Skip to main content

पागोळी

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 06/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
घन; वेस ओलांडून आला सोनियाचा सण धुळवड आकाशात ऊर घगर भरून झरे रेशमाचं पोत सारे दारूण झाकून रोमरोम शहारून गाई अंकुरात धून थेंब थेंब फुटे वाळा वारा शकून पिऊन झिंग ओलेत्या मेघाची सय सय उधाणून सरे चातकाचे ऋण मोर माना उंचावून भिजलेल्या अंगणात मन पागोळी होऊन .........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1313
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मस्त ...वाचताना एक छानशी लहर उठुन गेली मनात जणु भावनेला कुणीतरी शब्दांच कोंदन करुन ओळीत सजवतय शब्दा शब्दावर अर्थाचा जो पागोटा आहे ,त्यान तो असा सावरलाय की वाटल मोत्यांची माळ नाजुक गळ्याचा श्रुंगार बनन्यासाठी आसुसली आहे .. मस्त ..मस्त ..मस्त ...

झिंग ओलेत्या मेघाची सय सय उधाणून सरे चातकाचे ऋण मोर माना उंचावून कविता खुप आवडली... लिहित रहा... वाचत आहे