बराच वेळ मनाशी
मी हाच विचार करत होतो
की उपासाला नेमका
हा किस कसा चालतो..?
उपासाला जड असे
काहिच खायचे नसते..म्हणे!
मग हे कसे चालते..?
बारश्याला तेराव्याचे गाणे?
खिचडी काय..नी..किस काय?
हलके थोडेच असतात..होय?
माणसे कशी शोधुन काढतात
उपवासालाच सुखाची सोय?
उपवसाला शास्त्रात म्हणे
निराहार ही संज्ञा आहे
पण लोक केवढा किस काढतात
की पाहुन वाटतं..काय हे..?
खिचडी काय...नी थालपिठं काय
सगळं जडच खातात
तर काहि दुसरं टोक गाठणारे
पाणी पिऊन उपाशी रहातात.
तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो...
ज्याची त्याची अवड..!
मी म्हणतो,,बा धर्मा..
आता तुझ्या अस्थी सावड
धर्म ही अफूची गोळी
हे वचन आज मला पटलं
आणी त्यांना गुंगी का हवीये?
हे ही कोडं सुटलं
रोजचं जीवन जगता जगता
होते थोडी दमछाक...
म्हणुन ही थोडी मौज मजा
आणी हाच धर्माचा परिपाक.
==============================================================================
मागे मी,आंम्हा भिक्षुकांची त्या साबुदाण्याच्या खिचडीनी कशी दैना उडते,त्याची पिरेमं-मय व्यथा या http://www.misalpav.com/node/18998 कवितेतून मांडली होती. आज ही अठवण(आणी कविता) व्हायचं कारण म्हणजे,आज सकाळी एका कामाच्या ठिकाणी,एक नग,उपासाला खिचडी/किस हेच योग्य असताना...तुंम्ही, 'पोहे चालतील' हे कसं सांगता..? म्हणुन त्यानी स्वतः खाल्लेल्या खिचडीचे हात धूउन माझ्या मागे पडला. अता आंम्हीही,,ही तत्व-निष्ठांची जमात साबुदाण्यापेक्षा पचायला जड असली,तरी यांच्यावर दही टाकलं,की ही मऊ पडते...हे ओळखून बसलेलो आहोत. म्हणुन मी त्याला जे पचायला जड ते उपासाला कसं चालत..? असा ५००ग्रॅम चा प्रश्न टाकला. त्याला हा प्रश्न पचायला जड(च) असल्यामुळे,,,तो प्लेटमधल्या रताळ्याच्या किसासह,दुसर्या खोलीत चचला...आणी माझिही संभाव्य काथ्या-कुटातनं काहि क्षण सुटका जाहली...पण घरी येइ पर्यंत त्या रताळ्याच्या किसानी माझं डोकं हैराण केलं... स्वतःला ''आपण अतीशय धार्मिक आहोत'' असं म्हणवणारी माणसं,तत्वात जिंकुन व्यवहारात हरतात..हे काय कोडं आहे? हा विचार मला छळू लागला.
म्हणजे आज उपासाला प्रचलीत असलेल्या सर्व पदार्थांचं मूळतत्व ते केवळ खरकटे नाहीत,एवढच आहे...पण ते खाल्ल्यामुळे आपल्या पोटोबांना ओव्हरटाइमला बसावे लागते,हे उपवासाच्या दृष्टीनी योग्य आहे का..?असा प्रश्न का बरं पडत नसावा..? किवा पडत असला तरी, ते तो टाळतात..किंवा दुर्लक्षितात का..? उपवासाच्या मूळ तत्वाचा शास्त्र/परंपरेतला गर्भीत अर्थ-उपासाचे पदार्थ ज्या पासुन-बनवले जातात त्या गोष्टी म्हणजे-धान्यहोत नाहीत,पर्यायी त्या [धान्यासारख्या] खरकट्या नाहीत..म्हणुन उपासाला चालतात,असा आहे...ठिक आहे,हे तत्व मान्य..पण उपवास ही काही नुसती सुटी इहलौकिक गोष्ट नाही,उप-वास या शब्दाचा अर्थ-परमेश्वराच्या सांनिध्यात जाणं,त्याच्या निकट जाणं असा आहे. अता हे निकट जाताना त्या प्रीत्यर्थ काही उपासना करतांना,माणुस एकाग्र असावा हे गरजेचं आहे...म्हणुन तो त्या दिवशी निराहार करणारा असावा.. असंही आहे. निराहार,म्हणजे आळस/थकवा येणार नाही...यासाठी हलका आहार आणी तोही दिवसातून एकदाच...हा त्या निराहाराच्या तत्वामागचा व्यवहार आहे.
आज उपवासाला जे जडान्न खाल्लं जातं,,, ते नुसतच तात्विक नाही काय..? कारण त्यानी उपासाचा व्यवहार पाळण तर सोडाच,उलट त्याच्या हेतुलाच हरताळ फासला जातो..मग तरिही लोक व्यवहाराची
खिचडी करुन हा उपासाचा किस का घेतात..? आणी हे फक्त उपासाच्या बाबतीतच नाही,तर धर्मातल्या(लोकांना) नैतिक वाटणार्या/असणार्या अनेक कर्मकांडांच्या,समाज नियमांच्या बाबतीतही हे सगळ असच आहे...
पर्वाच एका मुंजीच्या कार्यक्रमात कर्नाटकमधुन आलेल्या एका वैदिकाशी (तो ही माझ्यासारखाच व्यवहारानी फक्त माणुस असल्यामुळे :-) ) माझी फक्कड दोस्ती जमली,आणी मधे मोकळ्या असलेल्या दोन तासात, धर्मातल्या निरनिराळ्या गोष्टींवर चर्चा करुन आंम्ही एका मतावर ठाम झालो...ते म्हणजे हे की,''वुई आर एंटरटेनींग टू पिपल्स'' ''आज आपण लोकांची करमणूक करित आहोत...'' माझे ते वैदिक मित्र या मतामुळे काहिसे खिन्न झाले होते...पण मी मात्र हसत होतो..त्यांनी त्याचं कारण विचारल्यावर,मी त्यांना म्हणलो... वुई आर एंटरटेनींग...एंटरटेनींग...अँड एंटरटेनींग... मग काय..? दोन मिनिटं आंम्ही दोघेही भरपूर मनापासुन हसलो... आणी होऊ घातलेल्या बटूला अंतरपाटामागे आणण्यासाठी ऑन स्टेज जाहलो... :-)
याद्या
12057
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
??????????? ?????? ???? ???
@????????????????????????
In reply to ??????????? ?????? ???? ??? by सुहास..
अ आ
In reply to @???????????????????????? by अत्रुप्त आत्मा
आजी कमी ऐकू येणार्या
"अहो.. तुम्हाला हवाय का
In reply to आजी कमी ऐकू येणार्या by गवि
असेच
In reply to आजी कमी ऐकू येणार्या by गवि
,आंम्हा भिक्षुकांची त्या
@अप्पाची खिचडी खाल्लीय का हो
In reply to ,आंम्हा भिक्षुकांची त्या by प्रचेतस
सहमत सहमत
In reply to @अप्पाची खिचडी खाल्लीय का हो by अत्रुप्त आत्मा
+२
In reply to सहमत सहमत by रणजित चितळे
हल्ली यापेक्षा डेक्कनच्या
In reply to +२ by रमताराम
बिपीन ची खिचडी
In reply to हल्ली यापेक्षा डेक्कनच्या by ५० फक्त
प्र का टा आ
In reply to सहमत सहमत by रणजित चितळे
तुमचं कसं झालय,रोज रोज खाता
In reply to @अप्पाची खिचडी खाल्लीय का हो by अत्रुप्त आत्मा
जिलब्या
In reply to @अप्पाची खिचडी खाल्लीय का हो by अत्रुप्त आत्मा
खरे सांगू
In reply to ,आंम्हा भिक्षुकांची त्या by प्रचेतस
भन्नाट हो भटजीबूवा...
@अशी मौजमजा यजमानांच्या घरी
In reply to भन्नाट हो भटजीबूवा... by धन्या
अशी मौजमजा यजमानांच्या घरी
In reply to भन्नाट हो भटजीबूवा... by धन्या
.
हो
उपास कसला घडला होता?
In reply to हो by विनायक प्रभू
जेवण मिळत नसल्याचा
In reply to उपास कसला घडला होता? by शुचि
पहा असल्या (म्हणजे साध्या
In reply to जेवण मिळत नसल्याचा by नाना चेंगट
साध्या भोळ्या प्रश्नांची
In reply to पहा असल्या (म्हणजे साध्या by शुचि
उपासा
कानडी
+१
In reply to कानडी by विनायक प्रभू
हा धागा जिवंत केलाय,तसे जरा
अहो आत्मूदा पण ते कानडी अन
In reply to हा धागा जिवंत केलाय,तसे जरा by अत्रुप्त आत्मा
तुम्ही म्हणताय म्हणून करीन पण
In reply to हा धागा जिवंत केलाय,तसे जरा by अत्रुप्त आत्मा
अतिशय धन्यवाद.
In reply to तुम्ही म्हणताय म्हणून करीन पण by रेवती
>>>>>>>> आजी कमी ऐकू येणार्
(No subject)
In reply to >>>>>>>> आजी कमी ऐकू येणार् by ज्ञानराम