✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन.

न — निश, Tue, 05/08/2012 - 14:33
कळायलाच हव्या काही गोष्टी पण त्या कधी कळतच नाहीत. कळल्या अस वाटतानाच , खरच त्या कधीही उलगडतच नाहीत. खुप पैसा कमावुनही अजुन अजुन पाहीजे हा हव्यास का केला जाई ? टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई. बहुतेक खरा आंनदही विकत असावा बाजाभावात. म्हणुनच टाळुवरच लोणी खाउनही आनंदापेक्षा दु:खी चेहरेच दिसतात प्रत्येक शहर व गावा गावात. खरा आनंद असतो मनाच्या उदारतेवर टिकुन दुसर्‍यांच्या आनंदात स्वताचा आनंद मानुन. पण आपण आनंदास बसतो घालवुन अवती भोवतीच्या मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन. आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन.

प्रतिक्रिया द्या
2604 वाचन

💬 प्रतिसाद (19)

वा!! मस्त...

मुक्त विहारि
Tue, 05/08/2012 - 17:40 नवीन
विशेषतः "टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई." हे फारच भावले..
  • Log in or register to post comments

मुक्त विहारि साहेब, तुमचे मनापासुन आभार

निश
Wed, 05/09/2012 - 14:55 नवीन
मुक्त विहारि साहेब, तुमचे मनापासुन आभार
  • Log in or register to post comments

मास्टरपीस...

स्पा
Wed, 05/09/2012 - 15:16 नवीन
निश साहेब.. तुमचा अजून एक मास्टरपीस... खूपच सुंदर स्पिचलेस धन्यवाद
  • Log in or register to post comments

लॉ ऑफ प्रपोर्शन्स

चौकटराजा
Wed, 05/09/2012 - 15:19 नवीन
द मोर यु आर रिच द मोर यू आर ग्रीडी !
  • Log in or register to post comments

>>आनंदास मुकतो मतलबी दुष्ट

यकु
Wed, 05/09/2012 - 15:24 नवीन
>>आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन -- कोण हे लोक? हा मन्या तर नाही ना? याचा चेहेरा दुष्‍ट आहे, पण हा मतलबी नाही. हा जर असला हाणतोच बघा ह्याला तिथं येऊन. बिलकुल कुणाचं काही ऐकू नका आणि आनंद घ्‍या. तुम्ही आपले सारखे सारखे सगळ्यांना साहेब म्हणत रहाता मग सगळं फसतं.
  • Log in or register to post comments

मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व यकु साहेब ....

निश
Wed, 05/09/2012 - 15:45 नवीन
मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व यकु साहेब तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार. यकु साहेब, अहो इथे तुम्हि, मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व सगळे सभासद मिपावरचे हे सगळे अतिशय चांगले व मनाने अतिशय दिलदार लोक आहात. ज्याला परीस म्हणतो ज्याच्या सहवासात आल्यावर लोखंडाचही सोन होत. ते परी स तुम्हि सगळे आहात. साहेब खर तर म्हणण्या मागच कारण की प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात पारंगत असतो. त्याच काम व त्याच knowledge हे त्या त्या क्षेत्रात अतिशय अफाट असत. म्हणजे एकप्रकारे ते त्यांच्या क्षेत्रात साहेबच असतात म्हणुन साहेब म्हणतो मी सगळ्याना. साहेब ह्या शब्ब्दातुन मला त्यांच्या knowledge ला सलाम करायच असत. म्हणुन साहेब म्हणतो मी.
  • Log in or register to post comments

निशा लेका ,

चौकटराजा
Wed, 05/09/2012 - 16:11 नवीन
निशा लेका, लोकांच्या पार लक्षात येईल एवढा मान ठेवू नको. सगळयांचेच पाय मातीचे आहेत रे ! आपला मातीचे पाय असलेला ( परिसाचे नव्हे) चौ रा अवांतर - आमचे वैशिष्टय असेल तर एवढेच की आमच्या पायाची माती आम्ही दुसर्‍याच्या अंगाला फासत नाही. वयाने लहान असला तरी लायकीने मोठा असेल तर त्याच्या पायाची माती आमच्या माथी लावतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

चौकटराजा साहेब, मातीतुनच तर सोन व परीसही जन्माला येत.

निश
Wed, 05/09/2012 - 16:20 नवीन
चौकटराजा साहेब, मातीतुनच तर सोन व परीसही जन्माला येत. मातीचे पाय असण हे तर खर तर विद्वान असल्याच लक्षण आहे. कदाचित माती तुनच माता हा शब्ब्द आला असावा कारण माती व माता ह्या दोहोंचेही काम एकच जन्म देणे व संगोपन करणे. हल्ली च्या दिवसात जेव्हा मुल व तरुण हे चुकीच्या गोष्टींच अंधानुकरण करत असताना माझ्या सारख्याने विद्वान माणसाना मान देण हेच उचित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

>>> वयाने लहान असला तरी

यकु
Wed, 05/09/2012 - 16:25 नवीन
>>> वयाने लहान असला तरी लायकीने मोठा असेल तर त्याच्या पायाची माती आमच्या माथी लावतो. ---- समस्त लायक लोकांनी चौरांकडे पायधूळ पॅक करुन पाठविण्याचे करावे. (नालायक ) यक्कू ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

निश साहेब हा केवळ तुमचा मोठे

स्पा
Wed, 05/09/2012 - 16:28 नवीन
निश साहेब हा केवळ तुमचा मोठे पणा झाला
  • Log in or register to post comments

+1

यकु
Wed, 05/09/2012 - 16:35 नवीन
मोठेपणा आणि अतिशय ;-) भोळेपणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मन्या फेणे साहेब, माझा मोठे पणा आहे की नाही मला माहीत नाही पण..

निश
Wed, 05/09/2012 - 16:37 नवीन
मन्या फेणे साहेब, माझा मोठे पणा आहे की नाही मला माहीत नाही पण वजनाने मी नक्कीच मोठा आहे हे मला माहीत आहे . १०५ किलो वजनाचा बेबी एलिफंट मी नक्कीच आहे. हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ड्वाले पानावले!! 'श्यामची आई'

कवितानागेश
गुरुवार, 05/10/2012 - 14:00 नवीन
ड्वाले पानावले!! 'श्यामची आई' वगरै शिणेमे बघत असल्याचा भास झाला. असो. मी काही फार वेळ भासात मग्न रहाणार नाही! :) बाकी '१०५ किलो वजनाचा बेबी एलिफंट मी नक्कीच आहे.' ही लाईट्वेट मन्याला धमकी आहे का? ;)
  • Log in or register to post comments

लीमाउजेट जी,नाही हो ही धमकी नाहीं.

निश
गुरुवार, 05/10/2012 - 15:35 नवीन
लीमाउजेट जी,नाही हो ही धमकी नाहीं. आणि तुम्हाला साने गुरुजींच साहित्य वाचायच असेल तर saneguruhi.net ह्या साईट वर वाचता येईल. कदाचित आजच्या भरकटणार्‍या जगाला योग्य दिशा दाखवण्या साठी श्यामच्या आईची च जास्त गरज असावी. तुम्हालाही तसच वाटत का लीमा उजेट madam.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

भरकटणार्‍या जगाला योग्य दिशा

गवि
गुरुवार, 05/10/2012 - 15:43 नवीन
भरकटणार्‍या जगाला योग्य दिशा दाखवण्यासाठी किंवा कसे यावर मला मत देता येत नाहीये. पण श्यामची आई हे नितांतसुंदर पुस्तक आहे. त्यातला काळ कालबाह्य झाला तरीही त्या काळाच्या संदर्भात किंवा संदर्भ न घेताही अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. कोणत्याही आईबापांनी आजही एक प्रत आपल्या पोरासाठी घ्यावीच. मध्यंतरी कोणत्यातरी संमेलन किंवा प्रदर्शनात सर्वात जास्त विक्री झालेलं पुस्तक श्यामची आई आहे असं वाचलं आणि खरोखर मनातून बरं वाटलं. हे सर्व मी लहानपणापासून श्यामच्या आईची पारायणे करुन म्हणतो आहे. ऐकीव मतांवर किंवा त्याच्या सर्वत्र वर्णिल्या जाणार्‍या गोड गुणगानावरुन नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

गवि साहेब, अतिशय योग्य बोललात.

निश
गुरुवार, 05/10/2012 - 15:49 नवीन
गवि साहेब, अतिशय योग्य बोललात. श्यामची आई हे अतिशय नितांत सुंदर पुस्तक आहे. मी पण त्याची पारायण केली आहेत. आजही श्यामची आई पुस्तक संच माझ्या घरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आजही श्यामची आई पुस्तक संच

प्रचेतस
गुरुवार, 05/10/2012 - 15:51 नवीन
आजही श्यामची आई पुस्तक संच माझ्या घरी आहे.
ते एकच पुस्तक आहे निश भाऊ. तुला साने गुरुजींचा पुस्तक संच असे म्हणायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

वल्ली साहेब, श्यामची आई पुस्तक संच च म्हणायच आहे मला.

निश
गुरुवार, 05/10/2012 - 15:55 नवीन
वल्ली साहेब, श्यामची आई पुस्तक संच च म्हणायच आहे मला. माझ्या कडे आहे ती ए़कुण ३ पुस्तक रुपात आहेत म्हणुन पुस्तक संच म्हटल मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओक्के.

प्रचेतस
गुरुवार, 05/10/2012 - 15:57 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा