Skip to main content

माझे सत्याचे प्रयोग - बॅचलर खिचडी

लेखक स्पा यांनी शनिवार, 05/05/2012 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर १. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे २. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी ३. गणपा, सानिका स्वप्नील, मृणालिनी .. यांच्या पाकृन्सारखी हि टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता ४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही... त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊ नये टीप : १.तोपांसू छाप प्रतिक्रिया अपेक्षित नसून " पोटाची खळगी भरण्याची सोय झाली" , "वा महिनाअखेरीस पैसे वाचवायची उत्तम सोय" छापाच्या प्रतिक्रिया चालतील २.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता ओक्के आता साहित्य १. एक मोबाईल, एक भांडकुदळ मित्र. साधा असला तरी चालतोय (आमच्या बाबतीत तो सूड होता) २. फोडणीच साहित्य ( एक मोठा चमचा तेल ,मोहरी, तिखट, मीठ, जीर, हिंग, हळद, काळा मसाला) ३ . एक वाटी तांदूळ, मुगाची डाळ सम प्रमाणात (हे माझ्या आकारमानानुसार , तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता ) ४. चार वाट्या पाणी ५. फ्रीज मध्ये सापडतील त्या भाज्या (इथे मी बटाटा , कांदा आणि तळाशी पडलेला एक जुनाट फ्लॉवर चा तुकडा घेतला) ६ . लसूण, आलं आवडीनुसार कृती : हातात असलेल्या मोबाईल वरून.. त्या मित्र कम बॅचलरला फोन लावून (अर्थात सूड ) खिचडी कशी करतात ते विचारणे , त्याचे ज्ञान एका कागदावर लिहून घेणे बाजूला साहित्याची जमवाजमव करणे हे सर्व साहित्य ओक्के आधी एक अर्धा तास.. घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून बाजूला निथळत ठेवा आता एका भांड्यात तेल तापत ठेवून कच्क्कून फोडणी करा .. मोहरी जळून तुम्हाला तळतळात देत असतानाच त्यात कांदा टाकून तीच थोबाड बंद करा .. वरून फोडणीच इतर साहित्य मारा . बाजूला एका भांड्यात ते चार वाट्या पाणी उकळवत ठेवा .. तोपर्यंत इथे कांदा अदृश्य अवस्थेत पोचलेला असेल .. त्यात ते तांदूळ - डाळ, बटाटा टाकून छान परतवायला लागा.. इथे पाणी मजबूत उकळल कि.. ते बाजूच्या मिश्रणात ट्रान्स्फर करा. आता छान पैकी त्यावर झाकण ठेवून .. बाहेर टीवी बघत बसा.. साधारण १० मिनिटात गरम गरम खिचडी तयार :) खिचडी वर खोबर कोथिंबीर घालू शकता, साजूक तुपाची धार मस्ट ..सोबत पापड, लोणचं.. ताक.. मेनू फक्कड होतो :) सोबत टोमाटो सूप चा बेत होता.. पण बाहेर टीवी बघताना आपण टोमाटो उकळत ठेवले आहेत हेच विसरलो .. .. पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच .. असो.. खिचडी तरी झकास बनली.. आणि महत्वाच म्हणजे हाटेलात जायचे पैक वाचले :D

वाचने 14861
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

मुळात 'हा' का 'ही' हेच कोडे सुटलेले नाही. तुम्ही थेट गाव वगैरे शोधायला निघालात. थांबा जरा, मन्या फेणेलाच विचारुयात.

In reply to by अन्या दातार

मी त्याच्या घरी पोचल्यावर तरी सत्या नामक जे काय प्रकरण आहे ते हजर नव्हतं. ते जे काही आहे ते मी आणि किसन यायच्या आधी कुकर लावून गेलं असावं अशी दाट शंका येतेय.

In reply to by सूड

@ते जे काही आहे ते मी आणि किसन यायच्या आधी कुकर लावून गेलं असावं अशी दाट शंका येतेय.>>>

In reply to by अत्रुप्त आत्मा

कुकर लावून गेलं असावं अशी दाट शंका येतेय. - गेलं - ही टाईपातली चुक आहे का व्याकरणाची का अजुन काही, फ्युअ‍ॅ, तुमच्याकडुन खुलाशाची अपेक्षा आहे.

In reply to by प्यारे१

अरे अरे, धाग्याचा विमंफळा व्हायला लागला की ओ, गेलं म्हणजे मला वाटलं होतं की ते मा. स्पाजी यांच्या घरातलं हिरव्या डोळ्यांचं काळं का काळ्या डोळ्यांचं हिरवं मांजर वगैरे आहे का काय, इथं सदस्य लोकं सुवर्णमध्य वगैरे काढायला लागली लगेच, कसलं महाग झालंय सोनं आणि त्यात त्याचा मध्य बिध्य कुठं काढता.

In reply to by अन्या दातार

तीच का रे ती खंबाल पाड्याची "सत्या म्हात्रे" ;-)

मा. श्री . स्पाजी, आता महापालिकेच्या शाळात दुपारचे जेवण पुरवायचे कंत्राट घेता का बघा, तिथं एवढंच यावं लागतं, खिचडी नायतर वरण भात. चांगला घंदा आहे बघा ट्राय मारुन.

In reply to by ५० फक्त

"चांगला घंदा आहे बघा ट्राय मारुन"- घंदा - ही टाईपातली चुक आहे का श्लेष आहे का अजुन काही, ५०फक्त, तुमच्याकडुन खुलाशाची अपेक्षा आहे.

मन्यारावांची खिचडी म्हणजे बिरबलाची खिचडी झालीये की. 'तयार' होऊन खाऊन मोकळे झाले तरी अजून चुलीवर 'शिजतेच' आहे.