✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बिअरशॉपची किमया - बेवडा भरकटला - नो प्रोब्लेम.

५
५० फक्त यांनी
Wed, 06/20/2012 - 07:54  ·  लेख
लेख
आंतरजालीय सज्जनांनो, आपल्या घरात फ्रिज असतात, पण ब-याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा 'त्यापेक्षा ऑटो बरा, आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशोबाने घरात बिअर आणुन ठेवण्याचे आपण सर्व जण (यात मी नाही आलो) टाळतो. आपल्याला हवी तेंव्हा बिअर न मिळणे व चिल्ड न मिळणे या वेगवेगळ्या समस्या आहेत, आपल्याला वेटर चांगला मिळाला नाही बिअर गरम येते, पण दारुधंद्यातल्या वितरणातील दोषांमुळे हव्या त्या ब्रँडची बिअर न मिळण्याचा अनुभव येतो. बहुतेक वेळा क्वचित प्यार्टी देणारा दोस्त बिल भरणार असेल तर हा प्रकार घडतो. अशी प्यार्टी आपल्या डोक्याला त्रासदायक वाटते, पण हा दोष हल्ली सुरु झालेल्या एका सोयीने सुधारता येतो, या सोयीला'' बिअर शॉप '' म्हणतात. त्याचा उपयोग आपण पाहु या. हे बिअर शॉप सरकारी कोट्यातुन उघडलेले आहे, पण त्या मधला इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग भरकटलेले आहे. आता याच दुकानाच्या परमिटवर, याच्या मालकाच्या जावयाने एक डुप्लिकेट दुकान उघडले आहे आता या डुप्लिकेट दुकानातुन दरवाजा उघडुन आत जा. इथं तुमचा नाव, पत्ता, पॅन कार्ड नंबर व रेशन कार्डाची झेरॉक्स द्या. इथल्या फॉर्म मध्ये तीन प्रकारे माहिती द्यावी लागेल, आपल्याला हवा असलेला ब्रँड त्याचा स्टाँगनेस त्यात टेंपरेचर ० ते १० ठेवा, आणि ओकेच्या वर क्लिक करा. आता खाली तुमच्या निवडीची आणि त्या टेबलामागच्या मदतनिसिने दिलेल्या सल्याची तुलना करुन पहा. (सर्व छायाचित्रे, आंतरजालावरुन फुकट साभार )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहती जागा
विडंबन
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7459 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

आज काय सकाळी सकाळी??

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 08:20 नवीन
तसा लेख परिणामकारक वाटतोय पण काही तरी कमी वाटते आहे? तसे तुमचा सदस्यनाम १० वर्षांपूर्वी पुण्यातील बिअरबार वाले वापरत असत. Any beer Rs.50/- only. कदाचित तुम्ही वैधानिक इशारा द्यायचे विसरला... संसारा उध्वस्त करी दारू.... बाटलीस स्पर्श नका करू.... सौजन्य - आमची वाहिनी सह्याद्री वाहिनी वरील एक जुनी जाहिरात (बायको -आलात पिऊन........ मुलगी - नको बाबा नको नको असे संवाद असायचे त्यात).
  • Log in or register to post comments

जोशीबुवा मिपाकरांसाठीचा

कानडाऊ योगेशु
Wed, 06/20/2012 - 08:30 नवीन
जोशीबुवा मिपाकरांसाठीचा वैधानिक इशारा वेगळ आहे हो... संसारा उध्वस्त करी दारू. लोकहो संसार नका करू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

होय, चकणा कमी आहे. आणि

५० फक्त
Wed, 06/20/2012 - 09:37 नवीन
होय, चकणा कमी आहे. आणि वैधानिक इशारे आम्ही कोण देणार, हमने तो कभी पि हि नही, रोज सकाळी झोपेतुन उठल्यावर जिवंत आहोत हे लक्षात येतं, त्याचीच नशा एवढी चढते की बाकी कसल्या नशेची गरजच पडत नाही. असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

उत्तर आवडले...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 11:26 नवीन
लगे रहो ५० भाई...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कै च्या कैच

जेनी...
Wed, 06/20/2012 - 20:55 नवीन
कै च्या कैच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आता याला ....

चौकटराजा
Wed, 06/20/2012 - 08:29 नवीन
आता याला पुढचा धागा लावणारा सौरभ उप्स म्हणून अ आ ची नेमणूक करा झालं !
  • Log in or register to post comments

५० राव मस्तच !

चौकटराजा
Wed, 06/20/2012 - 08:32 नवीन
मस्तच ..... आपला नम्र, किल्ली
  • Log in or register to post comments

चौरा काका

किसन शिंदे
Wed, 06/20/2012 - 09:03 नवीन
फक्त ३ मिनिटात दोन वेगवेगळे प्रतिसाद??? आवडलं नाही आवडलं, काय समजायचं काय?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आवडलंच १०० टक्के.

चौकटराजा
Wed, 06/20/2012 - 09:08 नवीन
आवडलंच १०० टक्के. त्यात आमच्या दोन् मिपा मित्राना उचकवले आहे. तेच दोघे आणखी मस्त विडंबन आणू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पहिला फोटू पाहूनच हहपुवा

प्रचेतस
Wed, 06/20/2012 - 08:43 नवीन
पहिला फोटू पाहूनच हहपुवा झाली.
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो कोणत्या पबचा आहे?

टवाळ कार्टा
Wed, 06/20/2012 - 08:52 नवीन
शेवटचा फोटो कोणत्या पबचा आहे? ;)
  • Log in or register to post comments

नशीब शेवटच्या फोटोतला मिपाकर

५० फक्त
Wed, 06/20/2012 - 09:31 नवीन
नशीब शेवटच्या फोटोतला मिपाकर ओळखु आला तुम्हाला, तो कोण आहे असं नाही विचारलंत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

विडंबन आवडलं ब्वॉ, निदान

किसन शिंदे
Wed, 06/20/2012 - 09:05 नवीन
:D विडंबन आवडलं ब्वॉ, निदान आपल्याला तरी.. ;) - इस्पिकराजा
  • Log in or register to post comments

वारुणी ओतणारी ललना विशेष

मदनबाण
Wed, 06/20/2012 - 09:19 नवीन
वारुणी ओतणारी ललना विशेष आवडली ! ;)
  • Log in or register to post comments

+१... I Love this Bartender टीव्ही शो आला डोळ्यासमोर...

मोदक
Wed, 06/20/2012 - 09:42 नवीन
I Love this Bartender टीव्ही शो आला डोळ्यासमोर... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मदिरा आणि मदिराक्षी

बॅटमॅन
Wed, 06/20/2012 - 11:52 नवीन
मदिरा आणि मदिराक्षी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

50 फक्तचा धागा आणि तोही

सोत्रि
Wed, 06/20/2012 - 09:55 नवीन
50 फक्तचा धागा आणि तोही बीयरवर, मोठ्या उत्साहाने धागा उघडला पण अंमळ निराशा झाली, कुछ मजा नही आया :( -( भरकटलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

सोत्रि साहेबांशी सहमत. काय लिहिल आहे ते नक्की कळलच नाही.

निश
Wed, 06/20/2012 - 10:51 नवीन
सोत्रि साहेबांशी सहमत. काय लिहिल आहे ते नक्की कळलच नाही. ५० फक्त साहेब बहुतेक लेख लिहीताना स्वताच गंडलेले दिसतात. गोंधळलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अहो ते फोटोशॉपची किमया- फोटो

प्रचेतस
Wed, 06/20/2012 - 10:55 नवीन
अहो ते फोटोशॉपची किमया- फोटो धुरकटला ? नो प्रॉब्लेम ! ह्या धाग्याचे विडंबन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

वल्ली साहेब, मग माझ आधीचा प्रतिसाद मी मागे घेतो.

निश
Wed, 06/20/2012 - 11:23 नवीन
वल्ली साहेब, मग माझ आधीचा प्रतिसाद मी मागे घेतो. तुम्ही माझी चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल तुमचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कळलं नाही..

प्रभाकर पेठकर
Wed, 06/20/2012 - 10:39 नवीन
मला तर काही कळलाच नाही लेख आणि त्याचे प्रयोजन. पण असो, बिअरवर आहे म्हणजे चांगलाच असणार.
  • Log in or register to post comments

@ फिफ्टी ओन्ली >रोज सकाळी झोपेतुन उठल्यावर जिवंत आहोत

संजय क्षीरसागर
Wed, 06/20/2012 - 11:58 नवीन
हे लक्षात येतं, त्याचीच नशा एवढी चढते की बाकी कसल्या नशेची गरजच पडत नाही S) क्या बात है साला! ज्याम खूष झालो! आता कधी लावतोय असं झालय! आणि नेमकी आज संध्याकाळीच पार्टी आहे!! >हमने तो कभी पि हि नही - यावरनं एक गझल आठवली : कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी कसम आज पी ही नही, हिचकीयां आ रही है, ये क्या हो रहा है? तुम्हारी कसम आज पी ही नही कुछ तो नशा आपकी बात का है और थोडा नशा धिमी बरसात का हमे आप यूं ही शराबी न कहिये ये दिलपर असर है मुलाकात का है मुलाकात का थाम लिजे हमे बस यही इल्तिजा है तुम्हारी कसम आज पी ही नही लगे रहो!
  • Log in or register to post comments

वाह उस्ताद !!

अर्धवटराव
Wed, 06/20/2012 - 21:51 नवीन
गजल आवडेश !! शायर कोण म्हणायचे?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गंभीर अपेक्षा भंग.

गणपा
Wed, 06/20/2012 - 13:05 नवीन
हे विडंबन आहे हेच लोकांना सांगावं लागावं यातच काय ते आलं. :)
  • Log in or register to post comments

+१

बाळ सप्रे
Wed, 06/20/2012 - 15:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

@हे विडंबन आहे हेच लोकांना

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/20/2012 - 20:01 नवीन
@हे विडंबन आहे हेच लोकांना सांगावं लागावं यातच काय ते आलं. >>> यहीच बोल्ता है...! विडंबन असं असावं,कि दिसावी मुळ जिल्बी आशय असा असावा,की वाचक व्हावा एल्बी...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हे तुम्ही म्हणावं श्री

अग्यावेताळ
Wed, 06/20/2012 - 22:27 नवीन
हे तुम्ही म्हणावं श्री अआ ? टाकुनी स्वतः विडंबने टुकार दुसर्‍यांना देती सल्ले चुकार...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

विडंबने (????) टुकार >>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/21/2012 - 23:58 नवीन
विडंबने (????) टुकार >>> आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का..? आमची सगळीच विडंबने टुकार क्याटॅगरीत मोडून दिल्या बद्दल आपले हार्दिक आभार.... --^--^--^-- स्वतः एकही विडंबन न करता,तुंम्ही कसे इतके भिकार...? :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्यावेताळ

विडंबन आहे हे कळण्यासाठी...

सूड
Wed, 06/20/2012 - 20:12 नवीन
मूळ धागाही तेवढ्याच दमाचा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रशिक्षणपर धाग्यावर विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ? मला तर एक स्तुत्य प्रयत्न वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खीक्क...

सोत्रि
Wed, 06/20/2012 - 21:17 नवीन
विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?
पावसाळा सुरू होऊन पाण्याची रेलचेल झाली असली तरीही पाण्याची अशी उधळपट्टी बरी नव्हे ;) - (पानीकम) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तेही खरंच म्हणा !! जाता जाता:

सूड
Wed, 06/20/2012 - 21:24 नवीन
तेही खरंच म्हणा !! जाता जाता: शेवटच्या फोटुत नातीच्या कौशल्याकडे कौतुकाने बघणारे आजोबा पाहून त्या नातीचा हेवा वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मूळ धागाही तेवढ्याच दमाचा

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 06/20/2012 - 21:20 नवीन
मूळ धागाही तेवढ्याच दमाचा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे.
मग तसा धागा निवडायला पाहिजे ना. उगाच कशाचेही विडंबन का करा ? मिमिक्री वाले पण सुप्रसिद्ध लोकांची मिमिक्री करतात. तुझी माझी करत नाहीत.
प्रशिक्षणपर धाग्यावर विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?
दर क्ष दिवसांनी (किंवा तासांनी) मिपा बोर्डावर विडंबन आलेच पाहिजे का ? कशाला नको त्यात पाणी घालून पाणी फुकट घालवायचे ?
मला तर एक स्तुत्य प्रयत्न वाटला.
मला वेळेचा अपव्यय वाटला. जे लेखक खूप भारी लिहू शकतात त्यांनी उगाच वेळ,सर्जकता आणि शक्ती वाया घालवू नये असे माझे मत आहे. (विडंबकांना रायटर्स ब्लॉक कधी येतो याची वाट पाहणारा ) विमे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

गणपा
Wed, 06/20/2012 - 21:25 नवीन
ऐसाइच बोल्ताय. :) विमे माझे टंकायचे कष्ट वाचवल्या बद्दल धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तू पण ना राव !!__/\__असो.

सूड
Wed, 06/20/2012 - 21:28 नवीन
तू पण ना राव !! __/\__ असो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

काही म्हणा!

पैसा
Wed, 06/20/2012 - 20:28 नवीन
पहिला फोटो बघून हसून जीव गेला!
  • Log in or register to post comments

सहमत. बरीच हसले.

रेवती
Wed, 06/20/2012 - 20:38 नवीन
सहमत. बरीच हसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा