✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

श
श्रीरंग_जोशी यांनी
Sat, 06/16/2012 - 10:07  ·  लेख
लेख
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात. जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते. पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात. आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार? यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये. मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66103 वाचन

💬 प्रतिसाद (155)

प्रतिक्रिया

हो

कपिलमुनी
Tue, 06/19/2012 - 17:18 नवीन
हा दुवा पाण्यापासून वाफ आणि वाफेवर वीज तयार करतात ..पण वाफ हे पाण्याचे एक रूप आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

पण औष्णीक केंद्रात वीज

शैलेन्द्र
Tue, 06/19/2012 - 17:37 नवीन
पण औष्णीक केंद्रात वीज कशापासुन करतात असं विचारल तर मी तरी कोळशापासुन्/गॅसपासुन किंवा इतर इंधनापासुन अस उत्तर देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पाणि पण लागतेच...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 19:11 नवीन
कोळसा वगैरे इंधन म्हणून पाणि तापवायला वापरले जाते. माझ्या माहितीप्रमाणे वाफेच्या जोरावर वीज निर्माण केली जाते. कृपया जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

वीज पाण्यात नसुन इंधनात

शैलेन्द्र
Tue, 06/19/2012 - 19:46 नवीन
वीज पाण्यात नसुन इंधनात असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

स्पष्टीकरण

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 19:57 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे वीज दोन्हीमध्ये नसते. वीजनिर्मितीसाठी कसली तरी शक्ती वापरुन मोशन (मराठी शब्द सुचवा) निर्माण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात. जसे पाण्यच्या वेगावर शक्तिशाली टर्बाईन्स (मराठी शब्द सुचवा) फिरतात व त्यापासून वीज निर्माण होते. तसेच थोडे वेगळ्या प्रकारे औष्णिक वीजप्रकल्पात होत असावे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

*औष्णिक/अण्वीक वीजप्रकल्पात

शैलेन्द्र
Tue, 06/19/2012 - 22:44 नवीन
*औष्णिक/अण्वीक वीजप्रकल्पात इंधनात असलेली रासायनीक/ जैवीक उर्जा जाळुन मुक्त केली जाते, त्या उर्जेवर पाण्याची वाफ करुन, ती वाफ कोंडली जाते, त्या स्थीतीज उर्जेवर टर्बाईन्स फिरवुन त्यापासुन गतीज उर्जा तयार केली जाते, त्या गतीज उर्जेवर डायनामो फिरवुन तिचे विद्युत शक्तीत रूपांतर केले जाते. *जलविद्युत प्रकल्पात योग्य ठीकाणी साचवलेल्या पाण्याच्या स्थीतिज उर्जेचे रुपांतर गतीज उर्जेत करुन त्यावर डायनामो फिरवले जातात. *पवन विद्युत प्रकल्पात वाहत्या वार्‍याची गतिज उर्जा वापरुन त्यावर डायनामो फिरवले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वाफ वापरतात ना ??

कपिलमुनी
Wed, 06/20/2012 - 13:18 नवीन
म्हणजेच पाण्याचा थोडा वापर होतो .. मूळ मुद्दा हा होता, अशा पद्धतीने वाफ केलेल्या पाण्याचा 'कस' गेलेला असतो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

घ्या..

मोदक
Wed, 06/20/2012 - 00:54 नवीन
मोशन (मराठी शब्द सुचवा) - गती. टर्बाईन्स (मराठी शब्द सुचवा) - जनित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 01:02 नवीन
आपले विशेष आभार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वीज निर्मिती साठी टर्बाईन

डावखुरा
Wed, 06/20/2012 - 13:27 नवीन
वीज निर्मिती साठी टर्बाईन महत्वाची...कोणत्याही प्रकारे टर्बाईन विशिष्ट वेगाने फिरायसाठी फक्त औष्णिक,जल, वायु किंवा लाटांचा उपयोग होतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हरयाणा निवडणुकीवेळी बहुधा

प्यारे१
Mon, 06/18/2012 - 15:21 नवीन
हरयाणा निवडणुकीवेळी बहुधा स्व. देवीलाल म्हणालेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ही गोष्ट भाक्रानांगल धरणाच्या

५० फक्त
Mon, 06/18/2012 - 19:34 नवीन
ही गोष्ट भाक्रानांगल धरणाच्या बाबतीतली आहे. आणि हायड्रो प्रकल्पात असा कस कमी होत नाही, पण औष्णिक प्रकल्पात मात्र हा खुप खुप मोठा प्रश्न आहे हे खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

विनोदी नाही पण एक लक्षात राहिलेला किस्सा..

मोदक
Sat, 06/16/2012 - 13:37 नवीन
मॅनहटनमध्ये एक फ्लायओव्हर किंवा रस्ता असे काहीतरी बांधणे रेंगाळले होते, बड्या बड्यांचे "हितसंबंध" आड येत होते. शेवटी कंटाळून President नी नकाशावर रस्त्याच्या दोन रेषा आखल्या, खाली सही केली व तो नकाशा हाच फायनल प्लॅन म्हणून अंमलात आणायला दिला. आणखी कुणाला काही माहिती आहे का या घटनेची?
  • Log in or register to post comments

दादाराजे खर्डेकर सातार्‍यात

विजुभाऊ
Sat, 06/16/2012 - 18:32 नवीन
दादाराजे खर्डेकर सातार्‍यात एक निवडणूक सभा घेत होते. भाषण संपल्या नंतर लोकानी घोषणा दिल्या शरद पवार झिंदाबाद. त्यानंतर कोणीतरी जोरात ओरडले "दादा राजे......" लोकाना जय म्हणावे /झिंदाबाद म्हणावे हे कळाले नाही एकदम शांतता पसरली. कोणीतरी त्या घोषणेला उत्तर दिले ".खर्डेकर........" सभेत एकदम हशा पिकला
  • Log in or register to post comments

राजकारण्यांचे विनोदी

चौकटराजा
Sat, 06/16/2012 - 19:07 नवीन
शरद पवार बडा मालदार आदमी है ..... शरद यादव इन लोकसभा हम इंदिराजी जैसे खूबसूरत तो नही फिर भी इतने बुरे भी नही,,,, हमारी एक बार तो सही तस्वीर दिखाओ ना दूर दर्शन पर ,,,,, अटल बिहारी बाजपेयी इन तळेगाव दाभाड
  • Log in or register to post comments

मराठी लोकांची हिंदी

ramjya
Sat, 06/16/2012 - 19:10 नवीन
खुप दिवसापुर्वी वाचण्यात आलेला किस्सा....संसदेत एका उत्तर भारतीय पांडे नावाच्या खासदारा नंतर एक मराठी खासदार भाषणाला उभे राहिले आणी त्याची सुरुवात " अध्यक्ष महओदय अभो जो पांडे जी ने विचार मांडे है.." ने केली तेव्हा सर्व संसद हसाय लागली..
  • Log in or register to post comments

ते मराठी नेते म्हणजे स का

बॅटमॅन
Mon, 06/18/2012 - 16:17 नवीन
ते मराठी नेते म्हणजे स का पाटील होते. "गांधीजी के नेतृत्व के नीचे हमने जो चलवल की" वैग्रे मुक्ताफळे पण त्यांचीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya

खंग्री

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/18/2012 - 19:43 नवीन
हमने जो चलवल मेलो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सोनिया गांधी राजकारणात सक्रिय

कानडाऊ योगेशु
Sat, 06/16/2012 - 21:04 नवीन
सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्यावर पहिल्याप्रथम जे भाषण केले ते फारच भावनिक होते. मी तुमच्या समोर सून म्हणुन आले.आणि तुमच्यासमोरच विधवा झाले ह्या प्रकारची भावनिक वाक्यरचना भरपूर होती.तेव्हा त्यांना भाषण लिहुन देणार्या टीमचे ही खूप कौतुक झाले होते. भाजप सरकारपडल्यावर व कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यावर पंतप्रधानपद नाकारताना ही "अंतरात्मा कि आवाज" नावाचा जबरदस्त गुगली मॅडमनी टाकला होता.
  • Log in or register to post comments

हो बरोबर आहे

श्रीरंग_जोशी
Sat, 06/16/2012 - 21:56 नवीन
तेव्हा अशी वंदता होती की सोनियाजींना जावेद अख्तर यांच्याकडून घरपोच शिकवणी मिळत आहे व त्यांच्याकडूनच भाषणे पण लिहून मिळत आहेत. त्या सर्व कष्टांस फळ येण्यास २००४ साल उजाडले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सोनियांचे भाषण = मोंगियाची खेळी

श्रीरंग_जोशी
Sun, 06/17/2012 - 04:51 नवीन
१९९८ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूका होऊन गेल्या होत्या, नेमके त्यावेळी भारत - ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामने (भारतात व नंतर शारजा येथे) सुरू होते. महान फलंदाज राहुल द्रविड त्यावेळी फॉर्मात नसल्याने संघामध्ये नव्हता. कर्णधार अझहर ने, नयन मोंगियास ६ / ७ व्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. तोवर या क्रमांकावर राहुल द्रविड फलंदाजीस यायचा. नयन मोंगियाच्या छोट्या पण वेगवान खेळींमुळे संघाला फायदा झाला व आपण शारजातील मालिकाही जिंकलो. अर्थात सचिनची दोन्ही शतके अजरामर आहेतच. त्या मालिकेचे वर्णन करताना बहुधा कणेकर (कदाचित संझगिरीही असतील) यांनी लिहिले, की जसे अटलजींच्या भाषणांतील दोन वाक्यातल्या विरामात सोनिया गांधींचे एक छोटेखानी भाषण संपून जाते तसेच राहुल द्रविडने धाव काढलेल्या २ चेंडूंच्या दरम्यान नयन मोंगियाची अख्खी खेळी संपून जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

काही किस्से

विकास
Sat, 06/16/2012 - 21:15 नवीन
विरोधी पक्ष नेते म्हणून (मला वाटते रावांच्या काळात) अटलजी जोशपूर्ण भाषणात, "हम बदलेंगे, हम ये बदलेंगे, वो बदलेंगे" वगैरे म्हणत होते. तर काँग्रेसच्या बाकावरून त्यांच्या नावावरून कोटी करण्यासाठी म्हणून कोणीतरी म्हणाले, की" लेकीन आप तो अटल है (फिर बदलेंगे कैसे?) " ... अटलजींनी मिश्कीलपणे बघत म्हणले, "हां लेकीन मै बिहारी भी हूं!" अगदी जुना अत्र्यांचा पत्रकार म्हणून किस्सा, आधीच्या एका माझ्याच प्रतिसादात सांगितलेला: नीलम संजीव रेड्डी आणि व्हि व्हि गिरींच्या मधे झालेल्या चुरशीच्या लढतीची आठवण झाली. ज्या मधे इंदिरा गांधींनी व्हि व्हि गिरींना (अनधिकृत उमेदवारास) निवडून आणून दिले. बर्‍याच अंशी ही भारताच्या राजकीय आणि काँग्रेस पक्षाच्या अजूनच र्‍हासाची सुरवात होती. वाचनावरून आठवते त्याप्रमाणे, यशवंतरावांनी तेंव्हा बाईंना त्यांच्या बाजूने मत देईन म्हणून शब्द दिला आणि तो पाळला नाही. बाईंनी आयुष्यभर त्यांच्यावर त्यावरून डूग धरला आणि कधीच आपले समजले नाही....याच गिरीसाहेबांच्या जिंकण्यावरून आणि त्यांच्या ११ मुलांवरून आचार्य अत्र्यांनी दुसर्‍या दिवशीच्या पेपरात संपूर्ण कुटूंबाचा फोटो देत "व्हि व्हि गिरींची कामगिरी" असे शिर्षक दिले होते.
  • Log in or register to post comments

सहस्रकाचा विनोद ठरलेल्या विधानाची दखल कोण घेणार ...

sagarparadkar
Sat, 06/16/2012 - 21:41 नवीन
हा घागा फकस्त राजकीय पुढार्‍यांच्या विनोदी विधानांसाठी मर्यादित केल्याबद्दल णिषेध व्यक्त करण्यात येत आहे ... परवाच ह्या सहस्रकाचा विनोद ठरलेले विधान वाचले बातमी म्हणून ... ते म्हणजे पाकिस्तानच्या अतिसभ्य लष्कर प्रमुख कयानींचे विधान .... टाईम्स ऑफ ईंडिया च्या वेब्साईटवर वाचलेले ... "पाकिस्तान हा शांतिप्रिय देश आहे ..." (हशा ... + टाळ्या) कोण म्हणतो कि लष्करी अधिकार्यांना विनोदबुद्धी नसते म्हणून ....
  • Log in or register to post comments

आवडले!

श्रीरंग_जोशी
Sat, 06/16/2012 - 22:38 नवीन
अहो पण मुळात पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी त्यांच्या देशात राजकारणी म्हणूनच ओळखले जातात. आपल्या देशातील राजकारणीही कमी पडतील अशी कामगिरी ते कधी कधी करून दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

अंगावर आले तर शिंगावर घ्या...!

श्रीरंग_जोशी
Sat, 06/16/2012 - 22:27 नवीन
माझे सर्वात आवडते राजकीय विधान. अंगावर आले तर शिंगावर घ्या...! ज्या माणसाला साधा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा प्रवास होताना पाहिले, त्याला डावा हात म्हणून वागवले तो विरोधकांशी हातमिळवणी करताना दिसतोय असे लक्षात येताच बाळासाहेबांनी पक्षाबाहेर काढले. ही घटना दोन्ही बाजूंना भावनिक वेदना देणारी होती यात शंकाच नाही. पण राणेसमर्थक राडा करताहेत हे दिसल्याबरोबर लगेच साहेबांचा आदेश आला अंगावर आले तर शिंगावर घ्या...! अन सैनिक कामाला लागले. हाच बाणा दैनंदिन जीवनात कधी कधी कामी येतो, उगाच कुणाच्या वाटेला जाऊ नये पण कुणी उगाचच अंगावर आल्यास तयास शिंगावर घ्यायची तयारी ठेवावी. अवांतर - हाच बाणा मिपावर सुद्धा बरेचदा वापरला जातो, काही वेळा यश मिळते अन काही वेळा झेपत नाही तर घेताव कशाला (शिंगावर) असे म्हणायची वेळ येते ; -).
  • Log in or register to post comments

बाबासाहेब भोसले.

कापूसकोन्ड्या
Sat, 06/16/2012 - 22:53 नवीन
बाबासाहेब भोसले.(प्राचार्य शिवाजी राव भोसले यांचे सख्खे भाउ) ते पण शब्दप्रभू होते. १) खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान (स्वतःमुख्यमंत्री झाल्यावर) २) बंडोबा थंडोबा झाले ( बंड निवळल्यावर) स्व.राजीव गांधी एकदा म्हणाले होते "ऐसा नही किया तो हम इलेक्शन लुजेंगे"
  • Log in or register to post comments

बंडोबा थंडोबा झाले...

श्रीरंग_जोशी
Sat, 06/16/2012 - 23:06 नवीन
या प्रतिक्रियेसाठी आपले विशेष आभार. बंडोबा हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात बाबासाहेबांनी प्रथम आणला. तसेच बारामतीच्या साहेबांनी २ वर्षांपूर्वी 'तोडपाणी' हा शब्दही आणला. काही लोकांनी त्याचा 'तोडबाजी' असा अपभ्रंश केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

चार वर्षांत साडेतीन मुख्यमंत्री ....

sagarparadkar
Sat, 06/16/2012 - 23:57 नवीन
प्रमोद महाजन ह्यांनी पुण्यातल्या जाहीर सभेत हा उत्तुंग षटकार मारला होता. त्या सभेला मी स्वतः हजर होतो. नुकतेच बॅ. आदिक हे आपल्या 'हवाई' कारकीर्दीमुळे पायउतार होत होते किंवा झाले होते. त्या वेळेच्या आसपास जी निवडणूक झाली, तिच्या प्रचारसभेत महाजनांनी जबरदस्त आतषबाजी केली होती. तेव्हा काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले "काय म्हणायचे ह्या काँग्रेसला ... ह्या महाराष्ट्राला ह्यांनी चार वर्षांत साडेतीन मुख्यमंत्री दिले ..." (लोक अचंबित .... म्हणजे काय?) तर महाजनांनी लगेचच त्या साडेतीन मुख्यमंत्र्यांची यमक जुळवत नावे सांगितली ... "अंतुले, भोसले, दादा .... आदिक आधा !" ....आणि एकच हशा उसळला .... आणि टाळ्यांचा कडकडाटच झाला ....
  • Log in or register to post comments

हटाव लुंगी ,बजाव पुंगी .हे

निनाद मुक्काम …
Sun, 06/17/2012 - 00:58 नवीन
हटाव लुंगी ,बजाव पुंगी. हे विधान दक्षिण भारतीयांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते तेव्हा खूप गाजले होते. किंवा मला सत्ता द्या मी बिहार चे रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत करून दाखवतो. लालू उवाच गुड्डी आता बुड्ढी झाली तरी ..... नाना आता तरी टीक रे , नाही मागे एकदा केले विधान केल्यावर मग म्हणाला होता , मी असे म्हणालोच नाही. अवांतर मिपाच्या इतिहासातील गाजलेली आणि विनोदी तकिया कलाम किंवा विधाने ह्यांच्यावर एखादा लेख काढला तर प्रतिसादातून मराठी साहित्यात अनमोल भर पाडणारा खजिना सापडेल. .
  • Log in or register to post comments

बाबू जगजीवनराम सांसदीय कामकाज

एम.जी.
Sun, 06/17/2012 - 12:51 नवीन
बाबू जगजीवनराम सांसदीय कामकाज मंत्री म्हणून इंदिराजींच्या म.म्त्रीमंडळात कार्यरत असताना त्यांनी सर्व खासदारांसाठी शासकीय खर्चाने एक सुट्टी मंजूर केली. त्यावेळेस ते म्हणाले ... " Member is allowed to be accompanied by his or her spouce on the trip..." अटलबिहारी वाजपेयी उभे राह्यले आणि विचारले.. "What about unmarried members ? Can they go with their friends..?" बाबू जगजीवनराम क्षणार्धात म्हणाले.... "I said Spouce and not Spice , Mr. Vajpeyi......"
  • Log in or register to post comments

पिलू मोदींचा मिश्किलपणा...

योगप्रभू
Sun, 06/17/2012 - 13:30 नवीन
(वाचनात लक्षात राहिलेले काही किस्से) खासदार पिलू मोदी हे मिश्किल गृहस्थ होते. लोकसभेत त्यांच्या विधानांनी खसखस पिकत असे. ते काही वेळा बिनधास्त बोलत असत. एकदा भाषणात टीका करताना ते म्हणाले, 'काही दुय्यम नेते आता स्वतःला सरकार समजू लागले आहेत. यांची पात्रता ती काय? हे नुसते आपल्या विद्यमान पंतप्रधानांचा पेटिकोट पकडून चालत चालत आलेत.' त्यावर सत्तारुढ सदस्यांनी 'पेटिकोट' शब्दाला आक्षेप घेतला आणि तो शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी त्यावर मोंदीकडे पाहिले. तर मोदी म्हणाले, 'महोदय, पण पेटिकोट काढून टाकला तर मग उरलं काय?' यावर तत्कालीन पंतप्रधानांनाही हसू आवरले नाही. महाराष्ट्र विधानसभेत एकदा सर्व सदस्यांच्या छापील माहितीच्या सूचीवरुन चर्चा झाली. या सूचीत अनवधानाने सर्व महिला सदस्यांच्या इंग्रजीतील नावामागे मिस लावले होते. याला विवाहित महिला सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावर सभापती मधुकरराव चौधरी यांनी ती चूक दुरुस्त करण्याचा आदेश दिला आणि गंमतीने महिला सदस्यांकडे पाहून म्हणाले, ' मला खात्री आहे. सन्माननीय सदस्या आता 'मिसप्रिंट' वर आक्षेप घेणार नाहीत.
  • Log in or register to post comments

मिस्प्रिंट च ज्योक एकच नंबर

बॅटमॅन
Wed, 06/20/2012 - 01:14 नवीन
मिस्प्रिंट च ज्योक एकच नंबर खत्रा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

हे घे.. आणखी एक मिस्प्रींट..

मोदक
Wed, 06/20/2012 - 02:34 नवीन
हे घे.. आणखी कांहीमिस्प्रींट.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चायला!!!!निर्वाण पावलो आहे

बॅटमॅन
Wed, 06/20/2012 - 02:53 नवीन
चायला!!!!निर्वाण पावलो आहे __/\__ रूम्मेट झोपलाय नैतर हसुनहसुन मेलोच अस्तो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अजून एक मिसप्रिंट पेपरातील

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 06/20/2012 - 11:41 नवीन
अजून एक मिसप्रिंट पेपरातील बातमी "काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात साधारण ३०० वक्ष कोसळले"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असे कोसळलेले वक्ष सावरण्याचे

बॅटमॅन
Wed, 06/20/2012 - 11:52 नवीन
असे कोसळलेले वक्ष सावरण्याचे काम करायला समाजातून सेवकांचा लोंढा येईल येविषीं यत्किमपि शंका आम्हास वाटत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्‍या आयडीकडून...

मोदक
Wed, 06/20/2012 - 12:04 नवीन
विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्‍या आयडीकडून असले प्रतिसाद बघून एक मिपाकर असल्याची... वैग्रै..., वैग्रै.. (कधी कधी) असभ्य असणारा आणि ते (नेहमीच) कबूल करणारा ;-) - मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मला सभ्य समजले जाते हे बघून

बॅटमॅन
Wed, 06/20/2012 - 13:09 नवीन
मला सभ्य समजले जाते हे बघून ड्वॉले पाणावले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आम्ही कधी म्हटले आम्हाला सभ्य

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 06/20/2012 - 14:00 नवीन
आम्ही कधी म्हटले आम्हाला सभ्य समजा म्हणून... जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही*. (नेहमीच) असभ्य असणारा आणि ते (कधी कधी) कबूल करणारा - विमे. * या मागचा किस्सा सांगू का ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आचार्य अत्रे जिंदाबाद!!!!

बॅटमॅन
Wed, 06/20/2012 - 15:01 नवीन
आचार्य अत्रे जिंदाबाद!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पुरे करा रे पोरांनो...

मोदक
गुरुवार, 06/21/2012 - 00:39 नवीन
पुरे करा रे पोरांनो... आधीच जोशी काका दुनियेच्या टारगेट वर आहेत त्यात तुम्ही अवांतराचे तेल ओतू नका. (सभ्य, सोज्वळ, सज्जन आणि निरागस नसणारा) मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अयाय गं..

चिगो
Fri, 08/03/2012 - 00:49 नवीन
"काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात साधारण ३०० वक्ष कोसळले"
अयाया.. गचकलो..:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

साहेब आणि साहित्यिक

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 09:54 नवीन
साहेबांचे राजकारणाखेरीज इतर क्षेत्रातील मान्यवरांशी नेहमीच जवळचे संबंध असतात. असाच एक किस्सा ४०+ वर्षांपूर्वीचा. साहेबांनी बारामतीमध्ये एका साहित्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात पुलं व गदिमा यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रम अर्थातच जोरदार झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साहेबांकडे त्यावेळी स्वतःची गाडी नव्हती. त्यामुळे एका स्थानिक शेठजींची गाडी घेण्यात आली होती. संध्याकाळी पुण्याला परत जाताना शेठजी व साहेब पण बरोबर होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शेठजींनी सवयीप्रमाणे सरळ मुद्द्यालाच हात घातला. ते म्हणाले, हे साहित्य वगैरे ठीक आहे हो पण तुम्ही लोक पोटापाण्यासाठी काय करता? गाडीमध्ये एक दडपणयुक्त शांतता पसरली. गदिमांच्या कोपिष्ट स्वभावाची साहेबांना पूर्ण कल्पना होती. अपेक्षेप्रमाणेच, पुलंनी परिस्थितीचा ताबा घेतला, ते म्हणाले आम्ही पोस्टासमोर काम करतो. या अण्णांचं हस्ताक्षर खूप चांगलं आहे त्यामुळे ते लोकांची पत्रं लिहून देतात आणि मी लोकांच्या तुटलेल्या छत्र्या दुरुस्त करून देतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धागा जरा खाली गेला की लगोलग

शिल्पा ब
Wed, 06/20/2012 - 10:00 नवीन
धागा जरा खाली गेला की लगोलग नवीन किस्सा टंकुन वर आणण्याच्या कामाचे कौतुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

समजले नाही...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 10:21 नवीन
एकावेळी पाचच धागे मुखपृष्ठावर दिसत असल्याने काहीही केले तरी तारखेनुसार क्र. ६ किंवा त्यापुढील धागा मुखपृष्ठावर दिसणार नसतोच. कृपया मार्गदर्शन करावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

जोशी साहेब.. म्याडम "नवे लेखन" बद्दल म्हणत आहेत.

मोदक
Wed, 06/20/2012 - 11:49 नवीन
जोशी साहेब.. म्याडम "नवे लेखन" बद्दल म्हणत आहेत. ते जावूद्या, तुम्ही नवे किस्से सांगा, मजा येत आहे वाचायला. (खोचकपणे बोलत नाहीये - गैरसमज नसावा) "राजधानीतून" नावाचे अशोक जैन यांचे पुस्तक वाचले आहे का? राजकारण्यांचे किस्सेच किस्से आहेत त्यात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 12:01 नवीन
आपला आभारी आहे, मोदकराव! म्हणजे मिपावरही म्याडम आहेत तर... हे पुस्तक वाचलेले नाहीये. खरे सांगायचे तर आवड असूनही फारशी पुस्तकं वाचणे जमलेच नाही. राजकारणाच्या या विनोदी अंगाचे दर्शन प्रथम घडले ते तंबी दुराई (श्रीकांत बोजेवार) यांच्या २ फूल १ हाफ या सदराने. ११ वर्षात एखाद- दुसरेच वाचायचे राहिले असेल. आता ते सदर नसल्याने लोकरंगची पार रयाच गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

जबतक समोसे मी आलू रहेगा तबतक

निनाद मुक्काम …
Sun, 06/17/2012 - 22:18 नवीन
जबतक समोसे मी आलू रहेगा तबतक बिहार मी लालू रहेगा. वाकड्या तोंडाचा गांधी , मैद्याचे पोते , लखोबा लोखंडे हि बाळासाहेबांनी दिलेली विशेषणे ज्याचा ते आपल्या भाषणात नेहमी उल्लेख करत खूप गाजली होती. राजकारण म्हणजे गजकरण ( गजकर्ण ) हे त्यांचे विधान सुद्धा गाजले होते.
  • Log in or register to post comments

शरद पवार

सूर्याजीपंत
Mon, 06/18/2012 - 03:43 नवीन
शरद पवारांना विलासराव परत मुख्यमंत्री होणार का विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, समय से पहले और किस्मत से ज्यादा किसीको कुछः नाही मिलता...
  • Log in or register to post comments

फ्युझ्ड बल्ब...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 04:08 नवीन
१९९८ ची लोकसभा निवडणूक, संयुक्त आघाडीच्या सरकारचा २०-२१ महिन्यांचा कारभार, सोनियाजींचे उगवते नेतृत्व यामुळे भाजप व मित्रपक्ष पूर्ण भरात होते. खास करून महाराष्ट्रात तर युतीचे वारू चौखूर उधळले होते. १९९६ च्या निवडणूकीत युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. भाजपचे राज्यातील नेतृत्व तर अती आत्मविश्वासात होते. त्याचीच परिणिती नागपूरचे खासदार यांचे तिकिट कापण्यात झाली. पुरोहितांनीही एका रात्रीत आपला गट बदलला व ते काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. द हितवाद (याचे ते मालक -संपादक आहेत अजूनही) वर्तमानपत्रात तर मुख्यमंत्र्यांच्या रामटेकमधील सभेत गुरे ढोरे बसल्याचे छायाचित्र आले होते. नितीन गडकरींनी यावर म्हटले की पुरोहितांबरोबर त्यांचे वर्तमानपत्रही बदलले. पुरोहितांनी त्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण जोर लावला. मतदानाच्या काही दिवस अगोदर सोनियांची नागपूरमधील पहिलीच जाहीर सभा होती. कस्तुरचंद पार्कवर लाखांची गर्दी जमली होती. व्यासपीठावर विदर्भातील ११ ही मतदारसंघांचे काँग्रेस - रिपाई चे उमेदवार व काँग्रेसचे राज्यातील नेते उपस्थित होते. अर्थातच बनवारीलाल पुरोहितही होतेच. नेमका सोनियाजींना सभास्थानी पोचण्यास उशीर झाला. या संधीचा लाभ उठवण्यासाठी पुरोहितांनी त्यांना सोनियाजी येईपर्यंत भाषण करू देण्याची विनंती केली. एवढ्या मोठ्या गर्दीसमोर भाषण करण्याची संधी उभ्या आयुष्यात मिळणार नव्हती. लोकसत्तेच्या वार्ताहराने याबद्दल लिहिले की त्यावेळी बोलू दिले नसते तर पुरोहितांना हार्ट अटॅकच आला असता. मौके की नजाकत पाहून काँग्रेस नेत्यांनीही त्यांना बोलण्याची संधी दिली. पुरोहितांनीही मिळालेल्या संधीचा पूर्ण वापर करून गडकरी व महाजनांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गडकरींनी पूरोहितांना फ्युझ्ड बल्ब म्हणून हिणवले होते. यावर पुरोहितांनी या सभेत प्रत्युत्तर दिले. ये गडकरी ने मुझे फ्युझ्ड बल्ब कहा, अगर मैने इनके ११ के ११ बल्ब फ्युझ नही किये तो नाम बदल दूंगा. अन काय सांगावे ऐन भरात असलेल्या युतीचे ११ ही उमेदवार पडले. त्यात ७ खासदार होते हे विशेष. महाराष्ट्रातही केवळ १० (सेना ६, भाजप ४) उमेदवार निवडून आले. विदर्भातील ३ धरून रिपाईचेही इतिहासात प्रथमच ४ खासदार निवडून आले. पवारांचे राजकीय समीकरण (काँग्रेस, सपा, रिपाई) व जुलै १९९७ ची रमाबाई आंबेडकर नगरातील घटना यांचा संयुक्त परिणामाने युतीचे न भूतो न भविष्यती असे पानिपत झाले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा