Skip to main content

टवाळा आवडे विनोद ???

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 16/05/2012 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
टवाळा आवडे विनोद ??? आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या. इंदिरा गांधी चे मुद्दाम उदाहरण देण्याचे कारण म्हणजे त्याना तथाकथित लोक हुकुमशहा म्हणत असत. आपल्या संसदेची साठ पुर्ण होत असताना साठी बुद्धी नाठी म्हणावे तसे वर्तन घडले आहे. १९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले. टू जी च्या प्रकरणात उलट्या सुलट्या कोल्यांट्या मारून अजिबात न डगमगडारा कपिल सिब्बल सारखा माणुस सुद्धा प्रचंड दहशती खाली होता. वात्सविक हा मुद्दा मांडण्यारा खासदांराची समजूत काढण्याऐवजी भाजप सारखा ’जबाबदार विरोधी पक्ष ' सुध्दा 'फिशींग इन ट्र्बल्ड वॉटर' असा वागत होता.आता त्या नव्हे तर सर्व पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रे काढण्याचा फतवा निघेल. आणि सर्वात वाईट आणि धोकादायक म्हणजे या फतव्याला विरोध करणारा हा आंबेडकर विरोधी ठरेल. मोदींचे कौतुक करणारा जातीयवादी, इंदिरा गांधी बद्दल चार चांगल शब्द बोलले तर तो लोकशाही विरोधी, पुतळा हलविला ते बरे केले असे म्हणले की तो ब्राह्मण विरोधी अश्या ब्लॅक आणि व्हाईट रंगामध्ये रंगविले जाणार.मग मोर्चे सभा बंद तोडफोड चे चालूच. खुन, मारामार्या, बलात्कार, भ्रष्टाचार याबद्दलच्या भावना बोथट होत असून जात, भाषा, प्रांत, आणि इतिहासातील मोठी माणसे यांच्या बद्दलच्या संवेदना चुकीच्या पद्ध्तीने टोकदार होत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहीजे. महाराष्ट्र टाईम्स च्या अंकात http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13142817.cms प्रताप आसबे यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे.

वाचने 26615
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

अरेरे!!! कीती आकांड तांडव करताहात!! मुद्दे नसल्यावर लोकं व्यक्तिगत चिखलफेक करतात हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
व्यक्तिगत चिखलफेकीचा आरोप हे वरच्या प्रतिसादात राहून गेले, मी कधिही असा कांगावा केलेला नाही, व्यक्तिगत आरोप/चर्चा कोण करते हे इथल्या प्रतिसादांवरुनही सहज कळेल इथे किंवा इतर संस्थळांवर जरी लोक माझे नाव घेऊन बोलतात, मला चर्चा करायची असते धुळवड खेळायची नसते. शह -काटशह देण्याच्या नादात मग आपण काहीही बरळू लागतो आणि शेवटचा "वार" म्हणून हे व्यक्तिगत आरोपांचे हत्यार उपसतो.त्यात काहि नवल नाही. असो मला माझा 'ढ'पणा आणखी सिद्ध करायचा नाही. हा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by अजातशत्रु

बरं!!! पण हुशारपणा दाखवुन मुळ मुद्यावर तर या!! बाकी व्यक्तिगत कोण झालंय हे प्रतिसादांवरुन कळतंच आहे याच्याशी सहमत.

In reply to by अजातशत्रु

भाजप शत्रू, अहो, तुम्हाला मुद्देसूद बोलता येत नाही हे समजू शकते, पण साधे स्त्री दाक्षिण्या सुद्धा दाखवता येवु नये म्हणजे कमाल झाली बुवा.. बाइ माणसाला काय अप्शब्द लिहिले आहेत.. अरेरे.. किबोर्ड हातात आला म्हणून काहिहि लिहित सुटलात वाटते..

In reply to by अजातशत्रु

>>आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. -- अर्थात. आणि हे मातृत्व जिथुन जिथुन स्त्रवते त्याला नाकरणे हा त्या मातृत्वाचा अपमान आहे... पण हि त्या मातृत्वाचीच थोरवी आहे कि ती मुलांचे कुठलेही अपराध माफ करते. >>उदा.देताना इतर शुल्लक खाण्या- पिण्याचे आणि प्राण्यांचे दाखले देणे त्या मातेच्या मातृत्वाचा अपमान आहे असे आम्ही समजतो. -- ह्म्म्म. ज्या अन्नावर पोषण होतय, ते क्षुल्लक. जे प्राणि ते अन्न पुरवतात ते क्षुल्लक. तरीच या देशातले शेतकरी फार जास्त सुखात आहेत. भरल्या पोटी पब्लीकला असे दिव्य विचार सुचतील तर का नहि म्हणा. >>शेवटि दोष स्त्रियांनाच (सूनेला) ना? शाब्बास.. मुलगे तर आसवे गाळून सुनेच्या हाता-पाया पडून पक्षि लोटांगण घालून वृद्धाश्रमात पाठवू नकोस म्हणून पत्नीपुढे गयावया करत असतात -- हा दोष मी देत नाहिए, सासवांना आणि सुनांन त्रास कुणाकडुन होतो ते त्यांच्याकडुनच जाणुन घ्या. शिवाय या सगळ्याचा मातृत्व भावनेच्या भव्यतेशी काहि संबंध नाहि.

In reply to by अर्धवटराव

आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. हे मान्य करावेच लागते..:-)
आणि हे मातृत्व जिथुन जिथुन स्त्रवते त्याला नाकरणे हा त्या मातृत्वाचा अपमान आहे... पण हि त्या मातृत्वाचीच थोरवी आहे कि ती मुलांचे कुठलेही अपराध माफ करते.
वर पुरेसे स्पष्ट झालेले आहे,तरीहि पुन्हा गाडी त्याच रुळावर?
ह्म्म्म. ज्या अन्नावर पोषण होतय, ते क्षुल्लक. जे प्राणि ते अन्न पुरवतात ते क्षुल्लक. तरीच या देशातले शेतकरी फार जास्त सुखात आहेत. भरल्या पोटी पब्लीकला असे दिव्य विचार सुचतील तर का नहि म्हणा.
आता शेतकर्‍यांचा उमाळा :-) शेतकरी अन्न पुरवतो/ पिकवतो ते त्याचे कर्म आहे आणि त्याचे फळ/ मोबदला त्यास मिळत असतो, माता आणि तीचे मातृत्व यात कर्म सिद्धांत येत नाही, तीचे मुलांसाठीचे प्रेम, संगोपन जे काही , हे निर्व्याज्य असते. मुलांनी काहि द्यावे, वृद्धावस्थेत सांभाळावे असे काही नसते. तुमचे दिव्य इचार वाचून ड्वॉळे पानावले
हा दोष मी देत नाहिए, सासवांना आणि सुनांन त्रास कुणाकडुन होतो ते त्यांच्याकडुनच जाणुन घ्या. शिवाय या सगळ्याचा मातृत्व भावनेच्या भव्यतेशी काहि संबंध नाहि.
तुम्हि सासु-सुनांचे डेली सोप फार गंभिरपणे पाहता असे दिसते,:-) मुलग्याचा रोल महत्वाचा असतो, मी रक्ताच्या मातृत्वा विषयीचा दांभिकपणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, अर्थात तुम्हाला त्याचे महत्व किती यावर सर्व अवलंबून असते. . . . . . . . . ( विवाहित आणि सुखी )

In reply to by अजातशत्रु

>>आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. हे मान्य करावेच लागते.. -- हॅ हॅ हॅ. म्हणुनच तुम्ही कुठल्याली नावाने हाका मारा, तिचे मातृत्व आटत नाहि हा मुख्य मुद्दा. >>वर पुरेसे स्पष्ट झालेले आहे,तरीहि पुन्हा गाडी त्याच रुळावर? -- ते स्पष्ट झालय होय... चला.. मुद्दा पटला म्हणायचा. >>आता शेतकर्‍यांचा उमाळा. शेतकरी अन्न पुरवतो/ पिकवतो ते त्याचे कर्म आहे आणि त्याचे फळ/ मोबदला त्यास मिळत असतो, -- आता तुम्हाला अन्न क्षुल्लक वाटलं... तर म्हटलं बघावं थोडा शेतकर्‍यांचा कैवार घेऊन. >>माता आणि तीचे मातृत्व यात कर्म सिद्धांत येत नाही, -- कर्मसिद्धांतवर बोलायचं म्हणताय... बघा बुआ... नाहितर आम्हालाच म्हणाल कि आता कर्मसिद्धांताचा उमाळा आला म्हणुन. >>तीचे मुलांसाठीचे प्रेम, संगोपन जे काही , हे निर्व्याज्य असते. -- म्हणुनच तुमच्या "सरस्विटी" या दिव्य नावाचं कौतुक केलं ना आम्हि. >>मुलांनी काहि द्यावे, वृद्धावस्थेत सांभाळावे असे काही नसते. तुमचे दिव्य इचार वाचून ड्वॉळे पानावले -- हॅ हॅ हॅ. आपले दिव्य विचार दुसर्‍याच्या हवाली करण्याचा तुमच्या मनाचा मोठेपणा बघुन आमचे डोळे थोडेफार पाणावलेच बघा. असते प्रतिभा एकेकाची. >>तुम्हि सासु-सुनांचे डेली सोप फार गंभिरपणे पाहता असे दिसते, -- नाहि बॉ. तुमचे वृद्धाश्रमावरचे विचार वाचले... म्हटलं आपलेही दोन पैसे टाकावे... >>मुलग्याचा रोल महत्वाचा असतो, मी रक्ताच्या मातृत्वा विषयीचा दांभिकपणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, अर्थात तुम्हाला त्याचे महत्व किती यावर सर्व अवलंबून असते. -- मी मातृत्वाच्या भव्यतेची, तिच्या क्षमाशिलतेची थोरवी गायचा प्रयत्न करतोय. त्याचे तुम्हाला महत्व असावे असं पुर्वग्रह लक्षीत/दुर्लक्षीत धरुन चालतोय.. कसं... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

हॅ हॅ हॅ. म्हणुनच तुम्ही कुठल्याली नावाने हाका मारा, तिचे मातृत्व आटत नाहि हा मुख्य मुद्दा.
तुलना प्रतिकांमधे चालू होती ना ...नावाचा मुद्दा कसा काय आला? :stare: इतर प्रतिवादहि याच पठडितले तेव्हा ..आणखी पुढे हा हा हू हू करण्यात स्वारस्य नाही. असो . . . . . . (:tired:)

In reply to by अजातशत्रु

प्रतिके वगैरे विषय काढुन ( आधीच भरकटलेला) धागा (अधीक) भरकटवाचा आमचा अजीबाद (कु)उद्देश नव्हता. तुम्ही ज्याप्रेमाने (वा कुठल्याही भावनेने) "सरस्विटी" हे नाव वापरले ते आम्हाला प्रचंड भावले आणि आम्हि त्याचीच दाद दिली. अर्धवटराव

In reply to by अजातशत्रु

तेवढं ते २ % ब्रह्मवृंदाच्या करमणूकीसाठी ते पुस्तक छापल होत आणि पुस्तक छापायच्या मागे भाजपचा हात होता त्याचे पुरावे देतायना? नाही म्हण्जे तुम्ही पुरावे शोधत असाल आणि त्याला वेळ लागेल हे मान्य. पण इकडच्या कुजकट लोकांच्या नासक्या प्रतिक्रीयांना उत्तरे देतादेता विसराल म्हणून आठवण केली.

In reply to by कवटी

अहो हे असले वाचाळ लोक .. यान्ना आज काय बोल्ले ते उद्या विचारले तर आठवणार नाही... आणि कणीतरी सान्गुन गेलेच आहे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.. म्हणून ही लोक क्रिया कराय्च्या ऐवजी प्रतिक्रिया करतात.. आणि त्याचे परिणाम अल्प्सन्ख्य असलेल्या तुमच्या ब्रह्मवृंदाना भोगावे लागतात..

In reply to by JAGOMOHANPYARE

हायला, असेच म्हणायचे झाले तर हुसेनच्या चित्रावर सरस्वती देवीनेही आक्षेप घेतलेला नाही. त्याचं काय करणार?
पण हुसेनला मारहाण झाल्याचे, त्याच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे, ते चित्र मागे घ्यायला त्याच्यावरती दबाव आल्याचे कुठे ऐकण्यात नाही बॉ. बाकी आता तुम्ही चर्चेचा मुद्दा सोडून फाटे फोडायला लागल्याने तुमचा पाठलाग बंद केला आहे. भागोमोहनप्यारे

In reply to by JAGOMOHANPYARE

>>>>>हायला, असेच म्हणायचे झाले तर हुसेनच्या चित्रावर सरस्वती देवीनेही आक्षेप घेतलेला नाही. त्याचं काय करणार? हाच न्याय सगळीकडे लावायचा म्हणाल तर डॅनिश वृत्तपत्रामध्ये जेव्हा पैगंबरांचे व्यंगचित्र छापले गेले होते, तेव्हा तरी कुठे पैगंबरांनी आक्षेप घेतला होता? तरी पण झालीच ना जगभर जाळपोळ...?

In reply to by JAGOMOHANPYARE

एकच प्रश्न तुम्हाला स्वताला त्या व्यंगचित्रामधे काय खटकले ते फक्त सान्गाल काय? (माझी बुध्धी कदाचित कमी पडते आहे त्या व्यंगचित्रामधले वाइट शोधायला) मला पण पटले तर मी सुध्धा निषेध करीन

In reply to by JAGOMOHANPYARE

बहु संख्यांचे म्हणणे चित्र नको असे असेल तर सरकारचा पैसा, कागद, शाई का व्यर्थ वाया घालवायची? भाजपाने स्वतःच्या खर्चातून अशी एडिशन छापावी आणि जनतेला वाटावी.
सगळेच निर्णय बहुमताने घ्यायचे का आता ? मग असे करूया, पुढील अभ्यासक्रम कसा असावा हे ठरवण्यासाठी देशव्यापी कौल काढूया डीटेल. आणि अहो आधीच छापून झालेल्या पुस्तकांमुळे पैसा वाया कसा जाईल ? उलट ते व्यंगचित्र काढून टाकण्यासाठी इतकी पुस्तके परत प्रिंट करावी लागतील. आता तुमच्याच तर्कशास्त्राप्रमाणे हा खर्च कुणी करायचा? बसप ने ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बहुसंख्य पुस्तकाना कसला विरोध होत नाही, याचा अर्थ ती बहुसंख्याना मान्य असतातच. कौल काढायची गरज नसते. पाठ्यपुस्तके एकदम ५० वर्शाची नसतात छापत, ज्या त्या वर्षाचीच असतात.. फारसे नुस्कान होणार नाही. काळल्जी नसावी.

In reply to by JAGOMOHANPYARE

मे महिना अर्धा झाला. पुढच्या वर्षीची पुस्तके छापून तयार असतील असा माझा अंदाज आहे. करणार बसप खर्च ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बहु संख्यांच्या जागी बहुजन वाचावे. बहु संख्यांचे म्हणणे असेही आहे कि, 'शिवाजीच्या बदनामीची केंद्रे' हे पुस्तक पाठ्यक्रमास लावावे. जेणेकरुन मुलांना इतीहास हा विषय 'समजून' घेणे सोप्पे जाईल, असे काल कुणी तरी चेपुवर बोलत होते, छपाई खर्च अर्थात ब्रिगेडच करेल. इथल्या काहि स्वयंघोषित विद्वानांना " खेडेकरांचे - शिवाजीच्या बदनामीची केंद्रे" या पुस्तकाचा सोयीस्करपणे विसर पडलेला आहे असे दिसतेय. त्यामुळे आठवण करुन दिली , बाकि काही नाही :-) . . . . . . ( हुसेन भक्त टरकूराम )

In reply to by अजातशत्रु

बहु संख्यांचे म्हणणे असेही आहे कि, 'शिवाजीच्या बदनामीची केंद्रे' हे पुस्तक पाठ्यक्रमास लावावे.
कोण हे बहुसंख्य ? मुठभर ब्रिगेडी कुठल्याही समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. उगाच स्वत:च स्वत:ला बहुसंख्य म्हणून घ्यायचे म्हणजे कमाल आहे. पार्श्वभागाला गोमय लावल्याने वृषभ होता येत नाही राव !!
छपाई खर्च अर्थात ब्रिगेडच करेल.
करेल नाही तर काय. हरामाचा पैसा आहे, हरामखोरीच्या कामीच खर्च होईल.

In reply to by कौतिक राव

शेणाचा पो हा शेणाचा पो असतो, मग ते शेण कुठल्या गाईचे किंवा बैलाचे आहे त्यात मला रस नाही :-) शेणाचा पो जमीन सारवायच्या किंवा खत बनवण्याच्या तरी कामी येतो. इथे त्याची उपमा दिल्याने त्याचा अपमान झाला असल्याने मी समस्त शेणाच्या पोंची माफी मागतो.

सरकार आठवले आदि मंडळींचा छान वापर करुन घेते. अडचणीत सापडले कि असं काहितरी काढायचं. गेली ६ वर्ष हे चित्र आहे. आत्ताच कसे हे जागे झाले?

एकदा का 'अबक' खतरे मे है' अशी आरोळी दिली की शहानिशा न करता झुंज सुरू करायची अशी आपली प्रंपराच हाये नाहि का?' अबक' सतत बदलत असतात इतकेच!

त्या काळातले व्यंग चित्र त्याचे संदर्भ निराळे आताच्या काळात ते संदर्भ लागु पडत नाहि.. मात्र जुन्या काळातिल प्रथा परंपरा याम्चे आज ते जुने संदर्भ देऊन ओकलेली गरळ चालते.. ते नको तर हे पण बंद करा..

एकदम टाईमपास 'ईश्यु' आहे.व्यंगचित्रविरोधवाल्यांनी ईश्यु आणखी दोन दिवस ताणून धरावा. म्हणजे रविवारच्या पुरवण्यात खालील विषयांवर लेख पाडता येतील- १)घटना- तिचा उद्देश. २)कोणी किती मेहनत घेतली ह्यावर एक लेख. ३)ईतकी वर्षे विरोध का नाही केला ह्यावर एक लेख(झोपले होते काय ? ). ४)हे प्रश्न चर्चेच्या माधमातूनच सुटु शकतील ह्यावर एक (युरोप्/अमेरिकेचे उदाहरण देत) एक लेख.

वेल नीट पाहता ते कार्टुन थोडे आक्षेपार्ह आहे हे नक्कीच. सगळ्यांनाच काही असे वाटणार नाही की नेहरु गोगलगायीच्या पार्श्वभागावर मारताहेत. काहींना थोडे वेगळे देखील वाटु शकेल.

In reply to by मृत्युन्जय

सहमत आहे...माझ्या सुमार बुद्धिला हे चित्र पुस्तकात योग्य वाटत नाही.. चित्रासोबतचा पुस्तकातला मजकूर कुणाला माहिती आहे का ?

In reply to by शाहरुख

मला व्यंगचित्रात काहीही अयोग्य वाटत नाही कारण व्यंगचित्रासोबत दिलेला मजकूर पुढीलप्रमाणे - हे पुस्तकात प्रथम स्पष्ट केले आहे - The voluminous debates in the Constituent Assembly, where each clause of the Constitution was subjected to scrutiny and debate, is a tribute to public reason at its best. These debates deserved to be memorialised as one of the most significant chapters in the history of constitution making, equal in importance to the French and American revolutions. व्यंगचित्राच्या खाली पानावर असणारा मजकूर - Cartoonist's impression of the 'snail's pace' with which the Constitution was made. Making of the Constitution took almost three years. Is the cartoonist commenting on this fact? Why do you think, did the Constituent Assembly take so long to make the Constitution? आणखीही शेजारी मजकूर आहे. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी. एन सी ई आर टी च्या या लिंक मध्ये अकरावीच्या political science चे India Contitution at work हे पुस्तक अजूनही डाऊनलोड करता येते. पृष्ठक्रमांक १८ वर (keps201 ही फाईल) संदर्भीय व्यंगचित्र आहे. http://www.ncert.nic.in/NCERTS/textbook/textbook.htm?keps2=1-10#

In reply to by इस्पिक राजा

मागे चाबूक हातात असलेले नेहरु नसले असते तर फार बरे झाले असते. सहमत!... हो..ना.. नेहरू चचा - आम्बेडकर आणि गोगलगायीच्या मानाने फारच लुकडे सुकडे आणि बर्‍यापैकी कुपोषित दाखवलेत!.. तसेच त्यांनी लॉन्ग नेहरूशर्टाच्या खाली सलवार घातली आहे की नाही.. ह्याबद्दल शन्का घेण्यासारखे काहीतरी त्या चित्रात आहे! आणि नेहरूचचांच्या हातातला चाबूक / दोरी इतकी आखूड आहे, की ती गोगलगायीच्या शेपटीपर्यन्तही पोचेल की नाही.. असे वाटते.. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे नेहरूचचांच्या कोटावर/ शर्टावर गुलाबाचे फूल दाखवले गेलेले नाहीये. त्यामुळे मी व्यक्तिशः या व्यंगचित्राचा निषेध करते! :)

In reply to by शाहरुख

मला सुध्दा हे चित्र योग्य वाटत नाही, लेख आणी त्यावरील प्रतिक्रिया वाचण्याच्या आधीच चित्र पाहीले होते. --टुकुल

In reply to by टुकुल

त्या वेळी ती राज्यघटना पूर्ण आणि स्विकृत व्हायची होती आणि नेहरु पंतप्रधान होते. आज ते हयात असते तर म्हणाले असते `घ्या हा चाबूक आणि द्या ती गोगलगाय मला बसायला'

व्यंगचित्र पाहीले.. लिंकमध्ये दिलेला लेखही वाचला. चांगला विवेचनपुर्ण लेख आहे. ह्या व्यंगचित्राबद्दल मला जे वाटते ते असे की, १९४९ मध्ये जेव्हा हे व्यंगचित्र काढण्यात आले होते तेव्हाच्या परीस्थितीतून त्याच्याकडे पहायला हवे. भारत स्वतंत्र होऊन जवळपास २ वर्षे झाली होती, तरी भारताचा "देश" झालेला नव्हता. संस्थाने होती, त्यांचे विलिनीकरण आणि देशांतर्गत एकत्रीकरण व्हायचे होते किंवा सुरु होते. अश्या परीस्थितीत भविष्यातील गरजांचा पुर्वविचार करुन एक मजबूत, कणखर आणि तरीही देशातील वेगवेगळ्या घटकांचा समावेश होण्यासाठी लागणारी लवचिकता असलेले संविधान बनवणे, हे संविधान समिती पुढचे आव्हान होते. त्यामुळे वेळ लागणारच होता. आता काही लोकांच्या मते त्यांना (संविधान समितीला) फक्त "कॉपी/पेस्ट" एवढंच करायचं होतं.. पण तसं नाहीये. वेगवेगळ्या देशांच्या संविधानांमध्ये असलेल्या प्राविधानांचा /कलमांचा अभ्यास करुन त्याला भारत देशाच्या हिशेबाने सुधारणे हे कठीण काम होते.. ह्या व्यंगचित्रात मलातरी नेहरुंचे "डेस्परेशन"च दिसले. नेहरु किती डेस्परेट ;-) होते, ह्यापलिकडे त्यात कुणाचाही अपमान नाही..

एक च विनंती आहे. रंगपंचमी खेळा, होळी खेळा पण त्याची धुळवड होउ देउ नका. आसबेनी लिहीलेला लेख परत एकदा संदर्भ म्हणून वाचावा ही विनंती. धन्यवाद

त्यांना (संविधान समितीला) फक्त "कॉपी/पेस्ट" एवढंच करायचं होतं.. = आणि मूळ फाईल पीडीएफ होती त्यामुळे वेळ लागला अशी ही पुस्ती जोडतात

एकंदरीत हल्ली रिपब्लिकन पक्ष गट - अ ते ज्ञ यांना काही काम पण नाहीये, मायावती पण गप्पच होती, रामदास आठवले तर बेरोजगारच होते. गल्लोगल्लीतली "पंचशील" मंडळांची अजून काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यांना एक नवीन मुद्दा मिळाला एवढेच. बाकी व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही.

एकाही लिंकेवरचे चित्र मलातरी दिसत नाही. एवढ्यात गणेशा भेटलेले नसूनही असे होत आहे. वादात भाग घ्यायचा राहून गेला याचेच काय ते वाईट वाटते.;)

१९६० मधली व्यंगचित्रे आत्ता खटकतात....मग कोमन्वेल्थ च्या वेळी जी बेइज्जती झाली ती केव्हा खटकणार? (का इथे असेच असते असे बोलुन मोकळे होणार?)

In reply to by टवाळ कार्टा

मग कोमन्वेल्थ च्या वेळी जी बेइज्जती झाली ती केव्हा खटकणार? ती कशाला खटकल? तिकडंच्या भरल्या पोटीच हे ब्रह्मज्ञान पाजळल जातय ना...

भारत हा कायम, खरा शत्रु न ओळखता आल्यामुळे, आपापसात भांडणार्‍या लोकांचा देश आहे आणि तो तसाच रहाणार आहे.

In reply to by JAGOMOHANPYARE

जामोप्या, शंभरी गाठली, की धागाकर्त्याची शंभरी भरली. ( जा मो प्या हे अद्याक्षरावरुन बनविलेले नाव असून कोणताही अधिक्षेप करण्याच उद्देश नाही.) परत माफी मागा, काढून टाका,वगैरे कुणी सांगीतले आहे?

वरील सर्व प्रतिक्रीया वाचुन माझी हि प्रतिक्रीया लोकशाहि च्या आयचा घो.... ह्या वर चित्रपट मांजरेकरांनी बनवावा.