Skip to main content

पौराणिक विमाने

लेखक आनन्दा यांनी शनिवार, 14/04/2012 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. "पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी... http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/… अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे. प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे... https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय? http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm ही म्हणे धावपट्टी असावी http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!

वाचने 79684
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

पण मला मुळात कळत नाही की जर आपला इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काय चूक आहे.
सहमत .. इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण ज्या शोधांचे पुरावे वा तत्वतः पटणारे विवेचनही देवू शकत नाही त्या गोष्टी कपोलकल्पितच मानायला हव्या. विमान होते म्हंटल्यावर, ते कसे उडायचे ? त्याचे तंत्रज्ञान नेमके कसे होते, इंधन कोणते वापरले जायचे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रामायण व महाभारतापुरतं म्हणायचं तर या कथांना अधिकृतपणे फक्त महाकाव्य म्हंटलेले आहे, इतिहास नव्हे. ( संदर्भ : मराठी विश्वकोष) तसेच रामसेतू बद्दलही : (संदर्भ ) रामाचा सेतू : भारत–श्रीलंका यांदरम्यानच्या सागर भागातील ३० किमी. लांबीची प्रवाळ खडकांची रांग. तिलाच ॲडम्स ब्रिज (आदमचा पूल) किंवा सेतुबंध असेही म्हणतात. भारताच्या आग्नेय किनाऱ्यावरील रामेश्वरम् (पांबन) बेट व श्रीलंकेतील मानार बेट यांना जोडणारी ही खडकांची रांग काही ठिकाणी तुटलेली आहे. रामायणातील युद्धकांडात वर्णन केलेला, लंकेवर स्वारी करण्यासाठी नल वानराकरवी रामाने व वानरसेनेने बांधलेला सेतू तो हाच, असे मानले जाते. यावरूनच रामाने लंकेत प्रवेश करून रावणाचा पराभव केला व सीतेची सुटका केली, अशी कथा आहे. भूवैज्ञानिक अभ्यासानुसार मात्र रामाचा सेतू ही खडकांची रांग म्हणजे प्रवाळांपासून तयार झालेली प्रवाळशैलभित्ती आहे बाकी अभिमान बाळगण्याबद्दल - -: अनेक गोष्टी आहेत - स्थापत्यशास्त्राचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत (कोणार्कचे वा इतर अनेक भव्य मंदिरे, अंजिठा सारख्या लेणी , विविध स्तुप, ताजमहालसारख्या वास्तु). मोहंजोदडो आता पाकिस्तानात असले तरी ते भारतातील सिंधू संस्कृतीचा भाग होते. तिथली आधुनिक नगररचना (रस्ते, सांडपाण्याचा निचरा ई) अतिशय अभिमानास्पद नाहीत का ? भारतीयांच्या धातुविज्ञानाचा पुरावा असणारे अशोक स्तंभ अभिमानास्पद आहे. याशिवाय शुन्याची संकल्पना, दशमान पध्दती ई अनेक अभिमानास्पद गोष्टी असताना विमानाच्या विनोदाचा अट्टहास कशाला ?

In reply to by तर्कवादी

पु्ण्यात डॉ. सुरेश विश्वनाथ भावे नावाचे वैद्यकीय व्यवसाय असलेले एक संशोधक होते. त्यांचे स्वत:चे एक लहान विमान होते. त्यातून पौराणिक, ऐतिहासिक वर्णनांची पडताळणी करण्याचा प्रयत्न करायचे. आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदासाने लिहिलेल्या संस्कृत प्रहसनात अशी कल्पना केली आहे की कालिदास पत्नीपासून दूर रामटेकेमध्ये असतो व पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन आषाढ मासारंभी नागपूरपासून मध्यप्रदेशकडे चाललेल्या एका मेघासोबत तो पत्नीसाठी निरोप पाठवितो. तो मेघ ज्या ज्या प्रदेशांवरून जातो त्या प्रदेशांचे विहंगम वर्णन कालिदासाने केले आहे. याचा पडताळा घेण्यासाठी एक दिवस डॉ. भावे आषाढ मासारंभी स्वतः आपल्या विमानात बसून त्या भूप्रदेशावरून गेले व कालिदासाने वर्णन हकेलेले बहुतांशी भूप्रदेश वर्णनाप्रमाणे दिसतात असे त्यांना आढळले. श्रीरामसेतूवर सुद्धा त्यांनी बरेच संशोधन केले, नासाची त्या भागाची छायाचित्रे पाहिली, स्वतःच्या विमानातून त्या भागावर उड्डाण करून सेतू कोठे असावा हे समुद्राच्या पाण्याच्या रंगात पडलेल्या फरकावरून नक्की केले. एक दिवस ते स्वतः एका नावेतून समुद्रात सेतूपर्यंत पोहोचले. त्यांचा एक सहाय्यक वरून विमानातून त्यांना मार्गदर्शन करीत होता. शेवटी श्रीरामसेतू तेथे आहे असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सावधगिरी बाळगून नावाड्याच्या मदतीने ते समुद्रात पाण्यात उतरले. त्यांना अक्षरशः चार साडेचार फुटांवर पायाला खडकासारखा आधार मिळाला. त्यावर ते उभे राहिल्यानंतर ते छातीपर्यंत बुडले होते परंतु पायाखाली एखादी भिंत किंवा खडकांची सलग रांग असल्याचे त्यांना लक्षात आले. ते त्यावर थोडे अंतर चालले. नावाड्याने त्यांची प्रकाशचित्रेही घेतली. नंतर ते परत आले व आपल्या अनुभवांवर त्यांनी एक दीर्घ लेख लिहिला होता. आकाशातून चित्रण केले तर त्या जागी श्रीलंकेपर्यंत पाण्याखाली गडद रंगाचा अरूंद पट्टा दिसतो. श्रीरामसेतू म्हणतात तो हाच असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर ही Times of India ची बातमी - https://m.timesofindia.com/city/pune/re-tracing-ramas-footsteps/article…

In reply to by श्रीगुरुजी

आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदासाने लिहिलेल्या संस्कृत प्रहसनात अशी कल्पना केली आहे की कालिदास पत्नीपासून दूर रामटेकेमध्ये असतो व पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन आषाढ मासारंभी नागपूरपासून मध्यप्रदेशकडे चाललेल्या एका मेघासोबत तो पत्नीसाठी निरोप पाठवितो. तो मेघ ज्या ज्या प्रदेशांवरून जातो त्या प्रदेशांचे विहंगम वर्णन कालिदासाने केले आहे. याचा पडताळा घेण्यासाठी एक दिवस डॉ. भावे आषाढ मासारंभी स्वतः आपल्या विमानात बसून त्या भूप्रदेशावरून गेले व कालिदासाने वर्णन हकेलेले बहुतांशी भूप्रदेश वर्णनाप्रमाणे दिसतात असे त्यांना आढळले.
अरे वा... मग कालिदासाच्या कल्पनाशक्तीला सलाम... वर मी उल्लेखलेल्या अभिमानास्पद बाबींत कालिदास सारख्या प्रतिभावान कवीचाही सामावेश व्हायला हवाच. असो. बाकी कालिदासानेही कुठे विमानाचा दावा केला नाही त्यामुळे तो प्रश्न येत नाहीच. आणि तरीही एकंदरीत विमानाच्या दाव्याबाबत चर्चा करायची असेल तर मी वरच्या प्रतिसादात उल्लेखलेले प्रश्न (विमानाचे तंत्रज्ञान, कोणत्या तत्वावर ते चालायचे, इंधनाचा प्रकार ई ई) टाळून पुढे जाता यायचे नाही.
श्रीरामसेतू म्हणतात तो हाच असे त्यांचे म्हणणे होते.
हो असे अनेकांचे म्हणणे आहे. पण त्याबद्दल विश्वकोषातले अधिकृत विवेचन मी वर उद्धृत केले आहे. असो. माझ्या मते आपल्या संस्कृतीबद्दल न्यूनगंड बाळगणारे लोकच बहूधा विमानाच्या वा तत्स्म अचाट कथा पसरवित असणार. आणि इतर अनेक गोष्टी (ज्या मी वरील प्रतिसादात उल्लेखल्या आहेत) ज्यांच्या करिता कोणत्याही नव्या पुराव्याची गरज नाही, ज्या अगदी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट दिसत आहेत त्यांचे महत्व बहुधा या मंडळींच्या लक्षात येत नसावे किंवा त्या गोष्टींचा अभिमानही वाटत नसावा म्हणून त्या गोष्टींचा उल्लेखही न करता ते केवळ काही अचाट /कपोलकल्पित बाबी पुढे रेटण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत असतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जब ज़ीरो दिया मेरे भारत ने भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आयी तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलायी देता ना दशमलव भारत तो यूँ चाँद पे जाना मुश्किल था धरती और चाँद की दूरी का अंदाज़ा लगाना मुश्किल था सभ्यता जहाँ पहले आयी पहले जनमी है जहाँ पे कला अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला संसार चला और आगे बढ़ा यूँ आगे बढ़ा, बढ़ता ही गया भगवान करे ये और बढ़े बढ़ता ही रहे और फूले-फले - गीतकार इंदीवर, मुळ प्रेरणा देशप्रेमी भारतकुमार वर्तक

अय्या, पुराऽऽऽणेऽऽऽऽऽऽ !!!? आपले पूर्वज कित्ती थापाडे आणि अडाणी होते हे माहित नाही का तुम्हाला? आपण तर बाबा विज्ञानवादी आणि सत्यान्वेषी! ( स्वतःचेच गालगुच्चे घेणारी एखादी स्मायली मिळेल का इथे?)

ग्रुहीत धरु या की हे सगळे शोध भारतात लागले. मग जेंव्हा पहिले परकीय आक्रमण आले.(माझ्या आठवणी प्रमाणे अलेक्झांडर, त्याच्या आधी माहित नाही, कुणी सांगीतल्यास उत्तम).तर मग आपल्या कडे ही विमाने का न्हवती? (कारण अलेक्झांडरने कुठल्याही विद्यापीठाचा नाश केलेला वाचनांत आले नाही.... विद्यापीठे तोडल्या गेली ती मुसलमानी राजवटीत.) माझ्या अंदाजाने, व्यास आणि वाल्मिकी , हे फार कल्पक विज्ञान कथा लेखक आणि तत्ववेत्ते असावेत. ह्या पैकी व्यास जास्त....कारण.. १. टेस्ट ट्युब बेबी...१०० मूले एका वेळी.. (पुढे मागे हे पण होवू शकेल) २. दूर चित्र वाणी.... संजय आणि ध्रुतराष्ट्र ३. मयसभा.... आज-काल अशी घरे निर्माण होवु शकतात ४. जमिनीला न टेकणारा रथ... चुंबकीय तत्वावर चालणारी गाडी ५. अणू बाँब... पण व्यास ह्यांनी अजुन एक मोठे काम केले ते म्हणजे "गीता".... म्हणजे व्यास हे वैद्य पण होते असे समजायला हरकत नाही. कारण मनो-विज्ञान शास्त्र आणि गीतोपदेश काही वेगळे नाही वाटत. (हेच सुत्र अजुन चांगल्या प्रकारे चाणक्याने वापरले....."कौटिल्याचे अर्थशास्त्र "आणि गीतेतील "राजाची कर्तव्ये " जवळ जवळ सारखीच आहेत... आणि कौटिल्याने त्यात काळानुरुप बदल पण केला आहे....कौटिल्याचा उल्लेख न करण्याचा मोह टाळता आला नाही, कारण "कौटिल्याचे अर्थशास्त्र " हे पुस्तक वाचल्या शिवाय भगवत्-गीतेचा अभ्यास पुर्ण होत नाही.)

In reply to by मुक्त विहारि

कासरा आवरा हो, गाडी अंमळ जोरात सुटली. जरा तपशीलात गफलत आहे हो. १. १०० मुले गांधारीचीच नाहीत नि एका वेळची तर मुळीच नाहीत. चौदा मुले गांधारीची ती ही वेगवेगळ्या वेळी जन्मलेली. गीता ही व्यासांच्या महाभारताचा भाग नव्हे. मयसभेच्या अस्तित्वाबाबत कोणतीही शंका/आक्षेप घेतलेला आमच्या पाहण्यात आलेला नाही. ....."कौटिल्याचे अर्थशास्त्र "आणि गीतेतील "राजाची कर्तव्ये " जवळ जवळ सारखीच आहेत... आँ. जाऊ दे हा मुद्दा इतरांना प्रतिवाद करण्यास सोडून देतो. व्यास हे वैद्य पण होते असे समजायला हरकत नाही. खो: खो: खो: हे असं आहे बघा. चांगले सुश्रुत, वाग्भट नि चरक यांच्यासारखे दिग्गज आपल्याकडे होऊन गेलेले असताना नि त्यांचे श्रेय जगन्मान्य असताना उगाचच मानसशास्त्राचे श्रेयही लाटण्याचा प्रयत्न करून हास्यास्पद का व्हावे. सर्वसामान्य वर्तणुकीचे चार नियम नि मानसशास्त्र यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हो सायबा. हे म्हणजे सीतेने काढलेल्या रावणाच्या अंगठ्यावरून कैकेयीच्या दासीने उरलेला सारा रावण चितारावा तसं दिस्तंय राव. लैच हुशार की हो तुम्ही. ;) (ह. घ्या हे वे. सां. न. ल.)

In reply to by रमताराम

१०० मुले गांधारीचीच नाहीत नि एका वेळची तर मुळीच नाहीत. चौदा मुले गांधारीची ती ही वेगवेगळ्या वेळी जन्मलेली. गीता ही व्यासांच्या महाभारताचा भाग नव्हे. तार्किक दृष्ट्या हेच बरोबर वाटते. पण महाभारतात तर्काच्या पट्टीवर पटणार्‍या फारच कमी गोष्टी आहेत. १ महिन्याच्या अंतराने जन्मलेली गांधारीची १०१ मुले (१०० मुलगे + १ मुलगी) हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार. १४ मुलांची थियरी महाभारतात नाही. दु या आद्याक्षराने नावे असले १४ मुले तेवढी गांधारीची बाकी सगळी दासींची मुले हा निष्कर्ष भैरप्पांच्या पर्व मधला. ती १४ मुले (ली) अशी: Duryodhana, Duhsasana, Duhsaha, Duhshala, Durmukha, Durdharsha, Dushpradharshana; Durmarshana, Dushkarna, Durmada, Dushpradharsha, Durvirochana; Duradhara, Dushala (Daughter) महाभारतातली कथा मोठी चमत्कारिक आहे आणी ऐकणे नक्कीच हास्यास्पद वाटेल पण महाभारतानुसार ती सर्व १०१ मुले माठात मांसाचा तुकडा ठेवुन त्यातुन जन्माला आली. Saomething like Test Tube Baby असे काही जणांचे मत आहे.

In reply to by मृत्युन्जय

१४ मुले तेवढी गांधारीची बाकी सगळी दासींची मुले हा निष्कर्ष भैरप्पांच्या पर्व मधला. हा तर्क - तुम्ही म्हणता म्हणून तर्क - असलाच तर भैरप्पापूर्व ( :) )आहे. कारण शांताबाईंच्या आणि/किंवा, इरावतीबाईंच्या लेखांमधूनही याचा उल्लेख आहे. नेमके संदर्भ आठवत नाहीत. पर्व वाचण्यापूर्वीपासून मी गांधारीची चौदा मुले हेच गृहित धरून चाललो होतो. बहुधा अरुणाताईंचीही एक युयुत्सुवरील कथा आहे युद्धोत्तर काळावर, त्यातही असाच उल्लेख आहे. संदर्भ शोधून सापडले तर इथेच लिहिन. परंतु हा घाऊक १००-१०१ मुले जन्माला येण्याचा भाग मूळ महाभारतात नसावा (पौराणिक असावा) किंवा प्रक्षिप्त ठरवला गेलेला असावा.

In reply to by रमताराम

नाही हो. संदर्भ मूळ मानल्या जाणार्‍या महाभारतातही असाच आहे आणि तो प्रक्षिप्त मानला गेलेला नाही. युगांत किंवा व्यासपर्व मध्ये हे वाचल्यासारखे वाटत नाही तरी परत वाचुन खात्री करुन घेतो. आणि कसेही असले तरी तो एका आधुनिक (भैरप्पा, भागवत, कर्वे आधुनिक बरंका :) ) लेखकाचा निष्कर्ष आहे. मूळ महाभारतातला नाही :)

आता या प्रतिसादाला काही ही म्हणा :) पण सध्या अशाच काहीश्या संदर्भात उकराउकरी चालू आहे त्यामूळे आलाच लेख नजरेत तर लिहून टाकतो. बाकी मुद्दे बाजूला राहू दे १) त्या चमकत्या त्रिशूलाचा उल्लेख रामायणातही आहे, दुसरं म्हणजे तो अशा दगडात कोरलेला आहे की तो फार ठिसूळ असतो मग हे कोरीव काम कुणी आणि कसे केले ? २) नाझ्का लाईन्स नुसत्याच रेषा नाहीत तर आजूबाजूला काही चित्रेही आहेत जी उंचावरूनच स्पष्ट दिसतात मग हा उपद्व्याप कुणी आणि का केला ? ३) आजही बर्फ नसलेल्या उत्तरध्रूवाचे नकाशे उपलब्ध नाहीत तरीही बर्फाखाली झाकलेल्या भूभागाचा एक हरणाच्या कातडीवर रेखाटलेला नकाशा पुरातन काळात माणसानेच बनवलेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे नक्की कुठल्या नजरेने पहाणार आपण ?

In reply to by चाफा

पण त्या माणसाने हरणाचे कातडे का वापरले? कागद नव्हता का? म्हणजे त्या काळात विमान होते पण कागद पेन नव्हते असे म्हणायचे आहे का? मग विमान तयार करायचा आराखडा कातड्यावरच होता का? :)

In reply to by JAGOMOHANPYARE

प्राचीन काळात ऋषी-मुनी आपले लिखाण भूर्जपत्रांवर करत, तर राजाज्ञा कापडावर लिहून प्रसृत केली जाई. मात्र दूत पाठवून तोंडी निरोप देण्याची पद्धत सर्रास वापरात होती. नंतर कागदाचा शोध भारतात लागला. आपण तो चीनने लावला, असे वाचत आलो, परंतु नव्या संशोधनानुसार चीनच्याही आधी भारतात कागद वापरला जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याबाबतचा माहितीपूर्ण लेख 'विमर्श' या त्रैमासिकाच्या जानेवारी ते मार्च १२ काळातील 'इतिहास प्रबोधन' विशेषांकात श्री. गोसावी यांनी लिहिला आहे. अभ्यासकांनी जरुर वाचावा.

In reply to by मन१

डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या "पृथ्वीवर माणूस उपराच" या पुस्तकात यासंबंधी माहिती दिली आहे. अ‍ॅडमिरल पिरी रीस (हा बहुतेक फ्रेंच होता) याने खूप पूर्वी हरणाच्या कातड्यावर जगाचा नकाशा बनवला होता, जो आजच्या जगाच्या नकाशाशी तंतोतंत जुळतो आणि तसा नकाशा उपग्रहाच्या मदती शिवाय बनवणे शक्य नाही. तो नकाशा आज हि पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

In reply to by मन१

नक्की मनोबा , अ‍ॅडमिरल पिरी रीस यांनी अंतराष्ट्रीय भौगोलीक दिनाच्या निमित्ताने सोळाव्या शतकातले काही नकाशे संयुक्त राष्ट संघटनेने भरवलेल्या प्रदर्शनात मांडले होते. ते त्यांना तुर्कस्थानात टोपीकापी की काहीश्या नावाच्या राजवाड्यात मिळाले त्यात तो नकाशा होता, तसेही त्यांचे दोन नकाशे आजही बर्लिन च्या स्टेट लायब्ररीत आहेत. अर्थात माझी माझ्या कामाच्या संदर्भात चाललेली काहीशी उकराउकरी आहे ही बाकी पुराणात विमानं होती की नाही हे वाद चालू राहू दे न जाणो चर्चेतून इथेच एखाद्या मर्क्युरी व्हर्टेक्स इंजिनाचा आराखडा तयार व्हायचा :) जमोप्या तो नकाशा बनवणारा कार्टोग्राफर होता ना ! त्याला ऐन वेळी कागद मिळालाच नसेल मग काय समोर हरीण दिसलं काढला त्यानं त्याच्यावरच नकाशा :)

हा हा हा! असो!

च्यामारी एवढ्या महान गोष्टींचे शोध भारतात लागले? काहितरी काय राव? सर्व महत्वाचे शोध पल्याड लागतात . म्हणुन तर आपल्याकडचे विद्वान लोक आताशा तिकडे जातात ना? इथे आता उरलय कोण विद्वान आणि पुर्वीतरी कोण होते? उगाच कचर्‍याच्या ढीगात हिरे शोधायचे प्रयत्न का करताय राव? लायकीत रहावा ना आपल्या. तुमच्या देशात दळभद्री लोकच काय ते जन्मले. शोधकर्ते सगळे हुष्षार गोर्‍यांच्या देशात जन्मल हे सत्य जेवढ्या लवकर पचवाल तेवढे बरे आहे तुमच्यासाठी नाहितर इनोच्या बाटल्याच्या बाटल्या संपवाव्या लागतील. राहिता राहिला प्रश्न पुराणात केलेल्या उल्लेखांचा तर ती तर चक्क बकवास आहे. काही उत्तम कल्पनाशक्ती असलेल्या माणसांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांचा नसता उदोउदो करुन त्यातल्या खोट्या खोट्या गोष्टी खर्‍या मानण्याची बाळबोध वृत्ती पाहिली की खरेच हसावे की रडावे ते कळत नाही. जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे स्वप्नांच्या दुनियेत हरवुन बसला आहात आणि वर वावड्या उडवा की रश्याननांना वेदांमध्ये विज्ञानाची महान सूत्रे दिसली म्हणे. आणि दिसली तर दिसली ते ही तसलेच येडे नाहित काय? स्वतःच्या देशाला वाचवु शकले काय मुर्ख लेकाचे? अमेरिकेतल्या शहाण्या लोकांसमोर त्यांचा काय पाड. असो. जागे व्हा. जागो रे जागोरे जागो. सिर्फ उठो नही जागो. वाटल्यास तो जागो चहा प्या. नसेलच तर ब्रेकफास्ट टी प्या (आमच्या गोर्‍या मालकाच्या देशातला) नसेलच तर स्टारबक्सची कॉफी प्या पण जागा.

आमच्याकडं आहे असलं एक विमान, पण लायसन नाही म्हणुन उडवत नाही. जाउदे उगाच नॉल्स्टेजॉलिव्ह्करृकिसद्क व्हायला होतं.

In reply to by गणपा

+१ (श्रुती/ स्मृती/ पुराणोक्तवाल्यांना जाउ द्या बारा गडगड्याच्या विहीरीत. त्यांच्या विरोधात असलेल्यांचीही भली मोठी परंपरा या भारतवर्षात आहे आणि ती वेदांच्याही पूर्वीची आहे असे हल्ली वारंवार वाचनात येते. या विरोधक (तथाकथित सांख्य, चार्वाकवादी, इहवादी, बुद्धीप्रामाण्यवादी वगैरे वगैरे) लोकांनी वेदपूर्व काळ ते इ.स. २०१२ पर्यंत कोणकोणते वैज्ञानिक शोध लावले, त्यातले आजरोजी किती व्यावहारिक वापरात आहेत यावर कुणी लेख/ लेखमाला लिहीली तर वाचायला आवडेल.)

आपल्या पुराणांमध्ये सगळे काही आहे. पुराणात "तैतियान" नावाची बोट बुडाल्याचा उल्लेख आहे. बरोबर १०० वर्षांपूर्वी Titanic नावाची बोट बुडली पण आमच्या पूर्वजांनी ते कित्येक शतके आधीच सांगून ठेवले होते. :)

बोईंग, एअरबस, अन्तोनोव, गेलाबाजार किमान बीचक्राफ्ट किंगएअर किंवा सेस्ना सायटेशनच्या लेव्हलचं तरी.... असं पूर्ण देशी बनावटीचं एकही प्रवासी विमान बनवू न शकलेल्या देशाने पोथ्यांतील अभिमान कितीकाळ बाळगावा? तो एक सारस विमानाचा प्रकल्प पाहताना धुगधुगी वाटली होती पण तोही बनत बनत कोसळलाच.. अर्थातच जुन्या काळात भारतात काहीच ज्ञान नव्हतं असं म्हणणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद मूर्खपणा ठरेल. पण आता पश्चिमेस शोध लागला की नंतर मग आपल्याकडेही तो फार्फार पूर्वी लागून हरवला होता असं बाडं चापसून सांगण्याची वृत्ती सोडून आपण नवीन निर्मितीस लागू तो उत्तम दिवस. होतं ना मर्क्युरी आयन व्होर्टेक्स इंजिन आपल्याकडे.. ठीक. पण आता नाही ना सापडत ते.? अरे.. मग आत्ता आजरोजी जे आयन प्रपल्शनचं ज्ञान अस्तित्वात आहे तेवढं तरी आत्मसात करुया की... का नुसतं नासाच्या शंभर वर्षं आधी आम्ही हे केलं होतं असं म्हणून आत्ता कॉलर टाईट करत बसायचं..?? आयन प्रपल्शनच्या ताकदीवर निर्वातात सूक्ष्म हालचाली जेमतेम करता येतात. वातावरणात विमानाला उचलू किंवा ढकलू शकेल अशी शक्ती त्यातून उभी राहू शकत नाही हे वास्तव आजरोजी दिसत असतानाही आपल्याकडे असलेलं (तळपदेंचं) विमान आयन प्रपल्शनवर चालायचं असा विश्वास का बाळगावा? विशेषतः त्याची रिप्रोड्युसिबल नोंद शिल्लक नसताना? इथेच मार खातो आपण..

In reply to by गवि

होतं ना मर्क्युरी आयन व्होर्टेक्स इंजिन आपल्याकडे.. ठीक. पण आता नाही ना सापडत ते.? अरे.. मग आत्ता आजरोजी जे आयन प्रपल्शनचं ज्ञान अस्तित्वात आहे तेवढं तरी आत्मसात करुया की... का नुसतं नासाच्या शंभर वर्षं आधी आम्ही हे केलं होतं असं म्हणून आत्ता कॉलर टाईट करत बसायचं..?? आयन प्रपल्शनच्या ताकदीवर निर्वातात सूक्ष्म हालचाली जेमतेम करता येतात. वातावरणात विमानाला उचलू किंवा ढकलू शकेल अशी शक्ती त्यातून उभी राहू शकत नाही हे वास्तव आजरोजी दिसत असतानाही आपल्याकडे असलेलं (तळपदेंचं) विमान आयन प्रपल्शनवर चालायचं असा विश्वास का बाळगावा? विशेषतः त्याची रिप्रोड्युसिबल नोंद शिल्लक नसताना? विमान डोक्यावरून गेले ;) केवळ धागाकर्त्यासाठी :: अजुन एक 'विकीपिडीत' ;)

In reply to by सुहास..

वरती चर्चेत त्या (पक्षी: आयन प्रपल्शन) तंत्रज्ञानाचा उल्लेख अनेकदा आलेला पाहून मी अधिक संदर्भ न देता तो उल्लेख केला. गूगलबाबांच्या जमान्यात न समजण्यासारखं काही उरलंय का?

In reply to by गवि

गूगलबाबांच्या जमान्यात न समजण्यासारखं काही उरलंय का? >> :) बघतो आहे !! एखादा लेहमन टर्म मध्ये लिखाण येवु द्यात की , समजायला सोप्पे पडेल :)

In reply to by गवि

शब्दा-शब्दाशी सहमत, मोठ मोठ्या उच्चशिक्षित लोकांना असे दावे करताना पाहून हसावं की रडावं कळत नाही !

In reply to by गवि

गविंशी पुर्णपणे सहमत, कुठल्याही तंत्रज्ञानाची तांत्रिक माहीती पुराणात उपलब्ध नसताना, ओढून ताणून अर्थ काढून आमच्या कढे ह्यांव होते नि त्यांव होते असा फुकाचा अभिमान बाळगून स्वतःचीच पाठ स्वतःच थोपटवून घेण्याच्या वॄत्तीची किव करावीशी वाटते.

In reply to by रम्या

धन्यवाद.. असं पहा, ते पुराणकालीन ग्रंथात असेलही.. न सापडलेल्या अवस्थेत.. ते सापडलं आणि त्या आकृत्या / तंत्र वापरुन खरं उदा. आयनच्या प्रॉपेल्शनने चालणारं विमान बनवता आलं तर तो सर्वोत्तम योग असेल. पण सध्या काय होतंय की एक ब्रेकथ्रू, (उदा, हवेत उडता येण्याचं तंत्र,) सापडणे या बिंदूपासून सव्वाशी वर्षांची टाईमलाईन पाहिली तर त्यात एका समूहाने (लोकसमूह, देश ही रचना कृत्रिम का असेना पण आपण मानली आहेच म्हणून तेच धरुनच बोलू..) चारशे लोकांना घेऊन अर्धी पृथ्वी पार करणारे प्रचंड यंत्र बनवलं आणि दुसरा समूह फक्त आपण ते "आधी" शोधलं होतं या विधानाखेरीज काही फार करु शकला नाही. भले दोन समूहांची आर्थिक राजकीय स्थिती वेगवेगळी असेल. आता आपण मागे का राहिलो याचं कारण देताना, पुन्हा शिवकर तळपदेंच्या विमानाचं उदाहरण घेतल्यास, असं म्हटलं जातं की हे संशोधन उपेक्षित राहिलं आणि विमानाचा प्रोटोटाईप तळपदेंच्या नातेवाईकांनी रॅली ब्रदर्स कंपनीला विकला. समजा त्या संशोधनात पार्‍याच्या आयन्सनी प्रपल्शन करुन विमान उडवण्याचं पोटेन्शियल असतं तर रॅली ब्रदर्स त्याच्यावर बसून राहिले असते का? ते संशोधन सयाजीराव, टिळकांसहित अनेकांनी पाहिलं पण तरीही विस्मरणात अन अडगळीत गेलं, याचा अर्थ ते व्हायेबल नव्हतं असं सध्या का समजू नये? आणि मग आज काय व्हायेबल आहे ते पाहून काही बनवून बाहेर विकण्याइतका दर्जा का प्राप्त करु नये?

गविंच्या वरील प्रतिक्रियेतील हे वाक्य त्यांच्यासाठीच उत्तम उत्तर आहे. पुराणांतील/जुन्या धर्मग्रंथांतील संदर्भ देणार्‍यांची इतकी टवाळी करण्याचे कारण नाही (ओक-वर्तक राहू दे बाजूला). जुन्या भारतीय साहित्यातील नोंदींना प्रचंड व्यापारी महत्त्व आहे. हळद आणि कडुलिंबाच्या पेटंटचा लढा आपण अशाच जुन्या नोंदींच्या आधारे जिंकला आहे. आपले पारंपरिक ज्ञान जतन करुन ठेवण्यात आपण कमी पडतो आहोत, हे खरे असले तरी कुठेतरी सुरवात तर झाली आहे. चीनने आपल्या सर्व पारंपरिक वनौषधी व उपचार तपशिलांचे डॉक्युमेंटेशन यापूर्वीच पूर्ण केले आहे. भारतात डॉ. माशेलकरांच्या प्रेरणेने सीएसाआरआयने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पारद इंधन विकसित करण्याबाबत नासामध्ये संशोधन सुरु असल्याचे वाचले होते. नासामध्ये जर कुणाचा संपर्क असेल तर कृपया अधिकृत माहिती द्यावी. काही वेळा आपण आपलाच हक्क प्रस्थापित करण्यात मागे पडतो आणि नंतर त्याचे परिणाम पाहून हळहळतो. गोमूत्रापासून बनवलेल्या ६० हून अधिक उत्पादनांपैकी तब्बल ४० पेटंट बाहेरच्या देशांनी घेतली आहेत. (जपान आघाडीवर आहे) भारतात याबाबतची सर्वाधिक पेटंट (१० की १२) वर्ध्याच्या गोसेवा प्रतिष्ठानकडे आहेत. गाईचे शेण, गोमूत्र यांचा औषधोपचारातील वापर आयुर्वेदात नमूद आहेच, परंतु त्यापासून उत्पादने विकसित करण्यावर लक्ष न दिल्याने ही पेटंट बाहेर गेली आहेत. कोल्हापुरी चपलांचे पेटंटही अलिकडेच दुसर्‍या गावाकडे गेल्याचे वर्तमानपत्रांत आले होते. गोगलगाईच्या वेगाने होणारी प्रगती ही चिंताजनक बाब आहेच, परंतु त्यातही संताप येण्याजोगी गोष्ट म्हणजे आपलेच करप्ट मानसिकतेचे गुलाम लोक. जे कायम परकीयांच्या प्रगतीचे दाखले देऊन भारतीयांवर थुंकण्याचे काम करतात. असल्या लोकांकडून अवसानघात होतोच, पण इनोव्हेटिव्ह काही घडत नाही. असल्या परधार्जिण्यांपेक्षा एकवेळ परके परवडले, जे मुंबईच्या अशिक्षित डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाला सलाम करायला मुद्दाम येथे येतात आणि मास मॅनेजमेंटची संकल्पना समजून घ्यायला या डबेवाल्यांना हार्वर्डला बोलवतात.

In reply to by योगप्रभू

टवाळी नाही हो.. पुराणकालीन काही शोधण्याचा प्रयत्न थांबवावा असं नव्हे.. पण एक पाय चालू काळातही असावा.. फक्त त्या पुराणकालीन नोंदीतच अडकून पुढे सरकणं नाकारण्यामुळे आपलं नुकसान होतंय. पाश्चात्य देशांना सुदैवाने ही अडचण नाही.. माझे आजोबा उत्तम प्रयोगशील शेतकरी होते अन त्यांनी पेरणीयंत्र शोधलं होतं असं म्हणत म्हणत मी आणि माझ्या पुढच्या पिढ्यांनी आजोबांच्या फडताळातल्या वह्यांवर (वह्या सापडल्या तर उत्तम ..खरंतर आजीने सांगितलेल्या आजोबांच्या कथांवर) लक्ष जास्त आणि प्रत्यक्ष शेतात लक्ष शून्य असा प्रकारही करायला नको हो.. बाजूच्या शेतातला ज्याचे आजोबा शास्त्रज्ञ नव्हते तो शेतकरी औताला बैल लावून जितकं पीक काढतोय तितकं तरी मी काढायला हवं ना?

In reply to by गवि

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका कल्पक उद्योजक शेतकर्‍याने द्राक्षापासून कृत्रिम मध तयार केला. हा मध नैसर्गिक मधाइतकाच उत्तम आहे, पण द्राक्षाचा बेस असल्याने काही वेगळ्या प्रॉपर्टीज पण आहेत. मी वर्तमानपत्रात ही बातमी वाचली. त्या शेतकर्‍याचे कौतुक केले व विसरुन गेलो. मध्यंतरी चाणक्याचे अर्थशास्त्र वाचत असताना मला त्या काळातील शेतकरी द्राक्षापासूनही मध तयार करत असत, हा संदर्भ मिळाला. आता त्या शेतकर्‍याला पेटंट घ्यायला ही नोंद महत्त्वाची नाही का ठरणार? उद्योजकतेच्या फार मोठ्या संधी आपल्याच पारंपरिक ज्ञानात दडल्या आहेत. भारतीय लोक खूप काही करत असतात. गेल्याच महिन्यात मी म्हैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फूड रिसर्चमधील एका ज्येष्ठ संशोधकाशी बोललो. त्याने भारतीयांच्या पारंपरिक खाद्य व पाककला ज्ञानावर इतका बारीक अभ्यास केला आहे, की मी थक्कच झालो. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे काही नाही. भारतात खूप काही होत असते. आपल्यापर्यंत पोचलेले नसते इतकेच.

In reply to by योगप्रभू

तुम्ही म्हणताय ते चांगलं आणि खरंच आहे. मी फक्त विमाने या विषयातील मर्यादित पॉईंट धरुन बोलत होतो. जगात सगळीकडे वापरात येतील अशी उत्पादने (एअरबस, बोईंग ही विमाननक्षेत्रातली उदाहरणे) आपल्याकडे बनावीत अशा अर्थाने. पुराणकाळातली मधाची नोंद निश्चित अत्यंत उपयुक्त आहे. तिच्याविषयी हीनत्व अजिबात नाही. पण आजच्या शेतकर्‍याने त्या नोंदीवर अवलंबून न राहता सभोवतीच्या ज्ञानाने नवा मध शोधला याचं मला जास्त कौतुक असेल. मग त्याला जुना लिखित आधार मिळाला तर मधाहून गोड.. उगाचच आपल्या परंपरेशी केवळ ती जुनी आहे म्हनून नाळ तोडण्यात किंवा तिजवर थुंकण्यात आनंद बाळगणं हा अशा विचारसरणीमागचा उद्देश नाही हे स्पष्ट व्हायला हरकत नसावी..

In reply to by गवि

टवाळी नाही हो.. सांगून उपयोग नाही गवि. मुद्दे संपले की गुद्दे सुरू होतात. मुद्दे खोडले की कांगावा. एकदा तुम्ही टवाळी करताय असा शिक्का मारला नि आपल्या वैयक्तिक अस्मितांना बळंच भारतीय संस्कृतीशी वगैरे जोडून घेतले की अर्धी चड्डीवाली बरीच पोरेबाळे लाठ्याकाठ्या घेऊन जमा होतात. मग जमावाच्या बळावर तुम्हाला नामोहरम करणे सोपे जाते. आमचा तोच प्रश्न - तिसर्‍यांदा - 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार. आणि हे जे काही असेल ते मूलभूत वेगळे असावे अशी अपेक्षा आहे. आफ्रिकेत कुठल्याशा कंदाची मुळी उपचारार्थ वापरली जाते इथे हळद असते. त्यामुळे हळदीचा शोध एकमेवाद्वितीय वगैरे नसतो, जसा विमानाचा असतो. माणूस कधीही नैसर्गिकपणे आकाशात उडू शकत नव्हता ते विमानाने त्याला साध्य करून दिले. इतका मूलभूत नवा शोध जेव्हा भूतकाळातील पुस्तकांच्या आधारे लावला जाईल (नुसते पुष्पक विमान होते या मोघम उल्लेखापलिकडे त्याची साग्रसंगीत माहिती मिळायला हवी.) तेव्हा त्याचे स्वागत करणारा मी पहिला असेन. सध्या तरी आत्मसंतुष्टांच्या तांड्यात सामील व्हायची आपली इच्छा नाही.

In reply to by रमताराम

आमचा तोच प्रश्न - तिसर्‍यांदा - 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार. ररा तुमच्या तर्कशुद्ध विचारांचा आदर आहे. परंतु हे वाक्य थोडे आगाऊपणाचे वाटले. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात त्यामुळे या शब्द्दाबद्दल तुमची माफी देखील मागतो. परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. अतिशय पर्सनल प्रश्न विचारतो. तुम्ही काय केले आहे? तुमच्यामते आम्ही तर अगदी निरुद्योगी निरुपयोगी लोक आहोत. तुम्ही तर वेगळ्या विचारसरणीचे आहात ना? तुम्ही वेगळा शोध असा काय लावलाय? तुमचा अनादर करण्याच्या हेतुन हा प्रश्न विचारलेला नाही आहे. तर फक्त हे सांगण्यासाठी विचारला की अजुन अंधारात असलेले आणि पाश्चात्यांना न जमलेले काहितरी करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान नसणे गरजेचे नसते. अभिमान असणे कदाचित प्रोत्साहनकारक ठरु शकेल.

In reply to by मृत्युन्जय

यात आगाऊपणाचे काय आहे कळले नाही. पुट अप ऑर शटप अशा आमच्या पाश्चात्यांच्या किंवा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा तुमच्या भाषेत म्हटले आहे. परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. आमचाच मुद्दा आहे हा. काहीतरी गफलत झालेली दिसते. तुमच्यामते आम्ही तर अगदी निरुद्योगी निरुपयोगी लोक आहोत. कैच्याकै. टोकाला जायचं काय कारण? आम्ही अस्मितेचा मुद्दा नाकारलाय नि जे तो महत्त्वाचा मानताहेत त्यांना आजवर नाही तर नाही भविष्यात आपण न वापरलेले शोध वापरू शकतो का नि त्या निमित्ताने आपला मुद्दा सिद्ध करू शकतो का हा प्रश्न विचारला यात तुम्हाला निरुद्योगी नि निरुपयोगी ठरवण्याचा प्रश्न येतो कुठे. उगा त्रागा कशाला. तुम्ही तर वेगळ्या विचारसरणीचे आहात ना? तुम्ही वेगळा शोध असा काय लावलाय? काहीही नाही असे आपण गृहित धरून चालू. समजा असलाच तरी काय फरक पडतो. मी काही धागे काढून बसलो नाही, माझ्या मताच्या विरोधकांना संस्कृतीबद्दल तुच्छता बाळगणे वगैरेच्या इक्ववॅलेंट कोणत्याही शिव्या दिल्या नाहीत. इतरांनी अमूक केले नाही 'इथेच आपण मार खातो' असली इतरांनी माझ्या मताप्रमाणे वागावे अशी अगोचरपणाची अपेक्षा ठेवत नाही. माझे मत तुम्ही मान्य करा नाहीतर तुम्ही कसलेतरी द्रोही असा शिक्का मारला नाही. पाश्चात्यांना न जमलेले काहितरी करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान नसणे गरजेचे नसते. अभिमान असणे कदाचित प्रोत्साहनकारक ठरु शकेल. अगदी सहमत. पण त्याचबरोबर आपले मत न पटणार्‍यांना तुच्छतावादी न समजता त्यांचे मुद्दे समजावून घेतले तर नुसत्या प्रोत्साहनाबरोबरच आत्मसंतुष्टता दूर व्हायलाही मदत होते.

In reply to by रमताराम

यात आगाऊपणाचे काय आहे कळले नाही. पुट अप ऑर शटप अशा आमच्या पाश्चात्यांच्या किंवा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा तुमच्या भाषेत म्हटले आहे. हॅ हॅ हॅ. मग ठीक आहे. काय आहे हिरव्या देशात गेल्यावर इथले सगळे काळे दिसायलाच लागते त्यामुळे तुमचे चालु देत. परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. आमचाच मुद्दा आहे हा. काहीतरी गफलत झालेली दिसते. हॅ हॅ हॅ. तुम्ही योग्य तो गैरसमज करुन घेतला आहे. संस्क्रूतीबद्दल गळे काढणारे म्हणजे संस्कूती शब्द उच्चारला रे उच्चारला की तो त्याज्य, अग्राह्य शब्द असल्यासारखे गळे काढणार्‍यांबद्दल बोलतो आहे मी. म्हणजे असे की भारतीय संस्कृतीने काही करुनच दाखवलेले नाही असे गळे काढणार्‍या आणि भारतात जन्मलेल्या तरी किती लोकांनी असे काही सो कॉल्ड भरीव करुन दाखवले आहे ते ऐकायला आवडेल मला. कैच्याकै. टोकाला जायचं काय कारण? आम्ही अस्मितेचा मुद्दा नाकारलाय नि जे तो महत्त्वाचा मानताहेत त्यांना आजवर नाही तर नाही भविष्यात आपण न वापरलेले शोध वापरू शकतो का नि त्या निमित्ताने आपला मुद्दा सिद्ध करू शकतो का हा प्रश्न विचारला यात तुम्हाला निरुद्योगी नि निरुपयोगी ठरवण्याचा प्रश्न येतो कुठे. उगा त्रागा कशाला. स्वतःला उपेक्षेने मारुन तरी काय डोंबलाचे शोध लावले जाणार आहेत असे आम्ही विचारतो आहे. योगप्रभूंनी दिलेले उदाहरणच घ्या. द्राक्षापासून मध बनवता येतो आणि ते प्राचीन पुस्तकात देखील लिहिले आहे. पण जर मूळात ते कोणी वाचणारच नसेल (कारण ते त्याज्य आणि निरुपयोगी आहे असे मत असणे) असे काही होउ शकते आपल्याला कळणारही नाही. अर्थात २० वर्षांनी असे शोध जेव्हा कोणी लावेल तेव्हा आपण म्हणु अर्रे अमुक तमुक पुस्तकात तर आधीच तसे लिहिलेले आहे. की मग तर झाले स्वतःला आणी संस्कृतीचा अभिमान असणार्‍या सर्वांना उपेक्षेने मारु इच्छिणार्‍या लोकांना बोंबा मारायचे अजुन एक साधन मिळणार की तुमच्या पुस्तकात लिहिले आहे म्हणुन नुसतेच म्हणता. उपयोग काय? अहो ते जे लिहिलेले आहे ते डोळसपणे वाचा. चार कल्पना मिळतील. मान्य आमच्याकडे युजर मॅन्युअल्स नाहित. हे असे होते असे वक्तव्य तर आहेत. त्या आधाराने काही करता येते का ते बघा. पण ती पुस्तके, तो विचार, त्या कल्पनाच एकदा टाकाऊ मानल्या की प्रश्नच मिटला. कायमस्वरूपी आम्ही गोर्‍यांनी बघा कसे जमवले ही स्तुती करण्यात धन्यता मानणार आणि वर सर्वज्ञपणाचा आव आणुन एतद्देशीय लोकांना सांगणार की बघा तुमची पुस्तके आणी पुराणे आणि संस्कृती कशी निरुपयोगी आहे. चंमतगच आहे. काहीही नाही असे आपण गृहित धरून चालू. समजा असलाच तरी काय फरक पडतो. असेल तर सांगा. उगाच खुप काही शोध लावल्याचा आव नको. असेल तर आम्हाला आनंदच आहे. असाही तुमच्याबद्दल आणि तुमच्या तर्कशुद्ध प्रतिसादांबद्दल आम्हाला तुमचा आदरच आहे. तो द्विगुणीत होइल. हे मी अतिशय सरळपणे बोलतो आहे. कुत्स्तितपणे नाही. मी काही धागे काढून बसलो नाही, धागे मीही काढत बसलेलो नाही आहे. पण प्रतिसाद आपन दोघेही देत आहोत. मुळात तुमचे म्हणणे काय आहे? द्गागे काढणार्‍यांना संस्कृतीचा अभिमान असण्याचा किंवा त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही इतर सर्वांना आहे. असे काय? नाही दोन्हींचा संबंध नीटसा कळला नाही म्हणून विचारतो आहे माझ्या मताच्या विरोधकांना संस्कृतीबद्दल तुच्छता बाळगणे वगैरेच्या इक्ववॅलेंट कोणत्याही शिव्या दिल्या नाहीत. त्या तुम्ही प्रतिसादातुन दिल्याच की नंतर. सुरुवात नाही केली म्हणुन काय झाले? प्रतिसादांची तीव्रता थोडी कमी आधिक एवढेच. इतरांनी अमूक केले नाही 'इथेच आपण मार खातो' असली इतरांनी माझ्या मताप्रमाणे वागावे अशी अगोचरपणाची अपेक्षा ठेवत नाही. मला वाटते हे मत प्रथम गविंनी मांडले ते तुमच्याच मताचे आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात काय? माझे मत तुम्ही मान्य करा नाहीतर तुम्ही कसलेतरी द्रोही असा शिक्का मारला नाही. असा शिक्का मारावा म्हणुन या धाग्यावर तरी तुम्हीच पहिल्यांदा प्रयत्न केला. मग लोकांना अशी चिथावणी दिल्यावर अजुन काय अपेक्षित होते तुम्हाला? अगदी सहमत. पण त्याचबरोबर आपले मत न पटणार्‍यांना तुच्छतावादी न समजता त्यांचे मुद्दे समजावून घेतले तर नुसत्या प्रोत्साहनाबरोबरच आत्मसंतुष्टता दूर व्हायलाही मदत होते. अगदी सहमत. त्यामुळेच जिथुन प्रोत्साहन घ्यायचे तिथुन ते घ्यावे जिथुन मार्ग सापडु शकेल अश्या इतर शक्यतांचाही विचार करावा. हे जर मान्य असेल तर मग प्रथम स्वतःच्या इतिहासाबद्दल स्वतःला अभिमान हा असलाच पाहिजे. त्याशिवाय हे कसे साध्य होणार? 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार. असो. आता वरील वक्तव्य औद्धत्यपुर्ण का वाटले ते सांगतो. जर अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही स्वयंघोषित संस्कृतीप्रेमी करुन दाखवु शकलेले नसले तर ते तसे स्वयंघोषित संस्कृतीद्वेष्टे तर नक्कीच करुन दाखवु शकलेले नाहित. आता जे स्वतःला जमत नाही त्यासाठी संस्कृतीला दोष देण्यात काय मतलब. त्याअतुन झालाच तर फायदाच होइल. तोटा नाही होणार. असो. माझ्यामते हा मुद्दा अजुन ताणण्यात फारसा अर्थ नाही कारण बरेच पर्सनल कमेंट्स होउ शकतील. जी माझ्याबाबत झाली तर माझी हरकत नाही. परंतु तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि विचाराने ज्येष्ठ आहात आणि तुमच्या तर्कशुद्ध विचारांबद्दल मला आदरदेखील आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल माझ्या हातुन असा अजुन काही प्रमाद घडल्यास मला नाही आवडणार. असो. काही उणेआधिक झाले असल्यास माफी मागतो. धन्यवाद.

In reply to by रमताराम

रमतारामांच्या सडेतोड युक्तिवादाला सलाम!

In reply to by योगप्रभू

जे कायम परकीयांच्या प्रगतीचे दाखले देऊन भारतीयांवर थुंकण्याचे काम करतात. एकदम योग्य बोललात प्रभुजी ! लंडनमधल्या म्हातार्‍या व्यक्तीने केली की ती आत्मियतेने केलेली चौकशी आणि हिंदुस्थानातील म्हातार्‍या व्यक्तीने केली की हिरवेपणा असा गळा काढणारे मंडळीही पाहिली आहेत... असो... भारतीयांवर थुंकण्याचे काम भारतीयच करतात हे आता नवीन नाही ! ही तर फॅशन आहे आपण फार विचारवंत आहोत असा आव आणणार्‍यांची.

In reply to by मदनबाण

प्राचीन काळातल्या आजतरी अनुपलब्ध असणार्‍या डॉक्युमेंटचा आधार घेताघेता वर्तमानकालीन प्रगतीची कास सोडू नये इनफॅक्ट चालू ज्ञानाने तरी पाश्चात्य देशांच्या बरोबरीत रहावे किंवा पुढे जावे.. आपली परंपरा आपल्याला पुढे घेऊन जावी, तिने आपले पाय मागेच धरुन ठेवू नयेत अशा विचारसरणीला भारतीयांवर थुंकणे असा शब्दप्रयोग केल्यावर बोलणेच खुंटले.

In reply to by गवि

ओक आणि वर्तकांच्या लेखनाचे उदाहरण देऊन अनेकजण भारतीय पुरातन संस्कृतीविषयी नेहमी तुच्छता व्यक्त करतात, या रागातून भावनेच्या भरात थुंकणे हा शब्द वापरला गेला. तो वैयक्तिक नव्हता. तरीही गवि मी सॉरी म्हणतो.

In reply to by योगप्रभू

ओक आणि वर्तकांच्या लेखनाचे उदाहरण देऊन अनेकजण भारतीय पुरातन संस्कृतीविषयी नेहमी तुच्छता व्यक्त करतात, ओक नि वर्तक प्रभृती लोकांचे लिखाण वाचून आत्मसंतुष्ट राहणारे लोक त्यांच्या मतांची थट्टा ही भारतीय पुरातन संस्कृतीविरोधी तुच्छता आहे अशी मखलाशी करतात, तुमच्यासारखे. कारण यातून आपल्यामागे मोठा जमाव जमवता येतो. तुमच्या वांझोट्या अभिमानाच्या स्थांनांची सांगड भारतीय संस्कृतीशी घालण्याची चलाखी करू नका. आमच्यासमोर तरी चालणार नाही. डोन्ट मिक्स अ‍ॅपल्स अँड ऑरेंजेस मि, प्रभू. (आता पाश्चात्यांचे हस्तक म्हटलेच आहे तर त्यांची भाषा वापरू या.)

In reply to by गवि

ओ विहारी कौनो गजबवा हुई गवा का ? अरे हमार प्रतिसाद कोनो इतर मंडली के लिये था, तोहार वास्ते नाही, जिनको समझना वह तो समझ गये...देखो तो वो सुहास कौनो कारण हस रहा है... ;) गवि माझा प्रतिसाद आपल्यासाठी नाही...

In reply to by मदनबाण

लंडनमधल्या म्हातार्‍या व्यक्तीने केली की ती आत्मियतेने केलेली चौकशी आणि हिंदुस्थानातील म्हातार्‍या व्यक्तीने केली की हिरवेपणा असा गळा काढणारे मंडळीही पाहिली आहेत... >>. =)) =)) =))

In reply to by योगप्रभू

प्रभूजी यू टू? नाही म्हणजे आपली तुपली मते जुळत नाहीत हे खरे. पण प्रतिवाद करण्याची ही पद्धत? टवाळी करतो आहे सबब उत्तर देणे हे आमच्यावर बंधनकारक नाही असे म्हणून शेपूट सोडवून घ्यायची? . मुळातच गृहितकावर जगणार्‍या नि इतरांनीही तसेच करावे असे मानणार्‍यांची थट्टा करण्यापलिकडे काय करता येते? अनेकदा पुरावे मागूनही दिले गेले नाहीत तर काय केवळ एका पुस्तकात लिहिले म्हणून ग्राह्य मानायचे. आणि हळद वगैरे मुद्दे आणून वडाची साल पिंपळाला का लावताय? हळद ही केवळ पुस्तकात होती म्हणून नव्हे तर आजतागायत आपण वापरत होतो म्हणूनच त्याबाबत आपण सत्यता मानली. गेलाबाजार पुस्तके वाचून का होईना एखाद्याने त्याचे पुनर्निर्माणाचे प्रयत्न का करू नये. का बोईंग कडे जावे, का मिग वाल्यांकडे जावे. करा ना तयार इथे विमाने. का करत नाहीत. संघासारख्या राष्ट्रवादी विचारांच्या संघटना नक्कीच त्यासाठी पैसा उभा करतील अयोध्येतील मंदिरासाठी जमवला तो यासाठी वापरला असता तर अधिक उपयुक्त ठरला नसता का? इथे 'शब्दप्रामाण्य' मानायला लावायचे नि अस्मितेच्या प्रश्नावर वांझोटे लढे लढवायचे हा दांभिकपणा कशाला. माझ्याच अन्य प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, 'अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना ज्ञात नसलेले असे उजेडात आणण्याचे कष्ट का घेत नाही कोणी'. तुमच्यासारखे पाच-पन्नास लोक एखादा गट स्थापन करून चिकाटीने हे काम करीत नाहीत. उगा फुका तोंडच्या नि अस्मितेच्या वाफा का दवडाव्यात. थट्टा तर करणारच. दिवसभर उगाच पारावर बसून इड्या फुकत बसलेल्या गण्या-गणपाने 'ती समुरची हवेली हाय ना त्या परिस म्होटी हवेली होती आमच्या आज्याची' म्हणत फुशारक्या का माराव्यात. आज ती दाखवू शकत नसेल वा नवी उभारू शकत नसेल तर त्याच्या बोलण्याचे मोल ते काय. नि त्याची थट्टा केल्याचा राग तरी का यावा? होती की नाही हा भूतकाळातला प्रश्न झाला. आज नि पुन्हा उभी करता येत नसेल तर तिचे अस्तित्व असून नसल्यासारखेच. उठसूठ नासाचे नाव ऐकले की ह. ह. पु. वा. होते. या फेका मारणार्‍यांना नासा नक्की काय काय करते हे समजून घेण्याची गरज आहे. रामसेतूला विरोध करताना 'नासा तिथले थोरियम ढापेल' हे ऐकून मी गार पडलो होतो. (थोरियम नि युरेनियम यांचा तुलनात्मक अभ्यास करावा असा अनाहुत सल्ला). 'संस्कृत ही कम्पूटरला योग्य भाषा आहे.' या मूर्ख विधानाला (कुणी सिद्ध केल्यास माझे विधान आनंदाने मागे घेईन) देखील नासाची साक्ष काढली जाते. अयोध्येच्या मंदिराबाबत सुद्धा. अरे नासा काय रिकामटेकडे लोक आहेत का आज भाषा नि कम्प्युटर संबंध तपासताहेत नि उद्या रामसेतू कसा दिसतोय पाहताहेत. सॅटेलाईट इमेजेस नि नासाचा घंटा काही संबंध नस्तो. नासाच्या साईट्वरील सॅटेलाईट इमेजेस - निदान पाच वर्षांपूर्वीपर्यंत - या भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटने दिलेल्याच असायच्या. (पण हा अभिमानाचा मुद्दा नसतो. अभिमानाचे मुद्दे सगळे पुराणा-कुराणात शोधायचे असतात ना.)

In reply to by रमताराम

'संस्कृत ही कम्पूटरला योग्य भाषा आहे.' या मूर्ख विधानाला (कुणी सिद्ध केल्यास माझे विधान आनंदाने मागे घेईन) देखील नासाची साक्ष काढली जाते. उगाच गुगल बाबाशी खेळुन पाहिले... http://www.parankusa.org/SanskritAsProgramming.pdf http://www.hinduwisdom.info/Sanskrit.htm

In reply to by मदनबाण

मदनबाण साहेब, तुम्ही दिलेली लिंक वाचली. तो पेपर बकवास आहे. जे सांगायचे ते त्याला नीट सांगता नाही आले. पण ते सोडा.संस्कृत आणि प्रोग्रामिंग यांचा काहीतरी संबंध आहे किंवा नाही? हा मुख्य मुद्दा. तर संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य ते हे की पाणिनीने तिचे व्याकरण अतिशय अचूकपणे सांगितले-कुठेही संदिग्धतेला वाव नाही. आणि प्रोग्रामिंग साठी जी भाषा लागते, तिच्यामध्ये असे गुणधर्म लागतात ही गोष्ट खरी आहे. पण त्यापलीकडे जाऊन संस्कृतवर आधारलेली प्रोग्रामिंग लँग्वेज काढणे म्हणजे काय? ही कल्पनाच संदिग्ध आहे. =, +, सॉर्टिंग इत्यादी एकदम बेसिक कल्पना तर काही बदलणार नाहीत. मग "संस्कृत" कुठून येणार त्यात? सारांश, संस्कृत भाषेचे काही असी वैशिष्ट्य नाही, की ज्यामुळे प्रोग्रामिंग साठी मराठी अथवा तमिळ पेक्षा संस्कृत वापरल्यास काही फायदा होईल. बर मग लोक जे म्हणतात त्यातले निके सत्व कोणते? तर पाणिनीचा विकी पहा. तिथे लिहिलंय: http://en.wikipedia.org/wiki/P%C4%81%E1%B9%87ini Pāṇini's grammar is the world's first formal system, developed well before the 19th century innovations of Gottlob Frege and the subsequent development of mathematical logic. In designing his grammar, Pāṇini used the method of "auxiliary symbols", in which new affixes are designated to mark syntactic categories and the control of grammatical derivations. This technique, rediscovered by the logician Emil Post, became a standard method in the design of computer programming languages.[22] Sanskritists now accept that Pāṇini's linguistic apparatus is well-described as an "applied" Post system. Considerable evidence shows ancient mastery of context-sensitive grammars, and a general ability to solve many complex problems. Frits Staal has written that "Panini is the Indian Euclid." संस्कृतचे व्याकरण लिहिताना पाणिनीने जी पद्धत वापरली, तीच पद्धत नंतर काही शास्त्रज्ञांनी वापरली (म्हणजे पुन्हा स्वत: शोधली,rediscovered by the logician Emil Post)आणि आता जगभर प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करण्यात तिचा वापर केला जातो. म्हणजे ती पद्धत शोधून काढणे हे पाणिनीचे श्रेय आहे. आणि ती पद्धत त्याने संस्कृत व्याकरणाला वापरली, म्हणून संस्कृतचे लेबल त्याला लागले. महत्व आहे ते त्या पद्धतीला, संस्कृतला नाही. समजा पाणिनी चीनी किंवा तमिळ असता, तर मग लोक म्हटले असते, की प्रोग्रामिंग साठी चीनी किंवा तमिळ भाषा योग्य आहे :)

In reply to by रमताराम

रमताराम, मी ओक आणि वर्तक यांच्या लेखनाचाच उल्लेख केला होता. बाकी रास्वसं/ हिंदुत्ववादी विचारसरणी यांच्याशी माझा संबंध नाही. तेव्हा भारतीय पुरातन संस्कृतीचा चिकित्सक अभ्यास करणे म्हणजे संघवाला, असले सोपे शिक्के मारणारे बरेच पोस्टमन मी बघितलेत. बाकी ते शेपूट वगैरे काय म्हणालात ते समजले नाही. मला म्हणत असाल तर मान्य करतो. नाहीतरी आमचे पूर्वज शेपूटवालेच होते. दरवेळी 'याचा उल्लेख आमच्या साहित्यात सापडतो' असा क्षीण आवाज करणार्‍यांवर एकदम पाश्चात्य विचारांची काठी घेऊन तुटून पडण्याचे कारण नाही. असले दांभिक बरेच सापडतात. त्यांनाच विचारावेसे वाटते, की दरवेळी परदेशी कंपन्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करुन दाखवण्याची हमाली करण्यापेक्षा एक तरी अभिनव उत्पादन/संशोधन करुन दाखवा. युरोपिअन ज्ञानाचा इतका एकांगी अभिमान खुद्द तेही बाळगत नसतील. गुलाम भारतीयांनी निदान युरोपीय विद्वानांच्या मांदीयाळीत तरी मानाचे स्थान मिळवून दाखवावेत. पाच पन्नास लोकांचा गट घेऊन काहीतरी करुन दाखवा, असे आव्हान तुम्ही देताय. हो. मला मंजूर आहे. फक मला स्वतंत्र गट स्थापन करण्याची गरज नाही. असे शेकडो गट भारतात याआधीच स्थापन झाले आहेत. मी त्यांच्याशी नाळ जोडेन. माझी वैचारिक बांधीलकी ओक आणि वर्तक यांच्याशी नसून माशेलकर/भटकर यांच्याशी आहे, इतके नमूद करतो. विमानांचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, की स्वतंत्र विमाने विकसित करण्यासाठी जी महाप्रचंड गुंतवणूक करावी लागते ती करण्याची भारताची क्षमता आतापर्यंत नव्हती. आजही नाही. पुन्हा अट्टहासाने ते करण्याची काही गरज नाही, असे मला वाटते. नुकतीच एका भारतीय कंपनीने अचूक मारा करणारी प्रणाली रशियन विमानांवर यशस्वी स्थापित केली आहे. अशी लहान इनोव्हेशनही सध्या पुरेशी ठरावीत. गुलामगिरीची मनोवृती आणि भ्रष्टाचार यांचा विळखा देशाला पडलेला असताना प्रगतीचा वेग मोजण्यापेक्षा काही तरी सुरु राहणे महत्त्वाचे असते. बाकी अयोध्येचे मंदिर, रामसेतू हे तुमच्या आवडीचे विषय असतील. मला त्यात रस नाही. मी केवळ उद्योजकता आणि अभिनवता याच दृष्टीकोनातून या विषयाकडे बघतो आहे. (बाकी तुमची इतर आगपाखड फालतू दर्जाची आहे. मी त्याची कवडीइतकीही दखल घेत नाही.)

In reply to by योगप्रभू

माझा शेवटचा प्रतिसाद. कारण तुम्ही इतके फाटे फोडत आहात की मूळ मुद्दा केव्हाच हरवून जातोय. १. मी तुम्हाला संघवाला म्हटलेले नाही संघासारखी राष्ट्रवादी संघटना यासाठी नक्की पैसा उभा करेल असे म्हटले आहे. असलीच ती ही संघाची स्तुती आहे असा आमचा तुच्छ समज आहे. २. माझ्या प्रतिसादात शेपूट हा शब्द सापडला नाही, कृपया शोधून देणे. ३. एकदम पाश्चात्य विचारांची काठी घेऊन तुटून पडण्याचे कारण नाही. 'आपल्याकडच्या' गोष्टींवर टीका करायाला पाश्चात्य काठीच लागते हा तुमचा टोकाचा विचार वाचून मौज वाटली. (जे आपले नाही ते पाश्चात्य आहे असा यातून सूर निघते ही अंमळ गम्मत तुमच्या लक्षात येते का?) ही पुन्हा दुसरी सोयीची मखलाशी. एकदा आम्ही पाश्चात्य विचाराचे म्हटलो की त्यांचे दोष आमच्या माथी मारता येतात. किती अपलाप कराल. जरा फापटपसारा वाढवून गोंधळ वाढवण्यापरिस आम्ही मांडल्या मुद्द्यावरच चर्चा कराल तर बरं होईल. बादवे, सांख्य, चार्वाक बौद्ध, जैन हे सारे भारतीयच होते त्यांनीही भारतातील अनेक चालीरीती वगैरेंवर टीका केल्या आहेत. हे सारे पाश्चात्य विचारांचे होते काय हो? (तस्मात त्रागा सोडा नि मुद्याला धरा) असे शेकडो गट भारतात याआधीच स्थापन झाले आहेत. मी त्यांच्याशी नाळ जोडेन. असे असेल तर स्वागतार्हच आहे, पुन्हा हेच सांगेन हवेतल्या गप्पा मारण्यापेक्षा अधिक माहिती द्या. विमानाचे उत्पादन हा माझा मुद्दा कधी होता. ती 'एक' निर्मिती आहे. माझा मुद्दा आजवर न निर्माण झालेल्या नि आपल्या ग्रंथात, इतिहासात असलेल्या 'पण' पाश्चात्यांना आजवर निर्माण करता न आलेल्या गोष्टींबद्दलचा होता. इथे विमानांच्या उत्पादनाचा प्रश्न कुठे आला. (बाकी तुमची इतर आगपाखड फालतू दर्जाची आहे. मी त्याची कवडीइतकीही दखल घेत नाही) धन्यवाद. याला आम्ही चोराच्या उलट्या बोंबा म्हणतो.

In reply to by रमताराम

(हे बघा तुमचे वाक्य.) प्रभूजी यू टू? नाही म्हणजे आपली तुपली मते जुळत नाहीत हे खरे. पण प्रतिवाद करण्याची ही पद्धत? टवाळी करतो आहे सबब उत्तर देणे हे आमच्यावर बंधनकारक नाही असे म्हणून शेपूट सोडवून घ्यायची?>>

In reply to by योगप्रभू

अहो हा वाक्प्रचार आहे हो. म्हटले आम्ही तुम्हाला शेपूट कधी लावली. बरं तुमचं म्हणणं बरोबर. प्रभूजी आता पुरे हां. नायतर खरंच लठ्ठालठ्ठी व्हायची राव आपली. जौ द्या. ते विमान आणि काय ते नेऊन घाला की हो तिकडे .... काय तरी चांगलं गाण्यागिण्याचं बोला की हो. -रमतारावसाहेब उर्फ रमराव हरिहर

In reply to by रमताराम

हळूहळू विमानांकडून रावणाची नाचगाणी, वैभव, सुंदर राक्षशिणी अशा विंटरेश्टिंग विषयांकडे वळणार होतो तेवढ्यात रमतारामाचा हल्ला झाला लंकेवर. हनुमान दोन बायकांचा नवरा होता आणि त्याला एक मुलगाही होता, ही नवलकथा ऐकलीय का? रावणाच्या अद्याप लपवलेल्या मृत शरीर आणि अफाट खजिन्याबद्दल ऐकलंय का? लय मज्जा हायेत आमच्या पुराण आन् महाकाव्यांमधी. भन्नाट टीपी व्हतुया बगा..

In reply to by योगप्रभू

प्रभुजी, मी अत्यंत साधेपणाने विचारतोय - १ श्री माशेलकर यांचे संशोधनातील कार्य काय...म्हणजे त्यांनी किती पेटंट्स मिळवली आहेत व त्यांना सगळ्यात महत्वाचे असे कुठले (नोबेल सारखे) मिळवले आहे का ? पेटंट बरेच जण मिळवतात त्यात मला विशेष रस नाही. काही मोठा शोध वैगेरे लावला आहे का ? २ श्री भटकरांनी अमेरिकेने सूपर काँप्युटर नाकारला म्हणून त्यांनी येथे तयार केला अशी बरीच टिमकी वाजवली गेली. असे जर असेल तर ही मशिन्स भारतात कोठे कोठे बसविली आहेत ? त्याचे जगातील इतर मशीन बरोबर Benchmarking झाले आहे का ? CDAC मधे जर एवढे महत्वाचे संशोधन झाले होते तर ते मधेच थांबवून तेथे भारतीय भाषांचे फाँटस असे फालतू काम का चालू झाले.... मला दुसर्‍या मुद्द्याबद्दल बर्‍याच शंका आहेत. कोणी प्रकाश टाकतील तर बरे होईल.

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंत, मी वैचारिक बांधीलकी म्हटलो आणि त्याचा अर्थ इतकाच, की सार्वजनिक जीवनात या व्यक्ती जे विचार मांडत आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. ओक आणि वर्तक यांच्या तुलनेत ही बांधीलकी स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे 'पोपचे निवासस्थान हे पूर्वीचे श्रीस्थान (सिस्टाईन चॅपेल) होते.' किंवा 'मी स्वप्नावस्थेत मंगळावर सूक्ष्मदेहाने विहार करुन आलो' असल्या दाव्यांपेक्षा मला भारतीय तरुणांनी आपल्या पारंपरिक ज्ञानसाठ्याचा शोध घेऊन समाजाभिमुख अभिनव उत्पादने विकसित करावीत, हा विचार जास्त महत्त्वाचा वाटतो. आपले प्रश्न आपण त्याच प्रभृतींना विचारावेत व शंकानिरसन करुन घ्यावे, ही विनंती. माशेलकरांनी कुठले पेटंट मिळवले आहे किंवा माईलस्टोन रिसर्च केले आहे हा प्रश्न मला 'अण्णा हजारेंनी कधी निवडणूक लढवली आहे, त्यांना संसदीय प्रणालीचा काय अनुभव?' यासारखा वाटतो. अशा प्रश्नांची थेट उत्तरे मला मिळवावीशी वाटत नाहीत. 'पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा' ही तरुणांची अपेक्षा ते पूर्ण करत आहेत. बस्स. पुरेसे आहे.

In reply to by योगप्रभू

मला फक्त कोणाला माहिती पाहिजे असल्यास पाहिजे होती. अर्थात अण्णांची आणि त्यांची तुलना चुकिची आहे हे जाताना नमूद करतो. असो ही माहिती मला का पाहिजे आहे हेही जाता जाता नमूद करतो. या दोन लोकांच्या कार्यामुळेच त्यांच्या विचारांशी बांधिलकीचा प्रश्न सामान्यजनात उद्भवतो. त्यामुळे त्यांचे कार्य काय हा प्रश्न मनात उभा राहिला म्हणून विचारला. सरळ सरळ साधा प्रश्न. त्यातून कृपया कसलाही अर्थ काढू नये. यासाठी मी एक वेगळा धागा काढीन. आपल्या प्रतिसादात यांचे नाव वाचले म्हणून वाटले की आपाल्याला काही माहीत असेल. तुमचा प्रतिसाद ठीक वाटला.

In reply to by जयंत कुलकर्णी

केवळ वरील प्रतिसादात विचारलेली माहिती म्हणून माशेलकरांच्या संदर्भातील खालील प्रतिसाद वाचावा. यातून पुर्वीच्या काळात विमाने होती अथवा नव्हती असे काहीच सिद्ध करण्याचा या प्रतिसादाचा उद्देश नाही. ;) श्री माशेलकर यांचे संशोधनातील कार्य काय... माशेलकरांची पब्लीकेशन्स आणि त्याचे कितीवेळेस सायटेशन केले गेले आहे, याचा अंदाज येथे येऊ शकतो. म्हणजे त्यांनी किती पेटंट्स मिळवली आहेत विकीवरील माहितीप्रमाणे, ‘Managing Intellectual Property’ च्या २००३ - २००५ च्या जागतीक सर्वेक्षणानुसार माशेलकर हे पेटंटक्षेत्रातील जगातील पन्नास दिग्गजांपैकी एक आहेत. त्यांनी भारतात या संदर्भात सरकारपासून औद्योगिक क्षेत्रात जागृती आणली. भारतातील (आणि तेच इतरत्रही) अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीचे पेटंट करण्याचा घाट आंतर्राष्ट्रीय कंपन्यांनी घातला होता/ आहे. त्यातील भारतासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या घटना म्हणजे हळद आणि बासमती... या दोन्हींच्या संदर्भात त्यांच्या नेतॄत्वाखाली युएस (सरकारी) पेटंट संस्थेत आणि आंतर्राष्ट्रीय पेटंट संस्थेत त्यांनी लढत दिली. परीणामी हळद आणि बासमती वाचलेच पण नैसर्गिक साधन संपत्तीचे पेटंट कसे करावे आणि नाही करावे या संदर्भात नवीन धोरणे तयर झाली, ज्याची मदत इतर विकसनशील राष्ट्रांनाही झाली. पेटंट देताना अधिकारी आधी ते ज्ञान उपलब्ध माझ्या लेखी त्यांनी हे काम अ‍ॅक्टीविझम/चळवळेपणा करण्याऐवजी, सध्याच्या नितीनियमांनुसार केले. सरस्वती आणि लक्ष्मी या एकत्र नांदायला हव्यात, थोडक्यात इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचे रक्षण होऊन त्यातून वैभव निर्मिती होयला हवी असे काहीसे त्यांचे मत होते/आहे, जे त्यांनी त्यांच्या मर्यादीत क्षमतेत उद्योग आणि सरकारमधे जागृत केले आहे असे वाटते. त्यांना सगळ्यात महत्वाचे असे कुठले (नोबेल सारखे) मिळवले आहे का ? आपल्याला त्यांना पारीतोषिक मिळाले आहे का असे विचारायचे असावे. नोबेल मिळाले म्हणजेच फक्त उत्तम असे आपले म्हणणे नसावे असे गृहीत धरतो. टाटा मोटर्सचे डायरेक्टर म्हणून फोर्ब्स मधे दिलेल्या माहितीनुसारः
Dr. R A Mashelkar: Dr. Mashelkar is an eminent chemical engineering scientist and has retired from the post of director general from the Council of Scientific & Industrial Research. Dr. Mashelkar is the President of the Indian National Science Academy, National Innovation Foundation, Institution of Chemical Engineers, UK and Global Research Alliance, a network of 60,000 scientists from five continents and has been honoured with honorary doctorates from 26 universities, including Universities of London, Salford, Pretoria, Wisconsin and Delhi. Dr. Mashelkar has also been elected as Fellow/Associate of Royal Society, London, National Academy of Science, USA, US National Academy of Engineering, Royal Academy of Engineering, U.K. and World Academy of Art & Science, USA. Dr. Mashelkar has won over 50 awardsand medals at national and international levels, including the JRD Tata Corporate Leadership Award and the Stars of Asia Award (2005). Dr. Mashelkar through leadership of various organizations/ Government Committees has propagated innovation and intellectual property rights and India?s science and technology policies. He is a Padmashri (1991) and Padmabhushan (2000) winner, and also a winner of the ?Punyabhushan Award? in 2008. He was appointed as a Director of the Company on August 28, 2007. He is also on the board of directors of various multinational companies, including Hindustan Unilever Limited, Reliance Industries Limited, Piramal Life Sciences Limited, KPIT Cummins Infosystems Limited and ICICI Knowledge Park.
यात नसलेल्या पण विकीवरील माहितीप्रमाणे त्यांना भारतापुरते वैज्ञानिकांमध्ये प्रतिष्ठीत मानले गेलेले शांतीस्वरूप भटनागर पारितोषिकही मिळालेले आहे. त्या व्यतिरीक्तः Pandit Jawaharlal Nehru Technology Award (1991), G.D. Birla Scientific Research Award (1993), Material Scientist of Year Award (2000), IMC Juran Quality Medal (2002), HRD Excellence Award (2002), Lal Bahadur Shastri National Award for Excellence in Public Administration and Management Sciences (2002), World Federation of Engineering Organizations (WFEO) Medal of Engineering Excellence by WFEO, Paris (2003), Lifetime Achievement Award by Indian Science Congress (2004), the Science medal by the Academy of Science for the Developing World (2005), Ashutosh Mookherjee Memorial Award by Indian Science Congress (2005), etc.

In reply to by जयंत कुलकर्णी

अशीच काही भटकरांविषयी आहे का ? त्यांचे विकीपान दिसले. जालावर अजून नक्की असेल. शोधा म्हणजे सापडेल. :-) माशेलकरांबद्दल आधी ऐकलेले होते म्हणून देऊ शकलो. श्री भटकरांनी अमेरिकेने सूपर काँप्युटर नाकारला म्हणून त्यांनी येथे तयार केला अशी बरीच टिमकी वाजवली गेली. ती टिमकी नाही तर वास्तव इतिहास आहे. (वास्तव रामायण नाही ;) ) रेगन आणि पहील्या बूशच्या काळात भारत-अमेरीका संबंध रसातळाला होते असे मला वाटते. त्याचे कारण अर्थातच शीतयुद्ध आणि आपले कम्युनिस्ट रशियाशी असलेली जवळीक आणि अमेरीकेशी असलेला दुरावा. सुपरकाँप्यूटर हे जसे विकासकामासाठी वापरले जाऊ शकतात तसेच अण्वस्त्रांसाठी देखील. म्हणून तत्कालीन बूशसरकारने ते आपल्याला देण्यापासून अमेरीकन "क्रे सुपरकाँप्यूटर" कंपनीस अटकाव केला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ते मनावर घेतले आणि प्रथम हजारो कोटी रुपयांची सरकारी गुंतवणूक केली. त्याचाच एक भाग म्हणून सीडॅ़कची स्थापना झाली आणि त्याचे पहीले नेतृत्व हे भाटकरांकडे सोपवले. पुढचा इतिहास आहे. भारत त्यावेळेस स्वतःचे सुपरकाँप्यूटर्स असलेला जगातील तिसरा देश होता (अमेरिका आणि जपान हे उर्वरीत दोन). भारताने त्यावेळेस इतर प्रगत देशांकडून ऑर्डर्सपण मिळवल्या. मात्र असले प्रकल्प हे सरकारी अनुदानावर चालतात. दुर्दैवाने आत्तापर्यंत सर्वच सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या मागे असलेला चीन पुढे गेला... अर्थातच सरकारी संस्थेचे संचालक म्हणून (अजून आहेत का माहीत नाही) भाटकरांना आणि त्या संस्थेस सरकारच्या ध्येयधोरणाशी संलग्न असलेले प्रकल्प राबवणे भाग होते. सरकारच्या दृष्टीने (आणि आजकाल अनेक मोठ्या खाजगी कंपन्या देखील असेच म्हणतात पण धंदा म्हणून!) ग्रामिण जनतेसाठी आयसीटी अर्थात "इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी" चा पुरस्कार महत्वाचा होता. काही अंशी त्याचे फायदे देखील पहात आहोत. त्या अनुषंगाने त्यांनी भारतीय भाषांचे फाँट्स आणि "Education to Home Mission" चालू केले. ते जेंव्हा चालू केले तेंव्हा जालावर देवनागिरी अथवा इतर भारतीय भाषांचे फाँट्स सहज उपलब्ध नव्हते. पण नंतर सगळेच सहज उपलब्ध झाले आणि त्या प्रकल्पाचे ते महत्व राहीले नाही. आता काय चालू आहे मला तरी माहीत नाही. हे काही भाटकर अथवा आधी माशेलकरांच्या बचावात अथवा स्तुतीपर लिहायच्या उद्देशाने लिहीलेले नाही. मी कुणाचाच व्यक्तीपूजक नाही. पण भाटकर-माशेलकरच नाही तर जे अशी कामे करतात त्यांचे कुठलेच काम कमी महत्वाचे नसते. विशेष करून ज्यानी देशाच्या विकासास दिशा आणि गती मिळते... असो.

१८९५ ला शिवंकर बापूजी तळपदे यांनी मरुत्सखा नावाचे मानवरहित विमान उडवले. http://articles.timesofindia.indiatimes.com/2004-10-18/mumbai/27162445_… आता हे विमान आत्ताच्या अर्थाने विमान होते की नव्हते? हा वेगळा मुद्दा आहे. किमानपक्षी काहीतरी झाले होते हे नक्की. लोकांचा दावा असतो की "वैमानिक शास्त्र" नामक ग्रंथाच्या आधारे प्राचीन भारतातील विमानाचे अस्तित्व सिद्ध होते. पण तो ग्रंथ कुठे मिळेल? त्यासंबंधी नेटवर शोध शोध शोधले, पण ज्या लिंक्स मिळतात, त्यामध्ये ४-५ आकृत्या आणि "वैमानिक शास्त्रात असे असे लिहिले आहे" यापलीकडे घंटा काही मिळत नाही. आय आय एस सी च्या काही लोकांनी एक पेपर त्यावर पब्लिश केलाय, तो इथे पहा. http://cgpl.iisc.ernet.in/site/Portals/0/Publications/ReferedJournal/AC… नाशिकला विविध पोथ्यांचा डिजिटाइझ्ड संग्रह बाळगणारे श्री. दिनेश वैद्य यांना मी याबद्दल विचारले तर ते म्हणाले की बडोद्यातील सयाजी युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये त्या ग्रंथाची हस्तलिखित पोथी आहे आणि ती मिळवण्याचा ते प्रयत्न करताहेत. काही दिवसांनी माझा एक मित्र नाशिकला गेला असताना त्यांना भेटण्याबाबत मी त्याला सांगितले. तो भेटला, त्यांच्याकडे त्यावेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हस्तलिखित डिजिटाइझ्ड रूपात होते, पण मित्राला काही ते बघता आले नाही. दिनेश वैद्य यांच्याशी मी आधी फोनवर बोललो आहे आणि मला माणूस प्रामाणिक वाटला. त्यांच्याबद्दलची बातमी इथे पहा. कुणाला कुतूहल असल्यास त्यांचा मोबाइल नंबर देखील आहे तिथे. http://www.thinkmaharashtra.com/index.php?option=com_content&view=artic… आता त्या पेपरच्या संदर्भाग्रंथांत दिल्लीच्या एका प्रकाशकाने वैमानिक शास्त्र प्रकाशित केले आहे असे दिसते. ते पहिले पाहिजे. मूळ पोथीवर भर देण्याचे कारण म्हणजे त्यामुळे हा प्रकार किती जुना आहे त्याची थोडी तरी कल्पना येईल. बाकी त्या पेपर मध्ये जे २-४ श्लोक दिलेत, त्यावरून वाटते की लेखकाला विमान या प्रकारची थोडी कल्पना असू शकते. विमान ज्या तत्वावर चालते, त्याची चर्चा ग्रंथाचा आधार देऊन अतिशय त्रोटकपणे केली आहे. त्यामुळे नक्की काहीच सांगता येत नाही. आता गविंसारखे लोक इथे असताना मी विमानाबद्दल काय बोलणार? पण हे आग्रहाने सांगावेसे वाटते की लोकांचे दावे ज्या ग्रंथावर आधारलेले असतात, त्या ग्रंथाचा अभ्यास करूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी केले पाहिजे म्हणजे या विषयाचा एकदा काय तो कंडका पडेल. थोडक्यात: १. वैमानिक शास्त्र या ग्रंथाची मूळ संहिता म्हणजे पोथी किंवा गेलाबाजार इंग्रजी भाषांतर मिळविणे. २. त्या आधारे नेमके काय लिहिले आहे आणि ते विमान तयार करण्यासाठी/उडवण्यासाठी लागणाऱ्या सध्याचा आपल्या ज्ञानाच्या तुलनेत ते कसे आहे? लिखाण किती अंशी सूचक आणि किती अंशी डायरेक्ट? सूचक लिखाणाला फारशी किंमत देऊ नये या मताचा मी आहे. काही अंशी तरी का होईना डायरेक्टपणा पाहिजेच. ३. केसरीच्या कार्यालयात जाऊन तळपद्यांची बातमी नेमकी काय होती ते पाहणे. हे केले पाहिजे. १ आणि २ सोडले तरी ३ करण्यासारखे आहे. जमल्यास मीच करेन ते कधीतरी. असो.

In reply to by बॅटमॅन

पण हे आग्रहाने सांगावेसे वाटते की लोकांचे दावे ज्या ग्रंथावर आधारलेले असतात, त्या ग्रंथाचा अभ्यास करूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी केले पाहिजे म्हणजे या विषयाचा एकदा काय तो कंडका पडेल. तुमचा प्रतिसाद आणि विचारपद्धती अत्यंत योग्य आहे. मी जे म्हटलंय त्यात छद्म लगेच दिसेल पण तुम्ही संयत शब्दात ते म्हणून योग्य मुद्दा पुढे आणला आहे. यात एकच अ‍ॅडिशन अशी, की ते ग्रंथ १. मिळून २. त्यानुसार प्रयोग करुन ३. उडणारं विमान किंवा तत्सम ब्रेकथ्रू मिळेपर्यंत, चालू ज्ञान वापरुन किमान जगाच्या लेव्हलला रहावे. तळपदे प्रयोग करुन गेले त्यानंतर सव्वाशे वर्षांत राईटच्या कापडी/लाकडी फ्लायरपासून सुपरसॉनिक जेट्सपर्यंत प्रगती झाली.. एअरबस ३८० आली.. आपण भारतीयांनी याच सव्वाशे वर्षात जी विमानं देशात आणली ती सर्व आयात केलेली किंवा इंजिन आणि बॉडी असे महत्वाचे भाग आयात करुन इथे फक्त जोडलेली.. हे कसं विसरायचं ?

In reply to by बॅटमॅन

ये हुई ना कुछ बात. फेसबुकावर फुकाचे फकाणे फेकण्यापरिस हे केले तर काही महत्त्वपूर्ण हाती येईल नि नवे निर्माणही होईल आणि आमच्यासारख्या चिंतातुर जंतूंनादेखील जमावाचा भाग होण्याचे भाग्य लाभेल. उगा खातापिता अस्मितेचे ढेकर देऊन काय साधणार?