍यांच्या कामाची शरम वाटली. क्षमा करा. मी काही या विभागाचा अभ्यासक नाही, जाणकार नाही. पण, मी पाहात होतो की, सहाव्या की सातव्या मजल्यावर आगीनं रौद्र रुप धारण केलेलं होतं आणि हे कर्मचारी पाईपमधे पाणी नसल्यामुळे शिडी उंचावर नेऊन अर्धातास किंवा तसाभर नुसते तिथे तोंड घेऊन उभे होते, या अशा नियोजन नसणार्‍या कर्मचार्‍यांचा आणि त्यांच्या अधिकार्‍यांना मानाचा मुजरा वगैरे करावा वाटला नाही.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2012 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या दोन चार रुमच्या घरात शॉर्ट-सर्कीट झाले तर माझ्या घरातील वीज ट्रीप होईल अशी व्यवस्था प्रत्येक रुममधे आहे. मंत्रालय इतकं मागासलेलं नाही की, तिथे अशी काही व्यवस्थाच नसेल. बाकी, मंत्रालय जळत होते आणि त्या विभागाचे मंत्री दाताड काढून पाहात होते. च्यायला, मंत्री नावाची एक अशी विशिष्ट कातडीच असते, जिला कोणतीच संवेदना नसते, याची काल काही दृष्य पाहून अजून खात्री पटली.

चला, माहितीच्या अधिकारात आता नगररचना विभाग, महसुल विभाग, शिक्षण विभाग आणि आणखी काही विभागाची माहिती मिळणार नाही आता विदा उपलब्द्ध नाही, असे उत्तर माहिती अधिकार्‍यांना देणे सोपे झाले, असे म्हणायला काही हरकत नाही.

-दिलीप बिरुटे
(संतापलेला)

कुंदन's picture

23 Jun 2012 - 12:19 am | कुंदन

जाउ द्या गुरुजी , आता नवीन च बांधणार आहे सगळे मंत्रालय.
नका जास्त त्रागा करुन घेउ तुम्ही.

अन्नू's picture

22 Jun 2012 - 11:31 pm | अन्नू

एक न दिसणार राजकारण!
मंत्रालय जळालं, डेटा- फाईली जळाल्या, मंत्र्यांच्या करतुदींचा सगळा काळाचिठ्ठा जळाला!
आता करा म्हणावं चौकशी आणि बसा पुरावे शोधत!
मंत्रालयाच्या पुर्नबांधणीच्या नावाने उकळा जनतेचे पैसे आणि भरा आपली घरे!

आशु जोग's picture

22 Jun 2012 - 11:39 pm | आशु जोग

मंत्रालय जळाल्यामुळे

ते पूर्ववत होइपर्यंत जनतेचे कोणतेही काम करायचे नाही

असा मंत्रीमंडळाचा निर्णय झाला आहे असे कळते

जरा चार दिस कळ काडा..भायेर यीतंय बगा !

मदनबाण's picture

23 Jun 2012 - 1:10 pm | मदनबाण

ही घटना घडली तेव्हा मला अमेरिकेतली ९/११ ची घटना आठवली !
त्या दिवशी एकुण ३ इमारती जमिनदोस्त झाल्या,त्यात दोन ट्वीन टॉवर होते,आणि तिसरी इमारत ही बिल्डींग नंबर ७ होती.
त्या इमारतीला सुद्धा आग लागली होती आणि काही वेळातच ती जमिनदोस्त झाली... या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते ! आणि इतक्या प्रगत राष्ट्रात इतक्या मोठ्या टॉवर मधे आग विझवण्याची सामुग्री नव्हती हे म्हणणे धाडसाचे ठरेल... बिल्डींग पडताना पाहिली तर कंट्रोल्ड डिमोलिशन कसे होते त्याची अनुभुती घेता येईल.असे म्हणतात की एनरॉन सरख्या बड्या घोटाळ्यांची कागदपत्रे तसेच इतर अमेरिकन घोटाळ्यांची कागदपत्रे इथे होती...पण अमेरिकन लोक ट्वीन टॉवर बाबतच चर्चा करत राहिले !

मदनबाण's picture

11 Aug 2014 - 7:11 am | मदनबाण

त्या दिवशी एकुण ३ इमारती जमिनदोस्त झाल्या,त्यात दोन ट्वीन टॉवर होते,आणि तिसरी इमारत ही बिल्डींग नंबर ७ होती.त्या इमारतीला सुद्धा आग लागली होती आणि काही वेळातच ती जमिनदोस्त झाली... या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते !

या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते ! आणि इतक्या प्रगत राष्ट्रात इतक्या मोठ्या टॉवर मधे आग विझवण्याची सामुग्री नव्हती हे म्हणणे धाडसाचे ठरेल... बिल्डींग पडताना पाहिली तर कंट्रोल्ड डिमोलिशन कसे होते त्याची अनुभुती घेता येईल.

आता जी सध्या जालावर या घटने बद्धल माहिती मिळत आहे ती फारच धक्कादायक आहे ! आणि ती म्हणजे त्या दिवशी कोणतेच विमान ट्वीन टॉवर आणि टॉवर ७ वर आदळले नव्हते ! अख्या जगाला विमान आदळण्याच्या ज्या काही क्लीप्स दाखवल्या गेल्या त्या पूर्णपणे फेक होत्या ! मिडीयाचा वापर करुन निर्माण केलेले जगातले सर्वात मोठे शडयंत्र !
काय परिणाम झाला याचा ? तर जगाचा इतिहास पूर्णपणे बदलला आणि लिहला सुद्धा गेला ! लाखो निरपराध नागरिक मारले गेले ! इराक,अफगणिस्थान बेचिराख झाला... अमेरिकेचे स्वतःचे हजारो सैनिक मारले गेले आणि अनेक कायमचे अपंग झाले ! सद्दाम मारला गेला आणि इतिहासाच्या पानात जमा झाला...
या कटात नक्की कोण सामिल होते / आहेत ? तर CIA, Mossad.
यावर मला अधिक लिहायचे आहेच... वेळ मिळाल्यावर सविस्तर प्रतिसाद देइन. सगळ्या गोष्टी अत्यंत चक्राउन टाकणार्‍या आहेत.

जाता जाता :- आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो... तो म्हणजे ज्या ट्वीन टॉवर हल्ला झाला त्या भागाचे नामकरण काय करण्यात आले ? तर ग्राउंड झिरो ! मिलेटरी भाषेत ग्राउंड झिरोचा अर्थ काय होतो ?
नाही माहित ? हरकत नाही ! विकीपिडीया कशासाठी आहे मग ?

Ground zero

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-

Guitar Center Sessions: Dick Dale - Miserlou

मदनबाण's picture

11 Aug 2014 - 10:35 pm | मदनबाण

अमेरिकेच्या ट्वीन टॉवर वर हल्ला झाला आणि अख्ख्या जगाला धक्का बसला ! अमेरिकेत असं काही होउ शकतं आणि अस काही घडेल याची कल्पना कधी कोणी केलीच नव्हती. अमेरिकन नागरिकांना तर नक्की काय घडले हेच कळेना... अर्थात अश्या घातपाताची सवय कुठे होती त्यांना ?

आता वेळ आहे बहुचर्चित व्हिडीयो देण्याचा,नीट शांतपणे पहा,ऐका :-

ह्म्म्...आता परत जो पहिल्या प्रतिसादात व्हिडीयो दिला आहे पहा आणि ट्वीन टॉवरचा व्हिडीयो पहा,तुम्हाला साम्य जाणवेल ते म्हणजे या ३ ही बिल्डींगचे खाली कोसळणे,कोसळायला सुरु होउन जमिनदोस्त होण्याचा वेळ आणि वेग.आत्ता पर्यंत जगातल्या अनेक गगनचुंबी इमारतींना आग लागल्याच्या घटना आहेत,पण त्यातली कुठलीही इमारत अशा रितीने पडल्याचे उदाहरण आहे ?

चला आता हे महाशय काय सांगत आहेत ते नीट ऐकुया, ते पहिल्या प्रतिसादातल्या व्हिडीयो मधील बिल्डींग बद्धल आहेत...

हे सगळ आहेच त्यात भर नविन आणि वेगवेगळ्या माहितींची भर पडतच आहे, मग ते Operation Gladio असो वा Dimitri Khalezov आणि त्याच्या झीप फाईल्स असोत... काय खरं आणि काय नाही ?

जाता जाता :- हे सगळं वाचत असताना, अचानक माझ्या लक्षात आलं की मध्यंतरी मी एक Akamai च्या संदर्भात प्रतिसाद दिला होता, ज्यात Danny Lewin चा उल्लेख केला होता तो फ्लाइट ११ मधे मारला गेला होता.पण कुठलेच विमान ट्वीन टॉवरवर कोसळले नसताना हा मारला कसा गेला असेल असा विचार करु लागलो मग Akamai शोध घेतला तर लक्षात आले हा तर Israel Defense Force मधे ४ वर्ष होता, आणि हाच Akamai फाउंडर मेंबर पैकी एक आहे, यांच्या विषयी ९/११ नंतर वेगवेगळ्या बातम्या आल्या त्याला विमानातल्या अपहरण कर्त्यींपैकी कोणीतरी चाकुने मारले,नंतर गोळी मारली गेल्याचे म्हंटले गेले... नक्की काय झाल ?

काही दुवे :-
http://www.ae911truth.org/
https://wikispooks.com/wiki/9/11:Israel_did_it
http://www.911hoax.com/Top_Lists_911.asp
https://wikispooks.com/wiki/Dimitri_Khalezov
https://wikispooks.com/wiki/File:911_The_Third_Truth_v2.pdf
http://www.apfn.org/apfn/WTC_stf.htm
http://cluesforum.info/viewtopic.php?p=1951587
http://cluesforum.info/viewtopic.php?p=2391276#p2391276
https://www.youtube.com/watch?v=toPlyXdpurw

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-

Guitar Center Sessions: Dick Dale - Miserlou

पुण्याचे वटवाघूळ's picture

16 Aug 2014 - 8:47 pm | पुण्याचे वटवाघूळ

"आता जी सध्या जालावर या घटने बद्धल माहिती मिळत आहे ती फारच धक्कादायक आहे ! आणि ती म्हणजे त्या दिवशी कोणतेच विमान ट्वीन टॉवर आणि टॉवर ७ वर आदळले नव्हते ! अख्या जगाला विमान आदळण्याच्या ज्या काही क्लीप्स दाखवल्या गेल्या त्या पूर्णपणे फेक होत्या ! मिडीयाचा वापर करुन निर्माण केलेले जगातले सर्वात मोठे शडयंत्र !"

मदनबाण, तुमच्यात कुमार केतकर संचारले की काय? असले प्रश्न कुमार केतकरांनी विचारले होते पूर्वी. त्यांच्या मते तर ९/११ चे 'मिथक' अमेरिकेनेच जन्माला घातले. तुम्ही पण तेच म्हणता असे दिसते.

टॉवर ७ कसा पडला , एवढे मोठे टॉवर १०-१२ सेकंदात धाराशायी कसे झाले इत्यादी प्रश्न नक्कीच रास्त आहेत.बुश प्रशासनाने विमान धडकण्याबरोबरच इतर काही कारणे होती का ज्यामुळे एवढे मोठे टॉवर इतक्या लवकर पडले ती कारणे लपवली असे म्ह्टत असाल तर ते नक्कीच मान्य.पण मुळात विमान धडकलेच नाही असे कसे म्हणता? http://www.youtube.com/watch?v=PZedY7nTiN4&index=4&list=PLzWiBLDWOYeeHHm... या व्हिडिओमध्ये २ मिनिटे ७ सेकंदांनंतर बघा. हा माणूस तर टेबलखाली लपला म्हणून थोडक्यात बचावला. त्याच्यासारख्या अनेकांनी विमान धडकताना बघितले आहे.मग विमान धडकलेच नाही असे कसे म्हणता?

तुमच्यात कुमार केतकर संचारले की काय? असले प्रश्न कुमार केतकरांनी विचारले होते पूर्वी. त्यांच्या मते तर ९/११ चे 'मिथक' अमेरिकेनेच जन्माला घातले. तुम्ही पण तेच म्हणता असे दिसते.
बापरे हा काय प्रकार आणि ? ;) अहो मी स्पष्ट लिहले आहे की :- जालावर या घटने बद्धल माहिती मिळत आहे
हे काही मी सांगत नाहीत, तर त्यांचीच लोक सांगत आहेत ना ? ठीक आहे,मिथकही असेल म्हणा... परंतु अनेक प्रश्नांची उत्तरे अजुन मिळत नाही. आणि प्रश्नांची संख्या वाढतच जाते, कारण ही घटनान अनेक पैलुंनी पहिल्या दिवसा पासुनच घेरली गेली आहे. काही प्रश्न मलाही पडलेत जसे अमेरिकन नागरिकांना पडले आहेत.
१} पेंटॅगॉनच्या {जी जगातली मोठी गुप्तहेर संथा आहे, हो अमेरिकेची.} मग तिथली सुरक्षा व्यवस्था / हल्लाप्रतिरोधाची क्षमता त्या दिवशी काय करत होती ? तिथे नक्कीच किती कॅमेरे आहेत ? आणि तिथल्या अनेक कॅमेरामधे बंदिस्थ झालेल्या अपघाता संबंधीचे असलेले व्हिडीयो फुटेज किती झाले ? किती दाखवले गेले ? आता वादाचा एक भाग इथेही, पेंटॅगॉनवर विमान आदळलेच नाही, कारण तशा प्रकारचा आघात विमान करु शकत नाहीत हे फुटेज आणि फोटोज वरुन या विषयातले तज्ञ सांगु शकतात.{ या मुद्द्यावर वाद आहे आणि तो का आहे? याचा विचार करायला हवा}
२} मोहम्मद आताचा पासपोर्ट कसा काय मिळाला ? जे विमान अख्खी इमारात खाक करु शकते त्यातुन पासपोर्ट सहीसलामत कसा काय सुटतो ? मला वाटत ब्लॅकबॉक्सच्या नंतर कुठल्यातरी टेक्नॉलॉजीचा आविष्कार झाला असेल ज्यामुळे असे शक्य झाले असेल ! ;) बरं हा पासपोर्ट सुस्थितीत सापडण्याची प्रोबॅब्लिटी काढता येइल काय ?
३}अजुन कुठे विमान पडले ? तुम्हाला आठवत का ? ओक्के क्लू देतो... पेन { शोधा.. शोधण्याचे कष्ट घ्याच जरा}
४} चला... मुख्य ३ इमारतीचा विचार करुया. या ३ ही इमारती एकाच दिवशी पडल्या...
आता तुम्हालाही माहिती आहे ती बिल्डींग {७} पाडण्याच्या घटनेचे फोटो आणि व्हिडीयोज मधे कुठेही विमान आदळत नाही.तरी सुद्धा ती बिल्डींग पडली ! { आता या बद्धल वाद आहे हे वेगळ्याने सांगायला नको ? वादा बद्धल विचार करायला हवा.}
५}आता विचार ट्वीन टॉवरचा करुया... { इथे २ विमाने आदळली असे सगळ्यांना दिसले {न्यूज टेलिकास्ट मधुन जगभर} }
आता एका वैमानिकाच्या दॄष्टीकोनातुन मी विचार करण्याचा क्षुल्लक प्रयत्न करुन बघावा म्हणतो... त्या टॉवरवर आदळण्यासाठी त्या विमानांची उंची किती असावी लागेल ? त्यांचा वेग किती असायला हवा ? त्या वेगाने आणि त्या उंचीवर विमाने आणण्यासाठी लागणारे कौशल्य कसे असायला हवे ? म्हणजे विमान उडवण्याच्या कामाचा किती तासांचा अनुभव असायला हवा ? अतिरेक्यांना दोन्ही टॉवरला भेदता कसे आले आहे ? म्हणजे विमान बरोबर टॉवर आदळण्यासाठी जे वैमानिक म्हणुन करणे अतिरेक्यांना शक्य आहे का ? विमान आदळले नाहीत असे सांगणारे व्हिडीयोज / व्यक्ती जे सांगण्याचा प्रयत्न करते ते तांत्रिकपणे करणे "सहज शक्य" आहे का विचार देखील करायला हवा. त्यात विमान आदळल्या नंतर होण्याच्या घटनांचा देखील विचार केला पाहिजे कारण विमान आघात झाल्या नंतरच त्या पडल्या ना ? मग कंट्रोल्ड डिमिलिशन या पद्धतीने ट्वीन टॉवर आणि बिल्डींग ७ या ३ही इमारती एकाच पद्धतीने कशा काय पडल्या ? तज्ञ म्हणुन ज्याकाही मंडळींनी वितळलेल्या स्टीलचे वाहण्याच्या मागे प्रश्न विचारले आहेत ते काय आहेत आणि या बद्धल मधे जी पण जालिय माहिती मी वाचतोय त्यात अनेक ठिकाणी Thermite चा वापर केल्याचा उल्लेख येतो... { आता जरा उलटा विचार करतो... Thermite वापरल्याने टॉवर पाडता येतील का ? अश्या कुठल्या प्रकारच्या वास्तु पाडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो ? विमान अघात आणि Thermite या दोघांच्या पैकी कुठल्या घटकाने/ घटनेने हे घडने शक्य आहे /अधिक शक्य आहे ? आणि यांच्या दोन्हींच्या तापमानांचा उच्च्चांकाने आणि स्टील वितळणे शक्य आहे ?
६} अमेरिकेच वायुदल काय करत होत ? न्यूज चॉपरला ट्वीन टॉवरचा शॉट मिळु शकतो पण ह्यांच्या हवाई दलाला ते दिसत नाही ? दिसले तर काय केल? नाही दिसले तर का नाही दिसले ? बरं या चॉपर मधुन शुट केला गेलेला जो व्हिडीयो दाखवला गेला आहे, त्या व्हिडीयोच्या तांत्रिक विश्लेषणामुळे वादाचा मुद्दा निर्माण झाला आहे ना ? विमानाचा वेग,त्या फुटेज मधे असलेले विमानाचे टॉवरला धडकणे आणि पहिल्या फ्रेम पासुन शेवटच्या फ्रेम मधला विमानाचा प्रवास आणि त्याचे स्थान इ. घटनांचा विचार केला आहे. अशा घटनेत अमेरिकेच्या वायुदलाला काय अधिकार आहेत ? २ विमाने ट्वॉवर आदळण्या इतकी घटना घडल्यामुळे अमेरिकेच्या वायुदलाच्या सामर्थ्यावरच प्रश्न विचारणे योग्य वाटते का ? अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा इतकी पोकळ आहे की अमेरिकेत कोणीही याव आणि विमान अपहरण करुन आदळुन निघुन जाव ?
७} आता नक्की विमान हायजॅक झालीत ? ती कुठ आदळली आहेत ? ज्या ज्या ठिकाणी विमान पडल्याचे सांगितले जाते त्या त्या प्रत्येक ठिकाणी विमानाचे कोणते अवशेष / फुटेज / फोटो मिळाले आणि त्या बद्धलच्या माहितीचा सुद्धा वाद का आहे ?
८} जगभर स्वतःचे सैन्यतळ असणार्‍या सामर्थशाली अमेरिकेच्या देशा अंतर्गत अशी घटना घडुच शकते हीच घटना तुम्हाला मिथक का वाटु नये. ?
जाता जाता :- हॉलिवुड काय म्हणते नावाचा एक व्हिडीयो... प्रश्न अजुन अनेक प्रश्न शिल्लक आहेत.

आजची स्वाक्षरी :- Is Raghuram Rajan being an alarmist by predicting a global markets crash?

निरन्जन वहालेकर's picture

23 Jun 2012 - 8:34 pm | निरन्जन वहालेकर

चला, "आदर्श " व्यवहार इतिहास जमा झाला एकदाचा. पुन्हा नविन "आदर्श " घडऊ या. पुढचि आग लागेपर्यन्त! ! !

अन्नू's picture

23 Jun 2012 - 8:41 pm | अन्नू

पुन्हा नविन "आदर्श " घडऊ या. पुढचि आग लागेपर्यन्त! ! !

फिर चलो दिल्ली. ;)

खटासि खट's picture

23 Jun 2012 - 9:12 pm | खटासि खट

परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर (वृत्तपत्रे इ. ) आणि प्रत्यक्षदक्षी पाहणी केल्यानंतर ( वाहिन्यांवरची दृश्ये ) तज्ञांची मते विचारात घेता ( आजचा सवाल. झी चोवीस तास, एबीसी माझा आणि संस्थळावरील चर्चा इ. ) आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत कि मंत्रालयाचे झालेले नुकसान, फायली नष्ट होणे इ प्रकार यासाठी आगच कारणीभूत आहे.

खडीसाखर's picture

24 Jun 2012 - 12:29 am | खडीसाखर

सरकारी इमारतींचा आगीचा विमा असतो का?

विकास's picture

24 Jun 2012 - 8:27 am | विकास

भारतातील माहीत नाही पण बहुदा इतरत्र असते तसेच असेलः सरकारी (तसेच मोठी महाविद्यालये, कंपन्या आदींच्या) इमारती बर्‍याचदा सेल्फ इन्शुअर्ड असतात... :(

मदनबाण's picture

9 Apr 2015 - 3:14 pm | मदनबाण

आज बर्‍याच दिवसांनी ९/११ चा किडा मला परत चावला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }

मदनबाण's picture

3 Aug 2015 - 8:32 pm | मदनबाण

@सनईचौघडा
तुम्ही मला ९/११ बद्धल विचारले होते, हाच तो धागा ! आज त्यात अजुन काही भर टाकतो.जमल्यास वेळ काढुन हा प्रतिसाद संपूर्ण पहा.

UK Documentary Maker Wins TV Licensing Court Case Proving BBC Had Prior Knowledge of Bldg. 7 Collapse

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pipe Guy - House/Trance/Techno Live

मदनबाण's picture

12 Sep 2015 - 5:04 am | मदनबाण

या घटनेला १४ वर्ष झाली ! पण या मागील सत्य खरेच समोर आले का ?

P1
लेटेस्ट :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja

मदनबाण's picture

27 Nov 2015 - 10:52 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

९/११ धाग्यावर मी ऑन ट्रॅक आहे याची खात्री, हा वरचा व्हिडीयो ऐकुन झाली. :) मग ते मोसाद असो वा akmai या सर्व गोष्टींचा उल्लेख अर्थातच या व्हिडीयोत झाला आहे. ज्या पद्धीतीने मी या घटनेचा मी विचार केला ती योग्य आहे, हे सुद्धा कळले.या घटनेचा मी जालावर शोध घेतला होता आणि जमेल तसे इथे देण्याचा प्रयत्न केला तो योग्यच आहे असे दिसते.इथे दिलेले काही व्हिडीयो आता डिलीट झालेले दिसत आहेत.हा वरचा व्हिडीयो कालच रिलीज झालेला आहे.
या घटनेचा आणि सध्या चालु असलेल्या आयसीस उपद्रव यांचा अर्थातच संबंध आहे, हे काही वेगळण्याने सांगण्याची गरज नाही ! सध्या माझा फोकस अर्थातच रशियावर आहे, रशिया तयार झाला आहे याचा अंदाज मला इथेच आला होता { ८ सप्टेंबर २०१५ } आणि मला वाटतं १ नव्हेंबर २०१५ पासुन रशियाने एअर स्ट्राइक्स सुरु केले. सध्या या चालु असलेल्या प्रत्येक घटनां मधुन आपल्याला बरेच काही शिकण्यास मिळणार आहे,आणि अर्थातच एका अर्थाने या घडणार्‍या घटनांचे मूक साक्षिदार सुद्धा असणार आहोत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

उद्या ९/११ ला १८ वर्ष पूर्ण होतील !

त्या दिवशी एकुण ३ इमारती जमिनदोस्त झाल्या,त्यात दोन ट्वीन टॉवर होते,आणि तिसरी इमारत ही बिल्डींग नंबर ७ होती.त्या इमारतीला सुद्धा आग लागली होती आणि काही वेळातच ती जमिनदोस्त झाली... या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते !

मागच्या आठवड्यात बाहेर आलेला रिपोर्ट आणि बातम्या !

University Study Finds Fire Did Not Cause 3rd Tower's Collapse on 9/11
University Study Finds Fire Did Not Bring Down World Trade Center Building 7 on 9/11
The World Trade Center Building 7 Collapse Findings
Fire did not destroy World Trade Center Building 7 on Sept. 11, scientific study reveals
Fire did not cause World Trade Center Building 7 collapse, UAF study suggests

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"

जालिम लोशन's picture

11 Sep 2019 - 12:17 am | जालिम लोशन

कळले नाही.