✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पौराणिक विमाने

आ
आनन्दा यांनी
Sat, 04/14/2012 - 19:29  ·  लेख
लेख
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. "पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी... http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1176901560/paracas_trident.jpg/tpod.html अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे. प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे... https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय? http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm ही म्हणे धावपट्टी असावी http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78970 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

छान लिन्क्स

मृगनयनी
Sat, 04/14/2012 - 19:41 नवीन
छान लिन्क्स आहेत..!!! "पद्माकर वर्तक" इज द ग्रेट मॅन!!!.. आय नो हिम!... सूक्ष्म देहातून मंगळ, गुरु ग्रहांवर ते जाऊन आलेले आहेत... त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे. बाकी आम्हाला रामायणातले "पुष्पक विमान" माहित आहे. :) रावणाने सीतेला याच विमानातून पळवून नेले होते. आणि पुढे याच विमानातून राम-सीता-लक्ष्मण परत अयोध्येस आले... :)
  • Log in or register to post comments

+१

रमताराम
Sun, 04/15/2012 - 00:21 नवीन
आणि पुढे याच विमानातून राम-सीता-लक्ष्मण परत अयोध्येस आले... एकटेच नाही, बरोबर अनेक लोक होते. इतके सगळे लोक त्या एवढ्याशा विमानात कसे काय बसले या आमच्या प्रश्नावर आमच्या आय आय एम (अहमदाबाद) च्या एका प्राध्यापकांनी 'मग तेव्हा माणसांना सुद्धा झिप (कम्पूटरमधील) करून पाठवायची विद्या आपल्याकडे होती.' असे उत्तर दिले होते. .................................................... ................................................................................................................ खो: खो: खो: शेवटी हसू फुटलंच. तेव्हाही हसू दाबू शकलो नाही नि आजही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हसू नका

नगरीनिरंजन
Sun, 04/15/2012 - 11:44 नवीन
संस्कृतीद्वेष्टे कुठले. हा धागा वाचून मी प्रचंड ऊर्जा खर्च करून सूक्ष्म रूपाने (कलियुगात हे करायची बंदी असूनही मी हे केलं. पद्माकरने नियम मोडला म्हणून मलाही तो मोडावा लागला.) पाताळातल्या माचूपिचू पर्वतावर जाऊन त्या नाझ्काच्या रेषा पाहून आलो. त्या रेषा पाहतानाच माझे ध्यान लागून मला इन्कांच्या लांबनाकाच्या चाक देवतेने दर्शन दिले. हा चाक म्हणजे अनार्य गणेशाचा सावत्र भाऊ. (आणि हो माचूपिचू वरची मंदिरं माया संस्कृतीची आहेत म्हणतात ते खरे म्हणजे 'मय' लोकांची आहेत. हे मय लोक म्हणजे मयसभा बांधणार्‍या मयासुराचे वंशज. इंद्रप्रस्थ बांधून झाल्यावर तो माचूपिचू पर्वतावर रिटायर झाला होता.) तर, चाक ने मला दिलेल्या दृष्टांतात तो वापरत असलेले पारदाभिसारीविमान दाखवले. एका उंदराच्या आकाराचे ते महाप्रचंड विमान इतके मोठे होते की एक संपूर्ण गाव त्यात सहज मावले असते. सध्या असलेल्या आयन थ्रस्टर यंत्रांप्रमाणे त्या विमानाच्या पोटात पारदाभिसारी यंत्र (Mercury Vortex Engine) होते आणि त्या यंत्राच्या कर्णकटू आवाजाने ढग गडगडल्याचा भास होत होता आणि त्यातून बाहेर पडणार्‍या धन-ऋण प्रभारीत कणांमुळे विजा चमकण्याचा आभास होत होता. म्हणूनच चाकाला पाताळातला वरुण म्हणतात. ते विमान त्या धावपट्ट्यांवर कसे उतरते हे ही त्याने दाखवले. विष्णूकडे यापेक्षाही मोठे गरुडविमान होते असेही त्याने सांगितले. त्या गरुड विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला उडण्या-उतरण्यासाठी धावपट्टीची गरज भासत नसे. म्हणूनच भारतात कोठेही अशा धावपट्ट्या दिसत नाहीत. पण कांभोज प्रदेशात ज्याला आजकाल अंगकोर वाट म्हणतात त्या विष्णूच्या स्थानात हे विमान उतरण्यासाठी प्रशस्त जागा आहे हे ही मला दिसले. चाकाचे आभार मानून मी तसाच मनोवेगाने जरा भूतकाळात गेलो. खरं म्हणजे मला खूप मागे जाऊन विष्णूचे दर्शन घ्यायचा मोह होत होता पण कलियुगात एवढे पुण्यबल नसल्याने ते शक्य होत नाही. म्हणून मी १८९५ सालातल्या मुंबईच्या किनार्‍यावर गेलो. तिथे श्री. शिवाकर तळपदेंना एका विमानाची प्रतिकृती करून उडवताना पाहिले. ते विमान काही अंतर जाऊन कोसळले. त्यांनी ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे विमान केले होते खरे पण कृतक पद्धतीचेच विमान कलियुगात उडते हे त्यांना माहित नव्हते असे दिसले. सत्ययुगात आवाज न करणारी मंत्रशक्तीवरची विमाने उडायची, त्रेता आणि द्वापारयुगात तंत्रशक्तीची विमानं उडायची पण कलियुगात फक्त यंत्रशक्तीची विमानं उडू शकतात. यंत्रशक्तीची विमाने वेदकालात हीन समजली गेल्याने फक्त पाताळातल्या राक्षसगणांनीच ती वापरली आणि त्याचे पुरेसे वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये नसल्याने आपण तशी विमाने करून या हसणार्‍या लोकांचे तोंड बंद करू शकत नाही. एकदा सत्ययुग येऊ द्या मग दाखवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

महाप्रतापी...

चिगो
Sun, 04/15/2012 - 15:50 नवीन
महाप्रतापी गदावीर धनुर्धर योग-विद्यामंडीत वेदाचार्य कूटनिती़ज्ञ यंत्र-तंत्र-मंत्रविशेषज्ञ श्री श्री परमपुज्य परमआदरणीय प्रातःस्मरणीय ज्ञानी नगरीनिरंजनजी की जय हो.. !! ;-) ननि, जबरा प्रतिसाद.. भलताच आवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१

सहज
Mon, 04/16/2012 - 10:55 नवीन
ननि, जबरा प्रतिसाद.. आता योगप्रभुंजींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

खुलासा

नगरीनिरंजन
Tue, 04/17/2012 - 11:44 नवीन
यात कोणाचीही व्यक्तिशः टवाळी करण्याचा किंवा भारताच्या इतिहासावर थुंकण्याचा वगैरे प्रयत्न नसून आयजीच्या जीवावर उदार होणार्‍या बायजी प्रवृत्तीची टिंगल करण्याचा हेतू आहे. भारताकडे नेहमीच सगळ्या जगाने तत्त्वज्ञानाची जन्मदात्री (Mother of Wisdom) म्हणून पाहिले आहे. भारतात निर्माण झालेल्या विचारधारांनी आणि साहित्यकृतींनी जगाला नेहमीच थक्क केले आहे आणि भारत म्हणजे काहीतरी अद्भुत, गूढरम्य आणि दैवी असा प्रदेश आहे असाही बर्‍याच लोकांचा रास्त समज आहे. पण ही असली बायजी प्रवृत्ती त्या समजाच्या ठिकर्‍या उडवून भारत म्हणजे उज्ज्वल इतिहास असणार्‍या मूर्खांचा देश आहे असा समज निर्माण करण्यात हातभार लावत आहे. जग तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूपच पुढे गेले आहे आणि ते तंत्रज्ञान आमच्याकडे आधीच होते असे म्हणणे नुसते हास्यस्पदही नाही चीड आणणारेही आहे. समजा हे तंत्रज्ञान होते आणि नंतर काळाच्या ओघात नष्ट झाले असे मानले तरी काय? आज जगाला हे तंत्रज्ञान कुठून आले हे नको आहे, आणि भारतानेही तसेच तंत्रज्ञान नव्याने निर्माण करावे अशीही अपेक्षा नाहीय. खूप लोकांनी जगाला मार्ग दाखवण्याची क्षमता भारतात आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रश्न असा आहे की आपण त्या विश्वासाच्या कसोटीवर उतरू की नाही? अतिप्रगत तंत्रज्ञान असूनही अनेक सामाजिक, आर्थिक, लष्करी आणि राजकीय प्रश्नांच्या भोवर्‍यांमध्ये जग गटांगळ्या खात असताना भारत विकासाच्या नावाखाली पाश्चात्यांनीच केलेल्या चुका करणार की स्वत:चा नवा मार्ग आखून त्यातून जगाला काही धडा देणार हा प्रश्न आहे. सध्याच्या परिस्थितीत तर पाश्चात्यांचेही अनुकरण धड जमत नाही आणि स्वतःचाही काही विचार नाही असा दिशाहीन भारत पाहताना या गप्पा तर आणखीच चीड आणतात एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

___/\___

प्यारे१
Tue, 04/17/2012 - 12:33 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

छ्या

सहज
Tue, 04/17/2012 - 12:41 नवीन
हे काय जादुचे प्रयोग चालू असताना जादुगाराच्या क्लुप्त्या उघडून सांगण्यासारखेच! जादूच्या प्रयोगांचा लुत्फ लुटायचा. असो तुमच्या माझ्या प्रतिसादांनी काय होते, काही दिवसांनी पुन्हा मिपावर असाच एक धागा येईल बघा. सदाबहार प्रयोग आहेत हे. मी खर तर हा धागा अजुन एक आपल्या ऋषिमुनींच्या तपोबलाची महती सांगायला उघडला होता. की त्यांनी केलेल्या तपोबलाने, ग्लोबल वॉर्मिंगही हरले. त्यांनी म्हणलेल्या योग्य मंत्रोच्चाराने तेथे प्रदुषणाची काही मात्रा चालली नाही. Himalayan glaciers growing despite global warming
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

नगरी"अंजन" प्रतीसाद !!

अर्धवटराव
Wed, 04/18/2012 - 23:54 नवीन
नेमक्या शब्दात नेमकं गमक मांडणारा प्रतीसाद !! अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+ २

मेघवेडा
Wed, 04/18/2012 - 18:58 नवीन
हा हा हा! खणखणीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नक्की कोणते प्राध्यापक?

क्लिंटन
Sun, 04/15/2012 - 23:03 नवीन
इतके सगळे लोक त्या एवढ्याशा विमानात कसे काय बसले या आमच्या प्रश्नावर आमच्या आय आय एम (अहमदाबाद) च्या एका प्राध्यापकांनी 'मग तेव्हा माणसांना सुद्धा झिप (कम्पूटरमधील) करून पाठवायची विद्या आपल्याकडे होती.' असे उत्तर दिले होते
नक्की कोणते प्राध्यापक हो ते? आमचे कोणतेही प्राध्यापक असे विधान सिरियसली करणार नाहीत (केलेच असले तर ते मजेत केले असेल) हे म्हणण्याइतपत मी माझ्या प्राध्यापकांना मी नक्कीच ओळखतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

सीरियस

रमताराम
Mon, 04/16/2012 - 14:06 नवीन
नांव सांगत नाही (कारण उघड आहे हा ओपन फोरम आहे. शिवाय ते आता तिथे नाहीत, ही आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे नि त्याचवेळी ते निवृत्त व्हायच्या मार्गावर होते. दुसरे असे की आमचा बॉस तिथला विद्यार्थी नि हे त्याचे गुरू त्यामुळे याहून अधिक बोलणे योग्य नव्हे.) दाक्षिणात्य होते इतके सांगतो. हे विधान पूर्ण गंभीरपणे केले होते. माझ्याबरोबर माझा कट्टर आयन रँड फ्यान होता, तो नि मी आम्हालाही आधी हे गंमत करताहेत असेच वाटले होते. पण ते - आमचा स्केप्ट्सिजम चेहर्‍यावर सहज वाचता येत असल्याने - अट्टाहासाने समजावू लागले. सुमारे दहा मिनिटे त्यांचे हास्यास्पद तर्क ऐकून घेतल्यावर आम्ही दोघेही सुटलो. (त्याबद्दल बॉस अर्थातच नाराज झाला, पण ते जाऊ दे). जाऊ द्या हो. एवढं गंभीरपणे घेऊ नका. भलेभले लोक अशा दुराग्रहांपायी वाहवत गेलेले पाहिले आहेत. प्रीमियम इन्स्टिट्यूटमधे प्रा. असले म्हणून ते वैयक्तिक आयुष्यात वस्तुनिष्ठ असावेत असे थोडेच आहे. माझ्याच बाबत एरवी अतिशय उत्तम संबंध असताना त्यांचे असले हास्यास्पद दावे मान्य न केल्याने (हो 'लेट्स अग्री टू डिस-अग्री' हे ही पुरेसे नसते, आमचे म्हणणे मान्य केलेच पाहिजे असा आग्रह असतो.) मैत्री तुटलेली एक दोन उदाहरणे आहेत. तेव्हापासून टोकाच्या अस्मिता असणार्‍यांपासून चार... चार काय चारशे हात दूरच राहतो, मग भले तो आईन्स्टाईन का असेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

चार काय चारशे हात दूरच राहतो,

तर्कवादी
Wed, 07/27/2022 - 15:39 नवीन
चार काय चारशे हात दूरच राहतो, मग भले तो आईन्स्टाईन का असेना.
आईन्स्टाईनच्या टोकाच्या अस्मिता होत्या काय ? मी तर समजत होतो तो अतिशय मनमोकळ्या स्वभावाचा , जिंदादिल मनुष्य होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

चला आय. आय. ऐम. शी तुमचा

पुरणपोळी
Mon, 04/16/2012 - 10:50 नवीन
चला आय. आय. ऐम. शी तुमचा काहितरि संबंध होता हे सिद्ध झाल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कैच्याकै

रमताराम
Mon, 04/16/2012 - 14:14 नवीन
आमचा साहेब तिथला. हे त्याचे गुरू. (आणि 'अस्माकं बदरीचक्रं....' म्हणत बळेच संबंध लावायला आम्ही थोडेच जाणार आहोत. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी

नासा

चित्रा
Mon, 04/16/2012 - 00:51 नवीन
>त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे. ह्याचा काही पुरावा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

या विषयी मी माझा प्रतिसाद

मदनबाण
Sat, 04/14/2012 - 20:15 नवीन
या विषयी मी माझा प्रतिसाद आधिच इथे दिला आहे.
  • Log in or register to post comments

कुठे?

साती
Sat, 04/14/2012 - 20:12 नवीन
त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे. कुठे म्हणे?
  • Log in or register to post comments

म्हणजे असं की मंगळ हा नक्की

रामपुरी
Tue, 04/17/2012 - 04:51 नवीन
म्हणजे असं की मंगळ हा नक्की अस्तित्वात आहे हे त्यामुळेच नासाला समजलं. मग पुढे त्यांनी ते फालतू यानबिन बनवून सोडलं. आता ही सूक्ष्मदेह वगैरे भानगड नसती तर "मंगळ आहे" हे कसं कळलं असतं? म्हणून अजूनही नवीन प्रकल्प हाती घेण्याअगोदर नासावाले वर्तकांच्या वाड्यात पायधूळ झाडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

वरच्या आणि खालच्या बर्‍याच

मृगनयनी
Wed, 04/18/2012 - 23:16 नवीन
वरच्या आणि खालच्या बर्‍याच प्रतिसादांमध्ये "माननीय डॉ.पद्माकर'जी वर्तक" यांच्याबद्दल आणि त्यांच्या महान कार्याबद्दल अनेक उत्कंठापूर्ण प्रश्न विचारले गेले होते. त्यांचा "नासा"शी असलेल्या सम्बन्धाबद्दलही अनेकांना कुतुहल असल्याचे जाणवले ...त्यांच्यासाठी हा खुलासा:- डॉ. पद्माकर वर्तक- M.B.B.S., F.U.W.A.I., Ph.D.(Literaure) [Washington DC] ( जन्मः- २५ फेब्रु, १९३३), माननीय पद्माकरजी वर्तक १९५६ साली (पहिल्या प्रयत्नात) M.B.B.S टिळक आयुर्वेद कॉलेज, पुणे येथे "सर्जरी- लेक्चरर" म्हणून काम सुरु केले. 'सेठ ताराचन्द हॉस्पिटल' पुणे, येथे "असिस्टन्ट सर्जन" म्हणून १९५६ ते १९६९ या कालावधीमध्ये काम केले. अध्यात्म शास्त्र, योगा, वेद-उपनिषदे इ चा अभ्यास वर्तक'जींनी १९५६ पासूनच सुरु केलेला होता. "तैत्तरीय उपनिषदा"नुसार (प्रत्येक )मानवी शरीर हे "अन्नमय कोश"असून त्या पूर्ण मुख्य अन्नमय शरीरामध्ये / कोषामध्ये "प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय" असे चार प्रकारचे उपशाखीय कोष असतात. अर्थात याची... या कोषांच्या अस्तित्वाची जाणीव अथक साधनेद्वारे, मनोबलाद्वारे मनुष्याला होत असते. पद्माकर वर्तकांनी अनेक वर्षांच्या अभ्यास, योगसाधनेद्वारे या चार कोशांची जाणीव प्राप्त करवून घेतली. स्थूल देहातून सूक्ष्म शरीरात प्रवेश करून त्याद्वारे संपूर्ण "ब्रह्मांडात"- Universe भ्रमण करण्याचेही तन्त्र त्यांना अवगत झाले ही दिव्य दृष्टी- अतिंद्रीय शक्ती त्यांना साधारण १९७५ साली प्राप्त झाली. या दिव्य दृष्टीद्वारे मंगळ, गुरु या ग्रहांवर जाऊन शोधन करण्यासाठी वर्तक'जींनी ३ मोठे प्रयोग केले. १९७५ मध्येच वर्तक'जींना असे समजले, की अमेरिका "मंगळा" वर जाऊन बेसिक / प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी एक मोठी स्पेसशीप लॉन्च करते आहे. तो पर्यन्त सर्वांचे असे तर्क वितर्क चालू होते, की " मन्गळावर मनुष्यवस्ती असून भरपूर प्रमाणात पाणीदेखील आहे आणि तेथील शेतीसाठी या पाण्याचा वापर होत असावा" अमेरिकेने उपग्रहांवरून काढलेल्या फोटोंवरून देखील असेच निष्कर्ष काढलेले होते, की" मन्गळावरती शेती आणि पाणी या दोन्हीचेही बर्‍यापैकी प्रमाणात अस्तित्व आहे." या पार्श्वभूमीवरती "पद्माकर वर्तक" यांनी आपल्या दिव्य दृष्टीद्वारे एक प्रयोग म्हणून "मन्गळा"वर जाण्याचे ठरविले. ती तारीख होती १० ऑगस्ट १९७५. समाधि-अवस्थेत गेल्यानन्तर पद्माकर'जींना असा एहसास झाला, की ते मन्गळाच्या भूमीवरती उभे आहेत. त्यांना तिथे पाणी, झाडे, जलाशय, समुद्र, नदी, माणसे, पक्षी, पशू, ... इ. इ. पैकी एकही गोष्ट आढळली नाही. फक्त काही ठिकाणी त्यांना असे वाटले, की खूप सार्‍या वर्षांपूर्वी येथे -मन्गळावर पाण्याचे प्रवाह अस्तित्वात असले पाहिजे, कारण वाळून गेलेल्या / पाणी आटलेल्या नदीप्रमाणे काही ठिकाणी खुणा होत्या... मन्गळावरील जमीन पूर्णतः लाल रन्गाची, कोंकणातील लाल मातीप्रमाणे मुरमाड टाईपची, काहीशी पृथ्वीवरील टेकड्यांप्रमाणे भासली. फक्त चन्द्राप्रमाणे येथे ज्वालामुखीमुळे निर्माण झालेली विवरे मात्र अजिबात आढळली नाही. मन्गळावरील वातावरण कोरडे आणि थोडेसे "डल" होते. तसेच तेथील हवेत एक विशिष्ट सुगन्ध होता. हवा शान्त आणि थन्ड होती. पृथ्वीवरच्यासारखीच मन्गळावरची सन्ध्याकाळही खूप सुन्दर होती. आकाश सुन्दर निळसर होते. आणि त्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा हे रन्ग मिक्स झाल्यासारखे वाटत होते. मध्येच एकदा पहिल्या पावसाचा मातीत मिसळलेला गन्ध जसा असतो, तसा वास त्यांना आला. तेथील कोरड्या पडलेल्या नदीच्या , जलाशयाच्या खुणा जेथे जेथे होत्या..तेथील लाल रन्गांच्या खडकांवर काही ठिकाणी मोठे मोठे डार्क पॅचेस पडलेले होते. तेव्हा पद्माकरजींना वाटले.. की तेथे वाळलेले शेवाळेदेखील असावे. आणि असेही जाणवले, की खूप सार्‍या लाखो वर्षांपूर्वी तेथे मन्गळावर जीवसृष्टी, पाणी, झाडे, वाहणार्‍या नद्या इ. गोष्टी अस्तित्वात होत्या. ह्या सगळ्या समाधिअवस्थेत मन्गळावर दृष्टीक्षेपात आलेल्या आणि जाणवलेल्या गोष्टी पद्माकर वर्तक'जींनी मनात साठवून ठेवल्या. व समाधीतून बाहेर आल्यावर कागदावर उतरवून ठेवल्या. आणि त्याचा रिपोर्ट बनवून १९७६ साली २ मराठी मासिकांमधून प्रसिद्ध केला. "डॉ. पद्माकर वर्तक" यांना मन्गळावर जाणवलेल्या गोष्टींची रिपोर्ट "संतकृपा" आणि "धार्मिक" या दोन मराठी मासिकांमध्ये छापून आला. अनुक्रमे- जून १९७६ आणि जुलै १९७६.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

अमेरिकेने मण्गळावर जाण्यासाठी

मृगनयनी
Wed, 04/18/2012 - 23:18 नवीन
अमेरिकेने मण्गळावर जाण्यासाठी अवकाशयान सोडले.. तो दिवस होता - २१ ऑगस्ट १९७५. आणि ते यान मन्गळावर सुस्थितीत पोहोचले.. तो दिवस होता- २१ जुलै १९७६. या "याना"ने मन्गळावरून पाठविलेले रिपोर्ट्स आणि पद्माकर वर्तक यांनी दिव्य दृष्टीने काढलेले व प्रसिद्ध केलेले रिपोर्ट्स "टॅली" केले गेले. २१ पैकी २० रिपोर्ट टैली करून ते परफेक्ट मॅच झाल्याचेही अमेरिकेकडून कळवण्यात आले. Smile २१ वा जो पॉइन्ट होता.. तो म्हणजे- "मन्गळावर लाखो वर्षांपूर्वी नद्या आणि शेवाळे अस्तित्वात होते"..हा वर्तक'जींचा मुद्दा "पाथफाईंडर" कडून टॅली केला गेला.. तो ही १९९७ साली.. म्हणजे तब्बल २२ वर्षांनी.. व तो पॉईन्ट नव्या शोधमोहिमेत परफेक्टली टॅली झाला. या दिव्य दृष्टीद्वारे मिळालेल्या मन्गळावरच्या अनुभूतीदरम्यान पद्माकर वर्तक'जींना याची पूर्ण जाणीव होती.. की त्यांचे अन्नमय शरीर हे त्यांच्या पृथ्वीतलावरील घरात आहे. आणि तरीही मन्गळावर असताना त्यांना स्वतःच्या शरीरातच असल्याचा आभास होत होता. आणि ते शरीर म्हणजे तैत्तरीय उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे आणि इकडे वरती नमूद केल्याप्रमाणे वर्तक'जींचे "विज्ञानमय कोषा"तील शरीर होते. या विज्ञानमय कोषाचा बेस / मूळ आहे - "महालोक"... पृथ्वीवर ज्याप्रमाणे "मृत्यूलोक" असते.. गुरुत्वाकर्षण, हवेचा दाब, पाण्याची उताराकडे वाहण्याची दिशा.. इ नियम मृत्यूलोकात असतात. पण "महालोकात" मा' त्र हे नियम लागू नसतात. सौरगंगेतील पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जी काही पोकळी असते... ती म्हणजे- "महालोक"!!! जिथे "विज्ञानमय" कोषयुक्त सूक्ष्म शरीराला सन्चार करणे सहज शक्य असते.. मन्गळावरील प्राथमिक संशोधन यशस्वी झाल्यामुळे या पहिल्या यशानन्तर पद्माकर वर्तक'जींना अमेरिकेकडून अनेक आव्हाने निर्माण केली गेली. त्यांपैकी एक आव्हान त्यांनी पेलायचे ठरविले. ते म्हणजे- अवकाशयान १ आणि अवकाशयान २ हे दोन्ही अध्या अवकाशात आहेत. तर त्यांची पुढची दिशा नक्की कोणती असेल.. व त्यांचे काय होईल?. हे चॅलेन्ज पद्माकरजींनी स्वीकारल्यावर १२ ऑगस्ट १९७६ रोजी रात्री १० वाजता त्यांनी समाधिअवस्थेतून दिव्य दृष्टी लावली. व ते पुन्हा मन्गळावर पोचले. तेव्हा त्यांना तिथे असे दिसले- की """ मन्गळावर देखील रात्र होती. आकाशात पूर्णपणे अन्धार होता. आणि बॅकग्राऊंडला २ ताम्बूस लालसर कलरचे गोळे वर्तक'जींच्या उजवीकडून डावीकडे जात होते. त्यापैकी डावीकडचा गोळा छोटा आणि गोलाकार होता आणि दुसरा बर्‍यापैकी आयताकृती व मोठा होता. अर्थात नन्तर पद्माकरजींना समजले, की ते दोन गोळे महणजेच अवकाशयान होते. डावीकडचे छोटे गोलाकार यान हे अवकाशयान क्र, १ होते, तर दुसरे आयताकृती मोठे यान अवकाशयान क्र. २ होते. नन्तर त्यांनी पाहिले, की अवकाशयान क्र. १ थाम्बलेले असून ते अवकाशयान २'ला भेटायला पुन्हा मागे येत आहे................................. Continue.............................................................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

Continue.....................

मृगनयनी
Wed, 04/18/2012 - 23:21 नवीन
Continue........................ तिथे अवकाशयान १ आणि २ यांमध्ये एकप्रकारची सर्क्युलर अरेन्जमेन्ट केल्यासारखे दिसत होते. अवकाशयान १ पुढे होते व २ त्याच्या मागे होते. आणि त्यांची रचना अशी केली होती.. की अ.या. १ मागे वळून अ.या.२ च्या पुढे स्पर्श करू शकेल. अ.या.१ ची दिशा अशी होती.. की ते अ.या. २ ला साधारण ४५ अंशात स्पर्श करेल.. व त्यांचे योग्य रीतीने डॉकिन्ग होऊ शकेल इतक्यात अवकाशयान १ एकदम पद्माकर'जींच्या समोरून वरून खालच्या दिशेने गेले.. तर अवकाशयान २ खालुन वरती पद्माकरजींच्या दिशेने आले. व त्यांचे परफेक्टली डॉकिन्ग होत असतानाच काहीतरी झाले.. व अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी त्यांचा प्लॅन आयत्या वेळी चेन्ज केला. व तो प्रयोग पोस्टपोन्ड केला गेला आणि अवकाशयान १ ... अ.या.२ पासून डीटॅच केले गेले.. अ.या. १ सेपरेट होऊन पद्माकरजींच्या डावीकडून वेगाने निघून गेले. आणि मोठे आयताकृती अ.या. २ त्या अ.या.१ ला हळूहळू फॉलो झाले. अ‍ॅक्चुली हा एक्सपेरिमेन्ट सक्सेसफुल होणारच होता. पण शास्त्रज्ञांना या प्रयोगात काहीतरी चूक झाल्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी अवकाश यान १ सेपरेट केले. आणि यानन्तर पद्माकर वर्तक समाधी अवस्थेतून बाहेर पडले. व त्यांनी असे अनुमान काढले, की अमेरिकेचा हा प्रयोग आधी पोस्ट्पोन्ड होईल.. आणि नन्तर कॅन्सल होईल. आणि मग त्यांनी दोन्ही अवकाशयानांबद्दल पाहिलेले भविष्य २२ ऑगस्ट १९७६ रोजी "तरूण भारत" या वृत्तपत्रात प्रकाशित केले. आणि त्याची कॉपी "डिरेक्टर ऑफ अमेरिकन अ‍ॅम्बासी" ला पाठविली. तेव्हा तेथील "मि. बायेस" यांनी पद्माकर वर्तक यांना त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांची स्तुती केली अनेक धन्यवाद दिले आणि असेही उत्तर पाठविले, की "" पद्माकर वर्तक यांचे संशोधन काही अंशी चुकीचे आहे. वर्तक यांनी समाधिअवस्थेत पाहिलेले अ.या. १ आणि अ.या. २ चे कोणतेही प्रयोग अद्यापि ठरलेले नाहीत.. किन्वा या दोन्ही यांनां'चे एकमेकांना भिडण्याचे चान्सेसदेखील नाहीत. :( !!!!"" आणि पुढे गम्मत अशी झाली, की ७ सप्टेम्बर १९७६ रोजी "नासा" ने ही बातमी प्रसारित केली, की अ.या.१ आणि अ.या. २ यांची धडक होण्याचा प्रयोग १२ सप्टेम्बर १९७६ रोजी मंगळावर आयोजित केलेला आहे... "नासा" ने सांगितले, की अवकाशयानांची दिशा पूर्व- पश्चिम असेल.. अर्थात हेही पद्माकरजींनी आधी वर्तविलेले होतेच. आणि पुढे काही दिवसांनी हा यानांच्या डॉकिन्ग'चा प्रयोग कॅन्सल झाला. आणि हा "पद्माकर वर्तक" यांचा सर्वांत मोठा विजय होता. त्यांच्या "मन्गळा"वर गेलेल्या 'विज्ञानमय कोषा'तल्या शरीराने समाधि अवस्थेत जे जे काही भविष्य पाहिले होते... ते ते सर्व तंतोतंत खरे ठरले... 'नासा' कडून त्यांना त्याप्रमाणे पत्रदेखील आले.. जे आजही पद्माकर वर्तक'जींकडे आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आता पाहू या वर्तक'जींचा गुरु

मृगनयनी
Wed, 04/18/2012 - 23:23 नवीन
आता पाहू या वर्तक'जींचा गुरु ग्रहावरील समाधिअवस्थेतील प्रवास आणि त्यांच्या प्रेडिक्शन्सला "नासा" कडून मिळालेला दुजोरा:- 'नासा'ने जेव्हा गुरु-ग्रहावर "व्हॉयगर" हे अंतराळयान सोडण्याचा विचार केला, तेव्हा मंगळा'प्रमाणेच "गुरु" ग्रहाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वर्तक'जी समाधिअवस्थेतून गुरु ग्रहावर गेले.आणि त्यांनी दिव्य दृष्टी लावली... तो दिवस होता- २७ ऑगस्ट १९७७. दुपारी साधारण १ वाजता तेध्यानास बसले.. ते रात्री १.१५ पर्यन्त त्याच अवस्थेत होते. त्या १२ तासांमध्ये त्यांनी 'गुरु' ग्रहाची सैर केली. एका क्षणात साधारण ५०० लाख किलोमीटर प्रवास केल्यासारखे पद्माकरजींना वाटले. गुरु ग्रहावर गेल्यानन्तर आपण तरंगत असल्याचा आभास पद्माकरजींना झाला... जे की मन्गळ ग्रहावर त्यांना त्यांच्या विज्ञानमय कोषातील शरीराद्वारे उभे राहिल्याचे जाणवत होते... तसे ते गुरुवर व्यवस्थित उभे राहू शकत नव्ह्ते. गुरुवर "आकाश" हे ढगाळलेले अन्धारुन आल्यासारखे त्यांना वाटले. तसेच त्यांना तिथे अतिशय डीम लाईट असल्यासारखे वाटत होते. तेथील ढग पण खूपच घट्ट आणि जाड असल्यासारखे वाटत होते..ते ढग खूप सारे एकत्र येऊन वेगाने एकमेकांपासून विलग होत होते. आणि विरून जात होते. आकाशात पिवळा आणि जांभळा हे दोन रन्ग प्रामुख्याने दिसत होते. ढग मात्र जांभळ्या रन्गाचे होते. वर्तकजींनी आधी आकाशात गुरुचे ३ पूर्ण चन्द्र त्रिकोणाकारात पाहिले.. नन्तर ४ पूर्ण चन्द्र आयताकारात दिसले. मग पुढे ६ अर्ध-चन्द्र त्यांना दिसले. हे ६ अर्धचन्द्र व्हर्टिकली अर्धे होते.. म्हणजे आपल्याला पृथ्वीवरून नॉर्मली शुक्ल चतुर्थी ते शुक्ल दशमी या तिथींचे चन्द्र हॉरीझोन्टली अर्धे दिसतात... म्हणजे आडवे दिसतात... पण गुरुवर ते उभे दिसत होते. तसेच त्या चन्द्रांचा अर्धा व्हिज्युअल पोर्शन बर्‍यापैकी ब्राईट होता.. नॉर्मली आपल्या पृथ्वीवरून दिसणार्‍या चन्द्रापेक्षा तो कमी ब्राईट होता आणि आकारानेही अपल्याला दिसणार्‍या चंद्राच्या ३/४ व्यासाचा होता. नन्तर वर्तक'जींनी छोट्या छोट्या काळ्या रन्गाच्या विन्चवाच्या शेपटीच्या आकाराच्या काही आकृती पाहिल्या. ते काळे खडक होते. गुरु'वरती धूळ अजिबात नव्हती. तसेच कोणत्याही प्रकारचा सुवास किन्वा दुर्गन्ध तेथे नव्हता. तसेच कोणताही आवाज त्यांना ऐकू येत नव्हता. तसेच कोणत्याही प्रकारचे जीव किन्वा पाणी तेथे अस्तित्वात नव्हते. आणि त्यापूर्वी देखील कधी जीवसृष्टी अस्तित्वात असल्याच्या खुणाही नव्हत्या.. जश्या की मन्गळावर अस्तित्वात होत्या. गुरुच्या हवेतील घनता आणि दाब हा पृथ्वीवरच्या धनता आणि दाबापेक्षा खूप जास्त होता. मग रात्री १.१५ वाजता वर्तक'जी समाधिअवस्थेतून बाहेर आले. 'गुरु' वरील हे सगळे निरीक्षण मग पद्माकरजींनी मराठी मासिक- "श्री" मध्ये २९ ऑक्टोबर १९७७ मध्ये प्रकाशित केले. "सन्तकृपा" या दिवाळी स्पेशल मासिकात नोवेम्बर १९७७ मध्ये प्रकाशित केले. "तरूण भारत" मध्ये ५ फेब्रुवारी १९७८ मध्ये प्रकाशित केले. तर "इन्डियन एक्सप्रेस" मध्ये २२ मे १९७८ रोजी प्रकाशित केले. वर्तक'जींनी 'गुरु'वर जाऊन तेथील स्थितीचा अनुभव घेतल्यानन्तर "नासा"ने २ वर्षांनी म्हणजे- १९७९ मध्ये "व्हॉयगर"ने गुरुवर जाऊन घेतलेला रिपोर्ट प्रकाशित केला. आणि आश्चर्य म्हणजे वर्तक'जींनी काढलेल्या रिपोर्टमधल्या १८ पैकी ९ पॉईन्ट्स हे "नासा" ने काढलेल्या प्रेडिक्शनशी तन्तोतन्त मिळत होते. व्हॉयगर'ने वर्तक यांनी काढलेल्या रिपोर्टमधील - गुरुची घनता, जडत्व, ढग, जाम्भळा रन्ग,ढगांच्या हालचाली, काळे खडक, त्यांचे शेपटीसारखे दिसणारे पुन्जके, गुरुवरील वातावरण, जीवसृष्टीचे अस्तित्व नाकारणे, वादळेविरहित स्टेडी अ‍ॅटमॉसफिअर ..इ. गोष्टी टॅली करण्यात आल्या... आणि त्या परफेक्ट मॅच झाल्याचेही "नासा" कडून ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आले.. त्यामुळे आपल्या देशातले, अमेरिकेतले आणि सम्पूर्ण जगभरातले शास्त्रज्ञ चाट पडले.. कारण 'नासा' सारख्या सन्स्थेने "गुरु" ग्रहावरील निरीक्षणे डिक्लेअर करण्याच्या आधी तब्बल दोन वर्ष अगदी तन्तोतन्त रिझल्ट पद्माकर वर्तक'जींनी सांगितलेले होते. १२.४ मिलियन्स किलोमीटरवरून "व्हॉयगर"ने गुरुच्या अर्ध चन्द्रांचा फोटो काढून तो नासा'ने पब्लिश केलेला होता. ज्यामध्ये वर्तकजींनी सांगितल्याप्र्माणे त्या चन्द्रांचा अर्धा भागच थोडाफार प्रकशित दिसत होता. जे गुरुचे "अर्ध चन्द्र" १२.४ मिलियन कि.मी. वरून व्हॉयगर'ने पाहिले होते.. ते चन्द्र वर्तक'जींनी स्वतः गुरुवर जाऊन पाहिले होते. " विज्ञानमय कोष" गुरुवर अस्तित्वात असल्याचे हे अतिज्वलन्त उदाहरण आहे, असे डॉ. पद्माकर वर्तक मानतात. या कोषामुळे हजारो मैल अन्तर एका क्षणात पार करता येते. त्याचा वेग प्रकाशवेगापेक्षाही खूपच जास्त असल्याने प्रकाशापेक्षा जवळजव्ळ वीस मिनिटे आधी 'विज्ञानमय कोष' मन्गळ आणि गुरुवर पोचू शकतो. हेही वर्तक'जींनी नमूद केले. _~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_ अश्याप्रकारे ध्यानयोगातून, समाधि द्वारे आपल्या दिव्य दृष्टीने "पद्माकर वर्तकजी" मंगळ, गुरु ग्रहांवर यशस्वीरीत्या जाऊन आले.. व त्यांनी दिलेल्या रिपोर्ट्सला "नासा"ने देखील मान्यता दिलेली असून त्यांच्या या अनमोल योगदानाबद्दल अनेक धन्यवाद दिलेले आहे........ :) || ओम नमः शिवाय ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

माननीय डॉ. पद्माकरजी वर्तक

मृगनयनी
Wed, 04/18/2012 - 23:29 नवीन
माननीय डॉ. पद्माकरजी वर्तक यांच्या कार्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी जागा राखून ठेवत आहे.. ___ ___ ___ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आर यु सिरीयस?

दादा कोंडके
गुरुवार, 04/19/2012 - 00:00 नवीन
आवरा! मंगळावर जाउन येण्यापेक्षा या देशातच काय करायचं ते करा म्हणावं. देशाचं सोडा, महाराष्ट्राचं घ्या. दुष्काळ, आत्महत्या, मुंबई हल्ला, घोटाळे, भारनियमन, माने प्रकरण, आणि आता जेष्ठ नागरीकांना मारहाण. :) की असल्या संकुचीत गोष्टी त्यांच्या खिजगणतीतच नाहीत आणि समस्त मानवकल्याण करायचं असलं तर मग प्रश्नच मिटला. नासा वगैरे म्हणल्यावर लोकांची बोलतीच बंद होते. खातरजमा कशी करणार? पण त्यांनी इस्त्रोला काही मदत केली आहे का? बाकीची लोकं जाउ देत, अगदी साईबाबांनी देखिल विझलेल्या राखेतून आग काढणे वगैरे असले फुटकळ चमत्कार केले असतील तर त्यापेक्षा तात्कालीक सामाजिक मोठ्या समस्या का सोडवल्या नाहीत? असा प्रश्नं साईभक्तांना पण पडत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

साईबाबा नै ओ तर ते

शिल्पा ब
गुरुवार, 04/19/2012 - 01:36 नवीन
साईबाबा नै ओ तर ते सत्यसाईबाबा म्हणजे ओरीजिनल साईबाबांचा पुनर्जन्म घेणारे...उगाच साईबाबांच्या नावावर सत्यसाईबाबाची बिलं कशाला फाडायची!! इतरः श्री श्री वर्तक 'जी यांच्याबद्दल मृगनयनीतैंनी मोलाची माहीती दिल्याने या इथल्या संस्कृतीभंजन करणार्‍या लोकांच्या डोक्यात थोडातरी प्रकाश पडेल अशी आशा आहे. लोकांना आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानाचा मुळीच अभिमान नाही याची खंत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

श्रद्धास्थानाला धक्का!

दादा कोंडके
गुरुवार, 04/19/2012 - 23:10 नवीन
उगाच साईबाबांच्या नावावर सत्यसाईबाबाची बिलं कशाला फाडायची!!
हा चमत्कार शिर्डी साईबाबांबद्दलच आहे. त्यांच्यावरच्या एक्-दोन सिनेमात लहान असताना बघितला आहे पण पक्कं लक्षात आहे. बाकी सत्यसाईबाबां भंपक माणूस असेनाका पण काही हॉस्पिटलं तरी बांधलीयेत. तुमच्या "सबका मलिक एक" वाल्यानी काय केलय सांगा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लोकांना १००रु. ना फसवुन १रु.

शिल्पा ब
Fri, 04/20/2012 - 04:05 नवीन
लोकांना १००रु. ना फसवुन १रु. परत दिला तर त्यात काय मोठं!! अन दिला तो दिला वर अजुन त्याची टिमकी वाजवायची!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

या धाग्याचे काश्मीर होणार तर

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 04/19/2012 - 23:24 नवीन
या धाग्याचे काश्मीर होणार असे दिसत आहे. लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लिंकांची विश्वासार्हता!

साती
गुरुवार, 04/19/2012 - 00:05 नवीन
http://www.drpvvartak.com/research.asp http://www.drpvvartak.com/publishings/PanchKosh.pdf या लिंकवरून भाषांतरित करताय का? दोन्हि वर्तकांच्या नांवाच्या आणि त्यांचा उदो उदो करणार्‍याच आहेत. या बातम्या कंन्फर्म करण्याचा वरिल लिंक आणि विकीपिडियावर काही लोकांनी यांतून केलेले कॉपीपेस्ट याशिवाय एखादा रिलायबल सोर्स आहे का? बाकी सर्जन असून नंतर आध्यात्मिक गुरू बनून लोकाना आपल्या नादाला लावणारे आणखीही एक डॉक्टर मला माहिती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हजर.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/19/2012 - 04:59 नवीन
साती, I think therefore I am च्या चालीवर I claim therefore I did it. एवडं शिंपल बी समजंना तुमा डॉक्टर लोकांना! चीपो आंतरजालाच्या जमान्याततर असं काहीही, कोणीही लिहीलं तर त्यावर विश्वास ठेवावा का? पाचशे-हजारात एक डोमेन नेम आणि एवढी वेबस्पेस वर्षभरासाठी भाड्याने मिळते. फक्त "मी सांगते" (किंवा सांगतो) यावर कधीपासून वैज्ञानिक सत्य ठरत नाहीत. लोकं आजही आईनस्टाईनची जनरल रिलेटीव्हीटी खोटी का खरी यावर संशोधन करतात. अवांतर माहितीची देवाणघेवाण-- १. जिओव्हान्नी शियापरेल्ली नामक इटालियन खगोलाभ्यासकाने १८७७ साली मंगळाची प्रतियुती (मंगळ -- पृथ्वी -- सूर्य अशी रचना, ज्यात मंगळ पृथ्वीपासून सर्वात जवळ येतो, रात्रभर आकाशात दिसतो.) असताना मंगळाची निरीक्षणं केली. त्यात त्याला मंगळावर canale असण्याचा भास झाला. या "कनाली"चं इंग्लिश भाषांतर "चॅनल" अथवा पाणी वहाण्याच्या खुणा असं झाल्यामुळे मंगळावर पाणी वाहिल्याच्या खुणा आहेत असा समज दीर्घकाळ होता. पर्सिव्हल लॉव्हेल (ज्यांनी प्लूटोचे नाव शोधाआधीच प्लूटो ठेवले होते) यांचा या पाणी वहाणे, कालवे खणलेले असणे वगैरे सिद्धांतांवर फार विश्वास होता. आधुनिक दुर्बिणींनी हे सर्व आभास होते हे सिद्ध केले. मंगळावर पहिलं मानवनिर्मित यान १९७२ मधे उतरलं तरी साठीच्या दशकात अमेरिका आणि तेव्हाचे यू.एस.एस.आर./ मराठीत "रशिया" या दोन्ही देशांची अनेक फ्लायबाय, जवळून जाऊन चित्रं घेणारी यानं, मिशन्स कार्यरत होती. पृथ्वीपेक्षा मंगळाचे वातावरण फारच विरळ आहे. (वातावरणाचा दाब ३०-१२०० पास्कल एवढा आहे. पृथ्वीवर समुद्रसपाटीवर हा दाब १०० किलोपास्कलच्या थोडा वर असतो. थोडक्यात मंगळावरच्या वातावरणाचा अधिकतम दाब हा समुद्रसपाटीवर असणार्‍या दाबापेक्षा साधारण १०० पट अधिक) वर्तकांना ही गोष्ट जाणवली नसेल तर त्यांची कातडी फारच जाड असली पाहिजे. एवढ्या कमी दाबामुळे मानवी शरीराचा स्फोट होऊ शकतो. 'Total recall' या आर्नीपटाच्या क्लायमॅक्सच्या (गलिच्छ) सीनमधे ही गोष्ट सोदाहरण दाखवलेली आहे; डोळे बाहेर येणं फारच गचाळ दिसतं. वर्तक जर विदेह मंगळावर गेले असतील तर सुगंध वगैरे गोष्टी त्यांना कशा समजल्या हा प्रश्न आहेच. चंद्रावर फारशी ज्वालामुखीजन्य विवरं शिल्लक नाहीत. ज्वालामुखीतून होणार्‍या पायरोक्लास्टीक प्रवाहाचा परिणाम म्हणा, किंवा जमिनीखालच्या घडामोडी म्हणा किंवा अशनी-आघातामुळे चंद्रावरची बहुतेकशी विवरं ही अशनी-आघातातून तयार झालेली आहेत असं समजलं जातं. मंगळाचीही तीच गोष्ट. मंगळाच्या फोटोंमधे काळ्या मोठ्या रेषा दिसतात, त्या मंगळाच्या भूगर्भातील हालचालींमुळे, प्लेट टेक्टॉनिक्समुळे एकावर एक थर चढल्यामुळे तयार झालेल्या रचना आहेत. शिवाय सातीने दिलेल्या पहिल्या दुव्यात हे सापडलं:
... The famous ring of Saturn is made of some material like slurry or mud along with floating rocks. There are no land marks on the Saturn because there is no formation of land. ...
मराठीत (हे भाषांतर शब्दशः नाही; हा मला समजलेला अर्थ आहे.):
शनीची कडी चिखल किंवा तरंगणार्‍या दगडांची बनलेली आहेत असे श्री. वर्तक यांना आपल्या शनीभेटीतून समजले.
जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१-१८७९) या स्कॉटीश भौतिकशास्त्रज्ञाने १८५७-१९५९ साली, दोन वर्ष या गोष्टीचा अभ्यास करून, गणिताच्या आधारे शनीच्या कड्यांचा प्रश्न सोडवला. शनीची कडी ही एकसंध वस्तू नसून अवकाशात द्रायू (द्रव+वायू/fluid) अवस्थेत असतील तर स्थिर असतील. निरीक्षणांतून असं दिसत नसल्यामुळे ही कडी धूळीचे आणि दगडांचे कण असतील असं प्रतिपादन त्याने केलं. व्हॉयेजर (व्हॉयेगर असा उच्चार मी प्रथमच इथे वाचते आहे) आणि पायोनियर, आणि पुढे कसिनी वगैरे यानांनी फोटो काढून मॅक्सवेलचा सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध केले. संदर्भ विकीपिडीयाचे हे पान. मॅक्सवेलने हे संशोधन अ‍ॅबरडीनच्या विद्यापीठात असताना केले. त्यानंतर तो लंडनच्या किंग्ज कॉलेजात लागला. तिथे त्याने विद्युतचुंबकीय क्षेत्रावर मूलभूत काम केले. हे काम आज मॅक्सवेलच्या समीकरणांच्या रूपात आता भौतिकशास्त्राचे सर्व विद्यार्थी पायाभूत म्हणून शिकतात. आणि हो, गुरूवर काळे खडक नाही. एक घन वस्तू, जिला सर्वजण शूमेकर लेव्ही-९ असं म्हणतात, ती गुरूवर आदळली तेव्हा गुरूने ती गिळंकृत केली आणि काही दिवसात त्याचं नामोनिशाणही राहिलं नाही हे आपल्यापैकी बहुतेकांनी कुठे ना कुठे पाहिलं असावं. शिवाय गुरूवर एक रक्तवर्णी, प्रचंड मोठा ठिपका आहे. हे गुरूवरचं वादळ आहे असं नासाचे आणि इतरही शास्त्रज्ञ समजतात. तेव्हा वर्तकांना गुरूवर वादळं दिसली नसतील तर ते चुकीच्या बाजूला उतरले असं खेदाने नमूद करते. असो. आता बाकीचं लिहायचा कंटाळा आला. माझा प्रतिसाद फारच पकाऊ आहे, त्यापेक्षा धाग्यावरचे इतर अनेक प्रतिसाद फारच उद्बोधक आणि विनोदी+करमणूकप्रधान आहेत. तेव्हा आवरते. ही सगळी माहिती नासाची संस्थळं, विकीपीडीया वगैरे ठिकाणी आहेच, मी तिथूनच उचलून आणली आहे. फार खोदकाम न करताच अशी बरीच "पकाऊ" माहिती मिळेल. वर्तकांच्या व्यक्तिगत सहलींबद्दल (vacations) मला काहीही घेणंदेणं नाही; पण वर्तकांच्या जन्माआधीच ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञाने शनीच्या कडी एकसंध नसणं सिद्ध केलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

@ साती.. & others... :- या

मृगनयनी
गुरुवार, 04/19/2012 - 15:55 नवीन
@ साती.. & others... :- या आणि य व्यतिरिक्त बर्‍याच लिन्क्स मलाही माहित आहे. तसेच या कुणीही पाहू शकते. यामध्ये देखील "मा. डॉ. पद्माकर वर्तक" यांनी काढलेले प्रेडिक्शन्स "नासा" च्या रिपोर्टबरोबर मॅच होतात.. असेच लिहिले आहे. मुद्दा असा होता/ आहे, की साती- तुम्ही आणि इतर अनेकांनी- "नासा" व "डॉ. वर्तक" यांचा अन्योन्य संबध काय? असा प्रश्न मला विचारलेला होता... जर तुम्ही किन्वा इतर प्रश्नकर्त्यांनी जर या लिन्क्स पाहिल्या असात्या.. तर कदाचित असा प्रश्नच विचारलाच नसता.. कारण या लिन्क्स मध्ये पद्माकर वर्तक- मन्गळ व गुरुवर गेल्याची डेट, टाईम... तसेच त्यांचा रिपोर्ट वेगवेगळ्या रिलायबल न्यूजपेपरला पब्लिश झाल्याची डेट, आणि त्यानतर दोन वर्षांनी नासा'च्या रिपोर्टबरोबर टैली झालेले पॉईन्ट्स.. या सर्व गोष्टी मांडल्या गेलेल्या आहे... :) किन्वा मग या लिन्क्स व तेथील इन्फॉर्मशन "इन्ग्लिश"मध्ये असल्याकारणाने कदाचित मला असा प्रश्न विचारणार्‍यांनी इतकी पाने वाचायचा कन्टाळा केला असावा.. किन्वा मग त्यांना "इन्ग्लिश" डायजेस्ट झाले नसावे.. असे मला वाटले... म्हणून सुलभ- मराठी भाषेत अत्यंत सोप्या पद्धतीने "डॉ. वर्तकां"चे कार्य.. त्यांच्या दिव्य दृष्टीचे महत्व, त्याद्वारे मन्गळ-गुरु ग्रहावरील त्यांचा अद्भुत प्रवास ... इ. गोष्टी मला टंकित कराव्या लागल्या.... असो. इच्छुकांनी त्यात नमूद केलेल्या वृत्तपत्रांशी, मासिकांशी सम्पर्क साधून वर्तकांचे संशोधन आणि नासा'चा रिपोर्ट यांची शहानिशा करून घ्यावी.. अर्थात इन्डियन एक्सप्रेस'सारख्या न्यूजपेपरवरतीही जर विश्वास नसेल .तर मग अश्या महाभागांबरोबर बोलणेच खुन्टले!!! :) पद्माकर'जीं वर्तक यांना मी व्यक्तिशः ओळखत असल्याने आणि माझे या विषयावरती त्यांच्याशी वैयक्तिक बोलणे झाले असल्याने तसेच तैतरीय उपनिषदातील विज्ञानमय, मनोमय, आनन्दमय.. इ. मानवी देहाच्या कोषांविषयी मला ज्ञान आणि विश्वास असल्याने पद्माकर'जींचा मन्गळ, गुरु वगैरे ग्रहांवरचा प्रवास कसा झाला असेल.. हे मी समजू शकते. आणि सध्यादेखील एका दुसर्‍या सूर्यमालेतील ग्रहावर त्यांचे दिव्य दृष्टीद्वारे संशोधन चालू आहे. तसेच याआधीदेखील अनेक खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ग्रहांवर संशोधन केलेले आहे.. त्याचे रिझल्टदेखील अचूक आलेले आहेत.... याबद्दल कोणतेच दुमत नाही. इथे मुद्दा आहे.. तो वर्तकांचा.. डॉ. वर्तक समाधिअवस्थेदारे दिव्य दृष्टीतून मन्गळ, गुरु, शनी वगैरे ग्रह कसे बघू शकतात...हा प्रश्न कुणालाही पडणे साहजिकच आहे. आणि त्याची सगळी उत्तरे वर साती' यांनी नमूद केलेल्या डो. वर्तक'जींच्या सन्दर्भातील लिन्क्समध्येच सापडतात. त्यामुळे ज्यांना उपनिषदे, मानवी देहातील अन्नमय कोष, प्राणमय कोष या सगळ्याबद्दल माहिती नाही.. आणि ते माहिती करून घ्यायची इच्छा नाही .. किंवा कदाचित कुणाची तशी क्षमताही नसते.. अश्या लोकांना "ग्रहांवर गेल्यावर तेथे मानवी व्हिजिबल शरीर नसतानासुद्धा सुगन्ध कसा येऊ शकतो.. "हे नाही समजू शकणार!!!! :) ज्यांना मानवी देहाच्या या चार कोषांबद्दल कुतुहल आहे.. आपण आपले मूळ शरीर पृथ्वीवर सुरक्षित ठेवून 'विज्ञानमय कोषाद्वारे' महालोकातून ग्रहांवर कसे काय प्रवास करू शकतो.. या बद्दल जिज्ञासा आहे.. अश्यांनी डॉ. वर्तकांची डयरेक्ट भेट घेणे केव्हाही उचित ठरेल.. असो.. पद्माकरजीं'चे कार्य, दिव्य दृष्टीद्वारे त्यांचा ग्रहांवरचा प्रवास, त्यांची नि:स्पृह वृत्ती हे सगळे पाहिले.. की खरोखर त्यांच्याविषयी आदर दुणावतो. बरं.. इतके सारे संशोधन केले असूनही त्यांच्यामध्ये तिळमात्रही गर्व दिसून येत नाही.. तसे आजकाल आम्हीदेखील "क्षमाशील वृत्तीचे बनत चाललेलो आहोत.. अगदी..काही दिवसांपूर्वीच -आधी मिपा'ला आणि नतर आम्हाला स्वतःहून शरण आलेल्या काहीजणांना आम्ही उदार मनाने माफ केले बरं!.. भले आता ते शरणागत कितीही दात दाखवत असले.. तरी आमच्या गुरुंची आज्ञा होईपर्यंत आम्ही त्यांच्या "मन्गळावरच्या पाण्याला" 'लाल वारुणि' पण म्हणू ..वाटल्यास तांबड्या समुद्राचा रन्ग हा "निळा" असतो.. असेही म्हणू.. ;) ;) त्याचं काय आहेना... "जोकराची टोपी" कितीही उलटी करून फिरविली तरी ती जोकराचीच टोपी असते. आणि सर्कशीतले जोकर सर्कशीतच चान्गले वाटतात.. असे आम्हाला आमचे "गुरुजी" सांगतात आणि आमच्या गुरुजींना भावभक्तीने दिलेला घास हा "गोडच" लागतो... :) घास कडू लागणारे... ते जोकर-टोपीवाले रिन्गमास्तर!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

अधिक माहिती हवी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/19/2012 - 21:29 नवीन
"नासा" व "डॉ. वर्तक" यांचा अन्योन्य संबध काय? असा प्रश्न मला विचारलेला होता
नाही. वैज्ञानिक संशोधनात 'नासा'ला वर्तकांचा कसा फायदा झाला आहे असा प्रश्न होता. वर्तकांनी सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी आधीपासूनच (पाश्चिमात्य संस्थांमधील संशोधनामुळे) मानवजातीला माहितच होत्या असं जे मी माझ्या वरच्या प्रतिसादात लिहीलेलं आहे त्याबद्दल काही टिप्पणी मिळाल्यास आनंद होईल. किंवा सुगंध समजतो पण हवेचा दाब कमी आहे हे समजत नाही असं का? याचंही उत्तर समजून घेण्याची इच्छा आहे. सर्वसामान्यत: संशोधनात दुसर्‍याच्या कामाचा फायदा झाल्यास, आपल्या संशोधनात त्या संशोधनाचा उल्लेख करतात. याला citation असं म्हटलं जातं. 'नासा'ने वर्तकांशी काही वेगळा संपर्क केला असल्यास त्याची प्रत पहावयास मिळेल का? आपला मराठी माणूस आहे म्हणून अधिक आपुलकी, दुसरं काय!
आणि सध्यादेखील एका दुसर्‍या सूर्यमालेतील ग्रहावर त्यांचे दिव्य दृष्टीद्वारे संशोधन चालू आहे.
वर्तकांना कदाचित या, या किंवा या विदागाराचा उपयोग होईल. शिवाय OGLE या प्रकल्पात याच विषयावर काम सुरू आहे. प्रसिद्ध केलेले सोडून शेकडो ग्रह त्यांच्या कन्फर्म करण्याच्या यादीत आहेत. (खासगी संपर्कातून मिळालेली माहिती.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क

मृगनयनी
गुरुवार, 04/19/2012 - 22:55 नवीन
आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क साधून उचित माहिती मिळवू शकता.... आपल्याला पाहिजे असलेल्या प्रती, पुरावे त्यांच्याकडेच सापडू शकतात. बाकी
आपला मराठी माणूस आहे म्हणून अधिक आपुलकी, दुसरं काय!
हे वाक्य वाचून =)) अश्या स्माईली टंकण्याचा मोह आवरला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/20/2012 - 01:53 नवीन
आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क साधून उचित माहिती मिळवू शकता.... आपल्याला पाहिजे असलेल्या प्रती, पुरावे त्यांच्याकडेच सापडू शकतात.
ओक्के.
हे वाक्य वाचून =)) अश्या स्माईली टंकण्याचा मोह आवरला..
जियो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

नीट वाचा.

साती
Sat, 04/21/2012 - 14:34 नवीन
त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे. कुठे म्हणे? असा प्रश्न मी माझ्या प्रतिसादात विचारला होता. त्याचं उत्तर आपण दिलेल्या लिंकांत सापडलेले नाही. काही अधिक इंग्रजी येणार्‍या लोकांनाही मी त्यांचा अर्थ विचारलापण त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. बाकी आपल्या तीव्र निष्ठांचा आणि तुम्ही दुसर्‍यांना अपमानास्पद भाषेत उत्तरे देऊन त्या निष्ठांचं केलेल्या समर्थनाचा अनुभव (जरी स्वानुभव नसला तरी)असल्याने यापुढे या विशयावर आपल्याशी विवाद करायची इच्छा नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मंगळावर तर जाऊ द्या शेजारच्या

अप्रतिम
गुरुवार, 04/19/2012 - 00:09 नवीन
मंगळावर तर जाऊ द्या शेजारच्या बंद खोलीतल्या १० वस्तू ओळखून दाखवण्याचे आव्हान अंनिस ने दिले होते...त्याचे आजतागायत उत्तर वर्तकांनी दिले नाही......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

काय हो!

साती
गुरुवार, 04/19/2012 - 00:14 नवीन
काय हो, असली बारिक सारीक आह्वाने स्विकारायला वर्तक स्वतः येतील काय? त्यांना मंगळावर आणि गुरूवर जाण्यातून वेळ तरी मिळायला पाहिजे ना! :) उद्या मी माझ्या बाळाचं मोडलेलं खेळण्यातलं विमान दुरूस्त करायला तुमच्या त्या नासाच्या डायरेक्टराला बोलावल्म तर येईल का तो? गेलाबाजार इस्त्रोवाला तरी येईल का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

जाऊंद्या !

Nile
गुरुवार, 04/19/2012 - 01:17 नवीन
पण मला बोलावलेत तर मी येईन हो! दोन वेळचं जेवण आणि चहापाणी मिळेल तोवर विमान दुरुस्त करायला जरूर येईन. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

नक्की या!

साती
Sat, 04/21/2012 - 14:23 नवीन
नक्की या.तुमच्या अन्नमय कोषाला अन्नाचा पुरवठा करायची जबाबदारी माझी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे सगळं मी पहिल्यांदाच वाचतोय !!

अर्धवटराव
गुरुवार, 04/19/2012 - 00:19 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद !! आमचा आळस आड येतो हो... नाहि तर या सर्व उपद्व्यापाची शहानीशा करायला आवडले असते. असो... मीपा वरचे शास्त्रज्ञ हे काम करतीलच. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

अन्नमय शरीर

Nile
गुरुवार, 04/19/2012 - 02:21 नवीन
"तैत्तरीय उपनिषदा"नुसार (प्रत्येक )मानवी शरीर हे "अन्नमय कोश"असून त्या पूर्ण मुख्य अन्नमय शरीरामध्ये / कोषामध्ये "प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय" असे चार प्रकारचे उपशाखीय कोष असतात.
ते डागदर अजून जिवंत आहेत का गेले हो? नाही एक प्रश्न विचारायचा होता. माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

करणी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/19/2012 - 16:08 नवीन
माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?
निळ्या तुझ्यावरती बहूदा कोणीतरी करणी केली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तूच तो!

Nile
गुरुवार, 04/19/2012 - 20:58 नवीन
तूच असशील तो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ते डागदर अजून जिवंत आहेत का

मृगनयनी
गुरुवार, 04/19/2012 - 16:30 नवीन
ते डागदर अजून जिवंत आहेत का गेले हो? नाही एक प्रश्न विचारायचा होता. माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?
नाईल... हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत. :) आणि प्रत्येक जिवन्त माणसाचे / प्राण्याचे...किन्वा कोणत्याही सजीवाचे शरीर हे एक अन्नमय कोशच असते. त्यामुळे आपोआपच त्यास नॉर्मल शरीरधर्मातल्या - भूक, तहान, मैथुन, सुख, दु:ख, आनन्द, सन्ततीनिर्मिती.. इ सगळ्या गोष्टी लागू होतत.. त्यामुळे आपले "जुलाब होणे" नॅचरल आहे. वेळीच औषध घेऊन उपचार करा.. नाहीतर तुमच्या अन्नमय कोषातली जीवशक्ती कमी होऊन इन्द्रिय शैथिल्य व बुद्धिमान्द्य इ. व्याधी उद्भवू शकतात. तुमचा 'अन्नमय कोष" जितका शुद्ध आणि पवित्र असेल.. तितक्या लवकर तुम्हाला तुमच्याच विज्ञानमय कोशाची माहिती होऊन तुम्हीदेखील मन्गळावर जाउ शकाल!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अन्नमय कोश!

Nile
गुरुवार, 04/19/2012 - 20:55 नवीन
हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत.
अरेरे..आपलं.. अरे वा!
आणि प्रत्येक जिवन्त माणसाचे / प्राण्याचे...किन्वा कोणत्याही सजीवाचे शरीर हे एक अन्नमय कोशच असते. त्यामुळे आपोआपच त्यास नॉर्मल शरीरधर्मातल्या - भूक, तहान, मैथुन, सुख, दु:ख, आनन्द, सन्ततीनिर्मिती.. इ सगळ्या गोष्टी लागू होतत.. त्यामुळे आपले "जुलाब होणे" नॅचरल आहे. वेळीच औषध घेऊन उपचार करा.. नाहीतर तुमच्या अन्नमय कोषातली जीवशक्ती कमी होऊन इन्द्रिय शैथिल्य व बुद्धिमान्द्य इ. व्याधी उद्भवू शकतात.
=)) =)) सदर तत्वज्ञान वाचून आमची सगळीच इंद्रीयं शिथिलपडली आहेत. बुद्धीचं तर विचारूच नका. (बाकी सुक्ष्मरुपात कोणाला तिथे धाडून इंद्रियांत पुन्हा चैतन्य आणता येईल का हे विचारायला पाहिजे. ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 04/20/2012 - 10:29 नवीन
हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत.
अरेरे..आपलं.. अरे वा!
अत्यंत थर्ड क्लास रिमार्क. ज्यांची बुद्धी केवळ पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकावरचे विनोद करण्याइतकी आहे त्यांच्या तोंडी लागण्यात काही हशील नाही, तरी केवळ निषेध व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जान दे ना विमे... कि फर्क

प्यारे१
Fri, 04/20/2012 - 10:42 नवीन
जान दे ना विमे... कि फर्क पैंदा???? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

जान दे ना विमे... कि फर्क

मदनबाण
Fri, 04/20/2012 - 12:36 नवीन
जान दे ना विमे... कि फर्क पैंदा???? + ओय पापे क्यो द्यान देता है यार ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दोआकाटा

Nile
Sat, 04/21/2012 - 12:25 नवीन
दोआकाटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा