Skip to main content

चाहूल

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी मंगळवार, 05/08/2008 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
हळूवार तुझे पाऊल मला चाहूल तरीही उराशी होईल पहाट नको जाऊस थांब जराशी उतरो न कधी ही धुंद श्वासात गंध रात्रीचा हा असाच चालो नसा नसात उत्सव प्रीतीचा आकंठ बुडूदे डोळ्यात तुझ्या देहात मला खोल ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल हे स्वप्न जरी वाटे कशास खोटे बोलू तुझ्याशी ठेवलीत जपून मी फुले सापडलेली उशाशी - अनिरुद्ध अभ्यंकर
लेखनविषय:

वाचने 7023
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सिद्धहस्त रचना ! सुरेख, लयबद्ध काव्य ! पहिल्या दर्जाची प्रेमकविता ! हे स्वप्न जरी वाटे कशास खोटे बोलू तुझ्याशी ठेवलीत जपून मी फुले सापडलेली उशाशी हाय ! काय कातिल ओळी लिहीता राव तुम्ही सुद्धा .... (थोडी गम्मत : बैठकीच्या लावणीच्या मीटर मधे ही सुरेख प्रेमकविता चपखल बसते !) :-)

In reply to by मुक्तसुनीत

सिद्धहस्त!

In reply to by मुक्तसुनीत

अगदी हेच म्हणतो.. पहिल्या दर्जाची , सिद्धहस्त, सुरेख, लयबद्ध प्रेमकविता ! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल ओ हो हो !! क्या बात है !! वा ! (जालकवीसम्मेलनासाठी ही तुमची एण्ट्री समजावी का ?) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट, (जालकवीसम्मेलनासाठी ही तुमची एण्ट्री समजावी का ?) आपली हरकत नसेल तर .. माझी हरकत नाही :) (बिना हरकत)अनिरुद्ध अभ्यंकर

फारच छान कविता. मजा आ गया! ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल आणि कशास खोटे बोलू तुझ्याशी ठेवलीत जपून मी फुले सापडलेली उशाशी हे विशेष आवडले. (आस्वादक)बेसनलाडू आपण आधीच बोलल्याप्रमाणे अशा फॉर्म असलेल्या कवितेतील थेट अर्थापेक्षा लपलेले इतर पदर उलगडले (कॉनोटेशन्स्),तर कवितेची लज्जत वाढते/वाढेल, असे वाटते. हा फॉर्म तुम्ही बरेच आधीपासून हाताळत असल्याने तुमचेही मत यापेक्षा वेगळे नसावे,असा अंदाज आहे :) (सूचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बेला, अशा फॉर्म असलेल्या कवितेतील थेट अर्थापेक्षा लपलेले इतर पदर उलगडले (कॉनोटेशन्स्),तर कवितेची लज्जत वाढते/वाढेल, असे वाटते.. १००% सहमत. (सहमत)अनिरुद्ध अभ्यंकर

आकंठ बुडूदे डोळ्यात तुझ्या देहात मला खोल ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल खल्लास!! "राजसा, जवळी जरा बसा " अशा ढंगाने जाणारे काही जाणवले! चतुरंग

कविता खूप आवडली.

सुंदर काव्य रचना भाव एकदम मस्त मांडले आहेत. :)

हे स्वप्न जरी वाटे कशास खोटे बोलू तुझ्याशी ठेवलीत जपून मी फुले सापडलेली उशाशी वा व्वा! मार डाला...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पुन्हा एक षटकार.

हे स्वप्न जरी वाटे कशास खोटे बोलू तुझ्याशी ठेवलीत जपून मी फुले सापडलेली उशाशी सुरेखच..कविता फार आवडली. स्वगत- केसु ब्याकसीटवर आणि अनिरुध्द अभ्यंकर ड्रायविंग सीट वर आलेत ते चांगलेच झाले म्हणायचे की.. स्वाती

हा असाच चालो नसा नसात उत्सव प्रीतीचा ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल
वाह! क्या बात है!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर

आकंठ बुडूदे डोळ्यात तुझ्या देहात मला खोल ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल सुंदर!

छान कविता! वार्‍याने हालते रान या कवितेची उगाचंच आठवण झाली... तात्या.

ही वाचूनी सुंदर कविता कंठ रूध्द झाला. चंपक

आकंठ बुडूदे डोळ्यात तुझ्या देहात मला खोल ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल अनिरुद्ध, ही रोम्यांटिक कविता एकंदर चांगली झाली आहे. माझ्या मते, ही सुरेख प्रेमकविता बैठकीच्या लावणीच्या मीटरमध्ये (पेक्षा लयीत) नीट बसत नाही. चूभूद्याघ्या. आकंठ बुडो डोळ्यात तुझ्या देहात मला ने खोल ते खुजे लाजरे शब्द नको ते शब्द स्पर्शाने बोल (स्पर्शाने लवकरलवकर उच्चारायचे) असे काहीसे केल्यास बसू शकेल.