उप-वास स्पेशलः-साबुदाणा खिचडी....
ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा
)''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झालेल्या या खिचडीला पहीली सलामी एका श्लोकाच्या ओळीच्या विडंबनातूनच दिली होती-म्हणजे,,, ''विश्वाधारं गगन सद्रुशं मेघवर्णं शुभांगम'' असं आहे की नाई,त्याला ''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''...असं मी चावलं होतं
...असो अता जास्त च्यावच्याव न करता उरलेलं कवीतेवर सोडतो---तर श्रोतेहो खिचडी करीता वाहातो,ही शब्दांची खिचडी....................(ही आमची पारंपारीक-गुरुजी/यजमान म्याच आहे.)
यजमानांनी विचारलं-उपास...?
जरा खिचडी देऊ का?
चपला घालतच म्हणालो
त्या पेक्षा मी येऊ का?
का हो?तुंम्ही गुरुजी..
आणी खिचडीला भिता?
अहो,वाचायला फार सोपी
ही पचायला अवघड गीता
अहो,मस्त दही टाका
मजबुत दाबून हाणा..
म्हणजे नंतर सहा तास
पोटात गोळे आणा?
जुने गुरुजी मजबुत खायचे...
एक/दोन प्लेट?...विसरा
पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का
खाण्यापलीकडे...दुसरा?
पूर्वीचे गुरुजी कामं करुन
पराती करायचे फस्त
अहो,जुना स्कुटरचा काळ तो
एव्हरेज पेक्षा इंधन जास्त
जाउ दे गुरुजी आता..
राग विसरा..हट्ट सोडा
कालची खिचडी पचायला
आधी आणा १ सोडा
अशा तह्रेनी आंम्ही यजमानांचा
१प्लेट अपराध पोटात घातला
पण नंतर दिवसभर...
तो आमच्या पोटात उतला
श्रावणाचा संपत सोमवार
आंम्ही या खिचडीवर सोडला
आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला..... 
प्रतिक्रिया
कविता आवडली. आम्च्य गुरूजींना
कविता आवडली.
आम्च्य गुरूजींना आम्ही मसाला दूध आणि केळी देतो ... त्यांना पण खिचडी बहुधा फारशी आवडत नसावी (किंवा आपल्यासारखी केस असावी).. नेहमी नाहीच म्हणतात.
-सविता
------------
माझे लेखन
मसाला दूध /केळी
आयला अजूनही ते या गोष्टी तुंम्ही दिल्यावर खातात, म्हणजे भलतेच तयार आहेत ते...कींवा त्यांचे पोट...
बाकी त्यांची केस तरी आमच्यापेक्षा वेगळी काय असणार म्हणा?....
ते सुपात आहेत,आंम्ही जात्यात आहोत...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
जबरदस्त
कविता खुप, खुप आवडली..........
पुढील लेखनास शुभेच्छा.
अभयं च मे सुखं च मे शयनं च मे
सूषा च मे सुदिनं च मे॥
हा हा हा
मस्त हो दिवेकर भटजी.
एकदम आवडेश. आधी चुकून लेखन विभाग चुकला का काय असे वाटले होते, पण लेखन उघडल्यावर मस्त करमणूक झाली.
अवांतर :-
ह्यावरून 'उपासाचा आनंद ह्या, मॅनफोर्स आता साबुदाणा फ्लेवर मध्ये' हे आठवले
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
मेनफोर्स....
''ह्यावरून 'उपासाचा आनंद ह्या, मॅनफोर्स आता साबुदाणा फ्लेवर मध्ये' हे आठवले ''--- हे वाचून आंम्हाला प रा-कोटीचा आनंद जाहला, हा तुमचा मेन फोर्स असावा असे वाट्टे
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
पहिलं कडवं वाचलं आणी एकदम
पहिलं कडवं वाचलं आणी एकदम मोठ्याने हसलो...जबरा आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~oOoOoOoOoOoOo~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल..
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..
- अशोक बागवे
गुर्जी-यजमान
म्याच आवल्डी रे!
साबूदाणं रबरसदृशं......श्लोकही भन्नाट
(साबूदाणा खिचडी प्रेमी) रंगाण्णा
धन्यवाद
सविता,पप्पु अंकल,प रा, किसनराव...सर्वांसी प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद...........
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
प्र.का.
प्र.का.टा.आ.
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
साबुदाणं रबरसदृशं .. हे
साबुदाणं रबरसदृशं .. हे सर्वात जास्त आवडले
http://preetamohar.blogspot.com/
हाहा अतिशय विनोदी. पहीलं कडवं
हाहा अतिशय विनोदी. पहीलं कडवं भन्नाट!!
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
हाहाहा
मस्त मजा आली.
आता पुजेला भटजीकांकाना खिचडी देताना विचार करावा लागेल.
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
लय भारी भटजीबुवा... कधी चुकुन
लय भारी भटजीबुवा...
कधी चुकुन माकुन तुम्हाला पुजेला बोलावलं तर तुम्ही म्हणाल ते खायला (आणि प्यायलासुद्धा
) घालू.
तो "शांताकारं..." च्या चालीवरचा श्लोक एकदम भन्नाटच !!!
ह्हा ह्हा ह्हा... धनाजीराव ,नका हो असं...
धनाजीराव,नका हो असं आमच्यात काय पण घालू....
)
मग आमचं यंत्र कसं ह्रायचं चालू?
पर्वाच आम्चा केला 'अट्टल बिहारी'.....( परा-ठा हाऊस मधे...
आणी तुंम्ही एवढ्यातच करताय लालू...?
धनाजीराव खुर्दाबाद.....(संभाव्य)यजमानशाही खुर्दाबाद...!

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
मस्त
परागभटजी लै भारी कविता.
उद्या/परवा खिचडी करून खायला लागेल. आम्हाला फक्त चतुर्थीलाच खायला मिळत असल्याने आम्हास साबुदाणा खिचडीचे फारच अप्रूप.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे
'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे आवडले. कविताही चान चान !!
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण.
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
अहो वडे काय?....
अहो वडे काय नी खिचडी काय.......? परतायच्या ऐवजी तळलं,तरी रबर निबरच असतं
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
सुड, तुझा वड्यावर फारच जीव
सुड, तुझा वड्यावर फारच जीव रे! आता पाकृ सेक्शनमध्ये "याचे वडे कसे करता येतील?" असा प्रश्न तुझ्याकडून आला तर आश्चर्य वाटायला नको!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण
हे वडेश्वरा.. हे वेगळे सांगायची काही गरज आहे का? तू तर आपल्या सामर्थ्याने फणसाचेही वडे करशील..
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण
हे वडेश्वरा.. हे वेगळे सांगायची काही गरज आहे का? तू तर आपल्या सामर्थ्याने फणसाचेही वडे करशील..
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
खिक्क् फणसाचे वडे !!
खिक्क्

फणसाचे वडे !!
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
हसायला काय झालं? शिकून घे ते
हसायला काय झालं?
शिकून घे ते वडे!
बरं बरं !!
बरं बरं !! ( ही देवळात गेली होती ना, कधी आली ?? )...

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
:)
सूड आता सूडास लागला म्हणायचा.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
इश्श्य......... उभ्या
इश्श्य.........
उभ्या दामादामातूनी टोलवाटा
कुणी सदेहयात्रेत या अडकले?
अल्प त्याच्या वेळेच्या या कडा अन
खड्ड्यात ट्राफिक तुंबले...
......खुर्ची
मस्त हो!
दिवेकर गुर्जी, रबर असो आणि काही असो, आम्हाला साबुदाणा खिचडी आवडते हो, मात्र रोज खाऊन तुमची वाट लागली असेल हे नक्कीच!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥
धन्यु हो...
तुंम्ही म्हणताय ते खरय.... पण फक्त वाट लागलेली नाही,आंम्हीही वाटेला लागलोय...........
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
असं काय म्हणता हो
असं काय म्हणता हो गुरुजी?
आमच्याकडे लघुरुद्राला येणारे ११ गुरुजी आवडीने खिचडी खातात असा अनुभव आहे.
पण तुम्ही म्हटल्यानुसार कंटाळा हा येतच असणार्........मग सध्या गुरुजींचा आवडता, कंटाळा न आलेला पदार्थ तरी सांगा. आम्ही मेन्युमध्ये बदल करू.
कवीता आवडली.
ह्हा ह्हा ह्हा...असो.... अहो रेवतीताई... ते आवडीनी वगैरे....
ते आवडीनी वगैरे तितकसं काही खंरं नसतं... तो आजकालच्या काळातला कस्टमर सर्व्हीसचा भाग झाला आहे,यजमानाला जे आवडेल ते सगळ बिनबोभाट करायच,असा हल्ली संकेतच झालाय...प्रत्येक व्यवसायात. त्याचाच तो परिणाम,दुसरं काय?तरी तुंम्ही फर्माइश केलीये म्हणुन सांगतो,,, बटाट्याचा तिखट (लाल) चिवडा आणी फ्रूटसेलेड,असा थोडा हटके मेनू ठेऊन बघा.आणी फक्त आग्रह करू नका...बघा काय होतं ते...
अवांतरः-मी उपासाचा काढलेला अर्थ म्हणजे,पोटातल्या गिरणी कामगारांना हाफ डे देणं कींवा पूर्ण रजेवर ठेवणं असा आहे.(शास्त्रातही उपवास यापेक्षा निराहार हीच संज्ञा रूढ आहे.) पण उपासाचे सगळे पदार्थ पाहीले की हाफडे,पूर्ण रजा सोडाच...पण तो ओव्हरटाईम दील्यासारखा वाटतो...म्हणुनच मी माझ्या अनेक यजमानांना ''हे'' विवेचन गळी उतरवून पोहे,उप्पीट कींवा कुठलाही हलका आहारच योग्य हे पटवलय आणी आमलातही आणवलय...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
चालेल. हा मेन्युही चांगलाच
चालेल. हा मेन्युही चांगलाच आहे.
गुरुजींना आवडल्यास मी आवर्जून कळवीन.
धन्यवाद!
सह्ही!
मस्तच लिहिलीत कविता.
बरं मग तुम्ही पोथी वाचायला उपासाच्या दिवशी आल्यावर काय मेन्यू ठेवू?
काय मेन्यु ठेवू ?
ह्ही ह्ही ह्ही.........आधी बोलवातर खंरं
आणी मेन्यू म्हणजे उपासाचा उप-वास नसलेला कोणताही पदार्थ ठेवा,मग येऊ हो आंम्ही...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
आमंत्रण
या या, कधीही या.
पत्ता संदेशातून कळवते. संदेश आवडतात का खायला?
संदेश आवडतात का खायला?
...........पचायला जड नसले तर
आवडतात हो..........
अट तीच आहे ''क्रुपया हलके देणे'' 
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
बुवा, शिंगाड्याच्या पिठात
बुवा, शिंगाड्याच्या पिठात केलेले हरि मिर्चिचे पराठे चालतिल का खिचडी ऐवजी ?
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
हरी मिर्चीचे पराठे.......
नाय नाय पर्वा पाहीली हरी मिर्च,,,आणी मी ह र लो
त्या परा-ठ्या पुढे...त्यात शिंगाड्याचं पीठ म्हण्जे ए सी सी सिमेंटचा थर... हे पोटात गेलं की दुसय्रा दीवशी सकाळी आमची थरथर 
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
मस्त. बहुतेक या मुळेच
मस्त.
बहुतेक या मुळेच आमच्याकडे गेल्यावर्षी सत्यनारायण करायला आलेले गुरूजी.. "आम्ही फराळ करू फक्त.. पण साबुदाणा खिचडी सोडून.. काहीही करा. अगदी बटाटे पोहे सुद्धा चालतील" असं म्हणाले होते ते आठवलं.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
भन्नाट
एक भन्नाट कविता. आणि सुरुवातीचा श्लोक तर अत्त्युत्तम !!
निमिष ध.
आयला, मस्त कविता!!
आपण सगळे सणाला मारे उदार यजमान होऊन भटजींवर आदरातिथ्याचा मारा करतो...


पण त्या बिचार्या भटजींची काय अवस्था होत असेल याचा विचारच करत नाही.....
दक्षिणा नको पण खिचडी आवर!!!!
जियो परागशेठ!!!
भन्नाट
मस्तच कविता आणि पहिला श्लोक तर अफलातून. वरती पिडा काकांनी म्हट्ले आहे तसेच म्हणते
दक्षिणा नको पण खिचडी आवर!!!!
जियो परागशेठ!!!
सविता
सर्वांना........धन्यवाद.
प्रीत-मोहर,जाई,शुची,वल्ली,सविता००१,पि डां काका,निमिष ध,प्राजुताई, सर्वांना धन्यवाद....
प्रतिक्रीयेच्या निमित्तानी प्रतिक्रीया दिलेल्यांनाही धन्यवाद
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
आवरा
__/\__
गुर्जी ...
साफ खपल्या गेलो आहे आहे असे नम्रपणे नमूद करू इच्छितो
***************************************
- मन्या फेणे
जावे त्याच्या वंशा तेंव्हा
जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे म्हणतात ते खरच आहे. मला वाटायच काय बुवा भटजी बुवांची चंगळ आहे, पण आज आतल खर बाहेर आल.
धमाल हो काव्यभट.
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
अपर्णा अक्षय धन्यवाद
तरी आमचं बर आहे,,,आंम्हाला या ना त्या कारणांनी नको असलेला पदार्थ टाळता तरी येतो.पण आमच्यात नोकरी/व्यवसाय निव्रुत्त झाल्यावर निव्वळ श्राद्धाला जेवायला जाणारी वयस्कर मंडळींची टीम आहे, त्यांन्ना मात्र श्राद्धाचं पानात वाढलेलं खावच लागतं, आंम्हाला खिचडी तसं त्यांना ''लाडू खा,,,लाडू खा'' हा आग्रह अस्तो. त्यात पुन्हा गेलेल्या माणसाला आवडणारे पदार्थही (विशेषतः तेराव्याला व पहील्या वर्षाच्या श्राद्धाला) वाढले जातात...त्यात पुन्हा भटजी म्हणजे खादाड हा परंपरागत अपसमज,त्यांची बिचाय्रांची खरच वाट लागते...
अतीअवांतरः- श्राद्ध विधींमधे श्राद्ध भोजनाला बसणाय्रा गुरुजींसाठी यजमानांनी म्हणायची १ प्रार्थना असते. तीचा साधारण आशय म्हणजे-''आज आंम्ही आपल्यासाठी भोजनाचे जे जे पदार्थ केलेत त्यांपैकी आपल्याला जे जे रुचतील ते ते नि:संकोच सेवन करा व जे रुचणार नाहीत त्यांचा त्याग करा(टाका) व तुंम्ही स्वस्थ अंतःकरणानी/सुखानी जेवा'' बाघा आता... तत्व कीती चांगलं आहे,,,पण परंपरेत रुजलेला व्यवहार कीती विपरीत आहे. सगळ्या धर्मांची हीच तर गोची आहे,जीथे तत्व चांगली आहेत तिथे व्यवहार वाईट आहे,,,आणी तत्व वाईट आहेत तिथे तर काही बोलूच नका (सुधारणावादातल तर अजीबात बोलू नका)अशी अवस्था,,,हा खंरं तर एका वेगळ्या लेखमालेचा विषय आहे. पण अत्ता अगदी न रहावलं गेल्यामुळे इथे लीहील गेलं.
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
कविता भारीच. मला वाटल रेसिपी
कविता भारीच. मला वाटल रेसिपी असेल.
गुर्जी.. दंडवत स्विकारा,
गुर्जी.. दंडवत स्विकारा,
यावरून यजमानांना यमजान असा नवीन शब्द रूढ करायला हरकत नाही असे निरिक्षण नोंदवतो.
यम-जान ..ह्हाह्हाह्हा
हा शब्द आमच्यात फेमस करणार...
igsmile:
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
दिवेकरांना शलुट ठोकत
दिवेकरांना शलुट ठोकत आहे....
वेगळ्या धर्तीवरची कविता..... ज्यांनी
गुर्जींचे होणारे हाल खमंग अन छानशा कवितेत बांधुन जनतेसमोर ठेवलेत....
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =
वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे
वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे अशी शंका येत आहे
नसावा.. ठाणे पुरेपूर
नसावा..
ठाणे पुरेपूर कोल्हापूर कट्ट्याला या दोन नावांनी दोन वेगवेगळ्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्याही एकाच वेळी.
हां अर्थात यामुळे आयडी डू नाही हे सिद्ध होत नाही..
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
वपाडाव यांच्या...
शलुटचा विनम्रपणे स्वीकार करण्यात येत आहे.........
धन्यवाद
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
गुरूजी आमचे दंडवत आहे
गुरूजी आमचे दंडवत आहे तुम्हाला. मस्त रेखाटलीय कविता
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हाहाहा.. आता कळलं!
गुर्जी कविता छान आहे.
घरात वास्तुशांतीची पुजा केलेली, गुरुजीं करता साबुदाणा खिचडी व इतर नातेवाईकांकरता पोहे..नंतर नातेवाईकांनी येउन सांगितले खिचडी छान झालेली आणि गुरुजी म्हणाले पोहे छान झाले होते..तेच म्हंटलं गुरुजींना चॉईस दिल्यावर पोह्यांचा नंबर लागला.
तेव्हा कळलं नव्हतं पण आता संदर्भ लागतोय...
--मयुरा.
सर्व प्रतिसादकांसी पुन्हा
सर्व प्रतिसादकांसी पुन्हा एकवार धन्यवाद..........
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.