Skip to main content

अळुवडी ( क्रिस्पी -कुरकुरी )

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/05/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अळूवडी ( क्रिस्पी) साहित्य : १) अळूची पाने ८-१० ( कोवळी अन छोटी असतील तर उत्तम ) २) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते ) ३) हिरव्या मिरच्या ७-८. ४) लसूण पाकळ्या ७-८. ५) जीर / (जिरपूड ) १ छोटा चमचा . ६) गुळ १ छोटा चमचा (किसून) ७) चिंचेचा कोळ १ चमचा . ८) मीठ चवीनुसार . ९ )तळण्यासाठी तेल . १० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा ( आँपशनल). कृती :- अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या . अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ कापून घ्या . आता हिरव्या मिरच्या अन लसूण याच वाटण करून घ्या . एका बाउलमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या ,मिश्रण जास्ती पातळ नको जास्ती घट्ट नको ,मध्यम ठेवा आता एक पान घ्या ज्या बाजूला शिरा असतात त्या बाजूला वरील मिश्रण सगळीकडे एकसारखे पसरवून घ्या आता त्यावर पुन्हा एक पण ठेवा ,परत सेम कृती करा ,असे कमीतकमी ३-४ पानाच्या थराला व्यवस्थित मिश्रण लावून घ्या नंतर ह्या पानाचा अलगद गुंडाळी करा एका चाळणीत हे रोल वाफवायला ठेवा चाळण फिट्ट बसेल अशा आकाराचे एक पातेले घ्या त्यात पाणी गरम करून घ्या त्यावर चाळणी ठेवून वरून एक घट्ट झाकण ठेवा साधारण १०-१५ मिनिट वड्या उकडून घ्या सुरी खुपसून पहा जर सुरीला बेसन लागले नाही तर वडी शिजली समजावी आता ह्या उकडलेल्या वड्या थोड्या थंड होऊ द्या. आता वड्याचे काप करा ,जर तुम्हाला वड्या क्रिस्पी अन कुरकुरीत हव्या असतील तर काप पातळ करा अन जर शॅलो फ्राय करायच्या असतील तर जाडसर ठेवल्या तरी चालतील आता एका कढईत तेल गरम करून सर्व वड्या छान खरपूस तळून घ्या थोड्याश्या लालसर होईपर्यंत !! क्रिस्पी अळूवड्या तयार आहेत . आमच्याकडे सर्वाना कुरकुरीत वड्या आवडतात .म्हणुन मी शक्यतो कुरकुरीत होइस्तोवर तळते ,तुम्हाला जर ओलसर ह्व्या असतील तर तुम्ही वड्या लालसर होइपर्यंत तळ्ण्याची गरज नाही :) ( * अळूची पाने मोठी असतील तर त्यामुळे हमखास घसा खवखवतो म्हणूनच पाने छोटी अन कोवळी वापरावीत. अन नाहीच मिळाली तरी चिंचेचा कोळ अन गुळ घातल्यामुळे घसा खवखवत नाही ) ( अन हो .....मला सॉस बरोबर वडी खायला आवडते म्हणुन सॉसची वाटी ठेवली आहे ट्रे मध्ये , उगा सॉस मध्येच कुठून? असा प्रश्न विचारु नये ) ;) धन्यवाद :)

वाचने 26929
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by गवि

वाक्यरचना म्हणुन ठीक असावी पण अपेक्षा असेल तर लायनीला लागा. लै लै लोक पियुषाबैला भेटायची वाट बघायलेत. कुणाला हुरडा खायचाय, कुणाला जिलबी तर कुणाला तोफ बघून पळायचय ;) काय मंडळि मी बोलतो ती गोष्ट सच्ची की नाय?

पिवशे, वरती माऊ म्हणाली तसंच म्हणते- आता इथे पियुला शोधणे आले. मस्त वड्या. छान फोटो. :)

अळूवडीची रेशिपी छानच. पण पिवशे, रंग आणि नाजूकपणावरुन ती पानं भाजीच्या अळवाची दिसतायेत. वडीच्या अळवाची पानं रंगाला थोडी गडद आणि थोडी जाड असतात. इतकी जाड की त्यांच्या शिरा काढल्या तरी नीट वळकटी करता यावी म्हणून आमच्याकडे त्यावर एखादा लाटण्याचा हात फिरवतात. हे भाजीचं अळू रैवारी सिंहगडावरुन उतरताना पाह्यलं आणि फदफदं खावंसं वाटू लागलं. आता ते इथे पुण्यात कुठे मिळेल ?

In reply to by सूड

अरे समोरचा काम्पुटर घेतला म्हणुन सांगतोय अन तु त्याला प्रोसेसर कॅपॅसिटी, ड्युअल कोर का क्वाड्रा कोर, रॅम डिडिआर का डिडिएम, नॉर्थ ब्रिज , साउथ ब्रिज, कुलिंग फॅन स्पिड, जिपियु स्पिड, साउंड कार्ड हे सगळं सांगतोय, आधी काम्पुटर बंद करायला स्टार्ट करावा लागतोय इथं पर्यंत तरी तयारी होउ दे की.

खतरनाक फोटो. अप्रतिम... मस्त झालेल्या दिसताहेत. तो.पा.सू. खूप खूप :-) सही.... इथे अळू मिळत नसल्याने अळूवडी पार्सल पाठवून दे :-) मागची तुझी जिलेबी ची रेसिपी पाहून जिलबी केली आणि वाईट फसली माझी जिलबी :-/ जिल्बुषे तुझ्या जिलब्या खूप सुंदर दिसत होत्या. असो. मी दही घालून ट्राय केल्या होत्या. पुढच्या वेळेस यीस्ट वापरून पाहिन.

तळून असो की भाजून असो, अळूवड्या छान झालेल्या दिसतायत! मी बेसनाऐवजी तांदुळाचा रवा घालून केलेल्या अळूवड्या मंगलोरी लोकांकडे खाल्ल्या आहेत, त्या पण अप्रतिम लागतात.

पिवशे ... रागवु नकोस .अशि हाक मारली म्हणुन....... वड्या मस्तच ........ फक्त पुढच्यावेळी त्यात तांदुळाचे पीठ घाल थोडेसे . म्हणजे वड्या अजुन कुरकुरीत होतील.

अगदी खुमासदार, रुचकर, चविष्ट, भन्नाट दिसत आहेत अळुवड्या. खूप आवडतात :) अळुवड्या करून त्याची भाजी करण्याची पद्धत आहे माझ्या सासरी...ती पण कसली जबरी लागते म्हणून सांगू अहाहा तोंपासू :)

In reply to by सानिकास्वप्निल

>>>अळुवड्या करून त्याची भाजी करण्याची पद्धत आहे माझ्या सासरी...ती पण कसली जबरी लागते म्हणून सांगू अहाहा तोंपासू नुसते सांगत का आहेस? तुझ्या कडुन एव्हढेच अपेक्षीत नाही. येउन जाउ द्या पाकृ.

In reply to by चिंतामणी

हो नक्की चिंतामणी काका :) देईन की पाकृ फक्त अळुची पाने मिळाली की लगेच देईन :) धन्यवाद

सगळे लोक पियुशा का शोधत आहेत बरे ? अळुवड्यांमधे कोणताही घटक "पियुशा" नावाचा नाही :O :~ बाकी अळुवड्या छान हं ! चिं.काकांबरोबर सहमत ह्याची पातळ भाजी पण जाम भारी लागते .

यात थोडे तीळ टाकलेस तरी चालतील. त्यायोगे तेलबिया खाल्ल्या जातात.

आम्च्याकडे खूपच आवडतात सगळ्यांना....उद्याच आणते आळूची गड्डी