कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस?
अलगद लाटांवर स्वार होत त्याचे पाउल पडतांना दिसते
हळू हळू चंद्र वर वर सरकत जातो...
टक लावून पाहिले तर असे वाटते की जणू लाटाच त्याला ह्ळू हळू आकाशात ढकलत आहेत
मग हलकेच तो वर वर सरकत जातो
पिवळसर फिकट दिसणारा मग सतेज कांतीने न्हाऊन निघतो
आणि आनंदाने लाटा चित्कार करु लागतात
डूलत डूलत चंद्र वर आकाशात येऊ लागतो आणि मग सरळ किनार्यावर बसल्या बसल्या त्याला पहाता येत नाही
हलकेच आपण मागच्या मागे लवंडतो आणि केवळ एकटक त्याच्याकडे पाहू लागतो
तो पण आपल्याकडे पहात असतो
त्याला काही तरी सांगायचे असते असेच नेहमी वाटते
पण तो काय सांगतो हे कळत नाही
कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस?
नसशील पाहिला तर बघ ... एकदा तरी बघ
कधी चंद्र नसला की त्याची वाट पहाणार्या चांदण्या दिसतात
जणू काही त्याच्या स्वागतासाठी नटून थटून त्या येतात
आपल्या इवल्याशा डोळ्यांनी भिरीभिरी इकडे तिकडे बघत डोळे मिचकवत त्या चंद्राला शोधत असतात
बराच वेळ झाला तरी तो येत नाही
मग फिकट चेहर्याने त्या हळूच पश्चिमेकडे निघून जातात
कुठे जातात ग त्या?
कधी तू पाहीले आहेस?
कधी शोधले आहेस?
मी खूप दिवसांपासून तुला विचारणार विचारणार म्हणून मनात प्रश्न जुळवत होतो
मी नसलो की तु पण अशीच वागतेस का?
एक दिवस उशीरा येऊन तुला पहाणार आहे
पण काय करु मलाच धीर निघत नाही आणि लवकर येऊन तुझी वाट पहातो
आजकाल तुझी वाट पहाणे हाच माझा विरंगुळा आहे
तु आलीस की लगेच निघून जातेस
ऐन भगभगत्या उन्हाळ्यात एखादा चुकार ढग सूर्यासमोर येऊन क्षण दोन क्षण सावली देऊन जावा तसं असतं तुझं येणं आणि जाणं
येण्याआधी येण्याची वाट पहाणं आणि गेल्यावर आठवणी कुरवाळणं
कधी तरी पाऊस पडेल या आशेवर काहीलीची तगमग कमी होते
पण बरसशील तर पावसाळ्याच्या पावसासारखी तृप्त कर
वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण तगमग अजूनच वाढते.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5169
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुक्तक आवडल
खुप
छान लिहिले आहे. आवडले..:)
मुक्तक फळलं हो....
वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण
वाह !
सुंदर!!!
छानच!
वाहव्वा! वाहव्वा! वाहव्वा!
मस्त !! आवडलं ..
झेपायच्या पलीकडले....
उलटा धक्का .....
नाना! नाना!! नाना!!!
सुरूवात वाचून
कधी समुद्रावर उगवणारा चंद्र
नान्या हल्ली चैनैला असतो
In reply to कधी समुद्रावर उगवणारा चंद्र by विजुभाऊ
-
In reply to कधी समुद्रावर उगवणारा चंद्र by विजुभाऊ
मस्त!
सुंदर!!
झक्कास
!
अत्यंत अश्लील प्रतिसाद.
In reply to ! by श्रावण मोडक
मस्त मस्त!
सुंदर
मुक्तक आवडल
सुंदर.
मस्तच..
नानाश्री, कधी चंद्र घरी आणून पाहा
In reply to मस्तच.. by टुकुल
सुरेख!
सुरेख मुक्तक !!
मस्तच
छान.
मस्त च रे नान्या !! पुन्हा
वेळ झाली भर
छान
आवडलं मुक्तक.
मस्त मस्त
व्वा..