विस्टिरिया लॉज - २ - होम्सकथा
लेखनप्रकार (Writing Type)
विस्टिरिया लॉज - भाग १ - होम्सकथा
आमच्या पाहुण्यांना निरोप दिल्यानंतर काही वेळ आम्ही शांत बसून राहिलो. बारीक झालेल्या डोळ्यांवर भूवया पाडून नेहमीप्रमाणे त्याचे डोके पुढे काढून होम्स जोरजोराने धूम्रपान करु लागला.
-----------------------------------------
'' तर वॉटसन'' माझ्याकडे अचनाक वळून तो म्हणाला,
''या सगळ्यातून तुला काय कळले?''
''स्कॉट एक्लसच्या गूढाबद्दल मला काहीच समजले नाही''
''पण गुन्ह्याबद्दल?''
''त्या माणसाचे साथीदारही गायब आहेत त्याअर्थी, मी असे म्हणेन की तेदेखील या खूनात सहभागी होते, म्हणूणच ते फरार आहेत''
''एका दृष्टीकोनातून हेदेखील शक्य आहे. पण असे असले तरी, त्याच्या दोन नोकरांनी गार्सियाविरुद्ध संगनमत करावे आणि त्याच्याकडे पाहुणा आलेल्या रात्रीच त्याच्यावर हल्ला करावा, हे विचित्र आहे हे तू पण कबूल करशील. गार्सियावर हल्ला करायचा असता तर हा नेमका दिवस सोडून तो कधीही त्यांच्याच तावडीत होता ना?''
''मग ते फरार का झाले?''
''अगदी अचूक! ते फरार का झाले? हा एक मोठा मुद्दा आहेच. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे आपला अशील स्कॉट एक्लसचा अनाकलनीय अनुभव. या दोन्ही ठळक मुद्यांना सांधणारे विश्लेषण देता येणं हे मानवी बुद्धीमत्तेला शक्य आहे काय? शब्दांचा विचित्र वापर करुन लिहिलेली ती गूढ चिठी विचारात घ्यायचीच असेल, तर ती तात्पुरते गृहितक म्हणूनच विचारात घेण्याच्या लायकीची असेल? आपल्याला कळणारी नवी तथ्ये, आपोआप आपल्या गृहितकाच्या साच्यात बसली तर आपले गृहितक हळूहळू या प्रकरणाची उकल करु शकेल.''
''आपले गृहितक आहे तरी काय?''
त्याच्या खुर्चीत मागे झुकून होम्सच्या डोळ्यांची मुद्रा मंगोल झाली.
''या स्कॉट एक्लसची कुणीतरी मुद्दाम मजा घेतलीय, हे अशक्य आहे हे तुलाही जाणवत असेल. घटनाक्रमातून दिसते त्याप्रमाणे पुढे गंभीर घटना घडणार होत्या आणि स्कॉट एक्लसला विस्टिरिया लॉजमध्ये घेऊन जाण्याचा त्यांच्याशी संबंध आहे.''
''पण कसला संबंध संभवतो?''
''आपण यातल्या प्रत्येक मुद्यावर विचार करु. तो तरुण स्पॅनियार्ड आणि स्कॉट एक्लसच्या विचित्र आणि अचानक झालेल्या ओळखीमध्ये काहीतरी खटकतंय. या स्पॅनियार्डनेच मैत्रीसाठी पुढाकार घेतला. स्कॉट एक्लसची त्याच्याशी ओळख झाल्यानंतरच्या दुसर्याच दिवशी त्याने लंडनच्या दुसर्या टोकाला जाऊन स्कॉट एक्लसची भेट घेतली, आणि त्याला इशरला घेऊन येईपर्यंत त्याने एक्लसशी सतत संपर्क ठेवला. आता, त्याला या एक्लसकडून काय मिळण्यासारखे होते? मला त्या माणसात दम दिसत नाही. तो तेवढा बुद्धीमानही दिसत नाही - हजरजबाबी लॅटीन माणसाचा मित्र होण्याएवढा तरी नाहीच. मग गार्सियाला मिळू शकणार्या इतर लोकांमधून यालाच का बरे निवडण्यात आले? हेतू तडीस जाईल असे काय या स्कॉट एक्लसमध्ये आहे? त्याच्यामध्ये वेगळा उठून दिसणारा गुण आहे का? मी म्हणतो असा गुण स्कॉट एक्लसमध्ये आहे. खानदानी
ब्रिटीश अदबशीरपणाचा तो उत्तम नमुना आहे, आणि हाच माणूस दुसर्या ब्रिटीश माणसावर छाप पाडू शकतो. स्कॉट एक्लसचे कथन कितीतरी विचित्र होते तरी या दोन अधिकार्यांनी चकार शब्दाने स्कॉट एक्लसला प्रश्न विचारला नाही, हे तू पाहिले असशीलच.''
''पण तो कशाचा साक्षीदार बनणार होता?''
''घटना जशा घडल्या त्यानुसार तो कशाचाच साक्षीदार बनला नाही. त्या जशा योजल्या होत्या तशा त्या घडल्याच नाहीत. हे प्रकरण मला दिसते ते हे असे!''
''तो alibi ठरु शकला असता, असे काही आहे का?''
''अगदी अचूक! वॉटसन, तो निश्चितच एक alibi ठरु शकला असता. केवळ युक्तीवादासाठी आपण असं मानू की विस्टिरिया लॉजमधले लोक संगनमत करुन कसलातरी बनाव रचत होते. हा बनाव, मग तो कशाचाही
असो, एक वाजण्यापूर्वीच तडीस जाण्याची योजना होती. काही घड्याळांचे काटे फिरवून त्यांनी स्कॉट एक्लसला त्याला वाटले त्यापेक्षा कितीतरी आधीच झोपी घातले असेल हे अगदी सहज शक्य आहे, पण काहीही झालेले असले तरी, बारापेक्षा जास्त वाजलेले नाहीत हे सांगायला जाणारा गार्सियाच होता हेही शक्य आहेच. गार्सियाला बाहेर जाऊन जे काय करायचे होते ते करुन उल्लेख केलेल्या वेळेपर्यंत तो परत येऊ शकला असता तर कसल्याही गंभीर आरोपावर त्याच्याकडे देण्यासारखी त्याच्याकडे जबरदस्त तोड होती. त्याच्याकडे कोणत्याही न्यायालयासमोर शपथेवर सांगू शकणारा एक इंग्लिश माणूस होता की गार्सिया रात्रभर घराच्या बाहेरच पडला नाही. वाईटात वाईट घडले तर संरक्षण म्हणून स्कॉट एक्लसच्या खांद्यावर बंदूक ठेवता आली असती.''
''होय, हे लक्षात आले, पण फरार झालेल्या इतरांबद्दल काय?''
''अद्याप वास्तविकता काय ते आपल्याला काहीच माहित नाही, पण यात फार मोठ्या अडचणी असतील असे मला वाटत नाही. तरीही, पूर्ण माहिती न घेताच युक्तीवाद करीत सुटणे चूक आहे. असे केले तर ती माहिती
आपण आपल्या गृहितकाशी जुळण्यासाठी उगाच त्यात फेरफार करतो.''
''आणि ती मध्येच आलेली चिठी''
''त्यात काय लिहिलं होतं बरं? आपले नेहमीचेच रंग, हिरवा आणि पांढरा. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा - रेसींगसारखं काहीतरी वाटतंय. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा हा एक सुस्पष्ट संकेत आहे. मुख्य पायर्या, पहिला कॉरीडॉर, उजवीकडील सातवे, ग्रीन बेझ - हा कुठेतरी करण्यात आलेला निर्देश आहे. या सर्वांच्या मागे आपल्याला कदाचित टाळके सरकलेला नवरा आढळू शकतो. खरोखर हा एक धोकादायक पाठलाग होता. तसं नसतं तर तिने 'लवकर' हा शब्द लिहिला नसता. ''डी'' हे कदाचित खूण म्हणून.''
''तो माणूस स्पॅनियार्ड होता, ते डी डोलोरेसमधले डी आहे, स्पेनमध्ये आढळणारे सर्वसामान्य नाव!''
''उत्तम, वॉटसन, फारच उत्तम! पण हे अशक्य आहे. एक स्पॅनियार्ड दुसर्या स्पॅनियार्डला स्पॅनिशमध्येच लिहील ना! या चिठीचा जो कुणी लेखक असेल तो निश्चितच इंग्लिश आहे. असो तर. तो हुशार इन्स्पेक्टर
आपल्याकडे परत येईपर्यंत आपण थंड बसावे हे उत्तम. दरम्यान काही तासांसाठी तरी आळसटलेल्या वातावरणातून बाहेर पडल्याबद्दल, आपले नशीब जोरावर आहे असे मानू.
सरे पोलीस ठाण्याचा अमलदार येण्यापूर्वीच होम्सच्या तारेचे उत्तर आले होते. होम्सने ते वाचले आणि त्याच्या वहीत ठेवण्यापूर्वी माझा आशाळभूत झालेला चेहेरा त्याच्या नजरेतून सुटला नाही.
''आपण बड्या वर्तुळात शिरत आहोत,'' तो म्हणाला.
ती तार म्हणजे नावे आणि पत्त्यांची यादी होती:
लॉर्ड हॅरिंगबी, दि डिंगल; सर जॉर्ज फॉलॉइट, ऑक्झशॉट टॉवर्स; मिस्टर हेन्स हेन्स, जे. पी, पर्डी प्लेस; मिस्टर जेम्स बेकर विल्यम्स, फॉर्टन ओल्ड हॉल; मिस्टर हेन्डरसन, हाय गॅबल, रेव्हरंड जोशुआ स्टोन, नेथर
वॉल्सलिंग.
''आपली कारवाई मर्यादीत वर्तुळात ठेवण्याचा हा अत्यंत सूस्पष्ट मार्ग आहे,'' होम्स म्हणाला.
''बेयन्सच्या पोलीसी खाक्याच्या मनाने आधीच अशी काहीतरी योजना वापरली असेल यात संशय नाही.''
''मला नीटसं कळलं नाही.''
''हे बघ मित्रा, आधीच आपण या निष्कर्षावर आलेलो आहोत की गार्सियाला जेवताना मिळालेला संदेश म्हणजे भेट किंवा भेटीचे नियोजन होते. आता, त्यातून पक्का अर्थ कळतो तो अचूक असेल तर, गुप्तता ठेवण्यासाठी, जाणार्याला मुख्य पायर्या चढून कॉरीडॉरमधला सातवा दरवाजा शोधावा लागणार, मग घर खूपच मोठे आहे हे अगदी उघड आहे. अगदी तसेच हेही निश्चित आहे की हे घर ऑक्झशॉटपासून एक किंवा दोन मैलांच्या आत आहे, कारण गार्सिया त्याच दिशेने चालत होता आणि, मी तथ्ये जशी पहातो त्याप्रमाणे, तो विस्टिरिया लॉजमध्ये alibi ची पाठराखण मिळवण्यासाठी परत येणार होता, जे त्याला एक वाजेपर्यंतच मिळू शकणार होते. ऑक्झशॉटच्या जवळील घरांची संख्या मर्यादित असायलाच हवी, म्हणून मी स्कॉट एक्लसने नमूद केलेल्या एजंटला तार पाठवून त्यांची यादी हस्तगत करण्याची सुस्पष्ट पद्धत वापरली. ती या तारेत आहे
आणि आपल्या गुंत्याची उकल करणारे टोक निश्चित त्यांत असायला हवे.''
इशरमधील त्या सुंदर सरे गावात इन्स्पेक्टर बेयन्सला सोबत घेऊन पोहोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले.
होम्स आणि मी मुक्काम पडणार या अंदाजानेच निघालो होतो आणि बुल येथे झोपण्याची मस्त सोय केली होती. शेवटी डिटेक्टीव्हसोबत आम्ही विस्टिरिया लॉजची पाहणी करण्यासाठी निघालो. झोंबरा वारा आणि
चेहेर्यावर सपकारे मारणारा दमदार पाऊस असलेली ती मार्चमधली थंडगार, किर्रर्र सायंकाळ होती. आम्ही ज्या भयंकर ध्येयाकडे निघालो होतो त्यासाठी हे वातावरण अगदीच जुळून आले होते.


प्रतिक्रिया
क्रमश:...
मस्त .... एक्दम ज ब रा
छान!
मस्त
मस्तचं
व्वा!
खिळवून ठेवणारी गोश्ट पुढ्चा
उत्कंठावर्धक
साहेब
तुम्ही उत्तम अनुवाद करताय.
>>इतक्या मोठ्या गॅपने भाग
कावू देत हो. तुम्ही लिहा.
बढीया..
उत्कृष्ठ अनुवाद यकुशेठ. मान
चान चान यकुभौ.
पु. भा. प्र.
मस्त रे !
हं..