रत्नांच्या बघ राशी झाल्या,
माझ्या काचखड्यांच्या
काटे भरल्या वाट होती ,
मखमल पायघड्यांच्या
ओले हिरवे झाले माझे,
मौसम निष्पर्णाचे
निळे जांभळे फ़ूल श्रावणी,
देही गोकर्णाचे
तुझ्यासोबती वाटा सार्या,
यमनामधले गाणे
घमघमणार्या सुरावटींशी,
नाते लोभसवाणे
रोमरोमी भिजते मीही,
हळवा श्रावण दे
ओघळते मी प्राजक्तासम,
भिजलं अंगण दे
उधाणू दे ना सागरलाटा,
तुझ्या किनार्यावरी
तुझी पौर्णिमा होऊन आले,
तुझ्याच मी अंबरी
-प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2413
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
@तुझी पौर्णिमा होऊन
छान आहे कविता
प्राजुने तिचा आयडी काय
प्राजुने तिचा आयडी काय
"रत्नांच्या बघ राशी
फारशी आवडली नाही .. काही
छान...
छान ! ! !
प्राजु ताई!!!.. आय लव्ह यु!