मिसळपावची चोरी
मिसळपावची चोरी
बटाटेवड्यांची चोरी
रबडी-फलुद्याची चोरी
मनसोक्त भटकंतीची चोरी
तण्णावून झोपंतीची चोरी
मित्र-मैफिलींची चोरी
डर्टी सिनेमांची चोरी...
ह्याची चोरी
त्याची चोरी...
आता बोला,
जगावं तरी कसं,
नवरोबांनी...
.....('सहज तुझी हालचाल' लिहिणार्या भा. रा. तांब्यांना श्रद्धांजली)...
वाचने
2011
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
प्रतिक्रिया
आजच्या ह्या काळात कोणीतरी रामदास स्वामींच्या विचारांचे येवढे जीव तोडून पालन करतो आहे हे बघून सदगदीत झालो.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
In reply to वा:! by परिकथेतील राजकुमार
म्हणजे दासबोधातल्या मुर्खांच्या लक्षणा बद्द्लच ना.... ? ;)
In reply to म्हणजे दासबोधातल्या by पक पक पक
समर्थ 'सावधान' ऐकून लग्न-मंडपातून पळाले, म्हणून 'दिसामाजि काहीतरी ते' लिहून 'दासबोध', 'भीमरूपी' इत्यादि प्रसवते झाले.
ज्यांनी नुस्तेच 'शुभमंगल' ऐकले, त्यांची गत अशीच होणार.
अवांतरः 'सदगदीत' होण्याचा 'सदगती पावण्या' शी काय संबंध आहे ?
वा:!