Skip to main content

निराकार

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 10/06/2012 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आलो वेस ओलांडून देह जन्म त्वा वाहून आले गेले निरोपाचे रोप अंगणी लावून करू पाहिला संसार ऐहिकाचा मुका मार पळ पळालो बेजार नाही फिटला अंधार रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार जळू गेली माया काया छेडली अंगी शततार राहिल्या न पडदे भिंती दिसू लागले त्या पार क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास .........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1220
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

छान

मस्त रचना. आवडली.

In reply to by कवितानागेश

...................... विना पाश सुटे मोकळे आकाश श्वासांविना निराकार झिंग ही सुगंधी अवस्था ध्रुवापाशी (अढळ) राहू देत. (पुन्हा जन्म मरणाच्या फेर्‍यात अडकवू नकोस) अशी याचना आहे ती......... .............................अज्ञात :)

शांतरसातली ही रचना आवडली.
रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार
हे अगदी ओळखीचं वाटलं.