Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 12:01
Operations Research च्या पुस्तकातील एक वाक्य - Optimized utilization of resources is service to humanity. महानिर्मिती कंपनीचे (पूर्वीच्या मराविमचा एक तुकडा) घोषवाक्य - 'ऊर्जेची बचत हिच ऊर्जेची निर्मिती'. दैनंदिन जीवनात आपण सगळेच पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपापल्या परीने काही उपाय करीत असतो. यामुळे कधी कधी आपले व आपल्या लोकांचे / कंपनीचे पैसेही वाचत असतात. सन्माननीय मिपाकरांना विनंती आहे की आपण वापरत असलेल्या क्लुर्प्त्या / उपाय येथे सांगाव्यात जेणेकरून इतरांनाही नवे काही तरी करता येईल. माझी काही उदाहरणे. १. अत्यावश्यक गरजा सोडून छपाई न करणे - या द्वारे कागद, शाई, वीज यांची बचत होते. आजकालच्या भ्रमणध्वनी यंत्रामुळे हे काम अधिकच सोपे झालेले आहे. २. शक्य असतील तेवढी सर्व बिले जालावरील सुविधांद्वारे भरणे. रोख रक्कम व चेकचा कमीत कमी वापर करणे. ३. गाडीने कुठेही लांबवर जात असताना जमेल तेवढी कामे जसे की खरेदी व इतर काही यांचे एकत्रीकरण करणे. म्हणजे पुन्हा पुन्हा इंधन व वेळ वाया जात नाही. ४. शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - हा उपाय लोकसत्तेतील एका लेखात सुचविण्यात आला होता.कुकरची शिटी वाजली की जमलेला सगळा दाब वाफेवाटे बाहेर पडतो व दाब वाढण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होते. मला खात्री आहे की आपण याखेरीज बरेच काही करत असाल त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की या धाग्यावर त्याबाबत लिहून याबाबत अधिक जागृती कराल.
  • Log in or register to post comments
  • 36768 views

प्रतिक्रिया

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 06/04/2012 - 12:05

Permalink

उम्म्म्म्म

तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता?
टूकार भिकार लेखन शक्यतो डायरीतच लिहून काढतो.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळखोर on Tue, 06/05/2012 - 14:47

In reply to उम्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

हम्म!

हम्म! म्हणजे ऊर्जा बचतीसाठी कागद खर्ची घालायचा? काय हे? त्याऐवजी पाटी पेन्सिल वापरा कि हो!
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 06/04/2012 - 12:13

Permalink

मेणबत्त्या लाउन उर्जाबचत

मेणबत्त्या लाउन उर्जाबचत करतो.. वहीच्या ऐवजी कॉम्प्युटर वापरतो गाडीच्या ऐवजी सायकलवतो व्यायामाच्या निमित्ताने जिमात जाउन तिथेच आंघोळ उरकतो म्हणजे पाणिबचत होते अन्न शक्यतो कच्चेच खायचा प्रयत्न असतो त्याने -माझी उर्जाबचत, गॅसबचत, वेळबचत, झालंच तर पाणिबचत होते (भांडे घासावे लागत नैत ना!)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 06/04/2012 - 12:19

In reply to मेणबत्त्या लाउन उर्जाबचत by शिल्पा ब

Permalink

हम्म्म

वहीच्या ऐवजी कॉम्प्युटर वापरतो
ह्याने नक्की कसली उर्जा बचत होते म्हणे ? मी तर शक्यतो जेवायच्या वेळेला बिकांच्या घरी किंवा चिंतामणी काकांच्या घरी उगाच चक्कर मारतो. मस्त फुकटचे जेवायला मिळते. त्यामुळे माझी खूपच उर्जा बचत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 12:33

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

मस्त?

परा गुरुजी - गुस्ताखी माफ असावी. मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण केवळ एका प्राण्यासाठी (बैल) वापरले जाते. जेवण पोटभर, रुचकर, स्वादिष्ट असू शकते, मस्त नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 06/04/2012 - 13:03

In reply to मस्त? by श्रीरंग_जोशी

Permalink

>>मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण

>>मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण केवळ एका प्राण्यासाठी (बैल) वापरले जाते. कितीतरी कथाकवितांमध्ये हे विशेषण उत्फुल्ल,तरोताजा वैग्रे अर्थी वापरल्या गेले आहे तेदेखील लै आधीपासून. असा कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नै की जो असा निर्बंध लादतो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/05/2012 - 03:33

In reply to >>मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण by बॅटमॅन

Permalink

अंशतः सहमत

मान्य आहे असा कुठलाही कडक नियम नाहीये. 'मस्त' हे विशेषण हिंदी भाषेत सर्रास वापरले जाते. विशेषण म्हणून त्याचा वापर मराठीमध्ये गेल्या काही दशकांत सुरू झाला असावा. चि. वि. जोशी, ना. धो. ताम्हनकर अशा लेखकांच्या पुस्तकांत त्याचा वापर आढळत नाही. ढोबळ मानाने मस्त हा एक तत्सम शब्द आहे. (शुद्ध मराठीत) याचा वापर जरूर करावा परंतु शेवटचा पर्याय म्हणून. बाकी हे सर्व ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आनंद होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 06/04/2012 - 13:34

In reply to मस्त? by श्रीरंग_जोशी

Permalink

काय सांगता काय ?

मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण केवळ एका प्राण्यासाठी (बैल) वापरले जाते.
ते बहूदा 'मस्तवाल' असे आहे. :) असो... तुम्ही एकदम मस्त माणूस आहात बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 06/04/2012 - 14:26

In reply to काय सांगता काय ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

___/\___

___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 06/05/2012 - 00:08

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

आता वही न वापरल्याने वृक्षतोड

आता वही न वापरल्याने वृक्षतोड कमी होईल अन कॉम्युटर वापरल्याने पुढे सौर्यउर्जेवर चालणारे कॉम्प्युटर तयार करायला भाग पाडले जाईल ज्याने भरचपुर उर्जाबचत होईल..आम्हीपण भविष्यकालीन विचार करुन काम करतो म्हंटलं!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 06/05/2012 - 01:22

In reply to आता वही न वापरल्याने वृक्षतोड by शिल्पा ब

Permalink

भरचपुर....

भरचपुर उर्जाबचत होईल.. उर्जाबचतीची नविन पद्धत आहे की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/05/2012 - 03:36

In reply to भरचपुर.... by प्रभाकर पेठकर

Permalink

मुद्राराक्षसाचा विनोद...

भरपुर ऐवजी भरचपुर...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 06/05/2012 - 09:03

In reply to मुद्राराक्षसाचा विनोद... by श्रीरंग_जोशी

Permalink

नाही..

'भरपूर' नाही 'भरपूरच', असा तो शब्द असावा. (एक अंदाज).
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Mon, 06/04/2012 - 12:21

Permalink

सावधान सावधान

Image removed.Image removed. लेखातील आयटम नं.४ खुपच धोकादायक / प्रसंगी जेवावर बेतणारा ठरु शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 06/04/2012 - 12:27

In reply to सावधान सावधान by jaypal

Permalink

च्यायला !

श्री. जयपाल ह्यांचा हा प्रतिसाद अत्यंत अश्लील असल्याने ताबडतोब उडवल्या जावा. तसेच त्यांना समज देण्यात यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Mon, 06/04/2012 - 12:41

In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

ऑ भलतच काही तरी

काय बोलताय पराशेठ ? ते चिन्ह नकारात्मक क्रुती दर्शवीत. उदा. नो पार्कींग्,नो हाँकींग, नो एंट्री ई. तुम्हाला यात नेमक काय अश्लील वाटल ?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 06/04/2012 - 13:33

In reply to ऑ भलतच काही तरी by jaypal

Permalink

किती तो विनयशिलपणा

चिन्ह नाय बे.. शब्द शब्द !
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 12:27

Permalink

कसे काय?

शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - जेव्हाही शिटी वाजणार असे जाणवते तेव्हा मी शेगडीची ऊर्जा कमी करतो. १ - २ मिनिटांनी पुन्हा वाढवतो. केवळ भात शिजवायचा असेल तर याची २ आवर्तने पुरेशी ठरतात असा माझा अनुभव आहे. यात कसलाही धोका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Mon, 06/04/2012 - 12:43

In reply to कसे काय? by श्रीरंग_जोशी

Permalink

हेच

लेखात नमुद केल असतत तर गैर समज झाला नसता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 12:53

In reply to हेच by jaypal

Permalink

अवश्य

पुढल्या वेळी काळजी घेईन.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 06/04/2012 - 20:14

In reply to अवश्य by श्रीरंग_जोशी

Permalink

तुम्हाला उंदियो का काय तो

तुम्हाला उंदियो का काय तो पदार्थ करता येतो का ..? त्याला गॅस लागत नाही.. मड्क्यात काय शिजवायच आहे ते भरायच अन मड्क मुंड्क बांधुन खड्डयात घालायच नंतर खड्डा बुजवुन वरुन काट्क्या जाळायच्या त्या खड्ड्यावर्.गॅस पन वाचतो अन कचरा पण जळ्तो .हाय काय अन नाय काय. झाली कि नाय उर्जा बचत...? :) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/05/2012 - 03:39

In reply to तुम्हाला उंदियो का काय तो by पक पक पक

Permalink

नाही करता येत

पाककृतीमध्ये छायाचित्रांसह प्रकाशित करा की राव...
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/05/2012 - 20:28

In reply to नाही करता येत by श्रीरंग_जोशी

Permalink

कूकरची शिट्टीच का काढून नाही ठेवत ?

कूकरची शिट्टीच का काढून नाही ठेवत ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/05/2012 - 20:44

In reply to कूकरची शिट्टीच का काढून नाही ठेवत ? by सूड

Permalink

कारण की...

त्यात (शिटी न काढता वाजू न देण्यात) जे शेंशेषन हाये ते ह्यात (शिटीच काढून टाकण्यात) आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 06/06/2012 - 09:22

In reply to कारण की... by श्रीरंग_जोशी

Permalink

शिटी न होऊ देता सुद्धा भात

शिटी न होऊ देता सुद्धा भात शिजवता येतो . शिटी होत असतानाच गॅस बंद करायचा ..वाफेवर शिजतो मस्त. माझी आज्जी तर चुलितल्या विस्तवावर चहा करणे ,दुध गरम करणे , तसच चुलिच्या दुसर्या भागावर .अलिकडच्या विस्तवाच्या धगीवर पाणि तापवने असली कामं करुन टाकायची .कितितरीच उर्जा वाचायची अश्याने .
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 06/07/2012 - 09:08

In reply to शिटी न होऊ देता सुद्धा भात by जेनी...

Permalink

>>>चुलिच्या दुसर्या भागावर

>>>चुलिच्या दुसर्या भागावर वैल म्हणतात त्याला!
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 06/05/2012 - 09:48

In reply to तुम्हाला उंदियो का काय तो by पक पक पक

Permalink

आज घरी जाउन, फरशी फोडून, एक

आज घरी जाउन, फरशी फोडून, एक खड्डा करीन म्हणतो
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Mon, 06/04/2012 - 12:41

Permalink

@ श्रीरंग_जोशी शिटी न होवू

@ श्रीरंग_जोशी शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - जेव्हाही शिटी वाजणार असे जाणवते तेव्हा मी शेगडीची ऊर्जा कमी करतो. १ - २ मिनिटांनी पुन्हा वाढवतो. केवळ भात शिजवायचा असेल तर याची २ आवर्तने पुरेशी ठरतात असा माझा अनुभव आहे. यात कसलाही धोका नाही. अजुन एक आय्ड्या सान्ग्ते भाताबरोबर कुकरमध्ये डाळही लावत जा, बओर्बर काहि भाज्या शिज्वयाच्या असतील तर त्या ही लावत जा अजुन उर्जा बचत होइल ..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 12:46

In reply to @ श्रीरंग_जोशी शिटी न होवू by पियुशा

Permalink

आभार..

हो हो नक्कीच भाताबरोबर इतरही पदार्थ मी शक्य / गरज असेल तेव्हा शिजवत असतो. माझ्या काही मित्रांनी भात सरळ मायक्रोवेव्ह मध्ये शिजवायला सुचविले आहे माझ्यामते त्यात ऊर्जा व वेळ अधिक खर्च होतो. आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Mon, 06/04/2012 - 12:55

In reply to आभार.. by श्रीरंग_जोशी

Permalink

माझ्या काही मित्रांनी भात सरळ

माझ्या काही मित्रांनी भात सरळ मायक्रोवेव्ह मध्ये शिजवायला सुचविले आहे माझ्यामते त्यात ऊर्जा व वेळ अधिक खर्च होतो. आपले काय मत आहे? त्याने विजेची बचत नै होत तुम्ही कुकरच वापरा ते चांगले ऑप्शन आहे :) बादवे तुम्ही हापिसला कसे जाता ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 12:59

In reply to माझ्या काही मित्रांनी भात सरळ by पियुशा

Permalink

हापिसला पायी जातो.

सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर हापिसापासून जवळच आहे. पाऊस किंवा बर्फ पडत असल्यास गाडी नेतो. काही वर्षांपूर्वी सायकल सुद्धा वापरली आहे हापिसात जाण्यासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 06/04/2012 - 20:02

In reply to हापिसला पायी जातो. by श्रीरंग_जोशी

Permalink

सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर

सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर हापिसापासून जवळच आहे. पाऊस किंवा बर्फ पडत असल्यास गाडी नेतो. अच्छा ,म्हण्जे आपण बाहेर देशी राहता तर ....? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 06/04/2012 - 23:17

In reply to सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर by पक पक पक

Permalink

सिमला किंवा काश्मीर

सिमला किंवा काश्मीर मध्ये रहात असतील की ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 23:44

In reply to सिमला किंवा काश्मीर by शुचि

Permalink

सध्या परदेशी वास्तव्य आहे

हो, सध्या माझे वास्तव्य अमेरिकेत आहे. भारतातील लोक उर्जाबचतीबाबत अमेरिकनांपेक्षा नक्कीच पुढे आहेत असे माझे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 06/04/2012 - 23:56

In reply to सध्या परदेशी वास्तव्य आहे by श्रीरंग_जोशी

Permalink

उर्जाच नै तर बचत ऑपॉप होतेय!!

उर्जाच नै तर बचत ऑपॉप होतेय!!
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Fri, 04/12/2013 - 17:28

In reply to उर्जाच नै तर बचत ऑपॉप होतेय!! by शिल्पा ब

Permalink

+१ लोड शेडींग

लोड शेडींग उर्जाच नै तर बचत ऑपॉप होतेय!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Fri, 04/12/2013 - 17:10

In reply to माझ्या काही मित्रांनी भात सरळ by पियुशा

Permalink

इंडक्शन कोइल

वापरा
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/04/2012 - 12:45

Permalink

वेगवेगळ्या प्रकारच्या

वेगवेगळ्या प्रकारच्या उर्जाबचतीसाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. आपणास कोणत्या प्रकारची उर्जाबचत अपेक्षित आहे हे कळल्यास उत्तर देणे सोपे होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/04/2012 - 12:49

In reply to वेगवेगळ्या प्रकारच्या by सूड

Permalink

दैंनंदिन जीवनातील

दैंनंदिन जीवनातील विविध आवश्यक कामे करताना शक्य असणारी उर्जा बचत यावरील उपाय हवे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 06/04/2012 - 20:07

In reply to दैंनंदिन जीवनातील by श्रीरंग_जोशी

Permalink

उन्हाळ्यात पंखा अथवा एअर

उन्हाळ्यात पंखा अथवा एअर कंडिशन लावण्या एवजी स्वतः भोवती गरागरा फिरा,थंड वाटेल व चक्कर येउन झोप देखिल लागेल. :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/05/2012 - 03:53

In reply to उन्हाळ्यात पंखा अथवा एअर by पक पक पक

Permalink

असहमत

हे जरा अतीच होताय असे वाटत नाही का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 06/04/2012 - 13:05

Permalink

दैंनंदिन जीवनातील विविध

दैंनंदिन जीवनातील विविध आवश्यक कामे करताना >>> मास्तरांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत .... बाकी जोशीसाहेब ....अतिशय उच्चकोटीचा वैचारिक प्रश्न आहे...तो आज वटपौर्णीमेच्या दिवशी आपण धाग्यारूपी गुंडाळल्याने त्याला चार चांद लागले आहेत ...बाकीचे चांद बिर्याणी खायला गेले आहेत...बिर्याणी व्हेज आणि नॉन व्हेज स्वरुपात मिळते....व्हेज बिर्याणी मध्ये हाटिलात हल्ली फक्त फ्लावर आणि गाजरं जास्त टाकतात....गाजर हा अतिशय हेल्दी पदार्थ आहे ...पदार्थ विज्ञानात मला गती नाही....गती ही हिरो होन्डा ला चांगली आहे...हिरो हा जॅकी श्रॉफ चा पिक्चर आहे...जॅकी श्रॉफ हा अशोक श्रॉफ ..आपल हे... सराफ चा भाउ असावा ...भाऊ चा रोल सत्या मध्ये चांगला झाला आहे ....सत्या हा माझ्या कंपनी मध्ये काम करतो... तो एकटा रहात असल्याने स्वता: कुकर मध्ये स्वयंपाक करतो ...हि झाली उर्जा बचत ...बचत खाते हे सर्व बँकामध्ये उपलब्ध आहे ...बँका मध्ये हल्ली खुप गैरव्यवहार चालतो....गैरव्यवहार ही तर आजकालची पध्दत झाली आहे...मिपावर डायरी लिहायची पण पध्दत झाली आहे... धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 06/04/2012 - 13:28

In reply to दैंनंदिन जीवनातील विविध by सुहास..

Permalink

सुहास.. तुम्हाला इंटरवेन्शन

सुहास.. तुम्हाला इंटरवेन्शन का काय म्हणतात त्याची गरज आहे असे वाटते. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 06/04/2012 - 13:29

In reply to सुहास.. तुम्हाला इंटरवेन्शन by नाना चेंगट

Permalink

व्वोक्के !

व्वोक्के !
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 06/04/2012 - 13:50

In reply to दैंनंदिन जीवनातील विविध by सुहास..

Permalink

@ सुहास, अफलातून!

>....अतिशय उच्चकोटीचा वैचारिक प्रश्न आहे...तो आज वटपौर्णीमेच्या दिवशी आपण धाग्यारूपी गुंडाळल्याने त्याला चार चांद लागले आहेत . = दे ढील... इथे हापसायला बरेच आहेत लेखकानं चेसुगुची उणीव भरून काढली आहे हे मात्र नक्की!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/05/2012 - 03:58

In reply to @ सुहास, अफलातून! by संजय क्षीरसागर

Permalink

आभार

धन्यवाद संजयजी. चेसुगू यांच्या लेखनाचा मीही चाहता आहे. परंतु त्यांची उणीव भरून काढण्याची माझी योग्यता नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 06/05/2012 - 04:01

In reply to आभार by श्रीरंग_जोशी

Permalink

चेसुगू यांच्या लेखनाचा मीही

चेसुगू यांच्या लेखनाचा मीही चाहता आहे. परंतु त्यांची उणीव भरून काढण्याची माझी योग्यता नक्कीच नाही. >>> =)) =)) =)) हार्ट अटॅक चा अनुभव आला !!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/05/2012 - 17:38

In reply to आभार by श्रीरंग_जोशी

Permalink

एक पाऊल पुढे

>>परंतु त्यांची उणीव भरून काढण्याची माझी योग्यता नक्कीच नाही. खरंच !! तुम्ही त्यांच्याही एक पाऊल पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या लेखनाचा गप्पकन पंखा होऊन जावंसं वाटायलंय बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/05/2012 - 03:41

In reply to दैंनंदिन जीवनातील विविध by सुहास..

Permalink

जबरी....

सरकणाऱ्या विपत्रांतील माझा आवडता प्राणी - गाय हा निबंध आठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 06/04/2012 - 13:27

Permalink

आम्ही उर्जा बचतीसाठी काहीही

आम्ही उर्जा बचतीसाठी काहीही करत नाही. कसे आहे आम्ही आपले जीव तोडून घरातले बल्ब हवे तेव्हा हवे तेवढेच लावणार, गाडीच्या ऐवजी शक्य असेल तिथे सायकल वापरणार, वगैरे वगैरे ! पण मॉलमधे ढाणढाण वीज जाळली जाणार, कार्पोरेटमधे सूर्यप्रकाश अडवून मोठमोठे लाईट लावले जाणार, बिनकामाचे पेट्रोल, डीझेल जाळले जाणार. बर हे कमी काय म्हणून जगाचे गुर्जीपणा आपल्याच कडे असल्याच्या आविर्भावात असलेली अम्रिका दनादन बॉम्ब टा़कणार, जाळपोळ करणार, उर्जा प्रचंड प्रमाणात खर्च करणार. मग मी आणि माझ्यासारख्यांनी वाचवलेल्या *टभर उर्जेने काय बचत होणार? ऑ !! सांगा तुम्ही !!!! त्यापेक्षा संपवून टा़कू एकदाचे आणि जाउ अश्मयुगात !!! किंवा संपलंच सगळं तर निदान नवे तरी पटकन शोधले जाईल !! नाही का? :) असो :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com