Skip to main content

मस्करी

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 18/05/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी शक्यतो कूणाची मस्करी करायला जात नाही.कारण कधी-कधी मस्करी मूळे पार वाट लागते.पण कधी-कधी काही जण असे काही बोलून जातात, की मग त्यांची थोडी मस्करी केल्याशिवाय राहवत नाही. मागच्या आठवड्यात पण असेच झाले.मी आणि मूलगा इंटरनेट थ्रु गप्पा मारत होतो. ...म्हणजे मी परदेशात नौकरी करण्याइतपत माझे शिक्षण झाले असून, दोन्ही घरातील इंटरनेटचा खर्च मी भागवू शकतो, हे तूमच्या लक्षांत आले असेलच.बायकोला घाबरून पळून गेलो, हे जगमान्य सत्य माझ्या आयुष्यात पण सत्य झाले, हे देखील लक्षांत आले असेलच... तेव्हढ्यांत मूलाचा मित्र आला. ...तो कसा आला? बेल वाजवून की कडी वाजवून? हे मैलिक प्रश्न न विचारल्यास उत्तम.... त्याला हे ऑन लाईन चॅटिंग प्रकरण माहित न्हवते. ...आता ६वीतल्या मूलाला हे माहित नाही हा दोष कूणाचा?ते देवाला माहित.आपण त्यात न पडणेच बरे नाही का?.. त्याने मूलाला विचारले , अरे हे काका कॉम्प्युटर मध्ये कसे गेले. मी पटकन म्हणालो, अरे कूणाला सांगू नकोस. माझ्या मूलाने आणि त्याच्या आईने मला, जादू करून कॉम्प्युटरमध्ये बंद करून टाकले.जास्त मस्ती केलीस तर तूला पण ह्याच्यात बंद करून टाकतील. त्या-दिवसापासून ते पोरगे बिचारे, माझ्या मूलाचे सगळे म्हणणे ऐकायला लागले. तुम्ही पण अशी कूणाची मस्करी केली असेल तर सांगा.

वाचने 5334
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

तुम्ही परदेशात मुक्त विहार करा , अन त्या गरीब निवाश्याला घाबरवा. ;-)

जुनी आठवण ताजी झाली. असेच एकदा मैतरणीला कपाटात बंद केली होती.......................... banana

In reply to by jaypal

मला वाटतं, तू फक्त १०% गोष्ट सांगतो आहेस!

In reply to by jaypal

मस्करी म्हणून नव्हे तर खुन्नस म्हणून शाळेत असताना एकाला टॉयलेटमध्ये तब्बल १० मिनिटे बंद केला होता.

In reply to by प्रचेतस

सज्जन किसनदेव असे सुद्धा करु शकतात?
हॅहॅहॅ आमच्या वाटेला गेल्यावर आम्ही काहीही करू शकतो. ;) वर उल्लेख केलेला टिनपाट आमच्या(माझ्या आणि वर्गमित्राच्या) विरुध्द वर्गमास्तरांना चोंबड्या करायचा. शेवटी काहितरी अद्दल घडवायची म्हणून मग टॉयलेटमध्येच बंद केला. :D

चॅट रूममध्ये मुलीच्या नावाने प्रवेश करून अनेक मित्रांचा अनेक वेळा पोपट केला आहे :)

In reply to by daredevils99

१०-१२ वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेट हा प्रकार तसा नवीन होता त्यावेळी माझ्या मित्राने असाच एक किस्सा केला होता.कुणा मुलीच्या नावाने त्याने चॅट रूममध्ये ठाण्यातील एका मुलाला "मी उद्या संध्याकाळी ५ वाजता अमुक एका ठिकाणी तुला भेटायला येईन" असे सांगितले.बरं एकमेकांना ओळखायचे कसे? तर मुलाने निळी जीन्स आणि लाल टी शर्ट घालून अमुक एका नंबरप्लेटच्या बाईकवरून त्या ठिकाणी जावे आणि हातात पर्कचे चॉकलेट घेऊन उभे राहावे तर "मुलीने" पांढरा पंजाबी ड्रेस आणि हातात लाल पर्स घालून जावे असे ठरले. दुसऱ्या दिवशी ५ वाजता माझा मित्र मजा बघायला त्या ठिकाणी गेला.खरोखरच तो मुलगा त्याच नंबरप्लेटच्या बाईकवरून निळी जीन्स आणि लाल टी शर्ट घालून हातात पर्क घेऊन उभा होता.तसेच आपल्याला भेटायला येणारी मुलगी हीच का याची जाणाऱ्या-येणाऱ्या मुलींकडे चोरट्या नजरेने बघून खात्री करायचा प्रयत्न करत होता.अर्थात कोणतीच मुलगी "पांढरा ड्रेस आणि लाल पर्स" कॅटेगरीतली नव्हती म्हणून ठिक नाहीतर महाशयांना चप्पल खायचीच वेळ आली असती. (स्वगत: माझी आणि हिलरीची भेटही अशीच इंटरनेटवर झाली. पण पहिल्यांदा भेटायच्या आधी आम्ही चांगले ३-३.५ वर्षे चॅट करत होतो आणि फोनवरही बोलत होतो. तेव्हा माझा असा पोपट व्हायची शक्यता अगदी शून्यच होती.)

एकदा एका मास्तरच्या खुर्चीला बसायच्या जागी "चोळ्या" असं लिहिलेलं स्टिकर चिकटवुन ठेवलवतं. (त्याची तशी सवय होती)नंतर तास संपल्यावर टिचर्स रुम पर्यंत जाईस्तोवर सगळे मागुन हसत होते ;-)

मी स्वतः नाही पण माझ्या मैत्रीणीने केलेला किस्सा सांगते. एकदा तिच्या घरी एका लहान मुलीला; असेल अरांउड ८ वर्षाची..तिची आई दुसर बाळ आणायला हॉस्पिटलला गेल्यान एक दिवस सांभाळायला आणुन ठेवल होत. मुंबईतली गोष्ट आहे ही. तर त्या लहानगीला आपला सुनिल शेट्टी अगदी फार म्हणजे फार आवडायचा. झाल बोलता बोलता तिन हे माझ्या मैत्रीणीला सांगितल. आता माझ्या मैत्रीणीला एकदम काय हौस आली कुणास ठाउक, पण तिन सांगितल," अरे मै तो उसे जानती हुं। मै कभी भी फोन लगा सकती हुं सुनिल शेट्टी को । " अय्या हो? चिमुरडी खुष .मग माझ्या मैत्रीणीन तिच्या ऑफिस मधल्या एका कलिगला फोन केला अन बोलायला सुरु केल. अर्थात त्यान हीचा आवाज ताबडतोब ओळखला. तर माझी मैत्रीण'" हलो । मै सुनिल शेट्टेजी से बात कर सकती हूं । ' माग चिमुरडी अक्षरशः नाचत होती. " हां मै कांचन बोल रही हुं। हमारे यहां एक नन्ही मेहमान आयी हुई है , जो आपको बहोत पसंद करती है। आप प्लिज उससे बात करोगे?" अक्षरशः आनंदान थुईथुई नाचत ती छोटुली "सुनिल शेट्टी 'बरोबर बोलली . अर्थात पलिकडुन जरा दमदार आवाज काढुन "कलिग" न बाजु सांभाळली. पण एका लहानग्या जिवाला सार्‍या दुनियेला सांगायला एक फार मोठ्ठ काही मिळाल.

माझी एका बुवानं मस्करी केली होती. लवकर मेला बिचारा.;) चुलतबहिणीच्या लग्नाच्या निमित्तानं सगळेजण जमलेले होते. काकूच्या माहेरचे लोकही त्यात होते. मला त्यांची नावे आणि नाते याबद्दल फारसे माहित नाही. सगळी मुले खेळत असताना हे काका/मामा टाईप व्यक्तीमत्व आमच्यात येऊन पत्ते, क्यारम खेळायचे. मी पाचव्या यत्तेत असल्याने मोठ्ठी मुलगी झाले असे वाटून हौसेने आईचे घड्याळ वापरायला सुरुवात नुकतीच केली होती. ते घड्याळ माझ्या मामांनी आईला ग्र्याज्युएशनला दिल्याने आईचे लाडके. घड्याळ ठरलेल्या ठिकाणी काढून ठेवले आणि नंतर नाहिसे झाले. आईने यथेच्छ मार दिला, दिवसभर तिचीही रडारड झाली. नंतर या काका टाईप व्यक्तीने सहा महिन्यांनी घड्याळ परत केले. ते आणि त्यांचे कुटुंब हे सगळेजण घड्याळ परत करताना काहीतरी विनोद झाल्यासारखे हसत होते. आम्ही ते कसे लपवले, रेवतीला मार मिळाल्यावर आम्ही दुसर्‍या खोलीत कसे हसत होतो असे काय काय सांगत होते. माझ्या काकूला या सगळ्या गोष्टीचा मनस्तापच झाला. आईने नंतर ते घड्याळ कधीच वापरले नाही. ते अजूनही कपाटात आहे.

In reply to by रेवती

रेवतीला मार मिळाल्यावर आम्ही दुसर्‍या खोलीत कसे हसत होतो असे काय काय सांगत होते. दुसर्‍याला दु:ख देऊन त्याचा आनंद वाटणार्‍याला सॅडिस्टच म्हटले पाहिजे.

In reply to by तिमा

नुसत सॅडीस्ट? अहो तो चक्क चोर माणुस होता अन त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला घड्याळाबद्दलची रेवतीच्या आईची भावना समजुन त्याला ते परत द्यायला लावल, फक्त तोंड लपवायला म्हणुन त्याला हसुन गोड केल गेल. मला वाटत्य रेवतीच्या काकीला याच गोष्टीचा मनस्ताप झाला असावा. मी तर त्याला सरळ हराम्खोर ही शिवी देउन रिकामी होइन. खर सांग रेवती आजही तुला त्या प्रसंगाचा मानसिक ताण तेव्हढाच जाणवतो ना? असच असत. काही काही क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टी अश्याच खुपत रहातात. अन ही मस्करी नव्हे. ती चोरी होती.