✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा

य
यनावाला यांनी
Sun, 04/15/2012 - 14:40  ·  लेख
लेख
अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा "प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता.कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली.एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले."रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे. प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्‍ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत.काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली. अनेकजण बळी पडले.वास्तुशकुनींनी पैसे कमावले. आता या दिशाभुलीचा हास्यास्पदपणा लोकांच्या ध्यानीं येत आहे.साथ आटोक्यात आली आहे.लौकरच हा रोगाणू नामशेष होईल.याप्रमाणे अनेक अंधश्रद्धा अस्तंगत होतात.पण फसवणूक करणे हाच ज्यांच्या उपजीविकेचा आधार असतो असे लबाड लोक नवनव्या अंधश्रद्धा पसरवतात. श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नसते. या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23529 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

सहमत

विकास
Mon, 04/16/2012 - 19:56 नवीन
लेखाच्या मतितार्थाशी सहमत. कुठलीही अंधश्रद्धा आणि त्यात अडकणे हे घातकच असते. फक्त असल्या अंधश्रद्धा केवळ व्यक्तींपुरत्याच मर्यादीत असतात. पण सगळेजण समान आहेत याचा अर्थ मार्क्सवाद आणि समाजवादाप्रमाणे घेतल्याने केवळ काही व्यक्तींचेच नाहीतर संपूर्ण देशाचे नुकसान झाले. ती देखील एक अंधश्रद्धाच होती आणि गंमत म्हणजे आजही असे अनेकांच्यात ती दिसून येते. फारतर त्याला सेक्यूलर अथवा निधर्मी अंधश्रद्धा म्हणू शकतो. पण आपले म्हणणे करणारे हे अंधश्रद्ध, मुहं मे "all are equal", असे म्हणत देशाचे आणि समाजाचे अधिक नुकसान करत आहेत. त्या अंधश्रद्धेचे निर्मुलन कसे करायचे?
  • Log in or register to post comments

जुन्या जाऊन नव्या वैज्ञानिक

अप्रतिम
Mon, 04/16/2012 - 20:12 नवीन
जुन्या जाऊन नव्या वैज्ञानिक मुलामा लावलेल्या अंधश्रद्धा येताहेत....
  • Log in or register to post comments

तथाकथित नाडी विद्ये बद्दल हेच

माझीही शॅम्पेन
Mon, 04/16/2012 - 23:03 नवीन
तथाकथित नाडी विद्ये बद्दल हेच म्हणता येईल का ?
  • Log in or register to post comments

अरेरे..आता इथेपण का?

एक
Mon, 04/16/2012 - 23:52 नवीन
कुठे जायची सोय ठेवली नाही. लेखात एक मत असं व्यक्त होत आहे की एक अंधश्र्द्धा जाते आणि दुसरी येते. हे निरीक्षण सांगणं एवढाच लेखाचा उद्देश आहे का? मग हे तर आम्हाला ही दिसतं. (तसे ट्रेण्ड आम्हाला विज्ञानातही दिसतात. पण त्या बद्दल नाही हा बोलायचं. ते विज्ञान आहे..) मग त्यात नवीन असं काय सांगितलं? बरं, या अंधश्रद्धा किती वेगाने येतात, किती वेगाने जातात, किंवा जाण्याचं प्रमाण आणि येण्याचं प्रमाण या बद्दल काही एनेलिसीस लेखात आहे का? त्यावरून काही निष्कर्ष काढला आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे, अंतु बर्वा ष्टाईलमधे "या लेखाला 'लाईक' तरी कुठ्ल्या खात्यावर करायचं?" एक उद्देश वाटतो तो असा.. नवीन नवीन एक पंचलाईन कळली आहे (ती सुद्धा नक्की कोणाची आहे हे माहित नाही) ती सांगण्यासाठी एवढा लेख. ती लाईन तशीही अनेक वेळा अनेकांनी ऐकली/वाचली आहे हा मुद्दा वेगळा. - एक अंधश्रद्ध (रिकामटेकड्या लोकांसाठी नवीन हॅण्डल. घ्या खेळा.)
  • Log in or register to post comments

हं?

Nile
Tue, 04/17/2012 - 04:49 नवीन
अरेरे..आता इथेपण का? कुठे जायची सोय ठेवली नाही.
हं? तोंड दाबून कोणी लेख वाचायला लावत आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

हा हिंदूद्वेष्टा भिकारचोट

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/17/2012 - 11:58 नवीन
नायल्या इथे काय करतोय ? शंकराचार्य परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आले आले..

एक
Tue, 04/17/2012 - 21:43 नवीन
वाटच बघत होतो... वकिल सरसावले पुढे! पण मी लेखा बद्द्ल जे मुद्दे उपस्थित केले (उ.दा. एनेलिसीस किंवा ट्रेण्ड ची कमतरता असणे, किंवा नुसतच निरिक्षण , जे सर्वांनाच दिसतं ते नोंदवणे. त्यामुळे लेखाची किंमत माझ्या दृष्टीने शुन्य ठरते) त्या बद्दल एक चकार शब्द नाही. जाऊ दे.. बादवे, आमच्या मिसळीत झुरळ पडलं तर आम्ही ती मिसळ टाकून देतो आणि मिसळवाल्याला थोड्या शिव्यापण घालतो. हा आवडी-निवडीचा प्रश्न आहे. आता आम्हाला नाही आवडत झुरळं! पण एरवी मिसळ चांगली मिळते ना म्हणून तक्रार करायची कि "बाबा थोडी काळजी घ्या. तुमची चांगली रेप्युटेशन आहे, तुमची मिसळ चांगली असते. पण असा हलगर्जीपणा करू नका."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ब्वॉर्र!

Nile
Wed, 04/18/2012 - 01:11 नवीन
वाटच बघत होतो..
हो, तुम्ही आठवण काढल्याने उचक्या लागल्या म्हणूनच आलो.
वकिल सरसावले पुढे! पण मी लेखा बद्द्ल जे मुद्दे उपस्थित केले (उ.दा. एनेलिसीस किंवा ट्रेण्ड ची कमतरता असणे, किंवा नुसतच निरिक्षण , जे सर्वांनाच दिसतं ते नोंदवणे. त्यामुळे लेखाची किंमत माझ्या दृष्टीने शुन्य ठरते) त्या बद्दल एक चकार शब्द नाही.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

अस्सं होय !!

अर्धवटराव
Tue, 04/17/2012 - 06:22 नवीन
>>"प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता. कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली. -- आपला काहि पर्सनल अनुभव नाहि बुवा... तेंव्हा पास. हां, आता ती अंधश्रद्धा नामशेष झालि कि काय याबद्दल दुमत आहे. आमच्या कॉलेजचे रिकामटेकडे उद्योगी अजुनही नवनवीन अवतार घेऊन हे असले प्रयोग करत असावे अशी खात्री आहे. >>एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले. -- फारच मोघम वाक्य. हे विधान अनेक टेक्नोलॉजी, थेरपीज, रसायनं, अ‍ॅलोपॅथी औषधी, मानसशास्त्रीय प्रयोग, डाएट प्रोग्राम्स.. असल्या असंख्य बाबतीत खरे आहे. >>"रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे. -- ज्यांना "रेकी" चा चांगला अनुभव आला अशे अनेक लोक पाहाण्यात आहेत. शिवाय ति (जरी अंधश्रद्धा असली) नामशेष वगैरे नाहि झालेली. अजुन "मुर्खांचा" तोटा नाहि हो जगात. >>प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्‍ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत. -- अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धांवर खरच एखादा डाटाबेस आहे काय लेखकाजवळ ? अस्ताचा इतका छातीठोक दावा करताय म्हणुन विचारतोय... कि ती सुद्धा एक "डोळस श्रद्धाच" आहे ? ;) >>काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली. -- या शास्त्राचं नाव पहिल्यांदाच ऐकतोय... >>पण फसवणूक करणे हाच ज्यांच्या उपजीविकेचा आधार असतो असे लबाड लोक नवनव्या अंधश्रद्धा पसरवतात. -- हे सुद्धा फारच मोघम विधान आहे. लबाडी करण्याच्या ट्रीक्स कुठल्या प्रांतात चालत नाहित? इनफॅक्ट, हा तर एंटरप्रेनशीपचा वास्तुपाठ म्हणावा ;) >>श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नसते. -- एकदम चुकीचे विधान. करेक्ट स्टेटमेंट असे: "भोळसटपणाला सीमा नसते". बरं, प्रत्येक मनुष्य अगदी हुषार, स्मार्ट, चौकस वगैरेच असला पाहिजे हा अट्टहास का? जगु द्या कि शांतपणे सर्वांना. >>या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही." -- या सुवचनावर लिहावं तेव्हढं कमीच. सध्या एव्हढच सांगता येईल कि इथे हे सुवचन सॉलीड गंडलय :) बाकि लेखकाच्या भावना समजल्या. त्याच्या प्रामाणीकपणाविषयी काहि शंका नाहि (आयला, शंका नाहि म्हणजे श्रद्धा->म्हणजे अंधश्रद्धा->म्हणजे आम्हि भोळसट-> म्हणजे आम्हि अमर्याद... ययाआआआहूऊऊऊ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद वाचल्यानंतर

यकु
Tue, 04/17/2012 - 11:27 नवीन
हा प्रतिसाद वाचल्यानंतर मर्यादित खिडकीतून अमर्यादीत आकाशात उडी मारण्यात आली आहे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

एय्य, व्हॉट आय टोल्ड यु

कवितानागेश
Tue, 04/17/2012 - 11:32 नवीन
एय्य, व्हॉट आय टोल्ड यु चिल्ड्रन... नो कबड्डी हियर बरं का...... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ब्वॉर्र!! जातोय .. जातोय..

यकु
Tue, 04/17/2012 - 11:36 नवीन
ब्वॉर्र!! जातोय .. जातोय.. मैदानावर जातोय :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

न जाणार्‍या

नितिन थत्ते
Tue, 04/17/2012 - 08:07 नवीन
काही अंधश्रद्धा मात्र कधीच अस्तंगत होणार नाहीत. कारण त्यांच्यामुळे एक प्रकारची नशा येते.
  • Log in or register to post comments

बरं मग? तुमचं काय म्हणणं आहे

शिल्पा ब
Tue, 04/17/2012 - 11:17 नवीन
बरं मग? तुमचं काय म्हणणं आहे हे एक गुपितच राहीलं की!!
  • Log in or register to post comments

उदयास्त...

विकास
Tue, 04/17/2012 - 18:41 नवीन
भारतात जेंव्हा सुर्यास्त होतो तेंव्हा अमेरीकेत सुर्योदय होत असतो. अंधश्रद्धांच्या बाबतीत पण असेच आहे का कळत नाही... आजच आमच्याकडील कर्मचार्‍यांसाठीच्या जत्रेमध्ये ब्लडप्रेशर वगैरे तपासणीचे बुथ्स आहेत पण त्याच बरोबर "रिलॅक्सेशन विथ रेकी" पण आहे! म्हणून सहज गुगल केले तर http://www.reiki.org/ हे अधिकृत संस्थळ दिसले. (रेकी हा काय प्रकार आहे, हे केवळ ऐकून माहीत आहे. जे काही ऐकले आहे त्यावरून त्यात काही वैज्ञानिक वाटले नाही... अजून एक आठवले: पुलंच्या आजारपणात त्यांचे काही चाहते सारखे रेकी करू लागल्याचे त्यांना कळले तेंव्हा पुल म्हणाले, हे अतिरेकी झाले. ;) )
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा