✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रत्नांच्या बघ राशी झाल्या..

प — प्राजु, Tue, 06/05/2012 - 23:42
रत्नांच्या बघ राशी झाल्या, माझ्या काचखड्यांच्या काटे भरल्या वाट होती , मखमल पायघड्यांच्या ओले हिरवे झाले माझे, मौसम निष्पर्णाचे निळे जांभळे फ़ूल श्रावणी, देही गोकर्णाचे तुझ्यासोबती वाटा सार्‍या, यमनामधले गाणे घमघमणार्‍या सुरावटींशी, नाते लोभसवाणे रोमरोमी भिजते मीही, हळवा श्रावण दे ओघळते मी प्राजक्तासम, भिजलं अंगण दे उधाणू दे ना सागरलाटा, तुझ्या किनार्‍यावरी तुझी पौर्णिमा होऊन आले, तुझ्याच मी अंबरी -प्राजु

प्रतिक्रिया द्या
2395 वाचन

💬 प्रतिसाद (9)

@तुझी पौर्णिमा होऊन

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/05/2012 - 23:57 नवीन
@तुझी पौर्णिमा होऊन आले, तुझ्याच मी अंबरी >>> मस्त :-) शेवट भावला.
  • Log in or register to post comments

छान आहे कविता

अक्षया
Wed, 06/06/2012 - 09:47 नवीन
छान आहे कविता :)
  • Log in or register to post comments

प्राजुने तिचा आयडी काय

नाना चेंगट
Wed, 06/06/2012 - 15:28 नवीन
प्राजुने तिचा आयडी काय वापरायला दिला आहे का कुणाला? प्राजु या नावाला साजेशी कविता/काव्य नाही. नीट जमले नाही... काहितरी कमी पडले आहे
  • Log in or register to post comments

प्राजुने तिचा आयडी काय

नाना चेंगट
Wed, 06/06/2012 - 15:28 नवीन
प्राजुने तिचा आयडी काय वापरायला दिला आहे का कुणाला? प्राजु या नावाला साजेशी कविता/काव्य नाही. नीट जमले नाही... काहितरी कमी पडले आहे
  • Log in or register to post comments

"रत्नांच्या बघ राशी

शैलेन्द्र
Wed, 06/06/2012 - 16:46 नवीन
"रत्नांच्या बघ राशी झाल्या, माझ्या काचखड्यांच्या काटे भरल्या वाट होती , मखमल पायघड्यांच्या" छान.. आवडली कविता.. ("काटे भरल्या वाट होती".. "वाटा" असं म्हणायच होत का?)
  • Log in or register to post comments

फारशी आवडली नाही .. काही

जेनी...
Wed, 06/06/2012 - 19:20 नवीन
फारशी आवडली नाही .. काही ठिकाणी तर फक्त यमक जुळवायचा प्रयत्न केलाय अस वाटलं. राग नसावा . पू. ले. शु .
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
गुरुवार, 06/07/2012 - 17:34 नवीन
छान... :)
  • Log in or register to post comments

छान ! ! !

निरन्जन वहालेकर
गुरुवार, 06/07/2012 - 20:12 नवीन
छान ! ! ! आवडली कविता ! ! !
  • Log in or register to post comments

प्राजु ताई!!!.. आय लव्ह यु!

मृगनयनी
Fri, 06/08/2012 - 22:36 नवीन
प्राजु ताई!!!.. आय लव्ह यु! :)
ओले हिरवे झाले माझे, मौसम निष्पर्णाचे निळे जांभळे फ़ूल श्रावणी, देही गोकर्णाचे
उधाणू दे ना सागरलाटा, तुझ्या किनार्‍यावरी तुझी पौर्णिमा होऊन आले, तुझ्याच मी अंबरी
लवली... अप्रतिम!!!!!.... नशा आहे गं........ .. सूर्यास्तानंतर कातरवेळी सुंदर सन्धिप्रकाशात कोकणातल्या एखाद्या अस्पर्श सागरकिनार्‍यावर खूssssssप दिवसांनी भेटलेल्या आपल्या अतिप्रिय सख्याच्या हातात हात घालून त्याच्या खान्द्यावर डोके ठेवून ...समुद्राच्या लाटांशी स्पर्धा करू पाहणार्‍या डोळ्यांतल्या आसवांना वाट करून देताना.........नारळाच्या, केळीच्या बागांचा, सुरन्गी- जाईजुईचा मिश्र सुगन्ध नाकात भरून घेताना... ही वरची दोन कडवी खूपच्च प्रकर्षाने आठवतात.... तुझी पौर्णिमा होऊन आले... तुझ्याच मी अंबरी!!!..... सुपर्ब!!!... वाट लावते गं ही ओळ!!!.... :) आपल्या नश्वर आयुष्यानन्तरही आपले प्रेम शाश्वतच राहणार... याची खात्री वाटत राहते!! :) थॅन्क्स प्राजु ताई!! :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा