✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एनर्जी व मॅटर

र
रणजित चितळे यांनी
Tue, 05/01/2012 - 14:19  ·  लेख
लेख
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही. आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली. एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का. मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरु झाली. आता वेळ हे आपल्या साठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस लागत असेल तर ती स्पेस आली कोठून. कोणी वैज्ञानिक निरुपण करु शकेल का ह्या प्रश्नाचे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36801 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

म्हणजे आता तुम्ही कधीच बोलणार नाहि !!

अर्धवटराव
Sat, 05/05/2012 - 00:53 नवीन
रघुपतीराघव राजाराम ! पतीतपावन सीताराम !! जय हो बाबा गांधिजी की अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्यांच झालं की मी प्रतिसाद देईन

संजय क्षीरसागर
Sat, 05/05/2012 - 01:16 नवीन
हे वाचलेलं दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ते वाचुनच मी प्रतीसाद दिलाय !!

अर्धवटराव
Sat, 05/05/2012 - 01:19 नवीन
प्रिकंडीशन मीट व्हायचे चान्सेस फार दिसत नाहित !! अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते आता तुम्ही आणि रामपुरी बघा

संजय क्षीरसागर
Sat, 05/05/2012 - 01:36 नवीन
कारण तुम्ही (बहुतेक आनंदानं) भजन सुरू केलय आणि त्यांना तर सर्व कळलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

फरक आहे !!

अर्धवटराव
Sat, 05/05/2012 - 01:44 नवीन
>>ते आता तुम्ही आणि रामपुरी बघा -- बळच. तुमच्या गळ्यातली धोंड आमचय गळी का उतरवताय ?? >>कारण तुम्ही (बहुतेक आनंदानं) भजन सुरू केलय -- थोडं उलट. भजन सुरु केल्याने आनंद मिळतोय. >>आणि त्यांना तर सर्व कळलय -- नो कमेंट्स. पण तुम्ही म्हणताय तर असेल कदाचीत. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

रणजितजी

निशदे
Tue, 05/01/2012 - 23:00 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Big_Bang_theory#Timeline_of_the_Big_Bang इथे थोड्या प्रमाणात माहिती आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे की अजून ही एक थिअरी आहे. मानवाच्या सध्याच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानानुसार ही थिअरी मांडण्यात आलेली आहे. नक्की बिग बँग कसा झाला आणि इतर प्रश्न संपूर्णपणे सुटलेले नाहीत.
  • Log in or register to post comments

मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही

रामपुरी
Wed, 05/02/2012 - 01:06 नवीन
जी गोष्ट अजून अस्तित्वातच नाही ती जालावर तरी कशी सापडेल? समर्पक उत्तराचा अजून शोधच लागलेला नाही. लागला की जालावर नक्की सापडेल (तोपर्यंत तुम्ही आम्ही अस्तित्वात असलो तर). :)
  • Log in or register to post comments

येथे वाचा. हे उत्तर असेल असे

sagarpdy
Wed, 05/02/2012 - 11:22 नवीन
येथे वाचा. हे उत्तर असेल असे नाही, पण डोक्याला चांगले खाद्य आहे.
  • Log in or register to post comments

४२!

दिगम्भा
Wed, 05/02/2012 - 13:44 नवीन
आमच्या अल्प माहितीनुसार जीवन, विश्व व सर्व काही यांचे अंतिम उत्तर ४२ हे आहे (संदर्भः रिचर्ड अ‍ॅडॅम्स, १९९७) ;) अधिक माहितीसाठी "द हिचहायकर्स गाइड टु द गॅलॅक्सी"वाचावे.
  • Log in or register to post comments

विश्वाची उभारणी आणि संहारणी!

सुधीर
Wed, 05/02/2012 - 14:58 नवीन
लोकमान्यांचं "गीतारहस्य" वाचतोय, अजून एका प्रकरणानंतर "विश्वाची उभारणी आणि संहारणी!" हे प्रकरण आहे. बघू लोकमान्य काय म्हणतायत. खूप हळू हळू वाचतोय कारण टिळकांनी इतका सूक्ष्म विचार केलाय की मम पामराला "टकूरं खाजवावं लागतंय". बिगबँग, स्ट्रींग, क्वांटम, रिलेटिव्हीटी थिअरीजची माहिती स्टिफन हॉकिंगजच्या "ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम" मध्ये झाली होती. हेच पुस्तक वाचूनच पहिल्यांदा मला "जग निर्माण होण्यापूर्वीच्या काळाचं काय करायच?(जग निर्माण करण्यापूर्वीच्या काळात परमेश्वर काय करतं होता? असा जरा आस्थिकांच्या धोतराला हात घालणार्‍या)" ह्या प्रश्नाची माहिती झाली होती. पण माझ्या "मी इथं मरायला काय करतोय?", या प्रश्नाचं उत्तर मला काही त्यावेळी मिळालं नाही. (अजूनही, सापडलं-सापडलं म्हणता शोधतो कधी कधी) काही वर्षांपूर्वी "इन्सेप्शन" पाहिला तेव्हा वाटलं वेळं अन् आयुष्य हा भास तर नसावा? सालं, कोणाच्या तरी मी स्वप्नात तर नाही ना? ड्रीम विदीन अ ड्रीम! थ्री, फोर, आणि किती लेवल ते "देवास" ठाउक. जाउंदे, आता मी काही शोधतं नाहीए, मला ते प्रश्नही नकोत अन उत्तरही. हाथी घेतलेली कामं कशी संपवायची येवढच बघतो. त्यासाठी डेव्हीड अ‍ॅलनच "गेटिंग थिंग्स डन (जीटीडी)" कितपत उपयोगी पडतंय ते बघतो.
  • Log in or register to post comments

>जाउं दे, आता मी काही शोधतं नाहीए

संजय क्षीरसागर
Wed, 05/02/2012 - 15:19 नवीन
मला ते प्रश्नही नकोत अन उत्तरही हाती घेतलेली कामं कशी संपवायची येवढच बघतो. त्यासाठी डेव्हीड अ‍ॅलनच "गेटिंग थिंग्स डन (जीटीडी)" कितपत उपयोगी पडतंय ते बघतो. = खरंय >लोकमान्यांचं "गीतारहस्य" वाचतोय, अजून एका प्रकरणानंतर "विश्वाची उभारणी आणि संहारणी!" हे प्रकरण आहे. बघू लोकमान्य काय म्हणतायत. = कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

कशाला?

सुधीर
Wed, 05/02/2012 - 15:58 नवीन
बसं, लोकमान्यांची मतं (विशेषतः कर्मयोगावर) जाणून घेणे येवढेच! त्याच्याविषयी असलेला आदर, गीतारहस्य लिहिण्यापूर्वी त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना केलेला व्यासंग, वयाच्या साठीतही इंग्रज सरकारने, गीतारहस्य लिहिलेली वही जेव्हा परत देण्यास चालढकल केली तेव्हा "मी पुन्हा ग्रंथ लिहून काढेन, तो माझ्या डोक्यात आहे" अशी जबरदस्त इच्छाशक्ती आणि उत्साह (साठीत सुद्धा?) त्यामुळे मला हे पुस्तक(ग्रंथ) वाचावसं वाटलं. आत्तापर्यंत पहिली सहाच प्रकरणं वाचून संपलीएत, चांगली होती. गीतारहस्यकडे मी "थिअरी ऑफ एथिक्स" (जो विषय मला खूप कठीण वाटतो) च्या दृष्टीकोनातन जेव्हा बघतो तेव्हा ज्ञानात भर पडतेय असं वाटतं. पण १०० वर्षा पूर्वीची भाषा असल्याने थोडी समजायला कठीण (वेगळी) वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गीता रहस्य

रणजित चितळे
Wed, 05/02/2012 - 17:48 नवीन
खरे तर मला गीते पेक्षा गीता रहस्य जास्ती आवडते. किती वेळा वाचले तरी मन भरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

अरे ?

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/02/2012 - 15:18 नवीन
अजून धाग्यावरती देव- धर्म, श्रद्धा - अंधश्रद्धा, वेद- पुराणे, भारताची संस्कृती इत्यादी गोष्टींची टिंगल टवाळी, खालच्या भाषेतले शेरे कसे काय बरे आले नाहीत ? :)
  • Log in or register to post comments

परा

रणजित चितळे
Wed, 05/02/2012 - 17:52 नवीन
परा कारण येथे वैज्ञानिक चर्चा पाहीजे अशी विनंती केली होती. खरे म्हणजे एका पॉन्टवर विज्ञान, आध्यात्म व फिलॉसॉफी एक होते ते बहूतेक जण विसरुन, आस्तिक नास्तिक, देव आहे का एनर्जी आहे, आम्ही दांभिक का ते दांभिक ह्या वर येतात. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

:)

अर्धवटराव
Wed, 05/02/2012 - 22:03 नवीन
>> खरे म्हणजे एका पॉन्टवर विज्ञान, आध्यात्म व फिलॉसॉफी एक होते... -- एकदम पर्फेक्ट मुद्दा >> ...ते बहूतेक जण विसरुन, आस्तिक नास्तिक, देव आहे का एनर्जी आहे, आम्ही दांभिक का ते दांभिक ह्या वर येतात. -- :( अहो विसरुन काय म्हणता... ते विचारातच न घेता गाडी सुसाट सुटते पब्लीकची. काय करणार. तसं बघितलं तर सामुहीक सुखी जीवन ही अत्यंत साधी गोष्ट आहे... पण खाजवण्यातच सुख मानत असेल कोणि तर रक्त निघणारच. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

अगदी खर

रणजित चितळे
Sat, 05/05/2012 - 09:11 नवीन
।।।।।।।।।।।।।।।।सामुहीक सुखी जीवन ही अत्यंत साधी गोष्ट आहे... पण खाजवण्यातच सुख मानत असेल कोणि तर रक्त निघणारच. अगदी खरे आहे आपले म्हणणे - पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अजून धाग्यावरती देव- धर्म,

बिपिन कार्यकर्ते
Wed, 05/02/2012 - 18:10 नवीन
अजून धाग्यावरती देव- धर्म, श्रद्धा - अंधश्रद्धा, वेद- पुराणे, भारताची संस्कृती इत्यादी गोष्टींची टिंगल टवाळी, खालच्या भाषेतले शेरे कसे काय बरे आले नाहीत ?
आर यु शुअर मि. परा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कहां गये वैज्ञानिक?

कवितानागेश
गुरुवार, 05/03/2012 - 12:33 नवीन
<रटरटित निवेदकाच्या आवाजात> "आखिर कहां गये सब वैज्ञानिक???" "कुछही दिन पहले पाया था उनको यही किसी भीड्वाले धागोंपर!" " लेकिन अब किसीकाभी कोई पता नहीं!" "आखिर कहां रह गये सब वैज्ञानिक???" " आईये ढुंढते है अल्याडपल्याडके संस्थळपर...." "आखिर कौन है ऐसा जो सुलझाएगा इस एनर्जी मैटर को??" "क्या आज इसी दिन इस बातका पता लग पाएगा, के किसने किया है बिग बैंग???" "आखिर कहां रह गये सब वैज्ञानिक???" :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लाईक इट

रणजित चितळे
गुरुवार, 05/03/2012 - 12:40 नवीन
लाईक इट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माउ

पैसा
गुरुवार, 05/03/2012 - 20:30 नवीन
हल्ली इंडिया टीव्ही जास्त बघतेस का ग? (आणि अवांतरः नाझ्का लाईन्सचं शेवट काय झालं??! :D)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड

गवि
Wed, 05/02/2012 - 18:07 नवीन
स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड डिझाईन पुन्हापुन्हा वाचून बर्‍यापैकी निराशा झाल्यावर आणि पूर्वी फिजिक्सची पदवी मिळवताना झालेल्या विज्ञानाच्या पायाभरणीवर आता (ग्रँड डिझाईनमधे न म्हटलेलं) असं नक्की वाटतं की विज्ञान (म्हणजे फिजिक्स) या गोष्टीच्या आधारे जगाची उत्पत्ती आणि तत्सम प्रश्न सोडवता येणार नाहीत. याचा अर्थ लगेच समोरचा जे म्हणेल ते मान्य करुन किंवा देव अशी संकल्पना कंपल्सरी करुन एखाद्या श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा "विजय" झाला असं घोषित करण्याची जरुरी नाही.. माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी. बाकी ग्रह, तारे, उंची, खोली, आई, बाबा, मित्र, डोंगर, हिरवा, मऊ, सुंदर, गार, गरम, जिवंत वगैरे वगैरे सर्व कॉन्शस असतानच्या "काळा"तला मतामताचा भाग झाला. काळ हा सुद्धा. हे उत्तर अर्थात "शास्त्रीय" नाही. त्यामुळे चितळे ते स्वीकारतील किंवा कसे माहीत नाही. आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल.
  • Log in or register to post comments

>>>>आपण मेल्यावर समजा जाणीव

यकु
Wed, 05/02/2012 - 18:15 नवीन
>>>>आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल. ---- गवि, नोट यूवर दीज सेन्टेसेस ;-) नेमकी हीच दिशा पकडून युजींनी 'मृत्यू म्हणजे काय?' या प्रश्नाच्या खोलात शिरण्‍याचा प्रयत्न केला आहे, तो अनुवादित करतो आहे, बहुतेक आज रात्री दोन अडीच वाजता तो अनुवाद टाकतो. थँक्स टू युजी, काही ठिकाणी त्यांनी पटलं तर घ्‍या, नाहीतर चालू पडा असं म्हटलेलं नाही, उलट प्रश्न विचारणार्‍याला त्या प्रश्नात खोलवर शिरायला मदत केली आहे, मला ते प्रचंड आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा

गवि
Wed, 05/02/2012 - 18:20 नवीन
पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा मानूनच सगळं.. :) युजी, त्यांची मतं, त्यांची मतं नसणं, देव, शक्ती, अस्तित्व, ई=एमसी स्क्वेअर, आईनस्टाईन, गुरुत्वाकर्षण, पुन्हापुन्हा अनुभवास येणारे विश्वाचे स्थिर नियम, फळ खालीच पडणं.. सारा सारा मतामतांचा किंवा एकमत करण्याचा भाग. असलंच काही खरं तर फक्त आपली... आपलीही नव्हे... एकूण फक्त "जाणीव". ती नक्की आहे. बाकीचं माहीत नाही.. बाकीचा भाग मताचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

गवि, यू हॅव हिट द नेल राइट ऑन द हेड!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/03/2012 - 12:46 नवीन
= बिफोर आय स्टार्ट, मी इथलं माझं पहिलं विधान उधृत करतो: प्रश्न महत्त्वाचा नाही, कोणत्या उत्तरानं तुम्ही शांत होता ते महत्त्वाचय कारण प्रश्न दुय्यम आहे, तुम्ही प्रार्थमिक आहात. गवि, शोध ज्यावेळी प्रक्रियेच्या अंगानं घेतला जाईल तेव्हा ते विज्ञान होईल आणि प्रश्नकर्त्याच्या दृष्टीकोनातनं घेतला जाईल तेव्हा ते अध्यात्म असेल. विज्ञानाचा शोध प्रश्नकर्त्यापर्यंत कधीही पोहोचणार नाही आणि जोपर्यंत प्रश्नकर्ता शांत होत नाही तोपर्यंत सर्व वैज्ञानिक शोध जगणं सोपं करतील पण मूळ अस्वास्थ्य मिटवू शकणार नाहीत. तुझा प्रश्न प्रश्नकर्त्याच्या अ‍ॅंगलनं आहे आणि तुझ्या दोन्ही प्रतिसादांचा सारांश असायं: >माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी. >आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल. >असलंच काही खरं तर फक्त आपली... आपलीही नव्हे... एकूण फक्त "जाणीव". ती नक्की आहे. बाकीचं माहीत नाही.. बाकीचा भाग मताचा. =या जगात फक्त एकच गोष्ट निर्विवाद आहे आणि ती म्हणजे आपलं असणं, आपण "मी नाही" असं म्हणू शकत नाही कारण "मी नाही" म्हणायला तरी मी हवाच; किंवा द अदर वे, जाणीव होणारा जाणीवेपूर्वी हजर असायलाच हवा. "हे असणं" ही "जाणीवेपूर्वीची स्थिती" आहे; किंवा द अदर वे, हा आपल्या प्रत्येकाला सतत जाणवणारा मी, आपल्या सर्वांचा एकच आहे. तो एकच असल्यानं निराकार आहे, आदीम आहे, सर्वत्र आहे आणि मुख्य म्हणजे तो जाणीवेनं अनाबाधित आहे. जर आपल्या निव्वळ असण्याच्या जाणीवेशी किंवा त्या जाणीवपूर्व स्थितीशी आपण सतत संलग्न राहू शकलो तर जाणीवेत घडणारी प्रत्येक घटना आपण जाणू शकू मग ती शारीरिक हालचाल असो, विचार असो, भावनांचे कल्लोळ असोत, झोप असो की मृत्यू. ही जाणीवपूर्व स्थिती गवसण्याला किंवा तो सार्वत्रिक मी गवसण्याला सत्य गवसणं म्हटलंय आणि त्या जाणीवपूर्व स्थितीत कायमच्या स्थित झालेल्या पुरूषाला (खरं तर कुणाही व्यक्तीला, पुरुष असो की स्त्री) सिद्ध म्हटलंय. (सध्या सॉलिड बि़झी आहे त्यामुळे इतर सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरं वेळ मिळाल्यावर देईन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जाणीव

विटेकर
गुरुवार, 05/10/2012 - 16:50 नवीन
माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी. दासबोध दशक ९ समास ६ गुणरुपनिरुपण जाणीव म्हणिजे जाणतें चळण| तेंचि वायोचें लक्षण | वायोआंगीं सकळ गुण| मागां निरोपिलें ||१९|| म्हणोन जाणीवनेणीवमिश्रीत| अवघें चालिलें पंचभूत | म्हणोनियां भूतांत| जाणीव असे ||२०|| पूर्ण समास मूळातूनच वाचावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अस्सं क्काय!!! वाचतेय.....

कवितानागेश
Wed, 05/02/2012 - 23:51 नवीन
अस्सं क्काय!!! वाचतेय..... :)
  • Log in or register to post comments

हम्म

मूकवाचक
गुरुवार, 05/03/2012 - 12:09 नवीन
जगभरच्या शास्त्रज्ञांनी आपली 'एनर्जी' अनंत काळपर्यंत पणाला लावली तरी हे 'मॅटर' मिपापुरतेही क्लोज होईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

आपले प्रतिसाद

रणजित चितळे
गुरुवार, 05/03/2012 - 12:59 नवीन
आपले सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मला किती अजून शिकायचे (जाणून घ्यायचे) आहे त्याची ग्वीही मिळीली. छान मुद्देसूद प्रतिसाद पाहून तरी आपण कोठे आहोत व आपल्याला किती जन्म अजून घ्यावे लागणार आहेत ह्याची कल्पना आली. ;)
  • Log in or register to post comments

रणजित, >आपण कोठे आहोत

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/03/2012 - 17:29 नवीन
व आपल्याला किती जन्म अजून घ्यावे लागणार आहेत = असा विचार करू नका, कारण समजलं नाही तरी आपण सत्यच राहतो. सत्य समजलं तर आहे आणि न समजलं तर नाही असं नाही. कुणाला समजो न समजो, कुणी दखल घेवो न घेवो, सत्य आहेच कारण सत्य ही कायम स्थिती आहे. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा सत्य समजल्यावर जगण्यात तुफान मजाय पण सत्य समजलं नाही म्हणून निराश होण्यात अर्थ नाही, इतर अनेक गोष्टी आहेत ज्यात तुम्ही रमू शकता त्यांचा आनंद घ्या. पण एक मात्र नक्की, जे काय असेल ते आता, या जन्मी आणि इथेच आहे, मग ते सत्य असो की लौकिक, कोणतीही गोष्ट पुढे ढकलण्यात अर्थ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

ह्या विषयाशी थेट संबंध

मराठे
Fri, 05/04/2012 - 23:14 नवीन
ह्या विषयाशी थेट संबंध नाहीये, पण तुमच्या एका प्रतिसादात तुम्ही म्हटलंय "मला वाटते देव आहे का नाही ह्याचे उत्तर ह्या कोड्यात दडलेले आहे." त्याच्या संदर्भात पूर्वी टि.व्ही.वर पाहिलेली एक मुलाखत आठवली. कोणाची, आणि कोणी घेतलेली ते काही आठवत नाही पण त्यात मांडलेले मुद्दे मात्र लक्षात थोडेफार लक्षात आहेत. "देवाचं कार्यक्षेत्र दिवसेंदिवस कमी होतंय. फार फार पूर्वी दिवस, रात्र, ग्रहण, पाऊस, वादळे, भूकंप हे देवाच्या कृपे/अवकृपेमुळे होतात असा समज होता. पण हळू हळू विज्ञानामुळे त्यामागची कारणं समजू लागली आणि त्यामुळे ग्रहण होतं त्यात देवाचा काही हात नाही हे समजलं. मानवाची उत्क्रांती कशी झाली हे समजल्यावर देवाने माणसाला निर्माण केलं ह्या समजाला तडा गेला. आपलं ज्ञान जसंजसं वाढत जाईल तसं तसं घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारणमिमांसा आपल्या ध्यानात येईल आणी आपण देवाला दोष देउन गप्प बसण्यापेक्षा त्या कारणाकडे लक्ष देऊ शकू. देवावर हवाला ठेऊन जगायला सुरूवात केली तर आजूबाजूला होणारी प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने न पाहता 'देवाची करणी' असं म्हणून माणूस गप्प बसेल आणि त्याच्या बुद्धीची वाढच खुंटेल." तुमच्या ह्या प्रश्नाचं पण तसंच आहे. जोपर्यंत विज्ञानाकडे ठाम उत्तर नाही तोपर्यंत हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी / देव आहे असा समज राहिल. सहज आठवलं म्हणून सांगतो, कॉलेजमधे असताना मी माझ्या मित्राबरोबर आकाशदर्शनासाठी वांगणीला जात होतो. ट्रेन मधे गप्पा मारताना, त्याला म्हणालो, ज्याप्रमाणे भोवरा स्वत:भोवती फिरताना त्याचा अक्ष स्थिर नसतो, तसंच पृथ्वीचाही अक्ष स्थिर नसतो. त्यामुळे ध्रुवतारा आज जरी आपल्याला एका ठिकाणी दिसत असला तरी हजारो वर्षांपूर्वी तो तिथे नव्हता." यावर माझा मित्र म्हणाला, "म्हणजे ध्रुव बाळाला मिळालेलं अढळपद खरं नाही असं तुला म्हणायचंय का? तुझा त्यावर विश्वास नाही का?" या त्याच्या प्रश्नावर मला काय बोलावं तेच समजेना. त्याला समजावण्याच्या भानगडीत मी काही पडलो नाही. काही काही वेळा गप्प बसणंच जास्त सोयिस्कर असतं. असो.
  • Log in or register to post comments

मेलो !!!

अर्धवटराव
Fri, 05/04/2012 - 23:23 नवीन
>>म्हणजे ध्रुव बाळाला मिळालेलं अढळपद खरं नाही असं तुला म्हणायचंय का? तुझा त्यावर विश्वास नाही का? --ठ्ठो... अर्धवतराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

विज्ञान आणि अध्यात्म

संजय क्षीरसागर
Sat, 05/05/2012 - 01:29 नवीन
का? हा वस्तुशी -वस्तुच्या परस्पर संबंधांचा किंवा किंवा वस्तुच्या अंतर-रचनेचा शोध आहे विज्ञान जे आहे त्याचा उलगडा करतं हा एक मस्त ज्योक आहे , शिक्षिका : गुरुत्वाकर्षण हा मानवी जीवनातला अत्यंत महत्वाचा शोध आहे आणि तो न्यूटनला सफरचंद झाडावरनं खाली का पडतं ? असा विचार केल्यानं लागला विद्यार्थी : मॅम, गुरुत्वाकर्ष्णाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंदं खालून वर जायची का? ट्राय टू अंडरस्टँड , प्रक्रियेचा अंत शोधता येत नाही हे शास्त्रज्ञाचं शल्य आहे आणि त्या अर्थी `का'? हा अंतीम अनुत्तरित प्रश्न आहे. ऑन एनी लाईन ऑफ इन्क्वायरी वन कम्स टू अ `कल डी सॅक'; काय कारण असेल त्याच? तर एव्हरी थींग अल्टीमेटली टर्न्स इंटू अ मिस्ट्री! आइनस्टाईननं म्हटलय... If I would be a young man again and had to decide how to make my living, I would not try to become a scientist or scholar or teacher. I would rather choose to be a plumber or a peddler in the hope to find that modest degree of independence still available under present circumstances.” या अर्थानं `का'? हा अंतीम अनुत्तरित प्रश्न आहे. पण अध्यात्म हा प्रक्रियेचा शोध नाही, तो ज्यात प्रक्रिया सुरु होते, चालते आणि संपते त्या अवकाशाचा शोध आहे कारण ते सर्व प्रक्रियांचा स्त्रोत आहे आणि म्हणून रहस्यांच रहस्य आहे. हॉकिंग जेव्हा "बिकॉज देअर इज अ लॉ सच ऍज ग्रॅविटी, दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग" म्हणतो त्या नथिंगनेसला बुद्ध शून्य म्हणतो. शास्त्रज्ञ उलगडा होत नाही म्हणून व्यथित होईल आणि बुद्ध अंतीम रहस्य गवसल्यानं शांत होईल इतकाच फरक आहे
  • Log in or register to post comments

पटल

रणजित चितळे
Sat, 05/05/2012 - 09:25 नवीन
एकूण काय कोणी काहीही म्हणो, विज्ञानात आज तरी मला सतावणा-या प्रश्नाला उत्तर नाही. मग लोक दुसरीकडे त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. त्या दुसरीकडच्या प्रयत्नाला काही लोक अध्यात्म म्हणतात. काही लोक फिलॉसॉफी म्हणतात, तर काही लोक विज्ञान म्हणतात. शिक्षिका : गुरुत्वाकर्षण हा मानवी जीवनातला अत्यंत महत्वाचा शोध आहे आणि तो न्यूटनला सफरचंद झाडावरनं खाली का पडतं ? असा विचार केल्यानं लागला विद्यार्थी : मॅम, गुरुत्वाकर्ष्णाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंदं खालून वर जायची का? अवांतर काही लोक न्यूटनला कॉन्स्टीपेशन होते का विचारतात. कारण नाही तर गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान त्याला लहानपणीच झाले असते. ;-) प्रत्येकाला सत्याची (ऋताची) उपरती व्हावा लागते, जेव्हा होते तेव्हा मग तो न्यूटन होतो, आईनस्टाईन होतो, ज्ञानेश्वर होतो, तुकाराम होतो, रमणा होतो, बुद्ध होतो, विवेकानंद होतो, किंवा फिलॉसॉफर होतो. बाकीचे मग त्यांचे अनूयायी होतात खरे पण अर्ध्या मुर्ध्या ज्ञानावर. मग एकमेकात भांडत बसतात विज्ञान श्रेष्ठ का अध्यात्म श्रेष्ठ. खरा विषय राहातो बाजूला. जेव्हा खरा विषय कळतो तेव्हा मग उपरती होते व त्यातून नवा न्यूटन किंवा ज्ञानेश्वर तयार होतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

धन्यवाद!

संजय क्षीरसागर
Sat, 05/05/2012 - 14:15 नवीन
एका चांगल्या चर्चेबद्दल आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

आभार?

नितिन थत्ते
Sat, 05/05/2012 - 14:26 नवीन
स्पष्टीकरण र्‍हायलं की वो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नितिन, तुम्ही हा स्वतंत्र प्रतिसाद दिल्यामुळे

संजय क्षीरसागर
Sat, 05/05/2012 - 15:39 नवीन
तुम्हाला व्य. नि. पाठवलाय, तुम्ही बिन्धास्त राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरे वा! :)

शाम भागवत
Sun, 06/28/2020 - 13:38 नवीन
अरे वा! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा