भंकस
म्हणजे तसं काही नाही विशेष लिहिण्यासारखं. च्यायला एवढी चांगली सुट्टी असून आज ऑफिसात येऊन बसावं लागलंय. मग आम्ही दुसरीकडे कुठे जाणार?
इथेही आलो तर काय ते लोक नेहमीप्रमाणे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलेले. जरा म्हणून मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारायची सोय नाही. त्यातून मला आजकाल मिपावर ''असहमत'' असा आयडी घ्यावा वाटतोय. आता हे मध्येच कुठं आलं? पण हे असंच. आजकाल सगळी जिंदगीच बोगस झाली आहे. हे म्हणजे नेहमी सुचणारं वाक्य. त्यातून ती कोसला आणि बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट, कंम्प्लीट शेरलॉक होम्स कॉटवर पडलेले असते आणि आजकाल लॅपटॉप बंद! मग आम्ही यातलंच कुठलंतरी पुस्तक उचकणार आणि सकाळचे साडेचार वाजवणार. मग ऑफिसला बारा-एक वाजता.
हे ऑफिसचे लोक आता फडफड करीत नाहीत. मागे एकदा केली होती तेव्हा मी माझं अस्ताव्यस्त रुटीन सांगून सरळ 'आय क्वीट' म्हणालो. त्यांना वाटलं मी खरोखर पूर्ण भंगलो आहे, त्यामुळं याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. मग ते म्हणे तुला जसं वागायचंय तसं वाग. आता मी कुठे काय करतोय? मला सांगा, एखाद्या माणसाला काही प्रश्न पडले असतील आणि त्याचं काहीच प्रॅक्टीकल उत्तर मिळत नसेल तो रात्रभर भंकस करीत जागणारच की नाही? तुम्हाला सगळं माहित नसेल. तुम्हाला कधी स्वत:च्या असण्याबद्दलच प्रश्न पडले आहेत काय? हे भलतंच आहे मान्य! पण असे अवघड प्रश्न पडतातच. उदाहरणार्थ मी! उगाच नोकरी करायला म्हणून इकडे येऊन राहिलो तर ती पण नीट होत नाही. म्हणजे असं वाटतं की हा फालतू टाइमपास आहे - म्हणजे नोकरी. ठीक आहे पैसे वगैरे मिळतात, पण तरीही तो टाइमपासच!
इफ यू वाँट ए लोफ ऑफ ब्रेड, यू नीड टू वर्क फॉर इट. तुम्ही जर म्हणालात की हा खरोखर बोगसपणा आहे आणि आपण असं काही करणारच नाही तर तुम्ही बाद! जा जिकडे जायचंय तिकडे आणि करा काय करायचंय आहे ते. असली भंकस होऊ नये या कारणासाठी हे नोकरी करणं. तरी बरं मी लग्न वगैरे फालतू लफडी मागे लाऊन घेतली नाहीत आणि घेणारही नाही. आयुष्य एकट्याला नीट जगता येत नाही, दुसर्या कुणासोबत तरी जगून बघायचं म्हणजे ते कितीही गोड वाटत असलं तरी रोगापेक्षा इलाज भयंकर. हे तर छाटछूट प्रश्न. हे जाऊ द्या, हे एवढं महत्त्वाचं नाही.
पण हे आपलं शरीर आहे, हे मन आहे, आपला जन्म झालेला आहेच तर आपल्या जगण्यासाठीही खूप मोठा काळ समोर असेलच. पण आपल्याला काही या गोष्टींबद्दल खोलवर माहित नाही. म्हणजे मादरचोद ज्या पायावर आपण नावाचं जे काही उभं आहे त्याबद्दलच काही झाट माहिती नाही आणि गगनभेदी स्वप्ने कसली पहायची? होत असतील ती स्वप्ने पूर्ण तर होत असोत, पण आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही. म्हणूनच कसली वासना, आकांक्षा, स्वप्ने, नियोजन ही भंकस आपल्याकडे नाही. आपण आहे त्या गबाळासोबत ह्याच प्रश्नांवर अडखळलो आणि खरोखर आतून काही कळेपर्यंत तिथेच रहाणार! हा खरं म्हणजे मूर्खपणा म्हणता येईल. एवढं सगळं सुचत असताना आता आतून आणखी काय कळायचं आहे?
पण म्हणालो ना, अवघड प्रश्न आहेत म्हणून. उदाहरणार्थ मी आतापर्यंत 26, 27 वर्षे जगलो आहे. काय झालं? काहीच नाही! किधरसे आये पता नही, किधर जा रहे है वो भी पता नहीं और यहां क्यूं खडे हो वो भी पता नहीं. यांव नोकरी केली, त्यांव केलं, हे अमूक मिळवलं ह्याला काही अर्थ नाही. एवढं कुत्र्यासारखं राबलं तर कुणालाही काहीतरी छाटछूट मिळतंच. आणि एवढे लोक तेच करतात तर आपण एक अजून त्यात कशाला? पण इलाज नाही म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात, म्हणून पडलेले प्रश्न विसरता येतात असं नाही.
आता हे युजींसारखे लोक. हे म्हणतात की तुम्ही असे खोपच्यात अडकला पाहिजेत की तिथून बाहेर पडण्याचा मार्गच शिल्लक उरायला नको. श्वास कोंडून मेलात आणि खरोखर मरुनच गेलात की तुम्हाला खरं काय असतं ते कळेल. आता हे म्हणजे काही एन्लायटन्मेंट मिळवणं, जागृत होणं, तत्त्वज्ञान वगैरे भंकस नाही. काही लोकांना उगाच तसं वाटतं ते सोडा. खरोखर जीवंत माणूस व्हायचं म्हणजे उत्क्रांतीच्या टप्प्यावरचं प्युअर्ली बायॉलॉजीकल एंड प्रॉडक्ट. म्हणजे ब्रह्मज्ञान होईल असं नाही. म्हणजे हा जो चौदा अब्ज वर्षांपासूनचा (असं म्हणतात म्हणे!) माणसाच्या असण्याच्या स्थितीतील शेवटचा टप्पा तुटलेल्या श्वासासोबतच ओलांडून जे आजूबाजूला अफाट आहे त्याच्यात सामावून जाणं. यात काही 'मिस्टीकल कंटेंट' नाही. पण हजारो लोकांनी याबद्दल बडबड करुन ठेवल्याने ते मिस्टीफाय होतंच - त्याला इलाज नाही.
पण ते प्रॅक्टीकली आयुष्याशी रिलेट केलं तर तेवढं गूढ रहात नाही. उदाहरणार्थ युजी म्हणतात की माणसाच्या आत काहीच नाही. कितीही शोधाशोध केली तरी काहीच सापडणार नाही. तुम्हाला जे तुम्ही जाणवता तो 'मी' फक्त विचार सांधले जाण्यातून धूसर धूसर दिसतो. एरव्ही माणसाच्या आतमध्ये काहीच नाही. विचार येतात, जातात - त्यातले काही तुमच्यामधून कुठल्या ना कुठल्या कृती रुपातून बाहेर पडतात आणि तेच तुम्ही आणि तुमचं आयुष्य बनतं. उदाहरणार्थ आता हे मी लिहितोय, हे काय आहे? हे मनात तुटक तुटक येणारे विचारच आहेत आणि ते टाइप केले की असलं भंकस बाहेर पडतंय. खराखुरा सॉलीड 'मी' वगैरे कुणाला आढळणारच नाही.
आणखी काही उदाहरणं दिली आहेत ती जास्त लागू पडतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर श्रद्धा बाळगण्याचं काही कारण नाही. उदाहरणार्थ खोलीचं दार बंद करुन, फॅन लाऊन निवांत पडलं की अंधार्या खोलीत तो फॅनचा आवाज ऐकू येतो तेवढेच तुम्ही असता. बस खलास. तुम्ही तेवढेच असता. त्यापेक्षा जास्त काही नाही. तुमच्या आजूबाजूला जे आहे, ज्या गोष्टीत तुम्ही गुंतले आहात त्या गोष्टींचं प्रतिबिंब तुमच्यात पडतं, आणि ते प्रतिबिंब म्हणजेच तुम्ही असता - बाकी तुम्ही बिलकुल असत नाही. शरीर? शरीर हा या सगळ्या पसार्याचाच एक भाग आहे - कुठल्याही किटक, प्राण्याला शरीर असतं तसंच.
हे सांगणं अवघड आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं? तुम्ही कसे जगता?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म
काही कळलं नाही
अरे सेंटी मत बनो मित्रहो. हे
कांद्याची आठवण झाली....
असे विचार, वागणूक हे क्लिनिकल
राजेशजी, दुव्यांबद्दल आभारी
व्यायाम सुरु कर. रात्री
मनातले विचार भीडभाड न राखता,
>>>>>हा लेखनशैलीचा प्रश्न
दारु प्यायल्यावर मी प्यायलो
>>>>दारु प्यायल्यावर मी
लिहीत रहा.
संन्यास घेण्याची वेळ आली
'पण हे आपलं शरीर आहे, हे मन
असो. जे मुद्दे आहेत त्यावर
मियां की दौड मस्जिद तक नसावी
फार जड पाणी आहे का तिथलं ?
तु पुर्ण नॉर्मल वाटतोयस.
परिक्रमेला निघा.
यात मध्येच 'डीप्रेशन' कुठून
डिप्रेशन
कै च्या कै
हं...कधीकधी गोंधळ उडतो खरा.
जे काही लिहिलय ते आवडलंय.
सोडा...
या जन्मावर या जगण्यावर
http://www.youtube.com/watch?
हाहाहाहा थँक्यू हो मास्तर.
हाण्ण!
आहाहा काय ते गाणं .....काय तो
मी म्हणते की तुम्ही लग्न करा.
यकु बाबा की जय !
श्वास घेणं ही प्रतिक्षिप्त
तेज्यायला !
बाकी शून्य.....!
या विषयावर इथे चर्चा घडवुन
त्यापेक्षा ज्या आंतरजालिय
श्री. श्री. गणपा....
Life is very Simple..
बिचार्याने एक सरळ लेख लिहिला
>>>त्याला कोणी गर्लफ्रेंड