गेली साठ-सत्तर र्वष चाललेल्या डिर्टजंट वॉरचा आढावा घेतल्याशिवाय टिनोपालच्या कथेचा अध्याय वाचता येणार नाही. १९५९ साली हिंदुस्थान लिव्हरने सर्फ बाजारात आणले आणि बकेट वॉशची पद्धत सुरू झाली. स्वस्तिक केमिकल्सचा डेट नावाचा एक डिर्टजट ब्रँड सोडल्यास सर्फच्या स्पर्धेत कुणीच नव्हतं.
सत्तरीच्या दशकात निरमा नावाच्या ब्रँडने हिंदुस्थान लीव्हरची झोप उडवली. सर्फची शुभ्रतेची मक्तेदारी संपली. ‘दूध सी सफेदी निरमा से आये’ या ओळीनं सर्फचा ब्रँड रिकॉल संपवून टाकला.
ज्यावेळी सर्फ १२-१३ रुपये किलोने विकलं जायचं तेव्हा निरमाची किंमत तीन रुपये किलो होती. छायागीत आणि सोबत निरमाची जाहीरात. दृकश्राव्य माध्यमाची ती उगवती वर्षे होती. छायागीतच्या लोकप्रियतेचा संपूर्ण भरघोस फायदा निरमाला मिळाला. सर्फ गावखेड्यात पोहचत नवहतं पण निरमा तिथे पोहचलं. गावागावात निरमाची गाडी फिरायची . रोख पैसे द्या आणि माल घ्या अशी अट असूनही निरमाचा माल ताबडतोब खपायचा.
हिंदुस्थान लिव्हरने समजदार ललिताजींना (कविता चौधरी) आणलं. ‘अच्छी चीज और सस्ती चिज’ मुद्दा मांडून बघितला. व्हील नावाची नवीन वॉशिंग पावडर निरमाच्या स्पर्धेत आणली. ‘दूर हो जा मेरी नजरों से’ ही कॅम्पेन सुरू करून बघितली.
आज भारतात येऊन सर्फला ६० वर्ष होत आली, सर्फची जिंगल कुणालाच आठवत नाही, पण ‘वॉशिंग पावडर निरमा’ ही जिंगल आठवत नाही असं कुणीच नसेल.. निरमाला संपवण्यासाठी लीव्हरने स्लोगन्स आणि टॅग लाइनचे जे युद्ध सुरू केले ते आजही चालूच आहे.
आता तर स्पर्धकांची संख्या वाढली आहे. शुभ्रतेच्या या बाजारावर काबू करण्यासाठीची धडपड आता एका वेगळ्याच पातळीवर गेली आहे. उदाहरण टाइड या ब्रँडचे घ्या. इतर ब्रँडच्या तुलनेत हा तसा नवीन ब्रँड, पण गेल्या काही वर्षांत टाइडच्या मूळ फॉम्र्युलात कमीत कमी २० वेळा बदल करून बघण्यात आला.
इतकी सगळी धडपड कशासाठी, तर शुभ्र कपडय़ाचे स्वप्न विकायची हिस्सेदारी आपल्या वाटय़ास जास्तीत जास्त यावी म्हणून.
हीच मक्तेदारी काही वर्षांपूर्वी टिनोपालकडे होती. कपडे किती शुभ्र तर टिनोपालमध्ये धुतल्यासारखे. टिनोपाल त्यावेळचा शुभ्रतेचा मानदंड होता. जे पांढरेशुभ्र असेल ते टिनोपाल. टिनोपाल म्हणजे साबण किंवा वॉशिंग पावडर नव्हे. टिनोपाल म्हणजे ऑप्टिकल ब्राइटनर. त्याला फ्लुरोसंट व्हाइटनिंग एजंट हे दुसरे नाव आहे.
कपडा कितीही स्वच्छ धुतला तरी एक पिवळसर झाक राहते, ज्यामुळे शुभ्र पांढऱ्या रंगाचा परिणाम येत नाही, काही तरी कमी आहे असे वाटत राहते. पांढऱ्या रंगाचा झगमगाट दिसत नाही. हे न्यून पुरते करण्यासाठी ऑप्टिकल ब्राइटनरचा वापर केला जातो.
दुसरा पर्याय आहे ब्लिचिंग एजंट वापरण्याचा. त्यामुळे शुभ्रता येते खरी पण तात्पुरतीच. ब्लिचिंग ही रासायनिक प्रक्रिया असल्यामुळे कापड कमजोर होते आणि हळूहळू विरते.
ह्या खेरीज आणखी एक उपाय म्हणजे पिवळसर रंग झाकून टाकणे. ज्याला मास्किंग एजंट असेही म्हणतात. या मास्किंग एजंटपैकी आपल्याला परिचित म्हणजे नीळ. (एके काळी रॉबिन ब्ल्यू नावाचा एक ब्रँड लोकप्रिय होता.) निळीच्या निळसर परिणामाने पिवळट मळकट छटा कमी व्हायची, पण निळीच्या पाण्यात कपडे बुडवायचे तंत्र जमले नाही, तर पिवळ्या रंगासोबत निळे ढगही पांढऱ्या कापडावर दिसायला लागायचे.
टिनोपाल ह्या सगळ्यापेक्षा वेगळे तंत्र वापरते. ते कपडय़ाच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाच्या अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणांना शोषून त्याऐवजी चमकत्या निळ्या किरणांना परावर्तित करते. ह्या हलक्या निळ्या रंगाचा परिणाम मानवी डोळ्यांना झगमगत्या पांढऱ्या रंगासारखा दिसतो. ह्या पांढऱ्या रंगाला म्हणतात ‘टिनोपाल की सफेदी’.
हवाहवासा वाटणारा हा शुभ्र पांढरा रंग आणण्यासाठी फारशी खटपट करण्याची आवश्यकता नसायची. कपडे धुऊन झाले की बादलीभर पाण्यात दोन चमचे दाणेदार टिनोपाल घोळवून त्या पाण्यातून कपडे काढले की, कपडा झगमग चमकायला लागायचा. निळ्या रंगाची-पांढऱ्या झाकणाची टिनोपालची डबी घरात असणे हे घराच्या पुरोगामित्वाचे लक्षण समजले जायचे. भसकाभर साबणाची पावडर वापरून जी सफेदी यायची नाही, ती सफेदी टिनोपालच्या दोन चमच्यात मिळायची. अर्थात टिनोपालची किंमतही जास्त असल्यामुळे कमावत्या माणसांचे कपडे टिनोपालमध्ये आणि बाकीच्या कपडय़ांसाठी पाचशे एकचा बार असा भेदभावही केला जायचा.
माणसाची कमाई आणि कपडा - माणसाची ऐपत आणि कपडा - माणसाची इभ्रत आणि कपडा याची घट्ट सांगड कपडय़ाच्या शुभ्रतेशी जोडल्याने टिनोपालसारख्या ऑप्टिकल ब्राइटनरला पर्याय नव्हता. ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’चे मूल्य वाढले की, ऑप्टिकल ब्राइटनरची गरज वाढत जाते.
महात्माजी होते तोपर्यंत चळवळीला टिनोपालची गरज नव्हती. गांधी टोपीला कसलाच डाग नव्हता. त्यानंतरच्या काळात ज्यांना टोपी घालूनही उजळ माथ्यानं फिरायची पंचाईत होती त्यांच्या सोयीसाठी टिनोपालची सफेदी फारच गरजेची होती. त्यामुळे टिनोपाल पोलीटीकल स्टेट्स सिम्बॉल झाले. टिनोपालच्या एका धुलाईत कपडय़ावरचे मळके डाग लपायला लागले आणि हो गयी मली मोरी चुनरिया अशी हळहळ वाटणारे संत कालबाह्य झाले.
सिबा गायगी नावाच्या एका कंपनीचा हा ब्रँड आता बीएसएफ या रसायन कंपनीकडे आहे. फार पूर्वी लायसन्स संपल्यावर टिनोपालचं रानीपाल झालं.
सगळ्याच डिर्टजट पावडरमध्ये आता ऑप्टिकल ब्राइटनर असते, त्यामुळे टिनोपाल किंवा रानीपालची वेगळी अशी गरज संपली आहे.
टिनोपाल म्हणजे काय हे आता बऱ्याच जणांना आठवणारही नाही.टिनोपालचे अस्तित्व वेगळे राहिलेले नाही. काही कंपन्या रानीपाल नावानं अजूनही ऑप्टिकल ब्राइटनर विकतात, पण ते काही खरे नाही.
ज्या ब्रँडचा लोकाश्रय संपला तो ब्रँड मावळला.
मावळत्या ब्रँडला अधूनमधून आठवणींचे अर्घ्य द्यायचे.
ग्रेट ब्रँड्स डु नॉट डाय, दे जस्ट फेड अवे.
खरं सांगायचं झालं तर कपडय़ांमध्ये रंगभेद- रंगीत आणि पांढरे - असा फक्त कपडे धुवायला टाकताना करावा, पण हे तत्त्व समजताना काहीतरी गल्लत झाली आणि माणसांनी कपडय़ाच्या रंगाप्रमाणे माणसंच वेगळी केली.
हा व्हाइट कॉलर तर तो ब्ल्यू कॉलर. पांढरपेशे किंवा व्हाइट कॉलर आणि श्रमजीवी ब्ल्यू कॉलर. कायदा सगळ्यांना सारखाच पण व्हाइट कॉलर माणसांच्या मोर्चावर पोलीस छडीमार करायचे, तर ब्ल्यू कॉलरवाल्यांवर लाठीमार करायचे.
न्याय सगळ्यांना एकसारखा पण काही वेळा असं वाटतं की, आपल्याकडे दोन इंडियन पीनल कोड आहेत. एक आयपीसी व्हाइट आणि एक आयपीसी ब्ल्यू.
२००१ सालच्या मे महिन्यातील एका रात्रीची गोष्ट. जुहूच्या एका रस्त्यावर फरदीन खानला अटक करण्यात आली. झडती घेतल्यावर त्याच्या खिशातून काही ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. मुंबईच्या फिल्मी विश्वाला हादरवून टाकणारी ही बातमी बहुतेक सगळ्याच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापली गेली. चाहत्यांची गर्दी कोर्टात झाली. अपेक्षेप्रमाणे त्याची ताबडतोब जामिनावर सुटकाही झाली. खटला उभा राहण्यासाठी दहा र्वष लागली. गेल्या वर्षी २०११ साली फरदीनवरचे आरोपपत्र कोर्टासमोर आले. मामुली प्रमाणात अमली पदार्थ विकत घेण्याच्या आरोपाखाली खटला पुढे चालवण्यात आला. या वर्षी फरदीन मार्च महिन्यात कोर्टापुढे हजर झाला. कोर्टासमोर त्याने निवेदन दिले की, तो आता व्यसनमुक्त झाला आहे. कोर्टाने त्याचे निवेदन स्वीकारून कलम ६४ (अ) NDPS अॅक्ट १९८५ ची तरतूद वापरून या खटल्यातून अभय दिले आणि मुक्त केले.
अंमली पदार्थाची केस -दहा वर्षांनी कोर्टासमोर यावी - अकराव्या वर्षी त्यातून अभय मिळावे. सगळं काही सोयीचं- सुरळीत आणि सुटसुटीत.
ही बातमी वाचताना २०-२२ वर्षांपूर्वीची एक बातमी आठवली. मुंबईच्या एका मिल कामगाराची रात्रपाळी सुटल्यावर गेटवर झडती घेण्यात आली. त्याच्या खिशात पंधरा ग्राम टिनोपाल सापडले. त्याची रवानगी ताबडतोब पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी कोर्टात आणि कोर्टानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्या कामगाराची परिस्थिती जेमतेमच असल्याने सरकारतर्फे वकील मिळून खटला उभा राहायाला काही दिवस गेले. कोर्ट जामीन द्यायला तयार झाले, पण त्याचा जामीन कोणी देईना. सहा महिने तुरुंगात काढल्यावर खटला उभा राहिला आणि तीन महिन्यांची शिक्षा झाली.
अंमली पदार्थ बाळगले तर चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर अभय आणि १५ ग्राम टिनोपाल चोरलं तर सहा महिने जेलात.
आता तो कामगार कुठे असेल किंवा असेल की नाही काही माहिती नाही, पण असलाच कुठे तरी आणि फरदीनची केस त्यानं वाचली, तर एकच प्रश्न त्याच्या मनात उभा राहील, ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’
वाचने
33184
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त 'ऐतिहासिक' सुरुवात आणि
__/\__
+१
In reply to __/\__ by अर्धवटराव
भूतकाळात परत नेउन ठेवणारे
"अरे देवा साबण की हो विसरले
काय बोलायला शिल्लकच नाही!
+१
In reply to काय बोलायला शिल्लकच नाही! by बिपिन कार्यकर्ते
रामदास जी
हे धत्तड तत्तड धत्तड तत्तड!
In reply to रामदास जी by चौकटराजा
डोळे उघडा
In reply to हे धत्तड तत्तड धत्तड तत्तड! by प्यारे१
अहाहा.. नेहमीप्रमाणेच उत्तम
लेख आवडला.
+१
In reply to लेख आवडला. by विसुनाना
छान. आता पुढचा लेख पारले जी
रामदासकाकांचे लेख म्हणजे
काय करील साबण...
ब्रॅण्डेतिहासाच्या अंगाने
खुपच छान!शेवट तर एकदम twist!!
अंजन
+१
In reply to अंजन by श्रावण मोडक
नेहमीप्रमाणेच मस्त !! साबण
उसकी कमीज मेरी कमीज से सफेद
जुन्या स्मृती चाळल्या
खीक्क...
In reply to जुन्या स्मृती चाळल्या by पिंगू
जुन्या म्हणजे बालपणातल्या
In reply to खीक्क... by सोत्रि
अप्रतिम
खुपच छान लिखाण.... जुन्या
"ओह्हो दिपिकाजी , आईये आईये
In reply to खुपच छान लिखाण.... जुन्या by उदय के'सागर
काका, किती आठवणी ताज्या
डंकनचा डबल बी-
In reply to काका, किती आठवणी ताज्या by शैलेन्द्र
बरोब्बर काका.. धन्तक...
In reply to डंकनचा डबल बी- by रामदास
शैलू,
In reply to काका, किती आठवणी ताज्या by शैलेन्द्र
युनीलिइव्हर..
In reply to काका, किती आठवणी ताज्या by शैलेन्द्र
गिर्हाइकाला
In reply to युनीलिइव्हर.. by वारा
सहमत
In reply to गिर्हाइकाला by शैलेन्द्र
सर्फच्या बरोबर
In reply to काका, किती आठवणी ताज्या by शैलेन्द्र
गुजरा हुआ जमाना...
मुक्तसुनीत यांनी
In reply to गुजरा हुआ जमाना... by विकास
लेख संपतासंपता विचार करायला
छान लेख रामदास'जी! शेवटची
कपड्यांवरून माणसं ओळखली
__/\__
_/\_
उत्तम
एकात एक
लेख आवडला. आपल्याकडे पैसा
आता तो कामगार कुठे असेल किंवा
आवडला
एक शंका : "१५ ग्रॅम टिनोपॉल
In reply to आवडला by धनंजय
टिनोपाल
In reply to एक शंका : "१५ ग्रॅम टिनोपॉल by मराठी_माणूस
टिनोपाल ची निळी डबी
सुरेख आठवण!
सोनाली बेंद्रे
In reply to सुरेख आठवण! by पिवळा डांबिस
सौंदर्य
In reply to सोनाली बेंद्रे by सुनील
बरोब्बर ओळखेलते हॉ
In reply to सुरेख आठवण! by पिवळा डांबिस
मस्त!!!
अजून एक दंडवत घ्या
क्या बात है!
वा मस्तच.
जहांपन्हा
टिनोपॉल.
_/\_ _/\_ _/\_
बर्याच आठवणी ताज्या झाल्या
मस्त लिखाण, आवड्ले !!!
छान लेख!
छान लेख!
सर खरचं --------- " आता तो
ससा
मस्तच
__/\__
लेख आवडला....