Skip to main content

दुष्काळ...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 21/06/2012 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आई पाझरत्या डोळ्यांनी तू जेव्हा मला पाठमोरा पहात होतीस जाताना... तेव्हा माझे पाय अडखळले....मी मागे वळून पाहिल्यावर मला दिसला... बाभलीखाली उभी राहिलेली तू अन तुझा तो फाटका पदर... ते रनरनत उन, बांधावर आडवा पडलेला तो नांगर... सावलीत उकिडवा बसून एक टक आभाळाकडे कोरड्या डोळ्याने पाहणारा तात्या.... हाडावंर कातडं ताणून खपाटीला गेलेलं पोट सांभाळत शेवटच्या घटका मोजणारी ढोरं.... पलिकड जमिनीचा ठाव घेत आ वासून बसलेली ती विहीर... आणि बांधावर लिंबाखाली भर उन्हात तिरपी किरणं अंगावर घेत घाम फुटल्यासारखा मक्ख बसलेला तो शेंदरी म्हसोबा... मला आता जायलाच हवं पुढं.... नाहीतर ह्या दृष्टचक्रात मी सुद्धा नांगरलेल्या भुईतून उखडलेल्या तनासारखा इथच जळून जाईन तुम्हा सगळ्यांबरोबर...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1486
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

फार करूण. तुम्ही चांगलं लिहिताय. आणखी लिहा.