Skip to main content

तगमग

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 14/06/2012 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस? अलगद लाटांवर स्वार होत त्याचे पाउल पडतांना दिसते हळू हळू चंद्र वर वर सरकत जातो... टक लावून पाहिले तर असे वाटते की जणू लाटाच त्याला ह्ळू हळू आकाशात ढकलत आहेत मग हलकेच तो वर वर सरकत जातो पिवळसर फिकट दिसणारा मग सतेज कांतीने न्हाऊन निघतो आणि आनंदाने लाटा चित्कार करु लागतात डूलत डूलत चंद्र वर आकाशात येऊ लागतो आणि मग सरळ किनार्‍यावर बसल्या बसल्या त्याला पहाता येत नाही हलकेच आपण मागच्या मागे लवंडतो आणि केवळ एकटक त्याच्याकडे पाहू लागतो तो पण आपल्याकडे पहात असतो त्याला काही तरी सांगायचे असते असेच नेहमी वाटते पण तो काय सांगतो हे कळत नाही कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस? नसशील पाहिला तर बघ ... एकदा तरी बघ कधी चंद्र नसला की त्याची वाट पहाणार्‍या चांदण्या दिसतात जणू काही त्याच्या स्वागतासाठी नटून थटून त्या येतात आपल्या इवल्याशा डोळ्यांनी भिरीभिरी इकडे तिकडे बघत डोळे मिचकवत त्या चंद्राला शोधत असतात बराच वेळ झाला तरी तो येत नाही मग फिकट चेहर्‍याने त्या हळूच पश्चिमेकडे निघून जातात कुठे जातात ग त्या? कधी तू पाहीले आहेस? कधी शोधले आहेस? मी खूप दिवसांपासून तुला विचारणार विचारणार म्हणून मनात प्रश्न जुळवत होतो मी नसलो की तु पण अशीच वागतेस का? एक दिवस उशीरा येऊन तुला पहाणार आहे पण काय करु मलाच धीर निघत नाही आणि लवकर येऊन तुझी वाट पहातो आजकाल तुझी वाट पहाणे हाच माझा विरंगुळा आहे तु आलीस की लगेच निघून जातेस ऐन भगभगत्या उन्हाळ्यात एखादा चुकार ढग सूर्यासमोर येऊन क्षण दोन क्षण सावली देऊन जावा तसं असतं तुझं येणं आणि जाणं येण्याआधी येण्याची वाट पहाणं आणि गेल्यावर आठवणी कुरवाळणं कधी तरी पाऊस पडेल या आशेवर काहीलीची तगमग कमी होते पण बरसशील तर पावसाळ्याच्या पावसासारखी तृप्त कर वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण तगमग अजूनच वाढते.
लेखनविषय:

वाचने 5169
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

खुप आवडलं! सुंदर आहे!! ऐन भगभगत्या उन्हाळ्यात एखादा चुकार ढग सूर्यासमोर येऊन क्षण दोन क्षण सावली देऊन जावा तसं असतं तुझं येणं आणि जाणं येण्याआधी येण्याची वाट पहाणं आणि गेल्यावर आठवणी कुरवाळणं कधी तरी पाऊस पडेल या आशेवर काहीलीची तगमग कमी होते पण बरसशील तर पावसाळ्याच्या पावसासारखी तृप्त कर वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण तगमग अजूनच वाढते. हे खासच! :)

नाना चेंगटांनी मुलींना खूश केलेल दिसते मुक्तकातून... ... सही है लगे रहो.

वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण तगमग अजूनच वाढते.
हे बाकी १००% खरंय रे नान्स. बाकी मुक्तक नेहमी प्रमाणेच चान चान. :)

नानबा खासच लिहिले आहे रे अगदी. खूप आवडले.

छानच!

सुखद अपेक्षा भंग . गद्य लिहिता लिहिता कवितेचा काठ गाठणारे.जबरदस्त आवडले आहे.

कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस? पष्चिम भारतात सूर्य आणि चंद्र हे डोंगरा आडून उगवतात व समुद्रात मावळतात. नान्या भूगोल सुधार रे............

परत परत वाचावे असे झाले आहे.

!

संध्येच्या खिडकीत येऊनी ही हसरी तारा हळूच पाहते खुणावते ही या या कोणाला? :)

सुंदर.

मस्तच रे नानुडी. --टुकुल.

मुक्तक आवडलं!!

नाना तगमग पोचली. छान.

छान.

वेळ झाली भर माध्यान्ही माथ्यावर तळपे उन्ह नको जाउ कोमेजुन माझ्या प्रितीच्या फुला माझ्या प्रितीच्या फुला॥

आवडलं ! अमृत

त्याला काही तरी सांगायचे असते असेच नेहमी वाटते पण तो काय सांगतो हे कळत नाही>> ... हे असे चेंगटपणामुळे होत असावं का बरं?? :P

मुक्तक आवडले, स्वाती