वडिलांची किर्ती गाऊ नये, धर्माच्या फुकाच्या गप्पा मारु नये, सारासार विचार करुन वागावे असा आम्हा रात्रंदिन उपदेश करणार्या रमतारामांचे आमच्यावर थोर उपकार आहेत.
आम्हास ज्ञान देणारा आम्हाला देवासमान असतो.
त्यामुळे रमताराम आमचे देव आहेत.
साहजिकच त्यांची आरती करणे अतिशय गरजेचे आहे.
आरतीनंतर प्रसाद मिळेल.
प्रसादासाठी कोणतीही गडबड करु नये.
देव रागवतो.
शिस्त ही आवश्यक आहे.
चला तर आरती करुया...
चला गाउया रमतारामाची आरती
चालवी जो आम्हा सत्यपथावरती
धरोनी बोट घेऊनीया कडेवरती
नौका करी पार भवसागरावरती |१
जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ
दाखविले आम्हा कवडसे प्रकाशांचे
आणिले भान सत्याच्या विविधतेचे
आम्ही बालक तुम्ही सागर ज्ञानाचे
तुमच्यासवे मिळे बळ जगण्याचे |२
जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ
जिएदेवाचे सादर करुनी उतारे
तळमळ केवळ नाही ते फटकारे
जळोत जिव्हा जे म्हणती पाखंडीरे
नाना म्हणे तुच धर्मरक्षक त्रातारे |३
जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ
फलश्रुती- ही आरती रोज म्हणणार्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
आरतीविस्तार- ही आरती अजून विस्तारल्यास आमची हरकत नाही.
गधेगाळ- रमतारामदेवाच्या आरतीतील गणमात्रावृत्त यांच्या चूका काढणार्याच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील आणि त्याच्या...... असो.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
20430
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
विभुती
तीर्थ प्राशन
आमचा अनुभव
In reply to तीर्थ प्राशन by प्रकाश घाटपांडे
कर्मकांड ...
+१
In reply to कर्मकांड ... by छोटा डॉन
बाबा की किरपा
ही आरती आणि याच्या आवृत्त्या
रमताराम आणि योगप्रभू यातले
>>>रमताराम यांचे सोवळे कडक
In reply to रमताराम आणि योगप्रभू यातले by स्वानन्द
सार्वजनिक खरडवही
====)))))))))))))))))) एकदम
आरती
बाप रे
मला पण