Skip to main content

फ्लोरा , फोटो, फोकस - भाग ४ व शेवटचा- इतर मानकरी

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 08/06/2012 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा सदस्य हो , खरे तर उच्च दर्जाचा कॅमेरा ( अति उच्च नव्हे) आता सर्वसामान्यांच्या हातात येणे अवघड नाही. मॅक्क्रो मोड व मॅन्युअल मोड आता बर्‍याच कॅमेर्‍यात मिळतात हे त्याचे कारण आहे. सकाळी आठ ते सायंकाळी ५ या वेळेतच एकेकाळी फोटो काढता येत असत. यातून प्रगती होत होत आता ६४०० चे आय एस ओ सेटींग असलेले कॅमेरे आल्यामुळे काहीशा नॉईज ( टिपके टिपके ) असलेले का होईना फोटो अंधारात काढता येतात. काही दिवसानी हा नॉईज पूर्णपणे घालविणारे सॉफ्टवेअर पण येऊ शकेल. पण आता एखाद्या माणसाने तांत्रिक रित्या फोटो उत्तम काढले तरी त्याचे आकर्षण संपत जाईल .कारण सर्वच जणांना असे फोटो काढता येतील. आगामी काळात फोटो तील विषयांच्या कल्पकतेला महत्व राहील यात मात्र शंका नाही. तेच फोटोग्राफरचे वेगळेपण ठरणार आहे. आपण गेर्ले तीन भागास प्रतिसाद दिल्याबद्दल प्रतिसादकांचे मनः पूर्वक आभार . उरलेले मानकरी फोटो खालील प्रमाणे- मुन्नार केरळ राज्य मुन्नार अल्लेप्पी ब्लू लॅगून मुन्नार ते पेरीयार घाट्- वेलदोडयाचे रोपटे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5205
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सलाम तुमच्या फोटोग्राफीला. हा शेवटचा भाग फारच हूरहूर लावून जात आहे.

>>>>आगामी काळात फोटो तील विषयांच्या कल्पकतेला महत्व राहील यात मात्र शंका नाही. तेच फोटोग्राफरचे वेगळेपण ठरणार आहे. १००० वेळा सहमत. केमेरा महत्वाचा नसुन त्या मागिल डोळा (नजर) महत्वाचा असतो फोटो क्र.२ व ३ आवडले

In reply to by jaypal

असेच म्हणतो

डोळे निवलेत. या सर्व फोटोंचे श्रेय तुमच्या सौंदर्य दृष्टीला. अमृत