घन; वेस ओलांडून
आला सोनियाचा सण
धुळवड आकाशात
ऊर घगर भरून
झरे रेशमाचं पोत
सारे दारूण झाकून
रोमरोम शहारून
गाई अंकुरात धून
थेंब थेंब फुटे वाळा
वारा शकून पिऊन
झिंग ओलेत्या मेघाची
सय सय उधाणून
सरे चातकाचे ऋण
मोर माना उंचावून
भिजलेल्या अंगणात
मन पागोळी होऊन
.........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1313
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख. आज सकाळीच पावसात चिंब
मस्त ...वाचताना एक छानशी लहर
मस्त