✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पौराणिक विमाने

आ
आनन्दा यांनी
Sat, 04/14/2012 - 19:29  ·  लेख
लेख
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. "पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी... http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1176901560/paracas_trident.jpg/tpod.html अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे. प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे... https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय? http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm ही म्हणे धावपट्टी असावी http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78970 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

सहमत

आबा
Mon, 04/16/2012 - 14:55 नवीन
शब्दा-शब्दाशी सहमत, मोठ मोठ्या उच्चशिक्षित लोकांना असे दावे करताना पाहून हसावं की रडावं कळत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गविंशी पुर्णपणे सहमत,

रम्या
Mon, 04/16/2012 - 17:05 नवीन
गविंशी पुर्णपणे सहमत, कुठल्याही तंत्रज्ञानाची तांत्रिक माहीती पुराणात उपलब्ध नसताना, ओढून ताणून अर्थ काढून आमच्या कढे ह्यांव होते नि त्यांव होते असा फुकाचा अभिमान बाळगून स्वतःचीच पाठ स्वतःच थोपटवून घेण्याच्या वॄत्तीची किव करावीशी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद..असं पहा, ते

गवि
Mon, 04/16/2012 - 17:20 नवीन
धन्यवाद.. असं पहा, ते पुराणकालीन ग्रंथात असेलही.. न सापडलेल्या अवस्थेत.. ते सापडलं आणि त्या आकृत्या / तंत्र वापरुन खरं उदा. आयनच्या प्रॉपेल्शनने चालणारं विमान बनवता आलं तर तो सर्वोत्तम योग असेल. पण सध्या काय होतंय की एक ब्रेकथ्रू, (उदा, हवेत उडता येण्याचं तंत्र,) सापडणे या बिंदूपासून सव्वाशी वर्षांची टाईमलाईन पाहिली तर त्यात एका समूहाने (लोकसमूह, देश ही रचना कृत्रिम का असेना पण आपण मानली आहेच म्हणून तेच धरुनच बोलू..) चारशे लोकांना घेऊन अर्धी पृथ्वी पार करणारे प्रचंड यंत्र बनवलं आणि दुसरा समूह फक्त आपण ते "आधी" शोधलं होतं या विधानाखेरीज काही फार करु शकला नाही. भले दोन समूहांची आर्थिक राजकीय स्थिती वेगवेगळी असेल. आता आपण मागे का राहिलो याचं कारण देताना, पुन्हा शिवकर तळपदेंच्या विमानाचं उदाहरण घेतल्यास, असं म्हटलं जातं की हे संशोधन उपेक्षित राहिलं आणि विमानाचा प्रोटोटाईप तळपदेंच्या नातेवाईकांनी रॅली ब्रदर्स कंपनीला विकला. समजा त्या संशोधनात पार्‍याच्या आयन्सनी प्रपल्शन करुन विमान उडवण्याचं पोटेन्शियल असतं तर रॅली ब्रदर्स त्याच्यावर बसून राहिले असते का? ते संशोधन सयाजीराव, टिळकांसहित अनेकांनी पाहिलं पण तरीही विस्मरणात अन अडगळीत गेलं, याचा अर्थ ते व्हायेबल नव्हतं असं सध्या का समजू नये? आणि मग आज काय व्हायेबल आहे ते पाहून काही बनवून बाहेर विकण्याइतका दर्जा का प्राप्त करु नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

हे अफाट आहे.

यकु
Mon, 04/16/2012 - 13:42 नवीन
हे अफाट आहे.
  • Log in or register to post comments

इथच तर मार खातो आपण...

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 15:19 नवीन
गविंच्या वरील प्रतिक्रियेतील हे वाक्य त्यांच्यासाठीच उत्तम उत्तर आहे. पुराणांतील/जुन्या धर्मग्रंथांतील संदर्भ देणार्‍यांची इतकी टवाळी करण्याचे कारण नाही (ओक-वर्तक राहू दे बाजूला). जुन्या भारतीय साहित्यातील नोंदींना प्रचंड व्यापारी महत्त्व आहे. हळद आणि कडुलिंबाच्या पेटंटचा लढा आपण अशाच जुन्या नोंदींच्या आधारे जिंकला आहे. आपले पारंपरिक ज्ञान जतन करुन ठेवण्यात आपण कमी पडतो आहोत, हे खरे असले तरी कुठेतरी सुरवात तर झाली आहे. चीनने आपल्या सर्व पारंपरिक वनौषधी व उपचार तपशिलांचे डॉक्युमेंटेशन यापूर्वीच पूर्ण केले आहे. भारतात डॉ. माशेलकरांच्या प्रेरणेने सीएसाआरआयने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पारद इंधन विकसित करण्याबाबत नासामध्ये संशोधन सुरु असल्याचे वाचले होते. नासामध्ये जर कुणाचा संपर्क असेल तर कृपया अधिकृत माहिती द्यावी. काही वेळा आपण आपलाच हक्क प्रस्थापित करण्यात मागे पडतो आणि नंतर त्याचे परिणाम पाहून हळहळतो. गोमूत्रापासून बनवलेल्या ६० हून अधिक उत्पादनांपैकी तब्बल ४० पेटंट बाहेरच्या देशांनी घेतली आहेत. (जपान आघाडीवर आहे) भारतात याबाबतची सर्वाधिक पेटंट (१० की १२) वर्ध्याच्या गोसेवा प्रतिष्ठानकडे आहेत. गाईचे शेण, गोमूत्र यांचा औषधोपचारातील वापर आयुर्वेदात नमूद आहेच, परंतु त्यापासून उत्पादने विकसित करण्यावर लक्ष न दिल्याने ही पेटंट बाहेर गेली आहेत. कोल्हापुरी चपलांचे पेटंटही अलिकडेच दुसर्‍या गावाकडे गेल्याचे वर्तमानपत्रांत आले होते. गोगलगाईच्या वेगाने होणारी प्रगती ही चिंताजनक बाब आहेच, परंतु त्यातही संताप येण्याजोगी गोष्ट म्हणजे आपलेच करप्ट मानसिकतेचे गुलाम लोक. जे कायम परकीयांच्या प्रगतीचे दाखले देऊन भारतीयांवर थुंकण्याचे काम करतात. असल्या लोकांकडून अवसानघात होतोच, पण इनोव्हेटिव्ह काही घडत नाही. असल्या परधार्जिण्यांपेक्षा एकवेळ परके परवडले, जे मुंबईच्या अशिक्षित डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाला सलाम करायला मुद्दाम येथे येतात आणि मास मॅनेजमेंटची संकल्पना समजून घ्यायला या डबेवाल्यांना हार्वर्डला बोलवतात.
  • Log in or register to post comments

टवाळी नाही हो.. पुराणकालीन

गवि
Mon, 04/16/2012 - 15:30 नवीन
टवाळी नाही हो.. पुराणकालीन काही शोधण्याचा प्रयत्न थांबवावा असं नव्हे.. पण एक पाय चालू काळातही असावा.. फक्त त्या पुराणकालीन नोंदीतच अडकून पुढे सरकणं नाकारण्यामुळे आपलं नुकसान होतंय. पाश्चात्य देशांना सुदैवाने ही अडचण नाही.. माझे आजोबा उत्तम प्रयोगशील शेतकरी होते अन त्यांनी पेरणीयंत्र शोधलं होतं असं म्हणत म्हणत मी आणि माझ्या पुढच्या पिढ्यांनी आजोबांच्या फडताळातल्या वह्यांवर (वह्या सापडल्या तर उत्तम ..खरंतर आजीने सांगितलेल्या आजोबांच्या कथांवर) लक्ष जास्त आणि प्रत्यक्ष शेतात लक्ष शून्य असा प्रकारही करायला नको हो.. बाजूच्या शेतातला ज्याचे आजोबा शास्त्रज्ञ नव्हते तो शेतकरी औताला बैल लावून जितकं पीक काढतोय तितकं तरी मी काढायला हवं ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

गवि, आता भारतीय लोक पण हुशार झालेत...

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 15:51 नवीन
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका कल्पक उद्योजक शेतकर्‍याने द्राक्षापासून कृत्रिम मध तयार केला. हा मध नैसर्गिक मधाइतकाच उत्तम आहे, पण द्राक्षाचा बेस असल्याने काही वेगळ्या प्रॉपर्टीज पण आहेत. मी वर्तमानपत्रात ही बातमी वाचली. त्या शेतकर्‍याचे कौतुक केले व विसरुन गेलो. मध्यंतरी चाणक्याचे अर्थशास्त्र वाचत असताना मला त्या काळातील शेतकरी द्राक्षापासूनही मध तयार करत असत, हा संदर्भ मिळाला. आता त्या शेतकर्‍याला पेटंट घ्यायला ही नोंद महत्त्वाची नाही का ठरणार? उद्योजकतेच्या फार मोठ्या संधी आपल्याच पारंपरिक ज्ञानात दडल्या आहेत. भारतीय लोक खूप काही करत असतात. गेल्याच महिन्यात मी म्हैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फूड रिसर्चमधील एका ज्येष्ठ संशोधकाशी बोललो. त्याने भारतीयांच्या पारंपरिक खाद्य व पाककला ज्ञानावर इतका बारीक अभ्यास केला आहे, की मी थक्कच झालो. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे काही नाही. भारतात खूप काही होत असते. आपल्यापर्यंत पोचलेले नसते इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुम्ही म्हणताय ते चांगलं आणि

गवि
Mon, 04/16/2012 - 16:04 नवीन
तुम्ही म्हणताय ते चांगलं आणि खरंच आहे. मी फक्त विमाने या विषयातील मर्यादित पॉईंट धरुन बोलत होतो. जगात सगळीकडे वापरात येतील अशी उत्पादने (एअरबस, बोईंग ही विमाननक्षेत्रातली उदाहरणे) आपल्याकडे बनावीत अशा अर्थाने. पुराणकाळातली मधाची नोंद निश्चित अत्यंत उपयुक्त आहे. तिच्याविषयी हीनत्व अजिबात नाही. पण आजच्या शेतकर्‍याने त्या नोंदीवर अवलंबून न राहता सभोवतीच्या ज्ञानाने नवा मध शोधला याचं मला जास्त कौतुक असेल. मग त्याला जुना लिखित आधार मिळाला तर मधाहून गोड.. उगाचच आपल्या परंपरेशी केवळ ती जुनी आहे म्हनून नाळ तोडण्यात किंवा तिजवर थुंकण्यात आनंद बाळगणं हा अशा विचारसरणीमागचा उद्देश नाही हे स्पष्ट व्हायला हरकत नसावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मुद्गल पुराणात तर विमांनांचा

मदनबाण
Mon, 04/16/2012 - 16:05 नवीन
मुद्गल पुराणात तर विमांनांचा संदर्भ बर्‍याच वेळा वाचनात येतो... असो... सध्या इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि

रमताराम
Mon, 04/16/2012 - 16:20 नवीन
टवाळी नाही हो.. सांगून उपयोग नाही गवि. मुद्दे संपले की गुद्दे सुरू होतात. मुद्दे खोडले की कांगावा. एकदा तुम्ही टवाळी करताय असा शिक्का मारला नि आपल्या वैयक्तिक अस्मितांना बळंच भारतीय संस्कृतीशी वगैरे जोडून घेतले की अर्धी चड्डीवाली बरीच पोरेबाळे लाठ्याकाठ्या घेऊन जमा होतात. मग जमावाच्या बळावर तुम्हाला नामोहरम करणे सोपे जाते. आमचा तोच प्रश्न - तिसर्‍यांदा - 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार. आणि हे जे काही असेल ते मूलभूत वेगळे असावे अशी अपेक्षा आहे. आफ्रिकेत कुठल्याशा कंदाची मुळी उपचारार्थ वापरली जाते इथे हळद असते. त्यामुळे हळदीचा शोध एकमेवाद्वितीय वगैरे नसतो, जसा विमानाचा असतो. माणूस कधीही नैसर्गिकपणे आकाशात उडू शकत नव्हता ते विमानाने त्याला साध्य करून दिले. इतका मूलभूत नवा शोध जेव्हा भूतकाळातील पुस्तकांच्या आधारे लावला जाईल (नुसते पुष्पक विमान होते या मोघम उल्लेखापलिकडे त्याची साग्रसंगीत माहिती मिळायला हवी.) तेव्हा त्याचे स्वागत करणारा मी पहिला असेन. सध्या तरी आत्मसंतुष्टांच्या तांड्यात सामील व्हायची आपली इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आमचा तोच प्रश्न - तिसर्‍यांदा

मृत्युन्जय
Mon, 04/16/2012 - 16:31 नवीन
आमचा तोच प्रश्न - तिसर्‍यांदा - 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार. ररा तुमच्या तर्कशुद्ध विचारांचा आदर आहे. परंतु हे वाक्य थोडे आगाऊपणाचे वाटले. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात त्यामुळे या शब्द्दाबद्दल तुमची माफी देखील मागतो. परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. अतिशय पर्सनल प्रश्न विचारतो. तुम्ही काय केले आहे? तुमच्यामते आम्ही तर अगदी निरुद्योगी निरुपयोगी लोक आहोत. तुम्ही तर वेगळ्या विचारसरणीचे आहात ना? तुम्ही वेगळा शोध असा काय लावलाय? तुमचा अनादर करण्याच्या हेतुन हा प्रश्न विचारलेला नाही आहे. तर फक्त हे सांगण्यासाठी विचारला की अजुन अंधारात असलेले आणि पाश्चात्यांना न जमलेले काहितरी करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान नसणे गरजेचे नसते. अभिमान असणे कदाचित प्रोत्साहनकारक ठरु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कळले नाही

रमताराम
Mon, 04/16/2012 - 17:20 नवीन
यात आगाऊपणाचे काय आहे कळले नाही. पुट अप ऑर शटप अशा आमच्या पाश्चात्यांच्या किंवा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा तुमच्या भाषेत म्हटले आहे. परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. आमचाच मुद्दा आहे हा. काहीतरी गफलत झालेली दिसते. तुमच्यामते आम्ही तर अगदी निरुद्योगी निरुपयोगी लोक आहोत. कैच्याकै. टोकाला जायचं काय कारण? आम्ही अस्मितेचा मुद्दा नाकारलाय नि जे तो महत्त्वाचा मानताहेत त्यांना आजवर नाही तर नाही भविष्यात आपण न वापरलेले शोध वापरू शकतो का नि त्या निमित्ताने आपला मुद्दा सिद्ध करू शकतो का हा प्रश्न विचारला यात तुम्हाला निरुद्योगी नि निरुपयोगी ठरवण्याचा प्रश्न येतो कुठे. उगा त्रागा कशाला. तुम्ही तर वेगळ्या विचारसरणीचे आहात ना? तुम्ही वेगळा शोध असा काय लावलाय? काहीही नाही असे आपण गृहित धरून चालू. समजा असलाच तरी काय फरक पडतो. मी काही धागे काढून बसलो नाही, माझ्या मताच्या विरोधकांना संस्कृतीबद्दल तुच्छता बाळगणे वगैरेच्या इक्ववॅलेंट कोणत्याही शिव्या दिल्या नाहीत. इतरांनी अमूक केले नाही 'इथेच आपण मार खातो' असली इतरांनी माझ्या मताप्रमाणे वागावे अशी अगोचरपणाची अपेक्षा ठेवत नाही. माझे मत तुम्ही मान्य करा नाहीतर तुम्ही कसलेतरी द्रोही असा शिक्का मारला नाही. पाश्चात्यांना न जमलेले काहितरी करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान नसणे गरजेचे नसते. अभिमान असणे कदाचित प्रोत्साहनकारक ठरु शकेल. अगदी सहमत. पण त्याचबरोबर आपले मत न पटणार्‍यांना तुच्छतावादी न समजता त्यांचे मुद्दे समजावून घेतले तर नुसत्या प्रोत्साहनाबरोबरच आत्मसंतुष्टता दूर व्हायलाही मदत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

यात आगाऊपणाचे काय आहे कळले

मृत्युन्जय
Tue, 04/17/2012 - 10:55 नवीन
यात आगाऊपणाचे काय आहे कळले नाही. पुट अप ऑर शटप अशा आमच्या पाश्चात्यांच्या किंवा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा तुमच्या भाषेत म्हटले आहे. हॅ हॅ हॅ. मग ठीक आहे. काय आहे हिरव्या देशात गेल्यावर इथले सगळे काळे दिसायलाच लागते त्यामुळे तुमचे चालु देत. परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. आमचाच मुद्दा आहे हा. काहीतरी गफलत झालेली दिसते. हॅ हॅ हॅ. तुम्ही योग्य तो गैरसमज करुन घेतला आहे. संस्क्रूतीबद्दल गळे काढणारे म्हणजे संस्कूती शब्द उच्चारला रे उच्चारला की तो त्याज्य, अग्राह्य शब्द असल्यासारखे गळे काढणार्‍यांबद्दल बोलतो आहे मी. म्हणजे असे की भारतीय संस्कृतीने काही करुनच दाखवलेले नाही असे गळे काढणार्‍या आणि भारतात जन्मलेल्या तरी किती लोकांनी असे काही सो कॉल्ड भरीव करुन दाखवले आहे ते ऐकायला आवडेल मला. कैच्याकै. टोकाला जायचं काय कारण? आम्ही अस्मितेचा मुद्दा नाकारलाय नि जे तो महत्त्वाचा मानताहेत त्यांना आजवर नाही तर नाही भविष्यात आपण न वापरलेले शोध वापरू शकतो का नि त्या निमित्ताने आपला मुद्दा सिद्ध करू शकतो का हा प्रश्न विचारला यात तुम्हाला निरुद्योगी नि निरुपयोगी ठरवण्याचा प्रश्न येतो कुठे. उगा त्रागा कशाला. स्वतःला उपेक्षेने मारुन तरी काय डोंबलाचे शोध लावले जाणार आहेत असे आम्ही विचारतो आहे. योगप्रभूंनी दिलेले उदाहरणच घ्या. द्राक्षापासून मध बनवता येतो आणि ते प्राचीन पुस्तकात देखील लिहिले आहे. पण जर मूळात ते कोणी वाचणारच नसेल (कारण ते त्याज्य आणि निरुपयोगी आहे असे मत असणे) असे काही होउ शकते आपल्याला कळणारही नाही. अर्थात २० वर्षांनी असे शोध जेव्हा कोणी लावेल तेव्हा आपण म्हणु अर्रे अमुक तमुक पुस्तकात तर आधीच तसे लिहिलेले आहे. की मग तर झाले स्वतःला आणी संस्कृतीचा अभिमान असणार्‍या सर्वांना उपेक्षेने मारु इच्छिणार्‍या लोकांना बोंबा मारायचे अजुन एक साधन मिळणार की तुमच्या पुस्तकात लिहिले आहे म्हणुन नुसतेच म्हणता. उपयोग काय? अहो ते जे लिहिलेले आहे ते डोळसपणे वाचा. चार कल्पना मिळतील. मान्य आमच्याकडे युजर मॅन्युअल्स नाहित. हे असे होते असे वक्तव्य तर आहेत. त्या आधाराने काही करता येते का ते बघा. पण ती पुस्तके, तो विचार, त्या कल्पनाच एकदा टाकाऊ मानल्या की प्रश्नच मिटला. कायमस्वरूपी आम्ही गोर्‍यांनी बघा कसे जमवले ही स्तुती करण्यात धन्यता मानणार आणि वर सर्वज्ञपणाचा आव आणुन एतद्देशीय लोकांना सांगणार की बघा तुमची पुस्तके आणी पुराणे आणि संस्कृती कशी निरुपयोगी आहे. चंमतगच आहे. काहीही नाही असे आपण गृहित धरून चालू. समजा असलाच तरी काय फरक पडतो. असेल तर सांगा. उगाच खुप काही शोध लावल्याचा आव नको. असेल तर आम्हाला आनंदच आहे. असाही तुमच्याबद्दल आणि तुमच्या तर्कशुद्ध प्रतिसादांबद्दल आम्हाला तुमचा आदरच आहे. तो द्विगुणीत होइल. हे मी अतिशय सरळपणे बोलतो आहे. कुत्स्तितपणे नाही. मी काही धागे काढून बसलो नाही, धागे मीही काढत बसलेलो नाही आहे. पण प्रतिसाद आपन दोघेही देत आहोत. मुळात तुमचे म्हणणे काय आहे? द्गागे काढणार्‍यांना संस्कृतीचा अभिमान असण्याचा किंवा त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही इतर सर्वांना आहे. असे काय? नाही दोन्हींचा संबंध नीटसा कळला नाही म्हणून विचारतो आहे माझ्या मताच्या विरोधकांना संस्कृतीबद्दल तुच्छता बाळगणे वगैरेच्या इक्ववॅलेंट कोणत्याही शिव्या दिल्या नाहीत. त्या तुम्ही प्रतिसादातुन दिल्याच की नंतर. सुरुवात नाही केली म्हणुन काय झाले? प्रतिसादांची तीव्रता थोडी कमी आधिक एवढेच. इतरांनी अमूक केले नाही 'इथेच आपण मार खातो' असली इतरांनी माझ्या मताप्रमाणे वागावे अशी अगोचरपणाची अपेक्षा ठेवत नाही. मला वाटते हे मत प्रथम गविंनी मांडले ते तुमच्याच मताचे आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात काय? माझे मत तुम्ही मान्य करा नाहीतर तुम्ही कसलेतरी द्रोही असा शिक्का मारला नाही. असा शिक्का मारावा म्हणुन या धाग्यावर तरी तुम्हीच पहिल्यांदा प्रयत्न केला. मग लोकांना अशी चिथावणी दिल्यावर अजुन काय अपेक्षित होते तुम्हाला? अगदी सहमत. पण त्याचबरोबर आपले मत न पटणार्‍यांना तुच्छतावादी न समजता त्यांचे मुद्दे समजावून घेतले तर नुसत्या प्रोत्साहनाबरोबरच आत्मसंतुष्टता दूर व्हायलाही मदत होते. अगदी सहमत. त्यामुळेच जिथुन प्रोत्साहन घ्यायचे तिथुन ते घ्यावे जिथुन मार्ग सापडु शकेल अश्या इतर शक्यतांचाही विचार करावा. हे जर मान्य असेल तर मग प्रथम स्वतःच्या इतिहासाबद्दल स्वतःला अभिमान हा असलाच पाहिजे. त्याशिवाय हे कसे साध्य होणार? 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार. असो. आता वरील वक्तव्य औद्धत्यपुर्ण का वाटले ते सांगतो. जर अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही स्वयंघोषित संस्कृतीप्रेमी करुन दाखवु शकलेले नसले तर ते तसे स्वयंघोषित संस्कृतीद्वेष्टे तर नक्कीच करुन दाखवु शकलेले नाहित. आता जे स्वतःला जमत नाही त्यासाठी संस्कृतीला दोष देण्यात काय मतलब. त्याअतुन झालाच तर फायदाच होइल. तोटा नाही होणार. असो. माझ्यामते हा मुद्दा अजुन ताणण्यात फारसा अर्थ नाही कारण बरेच पर्सनल कमेंट्स होउ शकतील. जी माझ्याबाबत झाली तर माझी हरकत नाही. परंतु तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि विचाराने ज्येष्ठ आहात आणि तुमच्या तर्कशुद्ध विचारांबद्दल मला आदरदेखील आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल माझ्या हातुन असा अजुन काही प्रमाद घडल्यास मला नाही आवडणार. असो. काही उणेआधिक झाले असल्यास माफी मागतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

+१

रम्या
Tue, 04/17/2012 - 09:11 नवीन
रमतारामांच्या सडेतोड युक्तिवादाला सलाम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

जे कायम परकीयांच्या प्रगतीचे

मदनबाण
Mon, 04/16/2012 - 15:36 नवीन
जे कायम परकीयांच्या प्रगतीचे दाखले देऊन भारतीयांवर थुंकण्याचे काम करतात. एकदम योग्य बोललात प्रभुजी ! लंडनमधल्या म्हातार्‍या व्यक्तीने केली की ती आत्मियतेने केलेली चौकशी आणि हिंदुस्थानातील म्हातार्‍या व्यक्तीने केली की हिरवेपणा असा गळा काढणारे मंडळीही पाहिली आहेत... असो... भारतीयांवर थुंकण्याचे काम भारतीयच करतात हे आता नवीन नाही ! ही तर फॅशन आहे आपण फार विचारवंत आहोत असा आव आणणार्‍यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

प्राचीन काळातल्या आजतरी

गवि
Mon, 04/16/2012 - 15:43 नवीन
प्राचीन काळातल्या आजतरी अनुपलब्ध असणार्‍या डॉक्युमेंटचा आधार घेताघेता वर्तमानकालीन प्रगतीची कास सोडू नये इनफॅक्ट चालू ज्ञानाने तरी पाश्चात्य देशांच्या बरोबरीत रहावे किंवा पुढे जावे.. आपली परंपरा आपल्याला पुढे घेऊन जावी, तिने आपले पाय मागेच धरुन ठेवू नयेत अशा विचारसरणीला भारतीयांवर थुंकणे असा शब्दप्रयोग केल्यावर बोलणेच खुंटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गवि, शब्द खटकल्यास माफी असावी...

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 16:01 नवीन
ओक आणि वर्तकांच्या लेखनाचे उदाहरण देऊन अनेकजण भारतीय पुरातन संस्कृतीविषयी नेहमी तुच्छता व्यक्त करतात, या रागातून भावनेच्या भरात थुंकणे हा शब्द वापरला गेला. तो वैयक्तिक नव्हता. तरीही गवि मी सॉरी म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असहमत

रमताराम
Mon, 04/16/2012 - 16:11 नवीन
ओक आणि वर्तकांच्या लेखनाचे उदाहरण देऊन अनेकजण भारतीय पुरातन संस्कृतीविषयी नेहमी तुच्छता व्यक्त करतात, ओक नि वर्तक प्रभृती लोकांचे लिखाण वाचून आत्मसंतुष्ट राहणारे लोक त्यांच्या मतांची थट्टा ही भारतीय पुरातन संस्कृतीविरोधी तुच्छता आहे अशी मखलाशी करतात, तुमच्यासारखे. कारण यातून आपल्यामागे मोठा जमाव जमवता येतो. तुमच्या वांझोट्या अभिमानाच्या स्थांनांची सांगड भारतीय संस्कृतीशी घालण्याची चलाखी करू नका. आमच्यासमोर तरी चालणार नाही. डोन्ट मिक्स अ‍ॅपल्स अँड ऑरेंजेस मि, प्रभू. (आता पाश्चात्यांचे हस्तक म्हटलेच आहे तर त्यांची भाषा वापरू या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

प्रकाटाआ

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 20:20 नवीन
प्रकाटाआ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ओ विहारी कौनो गजबवा हुई गवा

मदनबाण
Mon, 04/16/2012 - 16:02 नवीन
ओ विहारी कौनो गजबवा हुई गवा का ? अरे हमार प्रतिसाद कोनो इतर मंडली के लिये था, तोहार वास्ते नाही, जिनको समझना वह तो समझ गये...देखो तो वो सुहास कौनो कारण हस रहा है... ;) गवि माझा प्रतिसाद आपल्यासाठी नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लंडनमधल्या म्हातार्‍या

सुहास..
Mon, 04/16/2012 - 15:45 नवीन
लंडनमधल्या म्हातार्‍या व्यक्तीने केली की ती आत्मियतेने केलेली चौकशी आणि हिंदुस्थानातील म्हातार्‍या व्यक्तीने केली की हिरवेपणा असा गळा काढणारे मंडळीही पाहिली आहेत... >>. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

यू टू

रमताराम
Mon, 04/16/2012 - 16:06 नवीन
प्रभूजी यू टू? नाही म्हणजे आपली तुपली मते जुळत नाहीत हे खरे. पण प्रतिवाद करण्याची ही पद्धत? टवाळी करतो आहे सबब उत्तर देणे हे आमच्यावर बंधनकारक नाही असे म्हणून शेपूट सोडवून घ्यायची? . मुळातच गृहितकावर जगणार्‍या नि इतरांनीही तसेच करावे असे मानणार्‍यांची थट्टा करण्यापलिकडे काय करता येते? अनेकदा पुरावे मागूनही दिले गेले नाहीत तर काय केवळ एका पुस्तकात लिहिले म्हणून ग्राह्य मानायचे. आणि हळद वगैरे मुद्दे आणून वडाची साल पिंपळाला का लावताय? हळद ही केवळ पुस्तकात होती म्हणून नव्हे तर आजतागायत आपण वापरत होतो म्हणूनच त्याबाबत आपण सत्यता मानली. गेलाबाजार पुस्तके वाचून का होईना एखाद्याने त्याचे पुनर्निर्माणाचे प्रयत्न का करू नये. का बोईंग कडे जावे, का मिग वाल्यांकडे जावे. करा ना तयार इथे विमाने. का करत नाहीत. संघासारख्या राष्ट्रवादी विचारांच्या संघटना नक्कीच त्यासाठी पैसा उभा करतील अयोध्येतील मंदिरासाठी जमवला तो यासाठी वापरला असता तर अधिक उपयुक्त ठरला नसता का? इथे 'शब्दप्रामाण्य' मानायला लावायचे नि अस्मितेच्या प्रश्नावर वांझोटे लढे लढवायचे हा दांभिकपणा कशाला. माझ्याच अन्य प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, 'अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना ज्ञात नसलेले असे उजेडात आणण्याचे कष्ट का घेत नाही कोणी'. तुमच्यासारखे पाच-पन्नास लोक एखादा गट स्थापन करून चिकाटीने हे काम करीत नाहीत. उगा फुका तोंडच्या नि अस्मितेच्या वाफा का दवडाव्यात. थट्टा तर करणारच. दिवसभर उगाच पारावर बसून इड्या फुकत बसलेल्या गण्या-गणपाने 'ती समुरची हवेली हाय ना त्या परिस म्होटी हवेली होती आमच्या आज्याची' म्हणत फुशारक्या का माराव्यात. आज ती दाखवू शकत नसेल वा नवी उभारू शकत नसेल तर त्याच्या बोलण्याचे मोल ते काय. नि त्याची थट्टा केल्याचा राग तरी का यावा? होती की नाही हा भूतकाळातला प्रश्न झाला. आज नि पुन्हा उभी करता येत नसेल तर तिचे अस्तित्व असून नसल्यासारखेच. उठसूठ नासाचे नाव ऐकले की ह. ह. पु. वा. होते. या फेका मारणार्‍यांना नासा नक्की काय काय करते हे समजून घेण्याची गरज आहे. रामसेतूला विरोध करताना 'नासा तिथले थोरियम ढापेल' हे ऐकून मी गार पडलो होतो. (थोरियम नि युरेनियम यांचा तुलनात्मक अभ्यास करावा असा अनाहुत सल्ला). 'संस्कृत ही कम्पूटरला योग्य भाषा आहे.' या मूर्ख विधानाला (कुणी सिद्ध केल्यास माझे विधान आनंदाने मागे घेईन) देखील नासाची साक्ष काढली जाते. अयोध्येच्या मंदिराबाबत सुद्धा. अरे नासा काय रिकामटेकडे लोक आहेत का आज भाषा नि कम्प्युटर संबंध तपासताहेत नि उद्या रामसेतू कसा दिसतोय पाहताहेत. सॅटेलाईट इमेजेस नि नासाचा घंटा काही संबंध नस्तो. नासाच्या साईट्वरील सॅटेलाईट इमेजेस - निदान पाच वर्षांपूर्वीपर्यंत - या भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटने दिलेल्याच असायच्या. (पण हा अभिमानाचा मुद्दा नसतो. अभिमानाचे मुद्दे सगळे पुराणा-कुराणात शोधायचे असतात ना.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

'संस्कृत ही कम्पूटरला योग्य

मदनबाण
Mon, 04/16/2012 - 16:16 नवीन
'संस्कृत ही कम्पूटरला योग्य भाषा आहे.' या मूर्ख विधानाला (कुणी सिद्ध केल्यास माझे विधान आनंदाने मागे घेईन) देखील नासाची साक्ष काढली जाते. उगाच गुगल बाबाशी खेळुन पाहिले... http://www.parankusa.org/SanskritAsProgramming.pdf http://www.hinduwisdom.info/Sanskrit.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मदनबाण साहेब, तुम्ही दिलेली

बॅटमॅन
Mon, 04/16/2012 - 16:52 नवीन
मदनबाण साहेब, तुम्ही दिलेली लिंक वाचली. तो पेपर बकवास आहे. जे सांगायचे ते त्याला नीट सांगता नाही आले. पण ते सोडा.संस्कृत आणि प्रोग्रामिंग यांचा काहीतरी संबंध आहे किंवा नाही? हा मुख्य मुद्दा. तर संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य ते हे की पाणिनीने तिचे व्याकरण अतिशय अचूकपणे सांगितले-कुठेही संदिग्धतेला वाव नाही. आणि प्रोग्रामिंग साठी जी भाषा लागते, तिच्यामध्ये असे गुणधर्म लागतात ही गोष्ट खरी आहे. पण त्यापलीकडे जाऊन संस्कृतवर आधारलेली प्रोग्रामिंग लँग्वेज काढणे म्हणजे काय? ही कल्पनाच संदिग्ध आहे. =, +, सॉर्टिंग इत्यादी एकदम बेसिक कल्पना तर काही बदलणार नाहीत. मग "संस्कृत" कुठून येणार त्यात? सारांश, संस्कृत भाषेचे काही असी वैशिष्ट्य नाही, की ज्यामुळे प्रोग्रामिंग साठी मराठी अथवा तमिळ पेक्षा संस्कृत वापरल्यास काही फायदा होईल. बर मग लोक जे म्हणतात त्यातले निके सत्व कोणते? तर पाणिनीचा विकी पहा. तिथे लिहिलंय: http://en.wikipedia.org/wiki/P%C4%81%E1%B9%87ini Pāṇini's grammar is the world's first formal system, developed well before the 19th century innovations of Gottlob Frege and the subsequent development of mathematical logic. In designing his grammar, Pāṇini used the method of "auxiliary symbols", in which new affixes are designated to mark syntactic categories and the control of grammatical derivations. This technique, rediscovered by the logician Emil Post, became a standard method in the design of computer programming languages.[22] Sanskritists now accept that Pāṇini's linguistic apparatus is well-described as an "applied" Post system. Considerable evidence shows ancient mastery of context-sensitive grammars, and a general ability to solve many complex problems. Frits Staal has written that "Panini is the Indian Euclid." संस्कृतचे व्याकरण लिहिताना पाणिनीने जी पद्धत वापरली, तीच पद्धत नंतर काही शास्त्रज्ञांनी वापरली (म्हणजे पुन्हा स्वत: शोधली,rediscovered by the logician Emil Post)आणि आता जगभर प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करण्यात तिचा वापर केला जातो. म्हणजे ती पद्धत शोधून काढणे हे पाणिनीचे श्रेय आहे. आणि ती पद्धत त्याने संस्कृत व्याकरणाला वापरली, म्हणून संस्कृतचे लेबल त्याला लागले. महत्व आहे ते त्या पद्धतीला, संस्कृतला नाही. समजा पाणिनी चीनी किंवा तमिळ असता, तर मग लोक म्हटले असते, की प्रोग्रामिंग साठी चीनी किंवा तमिळ भाषा योग्य आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

प्रोग्रॅमिंग महीत नाही

आनन्दा
Mon, 04/16/2012 - 18:02 नवीन
असे ऐकले आहे की "नैसर्गिक भाषा हाताळणी" साठी संस्कृत चांगली आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संस्कृत

नितिन थत्ते
Mon, 04/16/2012 - 16:46 नवीन
>>उगाच गुगल बाबाशी खेळुन पाहिले... त्याऐवजी मी मिपाशीच खेळून पाहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ररा वडाची साल तुम्हीच पिंपळाला लावताय...

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 17:00 नवीन
रमताराम, मी ओक आणि वर्तक यांच्या लेखनाचाच उल्लेख केला होता. बाकी रास्वसं/ हिंदुत्ववादी विचारसरणी यांच्याशी माझा संबंध नाही. तेव्हा भारतीय पुरातन संस्कृतीचा चिकित्सक अभ्यास करणे म्हणजे संघवाला, असले सोपे शिक्के मारणारे बरेच पोस्टमन मी बघितलेत. बाकी ते शेपूट वगैरे काय म्हणालात ते समजले नाही. मला म्हणत असाल तर मान्य करतो. नाहीतरी आमचे पूर्वज शेपूटवालेच होते. दरवेळी 'याचा उल्लेख आमच्या साहित्यात सापडतो' असा क्षीण आवाज करणार्‍यांवर एकदम पाश्चात्य विचारांची काठी घेऊन तुटून पडण्याचे कारण नाही. असले दांभिक बरेच सापडतात. त्यांनाच विचारावेसे वाटते, की दरवेळी परदेशी कंपन्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करुन दाखवण्याची हमाली करण्यापेक्षा एक तरी अभिनव उत्पादन/संशोधन करुन दाखवा. युरोपिअन ज्ञानाचा इतका एकांगी अभिमान खुद्द तेही बाळगत नसतील. गुलाम भारतीयांनी निदान युरोपीय विद्वानांच्या मांदीयाळीत तरी मानाचे स्थान मिळवून दाखवावेत. पाच पन्नास लोकांचा गट घेऊन काहीतरी करुन दाखवा, असे आव्हान तुम्ही देताय. हो. मला मंजूर आहे. फक मला स्वतंत्र गट स्थापन करण्याची गरज नाही. असे शेकडो गट भारतात याआधीच स्थापन झाले आहेत. मी त्यांच्याशी नाळ जोडेन. माझी वैचारिक बांधीलकी ओक आणि वर्तक यांच्याशी नसून माशेलकर/भटकर यांच्याशी आहे, इतके नमूद करतो. विमानांचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, की स्वतंत्र विमाने विकसित करण्यासाठी जी महाप्रचंड गुंतवणूक करावी लागते ती करण्याची भारताची क्षमता आतापर्यंत नव्हती. आजही नाही. पुन्हा अट्टहासाने ते करण्याची काही गरज नाही, असे मला वाटते. नुकतीच एका भारतीय कंपनीने अचूक मारा करणारी प्रणाली रशियन विमानांवर यशस्वी स्थापित केली आहे. अशी लहान इनोव्हेशनही सध्या पुरेशी ठरावीत. गुलामगिरीची मनोवृती आणि भ्रष्टाचार यांचा विळखा देशाला पडलेला असताना प्रगतीचा वेग मोजण्यापेक्षा काही तरी सुरु राहणे महत्त्वाचे असते. बाकी अयोध्येचे मंदिर, रामसेतू हे तुमच्या आवडीचे विषय असतील. मला त्यात रस नाही. मी केवळ उद्योजकता आणि अभिनवता याच दृष्टीकोनातून या विषयाकडे बघतो आहे. (बाकी तुमची इतर आगपाखड फालतू दर्जाची आहे. मी त्याची कवडीइतकीही दखल घेत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

प्रभू

रमताराम
Mon, 04/16/2012 - 17:34 नवीन
माझा शेवटचा प्रतिसाद. कारण तुम्ही इतके फाटे फोडत आहात की मूळ मुद्दा केव्हाच हरवून जातोय. १. मी तुम्हाला संघवाला म्हटलेले नाही संघासारखी राष्ट्रवादी संघटना यासाठी नक्की पैसा उभा करेल असे म्हटले आहे. असलीच ती ही संघाची स्तुती आहे असा आमचा तुच्छ समज आहे. २. माझ्या प्रतिसादात शेपूट हा शब्द सापडला नाही, कृपया शोधून देणे. ३. एकदम पाश्चात्य विचारांची काठी घेऊन तुटून पडण्याचे कारण नाही. 'आपल्याकडच्या' गोष्टींवर टीका करायाला पाश्चात्य काठीच लागते हा तुमचा टोकाचा विचार वाचून मौज वाटली. (जे आपले नाही ते पाश्चात्य आहे असा यातून सूर निघते ही अंमळ गम्मत तुमच्या लक्षात येते का?) ही पुन्हा दुसरी सोयीची मखलाशी. एकदा आम्ही पाश्चात्य विचाराचे म्हटलो की त्यांचे दोष आमच्या माथी मारता येतात. किती अपलाप कराल. जरा फापटपसारा वाढवून गोंधळ वाढवण्यापरिस आम्ही मांडल्या मुद्द्यावरच चर्चा कराल तर बरं होईल. बादवे, सांख्य, चार्वाक बौद्ध, जैन हे सारे भारतीयच होते त्यांनीही भारतातील अनेक चालीरीती वगैरेंवर टीका केल्या आहेत. हे सारे पाश्चात्य विचारांचे होते काय हो? (तस्मात त्रागा सोडा नि मुद्याला धरा) असे शेकडो गट भारतात याआधीच स्थापन झाले आहेत. मी त्यांच्याशी नाळ जोडेन. असे असेल तर स्वागतार्हच आहे, पुन्हा हेच सांगेन हवेतल्या गप्पा मारण्यापेक्षा अधिक माहिती द्या. विमानाचे उत्पादन हा माझा मुद्दा कधी होता. ती 'एक' निर्मिती आहे. माझा मुद्दा आजवर न निर्माण झालेल्या नि आपल्या ग्रंथात, इतिहासात असलेल्या 'पण' पाश्चात्यांना आजवर निर्माण करता न आलेल्या गोष्टींबद्दलचा होता. इथे विमानांच्या उत्पादनाचा प्रश्न कुठे आला. (बाकी तुमची इतर आगपाखड फालतू दर्जाची आहे. मी त्याची कवडीइतकीही दखल घेत नाही) धन्यवाद. याला आम्ही चोराच्या उलट्या बोंबा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

हे बघा तुमचे वाक्य

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 20:17 नवीन
(हे बघा तुमचे वाक्य.) <<प्रभूजी यू टू? नाही म्हणजे आपली तुपली मते जुळत नाहीत हे खरे. पण प्रतिवाद करण्याची ही पद्धत? टवाळी करतो आहे सबब उत्तर देणे हे आमच्यावर बंधनकारक नाही असे म्हणून शेपूट सोडवून घ्यायची?>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हे राम

रमताराम
Mon, 04/16/2012 - 22:19 नवीन
अहो हा वाक्प्रचार आहे हो. म्हटले आम्ही तुम्हाला शेपूट कधी लावली. बरं तुमचं म्हणणं बरोबर. प्रभूजी आता पुरे हां. नायतर खरंच लठ्ठालठ्ठी व्हायची राव आपली. जौ द्या. ते विमान आणि काय ते नेऊन घाला की हो तिकडे .... काय तरी चांगलं गाण्यागिण्याचं बोला की हो. -रमतारावसाहेब उर्फ रमराव हरिहर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

हे बरं आहे देवा..

योगप्रभू
Tue, 04/17/2012 - 11:32 नवीन
हळूहळू विमानांकडून रावणाची नाचगाणी, वैभव, सुंदर राक्षशिणी अशा विंटरेश्टिंग विषयांकडे वळणार होतो तेवढ्यात रमतारामाचा हल्ला झाला लंकेवर. हनुमान दोन बायकांचा नवरा होता आणि त्याला एक मुलगाही होता, ही नवलकथा ऐकलीय का? रावणाच्या अद्याप लपवलेल्या मृत शरीर आणि अफाट खजिन्याबद्दल ऐकलंय का? लय मज्जा हायेत आमच्या पुराण आन् महाकाव्यांमधी. भन्नाट टीपी व्हतुया बगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

माशेलकर व भटकर

जयंत कुलकर्णी
Mon, 04/16/2012 - 19:21 नवीन
प्रभुजी, मी अत्यंत साधेपणाने विचारतोय - १ श्री माशेलकर यांचे संशोधनातील कार्य काय...म्हणजे त्यांनी किती पेटंट्स मिळवली आहेत व त्यांना सगळ्यात महत्वाचे असे कुठले (नोबेल सारखे) मिळवले आहे का ? पेटंट बरेच जण मिळवतात त्यात मला विशेष रस नाही. काही मोठा शोध वैगेरे लावला आहे का ? २ श्री भटकरांनी अमेरिकेने सूपर काँप्युटर नाकारला म्हणून त्यांनी येथे तयार केला अशी बरीच टिमकी वाजवली गेली. असे जर असेल तर ही मशिन्स भारतात कोठे कोठे बसविली आहेत ? त्याचे जगातील इतर मशीन बरोबर Benchmarking झाले आहे का ? CDAC मधे जर एवढे महत्वाचे संशोधन झाले होते तर ते मधेच थांबवून तेथे भारतीय भाषांचे फाँटस असे फालतू काम का चालू झाले.... मला दुसर्‍या मुद्द्याबद्दल बर्‍याच शंका आहेत. कोणी प्रकाश टाकतील तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

जयंत मी वैचारिक बांधीलकी म्हटलो...

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 20:16 नवीन
जयंत, मी वैचारिक बांधीलकी म्हटलो आणि त्याचा अर्थ इतकाच, की सार्वजनिक जीवनात या व्यक्ती जे विचार मांडत आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. ओक आणि वर्तक यांच्या तुलनेत ही बांधीलकी स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे 'पोपचे निवासस्थान हे पूर्वीचे श्रीस्थान (सिस्टाईन चॅपेल) होते.' किंवा 'मी स्वप्नावस्थेत मंगळावर सूक्ष्मदेहाने विहार करुन आलो' असल्या दाव्यांपेक्षा मला भारतीय तरुणांनी आपल्या पारंपरिक ज्ञानसाठ्याचा शोध घेऊन समाजाभिमुख अभिनव उत्पादने विकसित करावीत, हा विचार जास्त महत्त्वाचा वाटतो. आपले प्रश्न आपण त्याच प्रभृतींना विचारावेत व शंकानिरसन करुन घ्यावे, ही विनंती. माशेलकरांनी कुठले पेटंट मिळवले आहे किंवा माईलस्टोन रिसर्च केले आहे हा प्रश्न मला 'अण्णा हजारेंनी कधी निवडणूक लढवली आहे, त्यांना संसदीय प्रणालीचा काय अनुभव?' यासारखा वाटतो. अशा प्रश्नांची थेट उत्तरे मला मिळवावीशी वाटत नाहीत. 'पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा' ही तरुणांची अपेक्षा ते पूर्ण करत आहेत. बस्स. पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मला फक्त कोणाला माहिती पाहिजे

जयंत कुलकर्णी
Mon, 04/16/2012 - 21:27 नवीन
मला फक्त कोणाला माहिती पाहिजे असल्यास पाहिजे होती. अर्थात अण्णांची आणि त्यांची तुलना चुकिची आहे हे जाताना नमूद करतो. असो ही माहिती मला का पाहिजे आहे हेही जाता जाता नमूद करतो. या दोन लोकांच्या कार्यामुळेच त्यांच्या विचारांशी बांधिलकीचा प्रश्न सामान्यजनात उद्भवतो. त्यामुळे त्यांचे कार्य काय हा प्रश्न मनात उभा राहिला म्हणून विचारला. सरळ सरळ साधा प्रश्न. त्यातून कृपया कसलाही अर्थ काढू नये. यासाठी मी एक वेगळा धागा काढीन. आपल्या प्रतिसादात यांचे नाव वाचले म्हणून वाटले की आपाल्याला काही माहीत असेल. तुमचा प्रतिसाद ठीक वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

माशेलकर

विकास
Tue, 04/17/2012 - 23:59 नवीन
केवळ वरील प्रतिसादात विचारलेली माहिती म्हणून माशेलकरांच्या संदर्भातील खालील प्रतिसाद वाचावा. यातून पुर्वीच्या काळात विमाने होती अथवा नव्हती असे काहीच सिद्ध करण्याचा या प्रतिसादाचा उद्देश नाही. ;) श्री माशेलकर यांचे संशोधनातील कार्य काय... माशेलकरांची पब्लीकेशन्स आणि त्याचे कितीवेळेस सायटेशन केले गेले आहे, याचा अंदाज येथे येऊ शकतो. म्हणजे त्यांनी किती पेटंट्स मिळवली आहेत विकीवरील माहितीप्रमाणे, ‘Managing Intellectual Property’ च्या २००३ - २००५ च्या जागतीक सर्वेक्षणानुसार माशेलकर हे पेटंटक्षेत्रातील जगातील पन्नास दिग्गजांपैकी एक आहेत. त्यांनी भारतात या संदर्भात सरकारपासून औद्योगिक क्षेत्रात जागृती आणली. भारतातील (आणि तेच इतरत्रही) अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीचे पेटंट करण्याचा घाट आंतर्राष्ट्रीय कंपन्यांनी घातला होता/ आहे. त्यातील भारतासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या घटना म्हणजे हळद आणि बासमती... या दोन्हींच्या संदर्भात त्यांच्या नेतॄत्वाखाली युएस (सरकारी) पेटंट संस्थेत आणि आंतर्राष्ट्रीय पेटंट संस्थेत त्यांनी लढत दिली. परीणामी हळद आणि बासमती वाचलेच पण नैसर्गिक साधन संपत्तीचे पेटंट कसे करावे आणि नाही करावे या संदर्भात नवीन धोरणे तयर झाली, ज्याची मदत इतर विकसनशील राष्ट्रांनाही झाली. पेटंट देताना अधिकारी आधी ते ज्ञान उपलब्ध माझ्या लेखी त्यांनी हे काम अ‍ॅक्टीविझम/चळवळेपणा करण्याऐवजी, सध्याच्या नितीनियमांनुसार केले. सरस्वती आणि लक्ष्मी या एकत्र नांदायला हव्यात, थोडक्यात इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचे रक्षण होऊन त्यातून वैभव निर्मिती होयला हवी असे काहीसे त्यांचे मत होते/आहे, जे त्यांनी त्यांच्या मर्यादीत क्षमतेत उद्योग आणि सरकारमधे जागृत केले आहे असे वाटते. त्यांना सगळ्यात महत्वाचे असे कुठले (नोबेल सारखे) मिळवले आहे का ? आपल्याला त्यांना पारीतोषिक मिळाले आहे का असे विचारायचे असावे. नोबेल मिळाले म्हणजेच फक्त उत्तम असे आपले म्हणणे नसावे असे गृहीत धरतो. टाटा मोटर्सचे डायरेक्टर म्हणून फोर्ब्स मधे दिलेल्या माहितीनुसारः Dr. R A Mashelkar: Dr. Mashelkar is an eminent chemical engineering scientist and has retired from the post of director general from the Council of Scientific & Industrial Research. Dr. Mashelkar is the President of the Indian National Science Academy, National Innovation Foundation, Institution of Chemical Engineers, UK and Global Research Alliance, a network of 60,000 scientists from five continents and has been honoured with honorary doctorates from 26 universities, including Universities of London, Salford, Pretoria, Wisconsin and Delhi. Dr. Mashelkar has also been elected as Fellow/Associate of Royal Society, London, National Academy of Science, USA, US National Academy of Engineering, Royal Academy of Engineering, U.K. and World Academy of Art & Science, USA. Dr. Mashelkar has won over 50 awardsand medals at national and international levels, including the JRD Tata Corporate Leadership Award and the Stars of Asia Award (2005). Dr. Mashelkar through leadership of various organizations/ Government Committees has propagated innovation and intellectual property rights and India?s science and technology policies. He is a Padmashri (1991) and Padmabhushan (2000) winner, and also a winner of the ?Punyabhushan Award? in 2008. He was appointed as a Director of the Company on August 28, 2007. He is also on the board of directors of various multinational companies, including Hindustan Unilever Limited, Reliance Industries Limited, Piramal Life Sciences Limited, KPIT Cummins Infosystems Limited and ICICI Knowledge Park. यात नसलेल्या पण विकीवरील माहितीप्रमाणे त्यांना भारतापुरते वैज्ञानिकांमध्ये प्रतिष्ठीत मानले गेलेले शांतीस्वरूप भटनागर पारितोषिकही मिळालेले आहे. त्या व्यतिरीक्तः Pandit Jawaharlal Nehru Technology Award (1991), G.D. Birla Scientific Research Award (1993), Material Scientist of Year Award (2000), IMC Juran Quality Medal (2002), HRD Excellence Award (2002), Lal Bahadur Shastri National Award for Excellence in Public Administration and Management Sciences (2002), World Federation of Engineering Organizations (WFEO) Medal of Engineering Excellence by WFEO, Paris (2003), Lifetime Achievement Award by Indian Science Congress (2004), the Science medal by the Academy of Science for the Developing World (2005), Ashutosh Mookherjee Memorial Award by Indian Science Congress (2005), etc.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

माहितीसाठी धन्यवाद. अशीच काही

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 04/19/2012 - 06:52 नवीन
माहितीसाठी धन्यवाद. अशीच काही भटकरांविषयी आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कल्पना नाही...

विकास
गुरुवार, 04/19/2012 - 19:22 नवीन
अशीच काही भटकरांविषयी आहे का ? त्यांचे विकीपान दिसले. जालावर अजून नक्की असेल. शोधा म्हणजे सापडेल. :-) माशेलकरांबद्दल आधी ऐकलेले होते म्हणून देऊ शकलो. श्री भटकरांनी अमेरिकेने सूपर काँप्युटर नाकारला म्हणून त्यांनी येथे तयार केला अशी बरीच टिमकी वाजवली गेली. ती टिमकी नाही तर वास्तव इतिहास आहे. (वास्तव रामायण नाही ;) ) रेगन आणि पहील्या बूशच्या काळात भारत-अमेरीका संबंध रसातळाला होते असे मला वाटते. त्याचे कारण अर्थातच शीतयुद्ध आणि आपले कम्युनिस्ट रशियाशी असलेली जवळीक आणि अमेरीकेशी असलेला दुरावा. सुपरकाँप्यूटर हे जसे विकासकामासाठी वापरले जाऊ शकतात तसेच अण्वस्त्रांसाठी देखील. म्हणून तत्कालीन बूशसरकारने ते आपल्याला देण्यापासून अमेरीकन "क्रे सुपरकाँप्यूटर" कंपनीस अटकाव केला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ते मनावर घेतले आणि प्रथम हजारो कोटी रुपयांची सरकारी गुंतवणूक केली. त्याचाच एक भाग म्हणून सीडॅ़कची स्थापना झाली आणि त्याचे पहीले नेतृत्व हे भाटकरांकडे सोपवले. पुढचा इतिहास आहे. भारत त्यावेळेस स्वतःचे सुपरकाँप्यूटर्स असलेला जगातील तिसरा देश होता (अमेरिका आणि जपान हे उर्वरीत दोन). भारताने त्यावेळेस इतर प्रगत देशांकडून ऑर्डर्सपण मिळवल्या. मात्र असले प्रकल्प हे सरकारी अनुदानावर चालतात. दुर्दैवाने आत्तापर्यंत सर्वच सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या मागे असलेला चीन पुढे गेला... अर्थातच सरकारी संस्थेचे संचालक म्हणून (अजून आहेत का माहीत नाही) भाटकरांना आणि त्या संस्थेस सरकारच्या ध्येयधोरणाशी संलग्न असलेले प्रकल्प राबवणे भाग होते. सरकारच्या दृष्टीने (आणि आजकाल अनेक मोठ्या खाजगी कंपन्या देखील असेच म्हणतात पण धंदा म्हणून!) ग्रामिण जनतेसाठी आयसीटी अर्थात "इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी" चा पुरस्कार महत्वाचा होता. काही अंशी त्याचे फायदे देखील पहात आहोत. त्या अनुषंगाने त्यांनी भारतीय भाषांचे फाँट्स आणि "Education to Home Mission" चालू केले. ते जेंव्हा चालू केले तेंव्हा जालावर देवनागिरी अथवा इतर भारतीय भाषांचे फाँट्स सहज उपलब्ध नव्हते. पण नंतर सगळेच सहज उपलब्ध झाले आणि त्या प्रकल्पाचे ते महत्व राहीले नाही. आता काय चालू आहे मला तरी माहीत नाही. हे काही भाटकर अथवा आधी माशेलकरांच्या बचावात अथवा स्तुतीपर लिहायच्या उद्देशाने लिहीलेले नाही. मी कुणाचाच व्यक्तीपूजक नाही. पण भाटकर-माशेलकरच नाही तर जे अशी कामे करतात त्यांचे कुठलेच काम कमी महत्वाचे नसते. विशेष करून ज्यानी देशाच्या विकासास दिशा आणि गती मिळते... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

१८९५ ला शिवंकर बापूजी तळपदे

बॅटमॅन
Mon, 04/16/2012 - 15:31 नवीन
१८९५ ला शिवंकर बापूजी तळपदे यांनी मरुत्सखा नावाचे मानवरहित विमान उडवले. http://articles.timesofindia.indiatimes.com/2004-10-18/mumbai/27162445_1_plane-wright-brothers-air-शोव आता हे विमान आत्ताच्या अर्थाने विमान होते की नव्हते? हा वेगळा मुद्दा आहे. किमानपक्षी काहीतरी झाले होते हे नक्की. लोकांचा दावा असतो की "वैमानिक शास्त्र" नामक ग्रंथाच्या आधारे प्राचीन भारतातील विमानाचे अस्तित्व सिद्ध होते. पण तो ग्रंथ कुठे मिळेल? त्यासंबंधी नेटवर शोध शोध शोधले, पण ज्या लिंक्स मिळतात, त्यामध्ये ४-५ आकृत्या आणि "वैमानिक शास्त्रात असे असे लिहिले आहे" यापलीकडे घंटा काही मिळत नाही. आय आय एस सी च्या काही लोकांनी एक पेपर त्यावर पब्लिश केलाय, तो इथे पहा. http://cgpl.iisc.ernet.in/site/Portals/0/Publications/ReferedJournal/ACriticalStudyOfTheWorkVaimanikaShastra.pdf नाशिकला विविध पोथ्यांचा डिजिटाइझ्ड संग्रह बाळगणारे श्री. दिनेश वैद्य यांना मी याबद्दल विचारले तर ते म्हणाले की बडोद्यातील सयाजी युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये त्या ग्रंथाची हस्तलिखित पोथी आहे आणि ती मिळवण्याचा ते प्रयत्न करताहेत. काही दिवसांनी माझा एक मित्र नाशिकला गेला असताना त्यांना भेटण्याबाबत मी त्याला सांगितले. तो भेटला, त्यांच्याकडे त्यावेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हस्तलिखित डिजिटाइझ्ड रूपात होते, पण मित्राला काही ते बघता आले नाही. दिनेश वैद्य यांच्याशी मी आधी फोनवर बोललो आहे आणि मला माणूस प्रामाणिक वाटला. त्यांच्याबद्दलची बातमी इथे पहा. कुणाला कुतूहल असल्यास त्यांचा मोबाइल नंबर देखील आहे तिथे. http://www.thinkmaharashtra.com/index.php?option=com_content&view=article&id=442:2011-04-29-03-48-10&catid=39:2010-01-04-08-20-32&Itemid=192 आता त्या पेपरच्या संदर्भाग्रंथांत दिल्लीच्या एका प्रकाशकाने वैमानिक शास्त्र प्रकाशित केले आहे असे दिसते. ते पहिले पाहिजे. मूळ पोथीवर भर देण्याचे कारण म्हणजे त्यामुळे हा प्रकार किती जुना आहे त्याची थोडी तरी कल्पना येईल. बाकी त्या पेपर मध्ये जे २-४ श्लोक दिलेत, त्यावरून वाटते की लेखकाला विमान या प्रकारची थोडी कल्पना असू शकते. विमान ज्या तत्वावर चालते, त्याची चर्चा ग्रंथाचा आधार देऊन अतिशय त्रोटकपणे केली आहे. त्यामुळे नक्की काहीच सांगता येत नाही. आता गविंसारखे लोक इथे असताना मी विमानाबद्दल काय बोलणार? पण हे आग्रहाने सांगावेसे वाटते की लोकांचे दावे ज्या ग्रंथावर आधारलेले असतात, त्या ग्रंथाचा अभ्यास करूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी केले पाहिजे म्हणजे या विषयाचा एकदा काय तो कंडका पडेल. थोडक्यात: १. वैमानिक शास्त्र या ग्रंथाची मूळ संहिता म्हणजे पोथी किंवा गेलाबाजार इंग्रजी भाषांतर मिळविणे. २. त्या आधारे नेमके काय लिहिले आहे आणि ते विमान तयार करण्यासाठी/उडवण्यासाठी लागणाऱ्या सध्याचा आपल्या ज्ञानाच्या तुलनेत ते कसे आहे? लिखाण किती अंशी सूचक आणि किती अंशी डायरेक्ट? सूचक लिखाणाला फारशी किंमत देऊ नये या मताचा मी आहे. काही अंशी तरी का होईना डायरेक्टपणा पाहिजेच. ३. केसरीच्या कार्यालयात जाऊन तळपद्यांची बातमी नेमकी काय होती ते पाहणे. हे केले पाहिजे. १ आणि २ सोडले तरी ३ करण्यासारखे आहे. जमल्यास मीच करेन ते कधीतरी. असो.
  • Log in or register to post comments

पण हे आग्रहाने सांगावेसे

गवि
Mon, 04/16/2012 - 15:39 नवीन
पण हे आग्रहाने सांगावेसे वाटते की लोकांचे दावे ज्या ग्रंथावर आधारलेले असतात, त्या ग्रंथाचा अभ्यास करूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी केले पाहिजे म्हणजे या विषयाचा एकदा काय तो कंडका पडेल. तुमचा प्रतिसाद आणि विचारपद्धती अत्यंत योग्य आहे. मी जे म्हटलंय त्यात छद्म लगेच दिसेल पण तुम्ही संयत शब्दात ते म्हणून योग्य मुद्दा पुढे आणला आहे. यात एकच अ‍ॅडिशन अशी, की ते ग्रंथ १. मिळून २. त्यानुसार प्रयोग करुन ३. उडणारं विमान किंवा तत्सम ब्रेकथ्रू मिळेपर्यंत, चालू ज्ञान वापरुन किमान जगाच्या लेव्हलला रहावे. तळपदे प्रयोग करुन गेले त्यानंतर सव्वाशे वर्षांत राईटच्या कापडी/लाकडी फ्लायरपासून सुपरसॉनिक जेट्सपर्यंत प्रगती झाली.. एअरबस ३८० आली.. आपण भारतीयांनी याच सव्वाशे वर्षात जी विमानं देशात आणली ती सर्व आयात केलेली किंवा इंजिन आणि बॉडी असे महत्वाचे भाग आयात करुन इथे फक्त जोडलेली.. हे कसं विसरायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जे ब्बात

रमताराम
Mon, 04/16/2012 - 17:42 नवीन
ये हुई ना कुछ बात. फेसबुकावर फुकाचे फकाणे फेकण्यापरिस हे केले तर काही महत्त्वपूर्ण हाती येईल नि नवे निर्माणही होईल आणि आमच्यासारख्या चिंतातुर जंतूंनादेखील जमावाचा भाग होण्याचे भाग्य लाभेल. उगा खातापिता अस्मितेचे ढेकर देऊन काय साधणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आणि ग्रंथोपजीविये...

Nile
Tue, 04/17/2012 - 04:32 नवीन
यांत्रिकी शोंधाचा एकंदरीतच इतिहास मनोरंजक असतो. शोध कसे लागतात, इतर क्षेत्रातल्या शोधांचा उपयोग करून एखाद्या क्षेत्रास प्रगती कशी होते हे पाहिल्यास या प्रकारच्या दाव्यांचा पोकळपणा नीट दिसून येतो. विमानाच्या शोधाला आय सी इंजीनच्या शोधामुळे महत्त्वाचा फायदा झाला. त्या आधी विमानांच्या मानाने इंजिनचे वजन फार असल्याने विमान उडवण्यात फारसे कोणी यशस्वी झाले नाही. आय सी इंजीनचा शोधही एका रात्रीत लागला नाही. अनेक वर्षे अनेक लोकांनी प्रयोग केले, थर्मोडायनॅमिक्सचे अद्द्ययावत ज्ञान आणी कुशलतेने काम करणारी मशिने (ड्रील्स इ.) अशा अनेक कारणांमुळे हलके आणि इफिशीयंट इंजिन बनवणे शक्य झाले. ह्याच इंजिनचा वापर करून सुरुवातीची विमानं उडवण्यात यश आलं. पुढे विमानांसाठी खास बदल करून नविन इंजिने बनवली गेली त्यामुळे इंजिनांची कार्यक्षमता वाढली. त्याच बरोबर धातूंवर संशोधन होऊन नवनविन 'अलॉय' बनवीले गेले आणि विमानाचे 'डेड-वेट' कमी करण्यात यशं आलं. भारतात अशा प्रकारचं विमान बनलं असेल तर त्याला पुरक असे इतर कोणते संशोधनही दिसले असते. अयशस्वी प्रयोगांचे दाखले दिसले असते. वगैरे. त्यामुळे भारतात अशा प्रकारे विमान बनवलं गेलं यावर माझातरी विश्वास नाही. तरीही कोणी ते दावे सप्रमाण देणार असेल तर वाचायला आवडेल. जगात इतक्या काँस्पीरसी थेरीज आहेत की प्रत्येकांची सत्यता पडताळण्यासाठी त्यांचे ग्रंथ शोधा, ग्रंथाची सत्यता पडताळा इ. गोष्टी करणं अव्यवहारीक आहे. पण कोणी असं करणार असेल तर त्याला शुभेच्छा आणि काय होईल हे जाणण्याची उत्सुकता दाखवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आज हा एक लेख वाचनात आला.

राघव
Tue, 07/26/2022 - 23:39 नवीन
आज हा एक लेख वाचनात आला. यातले संदर्भ एका पुरातन ग्रंथावर भाष्य करतात. https://epaper.tarunbharat.net/article.php?mid=Asmpage_2022-07-24_a8638be071c1b9b49ff1e8ea0ebf6fa962dce757bfc31&JSON आता यासाठी कोणती यंत्रे वापरली असतील ते ग्रंथ वाचल्यावरच समजेल बहुदा. पण एक इंटरेस्टींग रीड म्हणायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

रोचक आहे

धर्मराजमुटके
Wed, 07/27/2022 - 13:47 नवीन
लेख वाचला. रोचक आहे. तथ्य तपासायला तो ग्रंथ प्रत्यक्ष (सुर्यसिद्धांत) वाचला पाहिजे आणि मुख्य म्हणजे संस्कृत चा चांगला अभ्यास हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

गवि, तुमच्याशी १००% सहमत.

बॅटमॅन
Mon, 04/16/2012 - 15:56 नवीन
गवि, तुमच्याशी १००% सहमत. इतिहासाची वर्तमानाशी गल्लत कधीच करता कामा नये हे तर नक्कीच. लोक म्हणतात त्याप्रमाणे प्राचीन भारतात विमान जरी असले तरी सध्या आपली अवस्था खराब आहे हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे तूर्तास चांगल्या गोष्टींची आयात करणे हे मस्ट, पण सोबत उकराउकरी सुरु ठेवावी , म्हणजे काय होते ते तरी कळेल. इतिहासाबद्दल उत्सुकता आणि वर्तमानाबद्दल सजगता या गोष्टी सेम नसल्या तरी परस्परपूरक देखील असू शकतात, योगप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे. बस इतकेच :)
  • Log in or register to post comments

बहुधा

आनन्दा
Mon, 04/16/2012 - 17:55 नवीन
कागद लवकर खराब होतो.. कातडे त्या मानाने बरेच दिवस टिकते नाहि का?
  • Log in or register to post comments

लहानपणी वाचलेली गोष्ट आठवली

अवतार
Mon, 04/16/2012 - 23:29 नवीन
अकबर -------- बिरबल ---------------
  • Log in or register to post comments

त्याआधी...

हुप्प्या
Tue, 04/17/2012 - 01:38 नवीन
राम हा खरोखरीच एक राजा होऊन गेला का तो एक काल्पनिक व्यक्ती होता? वाल्मिकीच्या प्रतिभेतून जन्मलेला? खरोखर असेल तर त्याच्या काळातील नाणी, शिलालेख, गाडगी-मडकी, दागिने, मणी असे काही अवशेष का सापडले नाहीत? निव्वळ लेखी वा तोंडी पुरावे का खरे मानायचे? डायनॉसॉर वगैरे जीवाष्म जे (बहुधा) रामापेक्षा प्राचीन आहेत, अशांचे अवशेष मिळाले आहेत. त्यावरुन त्यांचा अभ्यास झाला आहे. मग रामायण महाभारताचे घोडे कुठे पेंड खाते आहे? नाही म्हणायला पाण्याखाली द्वारका सापडली आहे असे वाचले आहे पण त्यावर उत्खनन्, संशोधन झाल्याचे ऐकिवात नाही. लंका, रामसेतु, दंडकारण्य, पंचवटी ह्या जागा खर्‍या आहेत. पण वाल्मिकीने खर्‍या जागांवर आधारित ही काल्पनिक गोष्ट कशावरुन लिहिली नसेल? दा विन्ची कोड ह्या काल्पनिक गोष्टीत खर्‍याखुर्‍या जागा उल्लेखिलेल्या आहेत म्हणून ती गोष्ट खरी होत नाही. ज्यूल्स व्हर्नने पाणबुडी, रॉकेट, अंतराळप्रवास ह्या गोष्टींबद्दल त्यांचा प्रत्यक्ष शोध लागायच्या आधीच लिहिले आहे. म्हणून ज्यूल्स व्हर्नच्या काळात हे सगळे होतेच असे म्हणत नाही. प्राचीन काळात भारतात विमाने उडत होती असे खरोखरच सिद्ध झाले तर मला आनंदच होईल, अभिमानही वाटेल पण पुराव्याअभावी आज तरी तसे म्हणवत नाही.
  • Log in or register to post comments

पीक वर्तूळ (Crop Circles) या

पाषाणभेद
Tue, 04/17/2012 - 03:08 नवीन
पीक वर्तूळ (Crop Circles) या बाबत काय म्हणता येईल?
  • Log in or register to post comments

शतकासाठी फक्त....! म्या काय

प्यारे१
Tue, 04/17/2012 - 10:30 नवीन
शतकासाठी फक्त....! म्या काय ह्यो धागा वाचत नाय, वाचनार बी न्हाय!
  • Log in or register to post comments

शेवटी काय ठरले? त्या नाझ्का

कवितानागेश
Tue, 04/17/2012 - 11:47 नवीन
शेवटी काय ठरले? त्या नाझ्का लाईन्स कुणी मारल्या म्हणे?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा