Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कापूसकोन्ड्या on Wed, 05/16/2012 - 01:42
टवाळा आवडे विनोद ??? आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या. इंदिरा गांधी चे मुद्दाम उदाहरण देण्याचे कारण म्हणजे त्याना तथाकथित लोक हुकुमशहा म्हणत असत. आपल्या संसदेची साठ पुर्ण होत असताना साठी बुद्धी नाठी म्हणावे तसे वर्तन घडले आहे. १९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले. टू जी च्या प्रकरणात उलट्या सुलट्या कोल्यांट्या मारून अजिबात न डगमगडारा कपिल सिब्बल सारखा माणुस सुद्धा प्रचंड दहशती खाली होता. वात्सविक हा मुद्दा मांडण्यारा खासदांराची समजूत काढण्याऐवजी भाजप सारखा ’जबाबदार विरोधी पक्ष ' सुध्दा 'फिशींग इन ट्र्बल्ड वॉटर' असा वागत होता.आता त्या नव्हे तर सर्व पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रे काढण्याचा फतवा निघेल. आणि सर्वात वाईट आणि धोकादायक म्हणजे या फतव्याला विरोध करणारा हा आंबेडकर विरोधी ठरेल. मोदींचे कौतुक करणारा जातीयवादी, इंदिरा गांधी बद्दल चार चांगल शब्द बोलले तर तो लोकशाही विरोधी, पुतळा हलविला ते बरे केले असे म्हणले की तो ब्राह्मण विरोधी अश्या ब्लॅक आणि व्हाईट रंगामध्ये रंगविले जाणार.मग मोर्चे सभा बंद तोडफोड चे चालूच. खुन, मारामार्या, बलात्कार, भ्रष्टाचार याबद्दलच्या भावना बोथट होत असून जात, भाषा, प्रांत, आणि इतिहासातील मोठी माणसे यांच्या बद्दलच्या संवेदना चुकीच्या पद्ध्तीने टोकदार होत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहीजे. महाराष्ट्र टाईम्स च्या अंकात http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13142817.cms प्रताप आसबे यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे.
  • Log in or register to post comments
  • 26537 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 05/16/2012 - 06:12

Permalink

सहमत आहे

आपण लोक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांबद्दल, उगाच कर्णे वाजविणाऱ्यांबद्दल, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांबद्दल फारच सहिष्णू आहोत. परंतु वरील प्रमाणे एखादी गोष्ट कुणी लक्षात आणून दिल्यास लगेच तोडफोड सुरू. ईश्वर अशा लोकांना सद्बुद्धी देवो.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 05/16/2012 - 09:05

Permalink

"आमच्यावर अन्याय होतोय, अपमान

"आमच्यावर अन्याय होतोय, अपमान होतोय" असे विनाकारण गळे काढुन राजकारणी त्यांचं भलं अन देशाचं वाटोळ करताहेत...अन तेवढ्यापुरता लाभ हवा असणारे त्यांना उत्तेजन देताहेत. पवारांनी मोठं केलेल्या विनायक मेट्यापासुन प्रेरणा घेउन देशभर धुडगुस घालुन देश एकदाचा विकुनच टाका म्हणावं...कमिशन मोठ्ठ मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अजातशत्रु on Wed, 05/16/2012 - 09:31

Permalink

वांझोट्या संवेदना

आंतरराष्ट्रिय दर्जाचे ख्यातनाम चित्रकार सन्माननीय हुसेन साहेब यांच्या मृतआत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना !! बाकि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्याख्ये बाबत मी काहिसा 'ढ' च आहे. :-) . . . . . . . . . (सदर घटनेमुळे त्याना आता 'एकटेपणा' जाणवणार नाही. अर्थात 'जन्नत'मधे )
  • Log in or register to post comments

Submitted by कापूसकोन्ड्या on गुरुवार, 05/17/2012 - 09:54

In reply to वांझोट्या संवेदना by अजातशत्रु

Permalink

हुसेन ची चित्रे आक्षेपार्ह होतीच पण ....

हुसेन ने काढलेली चित्रे ही व्यंग्चित्रे या सदरात नव्हती.आपला मराठी, पंढरीचा माणूस. काढत होता काही बाही. त्याच्या वर खुप क्रिमिनल केसेस होत्या त्यामुळे भारतात आल्या आल्या त्याला अटक झालीअसती, म्हणून त्यांनी भारतात येण्याचे टाळले. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by कापूसकोन्ड्या on गुरुवार, 05/17/2012 - 10:05

In reply to वांझोट्या संवेदना by अजातशत्रु

Permalink

वांझोट्या संवेदना

वांझोट्या नै कै! त्याला विषारी फळे येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 05/16/2012 - 10:00

Permalink

१९६० पासून प्रचलीत असेलेले एक

१९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले व्यंगचित्राच्या प्रकरणावरुन उठलेला गोंधळ पाहून केवळ हताशपणा वाट्याला येतो. व्यंगचित्राचा ज्याला काही एक अर्थ कळलेला नसतांना डॉ.पळशीकरांच्या कार्यालयावर तोडफोड करणारी सोयीची मनोवृत्ती आणि व्यंगचित्र आक्षेपार्ह वाटतात म्हणून सर्व पूस्तक परत घेण्याची सोयीचीवृत्ती थोड्याफार प्रमाणात सारख्याच वाटतात. आपण अशावेळी काहीच करु शकत नसतो. असो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कापूसकोन्ड्या on गुरुवार, 05/17/2012 - 09:57

In reply to १९६० पासून प्रचलीत असेलेले एक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हा हताशपणाच जास्त त्रास देतो.

व्यंगचित्राच्या प्रकरणावरुन उठलेला गोंधळ पाहून केवळ हताशपणा वाट्याला येतो. व्यंगचित्राचा ज्याला काही एक अर्थ कळलेला नसतांना डॉ.पळशीकरांच्या कार्यालयावर तोडफोड करणारी सोयीची मनोवृत्ती आणि व्यंगचित्र आक्षेपार्ह वाटतात म्हणून सर्व पूस्तक परत घेण्याची सोयीचीवृत्ती थोड्याफार प्रमाणात सारख्याच वाटतात. आपण अशावेळी काहीच करु शकत नसतो. असो. अगदी मान्य.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 11:07

Permalink

सरकारी पाठ्यपुस्तकं राजकीय

सरकारी पाठ्यपुस्तकं राजकीय व्यंगचित्र छापायची जागा कधीपासून झाली? १९६० साली व्यंगचित्र आले होते याचा अर्थ ते पाठ्यपुस्तकात छापा आसा होत नाही.. तशी तर रामावर आणि कृष्णावर पण व्यंगचित्रे आहेत. मग एकाही रामरक्षेच्या किंवा गीतेच्या पुस्तकात आजवर व्यंगचित्रे का नाही हो छापली? आक्षेपार्ह चित्रे पाठ्यपुस्तकात आणणार्‍या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. उघडपणे बाबासाहेबांचा अपमान करणं आज कुणालाही शक्य नाही, म्हणूनच हा छुपा मार्ग शोधला गेला आहे. त्यातून जर कुणाला व्यंगचित्रे हवीच असतील तर व्यंग चित्रात गैर नाही असे म्हणणार्‍या भाजपाच्या खासदाराला संपर्क करावा. त्याच्या पदरच्या पैशातून तशी स्वतंत्र एडिशन छापून घ्यावीत्त. बहु संख्यांचे म्हणणे चित्र नको असे असेल तर सरकारचा पैसा, कागद, शाई का व्यर्थ वाया घालवायची? भाजपाने स्वतःच्या खर्चातून अशी एडिशन छापावी आणि जनतेला वाटावी. हे व्यंगचित्र हवे असे म्हणून इथे टाहो फोडणार्‍या लोकानीही स्वतःचा पैसा त्यात घातला तर आनंदच होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 05/16/2012 - 11:07

In reply to सरकारी पाठ्यपुस्तकं राजकीय by JAGOMOHANPYARE

Permalink

तुम्ही कोणत्या ब्रिगेडचे

तुम्ही कोणत्या ब्रिगेडचे म्हणायचे? गुंडागिरी जोपर्यंत स्वत:ला फटका बसत नाही तोपर्यंत छान वाटते...मग आहेच लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 11:10

In reply to तुम्ही कोणत्या ब्रिगेडचे by शिल्पा ब

Permalink

मी तोडफोडीचे समर्थन केलेले

मी तोडफोडीचे समर्थन केलेले नाही.. व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात नको, इतकेच लिहिले आहे. आणि तसेही या देशात दुसर्‍याचे मत पटले नाही तर साक्षात राष्ट्रपित्यालाही गोळी घालायची आणि त्याचे समर्थन करायची प्रथा आहे. तिथं ही मोडतोड किरकोळ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 05/16/2012 - 11:19

In reply to मी तोडफोडीचे समर्थन केलेले by JAGOMOHANPYARE

Permalink

राष्ट्राचे तुकडे करायला

राष्ट्राचे तुकडे करायला समर्थन देणार्‍या व्यक्तिची हत्या झाली अन हत्यार्‍याला अन त्याच्या जातीच्या लोकांना शिक्षाही झाली. तो वेगळा विषय आहे. मला एक सांगा, तुम्ही ते व्यंगचित्र स्वतः पाहीलंय का? दुसरं म्हणजे गांधी काय आंबेडकर काय हे राजकिय अन सामाजिक पुढारी होते... वर त्या चित्रात काय होतं हे लिहिलंय त्यावरुन का होईना अवमानकारक काय होतं हे सांगितलं तर बरं होईल. देशाची घटना लिहिणार्‍या व्यक्तीचा मुद्दाम अपमान करावा असं कोणालाही वाटणार नाही...यात जातीचा प्रश्नच येत नाही...जाणुनबुजुन आणला जातोय. अन ही मोडतोड किरकोळ आहे असं म्हणुन तुम्ही समर्थनच तर देताहात.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 11:29

In reply to राष्ट्राचे तुकडे करायला by शिल्पा ब

Permalink

मी ते व्यंगचित्र पाहिले

मी ते व्यंगचित्र पाहिले आहे. तुम्हाला हवे असेल तर इथे आहे.......... http://www.theunrealtimes.com/2012/05/13/maneka-gandhi-now-protests-against-ncert-ambedkar-cartoon-for-cruelty-to-snails/ http://hayekorder.blogspot.in/2012/05/snail-cartoon-on-b-r-ambedkar-and-nehru.html (लिंक केवळ चित्रे बघण्यासाठी दिली असे. त्यातील लिखाणाशी आमचा संबंध नाही म्हणून दिले प्रतिज्ञापत्र. :) )
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 05/16/2012 - 11:41

In reply to मी ते व्यंगचित्र पाहिले by JAGOMOHANPYARE

Permalink

चित्र पाहीलं. त्यात अवमानकारक

चित्र पाहीलं. त्यात अवमानकारक काहीही नाही... राजकीय स्वार्थासाठी गोंधळ माजवणं चाललंय.. अवांतरः वरच्याच लिंकमधे आता मेनकाबै त्या व्यंगचित्रात गोगलगायीवर माणुस बसुन तिला हाकतोय असं असल्याने आता गोगलगायींच्या क्रुरतेविरुद्ध प्रोटेस्ट (?) करणार आहेत म्हणे!! काय तरी एकेक नग भरलेत संसदेत!!
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 05/16/2012 - 11:55

In reply to चित्र पाहीलं. त्यात अवमानकारक by शिल्पा ब

Permalink

>> काय तरी एकेक नग भरलेत

>> काय तरी एकेक नग भरलेत संसदेत!! -- संसदेमध्‍ये गुपचूप विषारी साप सोडून आले पाहिजे ! मग कळेल कसं असतं ते :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 11:58

In reply to >> काय तरी एकेक नग भरलेत by यकु

Permalink

अरे रे !

संसदेमध्‍ये गुपचूप विषारी साप सोडून आले पाहिजे ! मग कळेल कसं असतं ते
सापाला विनाशाच्या खाईत लोटण्याच्या प्रयत्नाचा तिव्र निषेध ! तिथल्या कोणाला चावला तर सापच मरायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/16/2012 - 12:15

In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

केवढे हे क्रौर्य!

सापाविरुद्ध केवढे हे क्रौर्य!
  • Log in or register to post comments

Submitted by कापूसकोन्ड्या on गुरुवार, 05/17/2012 - 10:03

In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

संसदेमध्ये विषारी साप?

खरं म्हणजे ज्यावेळी अफझलने संसदेवर हल्ला केला तेव्हा किमान अर्धे खासदार तरी त्यातून वाचायला नको होते. संरक्षण करताना हकनाक बळी गेलेल्या शूर शिपायांना सद्गती तरी मिळाली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on गुरुवार, 05/17/2012 - 19:32

In reply to संसदेमध्ये विषारी साप? by कापूसकोन्ड्या

Permalink

-

सहमत. अर्धे नाही, सगळेच.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 05/16/2012 - 12:58

In reply to मी ते व्यंगचित्र पाहिले by JAGOMOHANPYARE

Permalink

कार्टूनची लिंक दिल्याबद्दल

कार्टूनची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.. कार्टूनमुळे अपमान होतोय की नाही हा मुद्दा वेगळा.. पण कार्टून इतके काही छान नाही.. ( गणिताच्या पुस्तकातली शि. द. फडणीसांची चित्र खूप छान असायची.. ) आणि पाठ्यपुस्तकात हे कार्टून नक्किच सूट होत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/16/2012 - 13:20

In reply to कार्टूनची लिंक दिल्याबद्दल by बाळ सप्रे

Permalink

व्यंगचित्र हे व्यंगचित्रासारखंच असणार

ते संदर्भ सोडून बघीतलं जातयं म्हणून अवमानकारक वाटतय. `घटना तयार करायला ऊशीर होतोय म्हणून नेहरू रागावले आहेत' असा संदर्भ आहे. त्या वेळची वस्तुस्थिती विनोदी अंगानं दाखवल्यामुळे तसं कार्टून आहे त्यात कुणा व्यक्तीच्या (किंवा गोगलगायीच्या) अवमानाचा उद्देश नाही. अनेक जण कार्टून मधल्या व्यक्ती कशा दिसतात या अ‍ॅंगलनं बघतायंत त्यामुळे त्यांना ते अवमानकारक वाटत असावं.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 13:23

In reply to व्यंगचित्र हे व्यंगचित्रासारखंच असणार by संजय क्षीरसागर

Permalink

संजय साहेब

अहो जे घरातून निघतानाच 'काही झाले तरी मी बरोबर आहे, आणि कुठल्याही पुराव्यांपेक्षा माझी निष्ठा श्रेष्ठ आहे' असे ठरवूनच बाहेर पडलेले असतात, त्यांच्याशी वाद घालून काही उपयोग आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/16/2012 - 13:48

In reply to संजय साहेब by परिकथेतील राजकुमार

Permalink

पण मी काय म्हणतो, आधी घरातनं

पण मी काय म्हणतो, आधी घरातनं निघावंच कशाला माणसानं?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/16/2012 - 13:50

In reply to पण मी काय म्हणतो, आधी घरातनं by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हो ना!

ऊन तर "मी" म्हणतंय!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/16/2012 - 14:32

In reply to हो ना! by पैसा

Permalink

लै खास!

पण घरात बसून काय करायच? हा प्रश्न आहेच ना!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 15:21

In reply to पण मी काय म्हणतो, आधी घरातनं by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अरे ?

पण मी काय म्हणतो, आधी घरातनं निघावंच कशाला माणसानं?
आता सकाळी उठून स्वतःच्या घरी जायला नको का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 05/16/2012 - 19:35

In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

ठ्ठो!!!

कोणाला कशाच अन बोडकीला... :D - (सकाळी स्वत:च्याच घरी जाग येणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 11:48

In reply to मी तोडफोडीचे समर्थन केलेले by JAGOMOHANPYARE

Permalink

अगदी अगदी.

आणि तसेही या देशात दुसर्‍याचे मत पटले नाही तर साक्षात राष्ट्रपित्यालाही गोळी घालायची आणि त्याचे समर्थन करायची प्रथा आहे.
साला मिपावरती ही पद्धत का नाही ? निदान गोळी नाहीतर नाही, पण कंबरड्यात लाथ घालून हाकलून द्यायचे तरी स्वातंत्र्य हवे होते. असो.. Some people are still alive because it's against the law to kill them.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 12:08

In reply to अगदी अगदी. by परिकथेतील राजकुमार

Permalink

असे स्वातंत्र्य मालकाना,

असे स्वातंत्र्य मालकाना, संपादकाना असते.. कुणाही सोम्यागोम्याला असे स्वातंत्र्य नसते. -- सोम्याकथेतील गोमासुमार.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 12:14

In reply to असे स्वातंत्र्य मालकाना, by JAGOMOHANPYARE

Permalink

असे कसे ?

असे स्वातंत्र्य मालकाना, संपादकाना असते.. कुणाही सोम्यागोम्याला असे स्वातंत्र्य नसते.
अहो ज्यांचे व्यंगचित्र काढले गेले त्यांनी आक्षेप नोंदवला नाही त्यावेळी, पण आता त्यांचे नाव घेउन काही लोकं आपली अक्कल पाजळत आहेतच की आणि आक्षेप देखील नोंदवत आहेत. काही लोक लाठ्या काठ्या घेऊन, तर काही आंतरजालावरती कीबोर्ड बडवून. आता आंतरजालावरती जर अशी बेअक्कल लोकं आक्षेप नोंदवू शकतात तर मग सोम्या गोम्यानेच काय घोडे मारले आहे ? मारोपिछेसेसारे
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 12:20

In reply to असे कसे ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

हायला, असेच म्हणायचे झाले तर

हायला, असेच म्हणायचे झाले तर हुसेनच्या चित्रावर सरस्वती देवीनेही आक्षेप घेतलेला नाही. त्याचं काय करणार? -- पराकुटील पिछेसेमार
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 05/16/2012 - 12:23

In reply to हायला, असेच म्हणायचे झाले तर by JAGOMOHANPYARE

Permalink

आंबडकर नागवे अन विकृत दाखवले

आंबडकर नागवे अन विकृत दाखवले आहेत का त्या व्यंगचित्रात?
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 05/16/2012 - 12:24

In reply to आंबडकर नागवे अन विकृत दाखवले by शिल्पा ब

Permalink

बाऊंड्रीच्या बाहेर !!

बाऊंड्रीच्या बाहेर !!
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 12:29

In reply to आंबडकर नागवे अन विकृत दाखवले by शिल्पा ब

Permalink

विकृत दाखवायला नागवेच दाखवाला

विकृत दाखवायला नागवेच दाखवाला हवे असे नाही.. हे चित्र नागवे नाही. विकृत आहे की नाही हे ज्याच्या त्याच्या नजरेवर अवलंबून आहे. तुम्हाला हे चित्र हवे असेल तर भाजपाकडून छापवून घ्या आणि वाचा. आम्ही कुठे नको म्हणतोय? तुमच्या स्वातंत्र्याचाही आदर आहे. -- टंका ब्र
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 05/16/2012 - 12:39

In reply to विकृत दाखवायला नागवेच दाखवाला by JAGOMOHANPYARE

Permalink

छापवुन घ्यायला भाजपा कशाला

छापवुन घ्यायला भाजपा कशाला हवंय? लिंक तुम्हीच दिलीये की! विकृती नजरेत असते असं तुम्हीच म्हणताय...म्हणजे दोन्हीकडुन बोलायचं पण विचार मात्र करायचा नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 12:44

In reply to छापवुन घ्यायला भाजपा कशाला by शिल्पा ब

Permalink

सॉरी, वाक्यरचना चुकली. ज्याना

सॉरी, वाक्यरचना चुकली. ज्याना व्यंगचित्र योग्य वाटते त्यानी भाजपाकडून व्यंगचित्रे असलेली पुस्तके छापून घ्यावीत असे मला म्हणायचे आहे.. दोन आवृत्त्या छापायच्या. व्यंगचित्र नसलेली आवृत्ती सरकार छपेल कारण बहुसंख्याना ते चित्र नको आहे.. ज्याना हवे आहे, त्यांच्यासाठी भाजपा एडिशन काढू दे. २ % भ्रमवृंदाच्या करमणुकीसाठी सरकारी पैसा का खर्चायचा असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 05/16/2012 - 13:30

In reply to सॉरी, वाक्यरचना चुकली. ज्याना by JAGOMOHANPYARE

Permalink

बहुसंख्याना ते चित्र नकोय हे

बहुसंख्याना ते चित्र नकोय हे तुम्ही कस ठरवलं?
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 13:43

In reply to बहुसंख्याना ते चित्र नकोय हे by अनुप ढेरे

Permalink

मी कुठे ठरवलं? सरकारनंचं

मी कुठे ठरवलं? सरकारनंचं लोकानी दर्शवलेला विरोध पाहून चित्र वगळलं.. चित्र नको हे सांगणारे जसे पुढे आलेत, तसेच चित्र पाहिजेच आहे हेही सांगणारे लोक तर पुढे यायला हवेत ना? तसे आले का कुणी? आले असतील, आणि त्यांचीही संख्या जास्त असेल तर सरकारही त्यांच्यासाठी वेगळी एडिशन काढेल कदाचित.. नाहीच जमलं सरकारला, तर भाजपा आहेच की.. त्यांच्याकडून घेऊया छापून.. पण जे होईल ते शांततेने आणि आनंदाने व्हावे, नै का?
  • Log in or register to post comments

Submitted by कवटी on गुरुवार, 05/17/2012 - 09:48

In reply to मी कुठे ठरवलं? सरकारनंचं by JAGOMOHANPYARE

Permalink

यात भाजपाचा आणि २%

यात भाजपाचा आणि २% ब्रम्हवृंदाचा काय संबंध आहे ते स्पष्ट करणार का? पुस्तक छापले सरकारने (जे काँग्रेसचे आहे), प्रताप आसबे वगैरे (जे शरद पवार व पर्यायाने राष्ट्रवादीच्या जवळचे) लोकांनी त्याचे समर्थन केले मग तुम्ही सारखे भाजपचे नाव का घेताय? का आपल काहीही झाले की या दोघांना शिव्या घालून कंडू शमन चालू आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग on Wed, 05/16/2012 - 19:24

In reply to सॉरी, वाक्यरचना चुकली. ज्याना by JAGOMOHANPYARE

Permalink

चालू झाला परत टुक्कार पळपुटा

चालू झाला परत टुक्कार पळपुटा शब्दच्छल...
  • Log in or register to post comments

Submitted by कवटी on गुरुवार, 05/17/2012 - 15:55

In reply to सॉरी, वाक्यरचना चुकली. ज्याना by JAGOMOHANPYARE

Permalink

२ % भ्रमवृंदाच्या करमणुकीसाठी

२ % भ्रमवृंदाच्या करमणुकीसाठी सरकारी पैसा का खर्चायचा असे मला वाटते. २% ब्रह्मवृंदांच्या "करमणुकीसाठी" हे पुस्तक सरकारने पैसे घालून छापून घेतलय हा शोध कुठून लावलात? मुळ लेखात भाजपाने पुस्तक मागे घेण्याचे समर्थन केले म्हणून लेखक/ प्रसिद्धी माध्यमे बोंबलतायत आणि तुमच्या ओळीन ४-५ प्रतिसादात असे दिसतय की जणू भाजपानेच हे पुस्तक छापून घेतलय.... जामोप्या, तुझ्या वाकडेपणाला सलाम.... तेवढ शोध कुठून लावला ते नक्की सांगा बरका.
  • Log in or register to post comments

Submitted by कौतिक राव on Fri, 05/18/2012 - 12:18

In reply to सॉरी, वाक्यरचना चुकली. ज्याना by JAGOMOHANPYARE

Permalink

अल्पसन्ख्य समाज

आज आप्ल्या देशात अल्पसन्ख्य समाज (धर्म या सन्दर्भात) हा सग्ळ्यात सेफ आहे आणि अल्पसन्ख्य जात सगळ्यात जास्त अनसेफ आहे... असे का असावे बरे?
  • Log in or register to post comments

Submitted by अजातशत्रु on Wed, 05/16/2012 - 16:17

In reply to आंबडकर नागवे अन विकृत दाखवले by शिल्पा ब

Permalink

हुसेनजींचे शल्य

पण हुसेनला मारहाण झाल्याचे, त्याच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे, ते चित्र मागे घ्यायला त्याच्यावरती दबाव आल्याचे कुठे ऐकण्यात नाही बॉ. बाकी आता तुम्ही चर्चेचा मुद्दा सोडून फाटे फोडायला लागल्याने तुमचा पाठलाग बंद केला आहे.
'डबक्यात' बातम्या पोहचत नाहीत असे दिसते.. मान. हुसेनसाहेब जीवे मारण्याच्या धमकीमुळे घाबरुन "मायदेशात" येत नव्हते. बिचार्‍यांचा शेवटहि तीथेच झाला बिचारे सलत राहिले असतील शेवटच्या क्षणी :-(
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 17:37

In reply to हुसेनजींचे शल्य by अजातशत्रु

Permalink

काय ह्या कल्पना...

श्री 'अ'जात शत्रु
'डबक्यात' बातम्या पोहचत नाहीत असे दिसते..
आपली ज्ञानप्राप्ती तिथे झाली म्हणजे सगळे तिथलेच रहिवासी असतात असे नाही. अर्थात 'विहिरीतल्या आणि त्यापण गावकुसाबाहेरच्या बेडकाला बाहेरचे जग माहिती नसते' ह्या न्यायाने तुम्हाला असेच विचार सुचणार म्हणा.
मान. हुसेनसाहेब जीवे मारण्याच्या धमकीमुळे घाबरुन "मायदेशात" येत नव्हते.
काय सांगता काय ? मग तुम्ही काही प्रयत्न वैग्रे केलेत का नाही त्यांच्या रक्षणाचे ? निदान ह्या धमकी देणार्‍यांच्या कार्यालयाची तोडफोड, त्यांना मारहाण, पुस्तके वैग्रे जाळणे ? गेला बाजार संसदेत आवाज उठवायला लावणे वैग्रे ? निदान तुम्ही ह्या धमकीचा धिक्कार म्हणून चपला घालणे तरी नक्की सोडले असेल, हो ना ?
बिचार्‍यांचा शेवटहि तीथेच झाला बिचारे सलत राहिले असतील शेवटच्या क्षणी
घराच्या अंगणात एक कबर घ्या बांधून त्यांची. अधे मध्ये हळहळ वाटली की घ्यायची फुले वाहून.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 19:55

In reply to काय ह्या कल्पना... by परिकथेतील राजकुमार

Permalink

'विहिरीतल्या आणि त्यापण

'विहिरीतल्या आणि त्यापण गावकुसाबाहेरच्या बेडकाला बाहेरचे जग माहिती नसते' ------------------------------- आणि गावातल्या विहिरीतल्या बेडकाला बाहेरचे जग माहीत असते का हो? अजुन गाव नि गावकूस डोक्यातून गेलं नाही आणि समुद्राच्या गप्पा कशाला ठोकताय? -- रहाटगाडग्यातील गांडूळ्कुमार &%& चरा &%& आमचे राज्य All frogs have happy wells.
  • Log in or register to post comments

Submitted by अजातशत्रु on Sat, 05/19/2012 - 16:30

In reply to 'विहिरीतल्या आणि त्यापण by JAGOMOHANPYARE

Permalink

रहाटगाडग्यातील गांडूळ्कुमार

अजुन गाव नि गावकूस डोक्यातून गेलं नाही आणि समुद्राच्या गप्पा कशाला ठोकताय? -- रहाटगाडग्यातील गांडूळ्कुमार &%& चरा &%& आमचे राज्य All frogs have happy wells. ********************
+९९ _/\_ हे सुचले नव्हते, लय भारी पायचीत :-) . . . . . . (गटारातील मांडूळकुमार)
  • Log in or register to post comments

Submitted by कौतिक राव on Fri, 05/18/2012 - 12:33

In reply to हुसेनजींचे शल्य by अजातशत्रु

Permalink

माती खा

अशी माती खाता ना नेहमी म्हणुन तुम्हाला शत्रू नाहीत.. अधी हा दुवा वाचा http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-campaign/ हे वाचा: Out of the four leaders, M. Gandhi is decapitated and Hitler is naked. Husain hates Hitler and has said in an interview 8 years ago that he depicted Hitler naked so as to humiliate him as he deserves it ! How come Hitler's nudity caused humiliation when in Husain's own statement nudity in art depicts purity and is in fact an honour ! This shows Husain's hypocrisy and perversion मग सान्गा तुमचा हुसेन कसा होता ते.. आणी ही माती खाने कमी करा
  • Log in or register to post comments

Submitted by अजातशत्रु on Fri, 05/18/2012 - 12:54

In reply to माती खा by कौतिक राव

Permalink

तुम्ही काय खाता याच्याशी आम्हाला देणे- घेणे नाही.

आणि त्याचे कौतुकही नाही :-) मात्र मला स्वतःची मतं आहेत, अशा लिंका फिंका वाचून मी माझे मतं बनवत नसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अजातशत्रु on Wed, 05/16/2012 - 16:23

In reply to आंबडकर नागवे अन विकृत दाखवले by शिल्पा ब

Permalink

सरस्विटीला तरी कुठे 'नागवे' दाखविले होते?

आंबडकर नागवे अन विकृत दाखवले आहेत का त्या व्यंगचित्रात?
सरस्विटीला तरी कुठे 'नागवे' दाखविले होते? नागवेपणा हा बघणर्‍याच्या 'डोळ्यात' असतो..:-) ता.क. ज्यांना कलाकृतीतले काही कळत नाही त्यांनी रविवर्म्याची चित्रे पाहण्याचे धाडस करु नये
  • Log in or register to post comments

Submitted by इस्पिक राजा on Wed, 05/16/2012 - 16:35

In reply to सरस्विटीला तरी कुठे 'नागवे' दाखविले होते? by अजातशत्रु

Permalink

आपण शिवधर्मी का काय ते

आपण शिवधर्मी का काय ते दिसताय.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 05/16/2012 - 16:46

In reply to आपण शिवधर्मी का काय ते by इस्पिक राजा

Permalink

आणि मी कोण हो? रिपब्लिक

आणि मी कोण हो? रिपब्लिक काय? --- किलवर अठ्ठी
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com