राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री सम्राटभाउ मोझे यांस,
साष्टांग दंडवत,
पत्र लिहिणेस कारण की,
गेले काही दिवस आपली सुहास्य वदन भित्तिचित्रे पुण्यनगरीच्या कानाकोपर्यात झळकत आहेत. परंतु चित्रे पाहून आंम्हास भित्ती न वाटता अंमळ आनंद जाहला. पुण्यपत्तनास योग्य कारभारी मिळणार, मिळेल, मिळाला पाहिजे अशी चर्चा कैक दिवसांपासोन तारिके अहकामे सकाळगिरी मध्ये चालू होती. त्यामुळे पुण्यनगरीतील प्रत्येक चावडीवर आणी कित्येक ब्राह्मणभोजनातून कारभारी बदलाची गप्पाष्टके आणी खलबते चालू होती. आपल्या प्रकटनाने पुण्यनगरीची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले ऐसी जाहली. पेशवाईचा सुवर्णकाळ पुन्हा येणार येणार ऐशी जोरदार चर्चा सुरू जाहली.
दुसर्या रावबाजीचा काळ ! काय तो वर्णावा ! मनगट बुडेल इतका भात पंगतीत वाढला जात असे. सकाळ सायंकाळ सोमरसाची आचमने चालत असत. नायकिणी, नाटकशाळा यांना उदार राजाश्रय असे. दक्षिणा गोळा करण्यासाठी दूर - दूर वरून ब्रह्मवृंद गोळा होत असे. टोपीकर आला आणी धर्म बुडाला. दक्षिणा मागावी तर लालतोंड्या टोपीकर म्हणतो कसा ? - फक्त विद्वान ब्रह्मणास दक्षिणा मिळेल. आता ब्राह्मण हा जन्मजात विद्वान अस्तोच ! हे त्या विलायती टोपीकरास कसे कळावे ? ब्राह्मणभोजने बंद झाली. पुण्यनगरीचा सत्यानाश झालान.
पुढे टोपीकर बुडाला. स्वकीयांचे राज्य आले. पुण्यपत्तन आनंदले. याव्वचंद्रदिवाकरौ नेहरूबाबाचे राज्य चालो ऐश्या गर्जना पेठा पेठातून घुमू लागल्या. पण चांडाळ नेहरू बिल्कूलच जातीला जागेना. स्वकीयांस ऐतखाउ म्हणू लागला. ब्राह्मणभोजनांस फुकट्चे देणार नाही म्हणून धिक्कारू लागला. त्यानंतर पुण्यनगरीची कळाच गेली. कोणी वाढपी झाला. कोणी कारकून झाला. कोणी दूरदेशी कळा बडवू लागला.
आज आपले ऐश्वर्य पाहिले; अन चौका चौकात उभे राहून ताम्बूलभक्षण करणारे पुण्यनगरीचे नवे कार्यकर्ते आनंदले. आपला राजबिंडा थाट आपल्या उमद्या स्वभावाची साक्ष देतो आहे. आपणास मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ऐसे म्हटले ते त्यामुळेच. पुण्यनगरीची सांस्क्रुतिक संम्मेलने काव्य - शास्त्र - विनोद, सध्या पान टपरी या संगमस्थानी भरतात. भाउ आज तेथे आपल्या उदार आश्रयाला जाण्याची भावना सध्या रंगते आहे. रिकामटेकड्या कार्यकर्त्यांस आपुल्याकडे सढळ हाताने दक्षिणा मिळते ऐसी वदंता आहे.
पुण्यपत्तनाच्या आसपास धाकले राजे दादा साहेब ( जे की खजिनामंत्री महाराष्टर राज्य); यांनी सोन्याचा नांगर फिरवला. जमिनीचे भाव वाढले. त्यास आज गुंठा मंत्री नामक गोमटी फळे आली आहेत. ह्या मंत्रीगणांनी सैन्य जमविण्यासाठी पुनश्च ढाबाभोजनांस सुरवात केली आहे. आता ऐतखाउंचे काही चालत नाही. चौका चौकात सांस्क्रुतिक संगमस्थानी जमून काव्य - शास्त्र - विनोद करणार्या सकल विद्यालंकृत कार्यकर्त्यांसाठी ढाबाभोजने राखिव आहेत. येथेच सकाळ सायंकाळ विलायती सोमरसाची आचमने चालतात. आणी जुन्या पेशवाईच्या आठवणींनी आमुचे डोळे पाणावतात.
सोमरसाच्या कैफात काही प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर कार्यकर्त्यांकडून तुरळक घटना घडतात, पण आपल्यासारख्यांचे न्यायशास्त्रसंपन्न आशिर्वाद असताना कुणाची भिती ?
आपणास पुण्यनगरीच्या नूतन जाणत्या राजाचे आशिर्वाद अवश्य मिळोत; दादामहाराजांची क्रुपा आपल्यावर अखंड राहो; पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना.
आपला क्रुपाभिलाशी,
वैद्यबुवा
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
21147
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेलो
मोझे की सोन्याचे ओझे
लई भारी ओ वैद्यबुवा !!
ह्यांना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, वाचतोय.
In reply to लई भारी ओ वैद्यबुवा !! by सुहास..
आडनाव....आडनाव
In reply to ह्यांना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, वाचतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, सोपं करुन सांगा रे.
In reply to आडनाव....आडनाव by इरसाल
सोने आणि माती त्यांना समान हे चित्ती ;-) :P
In reply to च्यायला, सोपं करुन सांगा रे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लॉगावूट करतो आता.
In reply to सोने आणि माती त्यांना समान हे चित्ती ;-) :P by यकु
हॅहॅहॅ गोंधळ कमी व्हावा
In reply to लॉगावूट करतो आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यकु, च्यायला
In reply to सोने आणि माती त्यांना समान हे चित्ती ;-) :P by यकु
तिसरा प्रकार
In reply to यकु, च्यायला by इष्टुर फाकडा
+१
In reply to तिसरा प्रकार by पैसा
क्लु १ ) तुकाराम महारांजाचे
In reply to ह्यांना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, वाचतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा!!!
माफ करा
बर
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
अर्थात.
In reply to बर by राजघराणं
?
In reply to अर्थात. by अँग्री बर्ड
झोंबला का आमचा पुरावा ?
In reply to बर by राजघराणं
अयो --- माफी माफी माफी (त्रिवार)
In reply to झोंबला का आमचा पुरावा ? by परिकथेतील राजकुमार
कॅफेश्रिया विराजित,अखंडित
In reply to अयो --- माफी माफी माफी (त्रिवार) by राजघराणं
पेशव्यांमुळे पुण्याला
In reply to कॅफेश्रिया विराजित,अखंडित by मृगनयनी
तेच म्हणतो.
In reply to पेशव्यांमुळे पुण्याला by प्राध्यापक
एकदम सहमत आहे,या खेळाशिवाय हि
In reply to तेच म्हणतो. by राजघराणं
पेशवाईबद्दल माहित नाही, पण या
In reply to एकदम सहमत आहे,या खेळाशिवाय हि by प्राध्यापक
पप्या तू 'द्रष्टा'
In reply to पेशवाईबद्दल माहित नाही, पण या by यकु
हा हा हा
In reply to एकदम सहमत आहे,या खेळाशिवाय हि by प्राध्यापक
दुसर्याच्या माहितीला चुकीची
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅपुढचे 'ह. ना.'
In reply to दुसर्याच्या माहितीला चुकीची by प्राध्यापक
ऑ ?
In reply to तेच म्हणतो. by राजघराणं
सहमत..
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to सहमत.. by गवि
'पेशव्यांच्या रक्तातच
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
>>पेशव्यांच्या रक्तातच
In reply to 'पेशव्यांच्या रक्तातच by गवि
एकटा बाजीराव का? बहुतेक सरदार तसलेच होते...
In reply to >>पेशव्यांच्या रक्तातच by बॅटमॅन
अगदी बरोब्बर. "महाराजा" नामक
In reply to एकटा बाजीराव का? बहुतेक सरदार तसलेच होते... by योगप्रभू
>>>>लंडन येथील बड्या लोकांची
In reply to अगदी बरोब्बर. "महाराजा" नामक by बॅटमॅन
ऐला!!!! कुठल्या पुस्तक
In reply to >>>>लंडन येथील बड्या लोकांची by यकु
बॅटमॅण, सापडलं! मागवा बरं
In reply to ऐला!!!! कुठल्या पुस्तक by बॅटमॅन
हे ए ए धत्तड तत्तड धत्तड
In reply to बॅटमॅण, सापडलं! मागवा बरं by यकु
<पाताल विजयममधल्या राक्षसाचा
In reply to हे ए ए धत्तड तत्तड धत्तड by बॅटमॅन
हा प्रतिसाद देण्याचे एकमेव
In reply to <पाताल विजयममधल्या राक्षसाचा by यकु
एक एक अक्षर टांगले जाईपर्यंत
In reply to हा प्रतिसाद देण्याचे एकमेव by बॅटमॅन
क्काय सांगता???????
In reply to एक एक अक्षर टांगले जाईपर्यंत by यकु
आता सौरभचा झाला
In reply to क्काय सांगता??????? by मी-सौरभ
काय मंडळी झाली का मज्जा
In reply to आता सौरभचा झाला by यकु
नाय हो आम्हाला वाटलं बॅटमॅन,
In reply to काय मंडळी झाली का मज्जा by गणपा
बाय द वे...
In reply to नाय हो आम्हाला वाटलं बॅटमॅन, by यकु
.
In reply to हा प्रतिसाद देण्याचे एकमेव by बॅटमॅन
शिवाजीमहाराजांसारखा अपवाद लै
In reply to >>पेशव्यांच्या रक्तातच by बॅटमॅन
पराशेठ
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
नाटकशाळा बाळगुन आणी रमण्यामधे
In reply to पेशव्यांमुळे पुण्याला by प्राध्यापक
एका शनिवारी शनिवारवाड्यासमोर
In reply to नाटकशाळा बाळगुन आणी रमण्यामधे by इस्पिक राजा
मस्तानी मुसलमान नव्हती
In reply to एका शनिवारी शनिवारवाड्यासमोर by मृगनयनी
खबरदार
In reply to कॅफेश्रिया विराजित,अखंडित by मृगनयनी
मनसेचे
बाकी
एक मिनिट
In reply to बाकी by अँग्री बर्ड
चोरट्यांनी देवाला चोरण्या
चोरटा चोराला उचलत नसतो. एक
In reply to चोरट्यांनी देवाला चोरण्या by गणपा
(No subject)
In reply to चोरटा चोराला उचलत नसतो. एक by नाना चेंगट
हे पहाच!!
खहपलो आहे...
बापरे! यांना आहे का कोणाची
>>आम्हाला मेली अर्ध्या
In reply to बापरे! यांना आहे का कोणाची by रेवती
१८ कॅरेटचे असले तरी
In reply to >>आम्हाला मेली अर्ध्या by सूड
मस्त बखर!
मस्त लिहलय !
मदनबाण'जी... लयी
In reply to मस्त लिहलय ! by मदनबाण
चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स
In reply to मदनबाण'जी... लयी by मृगनयनी