Skip to main content

तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता?

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 04/06/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
Operations Research च्या पुस्तकातील एक वाक्य - Optimized utilization of resources is service to humanity. महानिर्मिती कंपनीचे (पूर्वीच्या मराविमचा एक तुकडा) घोषवाक्य - 'ऊर्जेची बचत हिच ऊर्जेची निर्मिती'. दैनंदिन जीवनात आपण सगळेच पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपापल्या परीने काही उपाय करीत असतो. यामुळे कधी कधी आपले व आपल्या लोकांचे / कंपनीचे पैसेही वाचत असतात. सन्माननीय मिपाकरांना विनंती आहे की आपण वापरत असलेल्या क्लुर्प्त्या / उपाय येथे सांगाव्यात जेणेकरून इतरांनाही नवे काही तरी करता येईल. माझी काही उदाहरणे. १. अत्यावश्यक गरजा सोडून छपाई न करणे - या द्वारे कागद, शाई, वीज यांची बचत होते. आजकालच्या भ्रमणध्वनी यंत्रामुळे हे काम अधिकच सोपे झालेले आहे. २. शक्य असतील तेवढी सर्व बिले जालावरील सुविधांद्वारे भरणे. रोख रक्कम व चेकचा कमीत कमी वापर करणे. ३. गाडीने कुठेही लांबवर जात असताना जमेल तेवढी कामे जसे की खरेदी व इतर काही यांचे एकत्रीकरण करणे. म्हणजे पुन्हा पुन्हा इंधन व वेळ वाया जात नाही. ४. शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - हा उपाय लोकसत्तेतील एका लेखात सुचविण्यात आला होता.कुकरची शिटी वाजली की जमलेला सगळा दाब वाफेवाटे बाहेर पडतो व दाब वाढण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होते. मला खात्री आहे की आपण याखेरीज बरेच काही करत असाल त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की या धाग्यावर त्याबाबत लिहून याबाबत अधिक जागृती कराल.

वाचने 36833
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

In reply to by सस्नेह

>>>> कुठे रानात्-शेतात राहता की काय प्राध्यापकसाहेब ? तालुक्याच्या गावी राहतो म्याडम. माझ्याच तालुक्यातल्या माझ्या मामाच्या गावी शेतात बारा तासाचं लोडशेडींग आहे. महावितरणाचं काय धोरण असेल ते असेल पण आम्ही मात्र शासनाचा हा 'भार' नियमनाचा त्रास सहन करतोय. तुम्हाला म्हणून सांगतो म्याडम, उन्हाळ्यात सकाळी सकाळी चांगली झोप लागते हे महावितरणवाले मेले सकाळी साडेपाचला वीज घालवतात. दुपारी अधनं-मधनं जमेल तसं बटनं बंद करतात. सायंकाळी पुन्हा साडेसहाला भिडतात ते थेट रात्री दहाला वीज सोडतात. आता अजून काय परवड सांगायची. >>>> आमच्याकडे तर ब्वा आठवड्यातून सात तास असते लोड शेडिंग . असतं म्याडम, एकेकाचं पूर्वजन्मीचं पूण्य. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>असतं म्याडम, एकेकाचं पूर्वजन्मीचं पूण्य. मागच्या जन्माचं कुणी बघितलंय प्राध्यापकसाहेब, या जन्मीच एक पुण्य करुन टाका ! कोल्हापूर, सांगली नाहीतर इचलकरंजीत एक घर घेऊन टाका ! २३ तास वीज ! (निदान सद्या तरी ! पुढेमागे वीजहानी वाढली तर नो ग्यारंटी !)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तालुकाच काय, जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा दिवसाला ७-७ तास लोड शेडिंग असतं. सकाळी ३.५ तास आणि दुपारी/संध्याकाळी ३.५ तास. ताईंचं खरंच पूर्वजन्मीचं पुण्य असावं महाराष्ट्रात राहून एवढी वीज मिळायला.

१. झोपणे (जास्तीत जास्त) - विजेचे दिवे, संगणक, टि.व्ही. ई. वर होणाऱ्या विजेची बचत २. आंघोळ न करणे - पाणी व ते पाणी चढवण्यासाठी मोटार ला लागणारी वीज वाचते ३. ऑफीस ला दांड्या मारणे - पेट्रोल ची बचत ४. फुकट बडबड न करणे - :P

एकाच उर्जेत दोन कामे केली कि आपोआप बचत होते.

In reply to by विनायक प्रभू

मास्तर तुमच्या डोक्यात 'जनप्रबोधना'चा एकच 'प्रोग्रॅम' असतो का कायम??????????

ऊर्जा वगैरे काही नसते. केवळ भास आहे तो. ;)

In reply to by नितिन थत्ते

भास असला तरी खास असतो.

विद्युत उर्जेचा बराचसा नाश हा Transmission करताना होतो. भारतात तो अदमासे २५% तर प्रगत देशात तो साधारण ६-७% आहे. वर अनेकांनी केलेल्या घरगुती सुचना वापरून फारतर वैयक्तिक वीज बील थोडे कमी करता येईल पण खरी उर्जाबचत करायची तर transmission अधिक efficient करणे हाच उपाय आहे. ओवर-हेड ऐवजी अंडर-ग्राऊंड ट्रान्स्मिशन सुरुवातील महाग पडले तरी अंतीमतः स्वस्त पडू शकेल कारण यात विजेचा नाश खूप कमी होतो. अर्थात हे सर्व उपाय वैयक्तिक पातळीवर करण्यासारखे नाहीत, तेव्हा माझा पास! थोडक्यात, लेखाच्या शीर्षकात उर्जाबचती ऐवजी वीज बील बचत असा बदल हवा होता.

In reply to by सुनील

आपण मांडलेल्या मताविषयी पूर्णपणे सहमत. शीर्षकातील ऊर्जा हा शब्द केवळ विजेसाठी वापरलेला नाहीये. दैनंदिन जीवनात जगण्यासाठी लागणाऱ्या अनेक संसाधनांना / प्रक्रियांना तो लागू आहे. तरीही हे शीर्षक सर्वसमावेशक नाहीये हे मान्य...!

In reply to by सुनील

खरंतर स्थानिक वीजनिर्मिती हा पर्याय उत्तम. टाकाऊ कचरा, सोलर, वारा वगैरे पासून वीज निर्मिती केल्यास खर्च वाचेल व स्वावलंबी खेडी बनतील.

In reply to by सुनील

transmission (पारेषण) पेक्षा distribution (वितरण ) मध्ये ऊर्जेचा जास्त नाश होतो. म्हणून तर 'महावितरण' ला 'मापं ' लावायचं (काढायचं नव्हे !) काम चालू आहे ना !

मी उर्जाबचतिसाठी शक्य तितक झोपुन घेते , कारण मी जागी राहिली तर लाईट पासुन ते गॅस , माइक्रोवेव पर्यंत सगळच वापरते हे सगळं टाळन्यासाठी मस्तपैकी झोपते ,अश्याने शरिरातली उर्जा सुद्धा वाचते ( कैच काम कराव लागत नै ) :D

योगायोगाने गेल्या २४ तासांपासून या धाग्यावर पर्यावरणाच्या जतनासाठी बरीच सर्वसमावेशक चर्चा सुरू आहे. सर्व मिपाकरांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरन्ग'जी... तुम्हासही पर्यावरणदिनाच्या मन्गलमय शुभेच्छा!! :) एक प्रश्नः- तुमचे लग्न झालेले आहे का? ... नसेल तर मग कदाचित तुमचा उर्जाबचतीचा प्रश्न लग्नानन्तर सुटू शकतो... कारण नक्की कुठली, कश्याची बचत कशी करावी... हे पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त कळते... :) किन्वा मग तुमच्या त्या सुकान्तेच्या सौभाग्यशाली पायगुणामुळे तुम्हांस इतकी भरभरून ऐश्वर्यप्राप्ती होईल... की कदाचित उर्जे' सारख्या छोट्या छोट्या ;) गोष्टींची बचत करण्याबद्दल तुम्हास विसरही पडेल!!!

In reply to by मृगनयनी

हो माझे लग्न झालेले आहे. काही व्हिसा कारणांनी बायकोला भारतात परत जावे लागले. नवा वर्क व्हिसा मिळून तिला काही महिन्यानि परत अमेरिकेला येता येईल अशी आशा आहे. आपल्या सदिच्छांबद्दल मनापासून आभारी आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अच्छा!! छान छान!... आपल्या सौभाग्यवती'स व्हिसा मिळाल्यावर कदाचित आपल्या उर्जाबचतीच्या समस्येचे आपोआप निराकरण होईल!!... :) गुड लक! :)

१ रात्री शक्यतो सर्व घरातल्या लोकानी एकाच खोलीत बसणे आणी बाकीचे दिवे बन्द ठेवणे. २ जी वीजेची उपकरणे वापरात नसतील त्यान्चा प्लग काढुन ठेवणे. ३ १ किलोमीटर अन्तरापर्यन्त चालत जाणे. ४ कामाची यादी करुन जास्तीत जास्त कामे १काच दिवशी करणे.

In reply to by जेनी...

असेल, कोजागिरीची रात्र असेल, किंवा काय घरात एखादं मेंबर वाढलं असेल अशातच, आपण कशाला नसत्या चवकशा करा. असो, तुम्हाला २०-२० मधुन इकडं क्सोटीत आलेलं पाहुन थोडं आश्चर्य वाटलं,.

पण ३१ किमी? कात्रजक - देहूरोड बाह्यवळण महामार्ग पार होईल की?

मी शक्यतो दात कोरून पोट भरत नाही व उर्जाबचतित खारीचा नाही तर मुंगीचा वाटा उचलत नाही . उगाच बारीक बारीक उपाय शोधून पार पाडण्यात जास्त उर्जा खर्च होते. प्रदीप

प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देण्याचा हट्ट टाळला तरी भरपूर उर्जा वाचेल.

Law of conservation of energy (मराठीत आठवत नाहीये). This states that energy can be neither created nor destroyed. However, energy can change forms, and energy can flow from one place to another. The total energy of an isolated system remains the same. कशाला काळजी ? झोपा सुखात!

In reply to by sagarpdy

"उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते हा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम आहे." (सौ. विकिपीडिया)

In reply to by ५० फक्त

हल्लीच सौ.एच्डिफसि सुद्धा ऐकलं होत> अहो हेच काय, सौ. लोकसभा आणि सौ. राज्यसभा असल्याचंही एकिवात आहे!

In reply to by हंस

'उर्जा अक्षय्यता' :-). माजी केंद्रीय मंत्री श्री. विलास मुत्तेमवारांच्या खात्याचे नाव 'अक्षय्य ऊर्जा मंत्रालय' (Ministry of New and Renewable Energy) आहे.त्यांच्या अखत्यारीत ते २ - ३ दा बदलण्यात आले. पूर्वी त्याचे नाव अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय (Ministry of Non-Conventional Energy Sources) असे होते. सध्याचे मंत्री आहेत श्री. फारूख अब्दुल्ला.

कों णी भरपूर वाटाणे, बटाटे वा तत्सम पदार्थ खा खा खाल्ले व त्यामुळे निघणारा गॅस साठवून तोच परत स्वयंपाकाला वापरला तर ' शून्य' उर्जेत घर चालू शकेल काय?

त्या गॅस ची कॅलोरीफिक वॅल्यू कमी असते. वासोफिक वॅल्यू मात्र जबरद्स्त.

एकेक प्रतिसाद वाचून भरपूर हसलो. वाचनखूण साठवण्याच्या योग्यतेचा धागा!

कृझ मोड मध्ये चालवल्याने कार तेवढ्याच इंधनात थोडे अधिक अंतर चालते. मात्र लांबच्या प्रवासात चालकाला झोप येत असल्यास कृझ मोडवर चालवणे अपघाताला आमंत्रण ठरू शकते.

सुर्यास्ता नंतर लवकर झोपावे आणि सुर्योदया नंतर उठावे.. म्हणजे भरपुर उर्जा वाचेल..

श्री जोशी,एक गोश्ट विचारावि असे वाट्ते,कि अमेरिकेत उर्जा बचती साठी काय उपाय केले जातात?, तसेच एल ई डी वापरुन किती फरक पड्तो,अमेरिकेत एल ई डी किति प्रमाणात वापरतात?

In reply to by अनिरुद्ध प

वर म्हंटल्याप्रमाणे भारतीय लोक उर्जाबचतीच्या बाबतीत अमेरिकन लोकांपेक्षा नक्कीच पुढे आहेत. कार्यालयाची वेळ संपल्यावरही आत चिटपाखरूही नसताना दिवे पूर्ण सुरू असल्याचे चित्र नेहमीच दिसते. मी माझ्या आयुष्यात काढल्या नसतील एवढ्या प्रिंट आउट्स काही लोक आठवडाभरात काढतात. इमेल मोठी असेल तर स्क्रीनवर वाचायला कंटाळा येतो म्हणून लगेच प्रिंट आउट काढतात. एल इ डी बल्ब बाबत विचारताय का?

होय म्हणजे एल ई डी बल्ब आणि ईतर एल ई डी तन्त्रज्ञान किती प्रमाणात वापरले जाते,कारण हे उर्जा बचतीचा मोठाच साठा आहे असे अभ्यासा वरुन आढळ्ले आहे परन्तु Investment Cost जास्त असल्याने भारतीय लोक टाळाटाळ करताना दिसतात.

In reply to by अनिरुद्ध प

एल इ डी बल्बच्या जाहिराती दिसतात कधी कधी. पण इथे सी एफ एल शिवाय जुन्या प्रकारचे बल्ब अजूनही बर्‍याच प्रमाणात वापरले जातात (येल्लो येल्लो डट्टी फेलो फेम ;-) ). एल इ डी दूरचित्रवाणिसंच मात्र इथे आघाडीवर आहेत. पण उर्जाबचतीपेक्षा नवे तंत्रज्ञान म्हणून त्याचा स्विकार अधिक होत असावा हे वरकरणी दिसते. हायब्रीड कार्स मात्र बर्‍यापैकी वापरल्या जातात कदाचित इंधनाचे दर गेल्या काही वर्षांत गगनाला भिडले म्हणूनही तसे केले जात असावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरे वाह वाह , किति चान चान गोश्टी आहेत हो तुमच्या अमेरिकेत आम्हाला अज़ून काही उक्तिचया गोश्टी सांगाच राव !!

In reply to by अनिरुद्ध प

LED lights could become network devices, too हा विषय इथे निघाला अन जालावर वरील लेख दिसला. रोचक तंत्रद्नान दिसत आहे (ब्लिंक करणारे एल इ डी दिवे वापरून डेटा ट्रान्समिशन व रिसिव्हल) . अर्थात त्याचा वापर करताना मर्यादाही आहेतच.