ढिस्क्लेमर
१. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे
२. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी
३. गणपा, सानिका स्वप्नील, मृणालिनी .. यांच्या पाकृन्सारखी हि टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता
४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही... त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊ नये
टीप : १.तोपांसू छाप प्रतिक्रिया अपेक्षित नसून " पोटाची खळगी भरण्याची सोय झाली" ,
"वा महिनाअखेरीस पैसे वाचवायची उत्तम सोय" छापाच्या प्रतिक्रिया चालतील
२.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता
ओक्के
आता साहित्य
१. एक मोबाईल, एक भांडकुदळ मित्र. साधा असला तरी चालतोय (आमच्या बाबतीत तो सूड होता)
२. फोडणीच साहित्य ( एक मोठा चमचा तेल ,मोहरी, तिखट, मीठ, जीर, हिंग, हळद, काळा मसाला)
३ . एक वाटी तांदूळ, मुगाची डाळ सम प्रमाणात (हे माझ्या आकारमानानुसार , तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता )
४. चार वाट्या पाणी
५. फ्रीज मध्ये सापडतील त्या भाज्या (इथे मी बटाटा , कांदा आणि तळाशी पडलेला एक जुनाट फ्लॉवर चा तुकडा घेतला)
६ . लसूण, आलं आवडीनुसार
कृती :
हातात असलेल्या मोबाईल वरून.. त्या मित्र कम बॅचलरला फोन लावून (अर्थात सूड ) खिचडी कशी करतात ते विचारणे , त्याचे ज्ञान एका कागदावर लिहून घेणे
बाजूला साहित्याची जमवाजमव करणे
हे सर्व साहित्य
ओक्के
आधी एक अर्धा तास.. घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून बाजूला निथळत ठेवा
आता एका भांड्यात तेल तापत ठेवून कच्क्कून फोडणी करा .. मोहरी जळून तुम्हाला तळतळात देत असतानाच त्यात कांदा टाकून तीच थोबाड बंद करा .. वरून फोडणीच इतर साहित्य मारा .
बाजूला एका भांड्यात ते चार वाट्या पाणी उकळवत ठेवा ..
तोपर्यंत इथे कांदा अदृश्य अवस्थेत पोचलेला असेल .. त्यात ते तांदूळ - डाळ, बटाटा टाकून छान परतवायला लागा..
इथे पाणी मजबूत उकळल कि.. ते बाजूच्या मिश्रणात ट्रान्स्फर करा.
आता छान पैकी त्यावर झाकण ठेवून .. बाहेर टीवी बघत बसा..
साधारण १० मिनिटात गरम गरम खिचडी तयार :)
खिचडी वर खोबर कोथिंबीर घालू शकता, साजूक तुपाची धार मस्ट ..सोबत पापड, लोणचं.. ताक.. मेनू फक्कड होतो :)
सोबत टोमाटो सूप चा बेत होता.. पण बाहेर टीवी बघताना आपण टोमाटो उकळत ठेवले आहेत हेच विसरलो .. .. पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच .. असो..
खिचडी तरी झकास बनली.. आणि महत्वाच म्हणजे हाटेलात जायचे पैक वाचले :D
वाचने
14861
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
साला...
>>आता इथे एक " एक भांडकुदळ
In reply to साला... by कुंदन
जीरे, कांदा क्लोज अप लै भारी
प्रयत्न चांगला आहे. त्या
गपे
In reply to प्रयत्न चांगला आहे. त्या by किसन शिंदे
त्या जिरे आणि कांद्याच्या
In reply to प्रयत्न चांगला आहे. त्या by किसन शिंदे
वा वा .चान चान.
मुगाची डाळ म्हणजे अंमळ स्वीट
In reply to वा वा .चान चान. by प्रचेतस
;)
In reply to मुगाची डाळ म्हणजे अंमळ स्वीट by प्रसाद प्रसाद
१. सदर पाककृती हि एका बॅचलर
बाबौ
In reply to १. सदर पाककृती हि एका बॅचलर by ५० फक्त
सहमत आहे !
In reply to बाबौ by रमताराम
मस्त
In reply to १. सदर पाककृती हि एका बॅचलर by ५० फक्त
छान ! पाकृ पेक्षा फोटूच लै
अर्थात
In reply to छान ! पाकृ पेक्षा फोटूच लै by सस्नेह
चला, अजुन एक पोरगा मार्गाला
व्वा!!
झकास
नंदनभाऊ,
In reply to झकास by नंदन
हम्म्म
काय राव
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
+१.५ / -१.५
In reply to काय राव by रमताराम
ह्याला पुरावा काय ? नको गाडाच
मन्या फेणे खिचडी टाकतो या
जरा
घरात या पैकी काहीही नव्हते
In reply to जरा by सहज
कुणाच्या?
In reply to घरात या पैकी काहीही नव्हते by स्पा
मनातलं विचारलंत !! मी तर
In reply to कुणाच्या? by नाना चेंगट
:-)
In reply to मनातलं विचारलंत !! मी तर by सूड
फेण्या, कळले हो तुझे सत्याचे
टॉमेटो गॅसवर ठेवलेले टीव्ही
माताय
In reply to टॉमेटो गॅसवर ठेवलेले टीव्ही by सूड
उत्तम मांडणी
वा वा!
मन्या फेणे साहेब, खिचडी तर एकदम फक्कड झालेली आहे .
तुम्हाला असं म्हणायचं आहे का
In reply to मन्या फेणे साहेब, खिचडी तर एकदम फक्कड झालेली आहे . by निश
५० फक्त साहेब, तस नाही मला हेच विचारायच होत की ..
In reply to तुम्हाला असं म्हणायचं आहे का by ५० फक्त
चला!
>>डाळ आणि तांदुळांचं प्रमाण
In reply to चला! by पैसा
सांगणार्याने नीट सांगितलं.
In reply to >>डाळ आणि तांदुळांचं प्रमाण by सूड
छान छान!
प्रायोगिक सत्य अवडलं... आता
क्रमांक सत्तावीस असलेल्या
मन्या..
In reply to क्रमांक सत्तावीस असलेल्या by रेवती
==))
मन्याने पकवली स्वीटकॉर्नची
In reply to ==)) by सोत्रि
खीक्क...
In reply to मन्याने पकवली स्वीटकॉर्नची by धन्या
नको.
In reply to खीक्क... by सोत्रि
अय्या!!! छान दिसतेय की खिचडी!
खिचडी बर्यापैकी बरिये फेण्या
लैच... ह्या खिचडीची अनेक
अजून काही
In reply to लैच... ह्या खिचडीची अनेक by सुहास झेले
खिचडी म्हणजे ऑल टाईम
प्रिय मित्र मन्याराम फेणे
बॅचलर पाकृंना 'चान चान'
काय फुलुन आलाय प्रतिसाद...!
In reply to बॅचलर पाकृंना 'चान चान' by प्यारे१
मा. श्री,प्यारे, नम्र विनंती
In reply to बॅचलर पाकृंना 'चान चान' by प्यारे१
माझे सत्याचे प्रयोग भाग २
मेल्या, म्हणजे खीर आणि पुरी
In reply to माझे सत्याचे प्रयोग भाग २ by स्पा
@आणि तू वरणभाताचा कुकर लावलास
In reply to मेल्या, म्हणजे खीर आणि पुरी by गवि
हा हन्त हन्त
In reply to @आणि तू वरणभाताचा कुकर लावलास by अत्रुप्त आत्मा
आता या अत्रुप्त आत्म्याला
In reply to हा हन्त हन्त by अन्या दातार
@(त्यावरुन आम्ही यायचे की
In reply to हा हन्त हन्त by अन्या दातार
पहिल्या फोटोत लोणचं शोधायला
In reply to माझे सत्याचे प्रयोग भाग २ by स्पा
@हिरवे पान कढीपत्त्याचे आहे
In reply to पहिल्या फोटोत लोणचं शोधायला by प्रचेतस
अन भात
In reply to @हिरवे पान कढीपत्त्याचे आहे by अत्रुप्त आत्मा
अन भात मौ होता ना रे तू भेट
In reply to अन भात by कुंदन
मन्या
बेसिक!
सत्या रत्नांग्रीकर असावी काय?
In reply to बेसिक! by अन्या दातार