Skip to main content

रमतारामाची आरती

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 18/05/2012 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
वडिलांची किर्ती गाऊ नये, धर्माच्या फुकाच्या गप्पा मारु नये, सारासार विचार करुन वागावे असा आम्हा रात्रंदिन उपदेश करणार्‍या रमतारामांचे आमच्यावर थोर उपकार आहेत. आम्हास ज्ञान देणारा आम्हाला देवासमान असतो. त्यामुळे रमताराम आमचे देव आहेत. साहजिकच त्यांची आरती करणे अतिशय गरजेचे आहे. आरतीनंतर प्रसाद मिळेल. प्रसादासाठी कोणतीही गडबड करु नये. देव रागवतो. शिस्त ही आवश्यक आहे. चला तर आरती करुया...
चला गाउया रमतारामाची आरती चालवी जो आम्हा सत्यपथावरती धरोनी बोट घेऊनीया कडेवरती नौका करी पार भवसागरावरती |१ जय देव जय देव जय रमतामाऊली होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ दाखविले आम्हा कवडसे प्रकाशांचे आणिले भान सत्याच्या विविधतेचे आम्ही बालक तुम्ही सागर ज्ञानाचे तुमच्यासवे मिळे बळ जगण्याचे |२ जय देव जय देव जय रमतामाऊली होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ जिएदेवाचे सादर करुनी उतारे तळमळ केवळ नाही ते फटकारे जळोत जिव्हा जे म्हणती पाखंडीरे नाना म्हणे तुच धर्मरक्षक त्रातारे |३ जय देव जय देव जय रमतामाऊली होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ
फलश्रुती- ही आरती रोज म्हणणार्‍याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आरतीविस्तार- ही आरती अजून विस्तारल्यास आमची हरकत नाही. गधेगाळ- रमतारामदेवाच्या आरतीतील गणमात्रावृत्त यांच्या चूका काढणार्‍याच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील आणि त्याच्या...... असो.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 20430
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

हे बाबा विभुती कुठुन काढणार? म्हणजे हातातुन विभुती, तोंडातुन सोन्याची चेन अशा अर्थाने.

आरती नंतर शास्त्रोक्त ( शक्य नसल्यास किमान शास्त्रापुरते तरी) 'तीर्थप्राशन' केल्यास अधिक पुण्य मिळते, मानसिक आरोग्य वाढते असा आमचा अनुभव आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आमचा अनुभव? तो अनुभव तुमचा नाही. ती त्या बाबाचीच कृपा आहे. ;-)

नानासारखे समंजस आणि सुशिक्षित व्यक्तिमत्वही आता व्यक्तिपुजा आणि कर्माकांड यात गुतंलेले पाहुन मनास अनंत यातना झाला. असो, त्याचा जो काही देव असेल तो त्याला मुक्ती देवो अशीच प्रार्थना करतो. बाकी इतर बुवाबाजी आणि कर्मकांडावर आमचा विश्वास नाही. बाकी रमताराम आमच्यातलेच असल्याने त्यांच्याबद्दल अधिक काय बोलणे ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

त्यातही, आजोबांचा बाबा झालेला (कोण रे तिकडे बाबा ला अबाबा करतोय??) पाहून जग उलटीकडे जातंय याची खात्रीच पटली! भविष्यात याच आजोबांनी आमची लंगोटीईजेव्हा आम्ही पाळण्यात होतो तेव्हा हो!) धुतली आणि हे एक नंबरचे थोतांड आहे असे जरी आम्ही म्हणले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही हे ही दिसत आहेच.

रमताराम आणि योगप्रभू यातले कोण जास्त पावरफुल आहेत, यावर कोणी मार्गदर्शन करेल का? रमताराम यांचे सोवळे कडक असते म्हणे... केवळ आरती म्हटल्याने मनोकामना पूर्ण होतील का?

In reply to by स्वानन्द

>>>रमताराम यांचे सोवळे कडक असते म्हणे.. अहो कित्येक वर्षांत धुतलेले नाही म्हणून कडक झाले आहे. तशी अजूनही बरीच कारणे आहेत. सुज्ञांस सांगणे नलगे

आरती अन् प्रतिसाद पाहून खपले!! बाबांचा डिमांड जास्तच वाढलेला दिसतोय या आरतीने!!! ;) =)) =))

थोडीशी गंमत होईलसे वाटले पण लोक लैच शिरेस झाले की. आरती झाली आता विसर्जनाला नेऊ नका म्हणजे मिळवली. :ghost:

शिष्यत्व हवे. कधी भरु टेंडर? -सूर्यपुत्र.