Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अज्ञातकुल on Sun, 06/10/2012 - 17:27
आलो वेस ओलांडून देह जन्म त्वा वाहून आले गेले निरोपाचे रोप अंगणी लावून करू पाहिला संसार ऐहिकाचा मुका मार पळ पळालो बेजार नाही फिटला अंधार रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार जळू गेली माया काया छेडली अंगी शततार राहिल्या न पडदे भिंती दिसू लागले त्या पार क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास .........................अज्ञात

Submitted by निवेदिता-ताई on Sun, 06/10/2012 - 19:14

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Mon, 06/11/2012 - 16:37

Permalink

मस्त!!

मस्त रचना. आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 06/11/2012 - 17:29

Permalink

राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी

राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास ही ओळ कळली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अज्ञातकुल on Mon, 06/11/2012 - 18:23

In reply to राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी by कवितानागेश

Permalink

...................... विना

...................... विना पाश सुटे मोकळे आकाश श्वासांविना निराकार झिंग ही सुगंधी अवस्था ध्रुवापाशी (अढळ) राहू देत. (पुन्हा जन्म मरणाच्या फेर्‍यात अडकवू नकोस) अशी याचना आहे ती......... .............................अज्ञात :)
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Mon, 06/11/2012 - 17:51

Permalink

छान.

शांतरसातली ही रचना आवडली.
रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार
हे अगदी ओळखीचं वाटलं.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1214 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com